Tuesday 12 November 2019

ज्योतिषशास्रातील महत्त्वाचे नियम (भाग -२) (ASTROLOGY TIPS-2)

ज्योतिषशास्रातील महत्त्वाचे नियम (भाग -२)
          (ASTROLOGY TIPS- part 2)                        ज्योतिषशास्त्राचा खरोखर शास्त्रीय अभ्यास करावयाचा आहे ,त्याने निरनिराळी ज्योतिषशास्त्राची पुस्तके वाचून आपणाला पटणारी अशी काही जातक-शास्त्रीय तत्त्वे वा सूत्रे ( Rules of Predictive Astrology) एकत्र करून नंतर ती अभ्यासून पहावीत,  हे करीत असतां ती तत्त्वे वा सूत्रे त्याने निरनिराळ्या जन्मपत्रिकांनालावून पहावी आणि पडताळ्याच्या स्वरूपांत तपासून घ्यावी
प्रत्येकाची कुंडली परीक्षणाची पद्धतनियमाचा वापर करण्याची हातोटीअंतीम फलादेशास पोहचण्याची पद्धत वेगळी असू शकते. एकाच घटनेसाठी काही ठिकाणी एकापेक्षा जास्त नियम दिलेले आढळतात, प्रत्येकाला येणारा अनुभव निराळा असल्याने प्रत्येकजण आपली स्वतःची पद्धत व नियम अनुभवांती ठरवित असतो. त्यामुळे एकापेक्षा जास्त नियम आढळले तर, नविन अभ्यासकांनी गोंधळुन जाण्याचे कारण नाही. ज्याने त्याने आपल्या अनुभवानुसार कोणता नियम किंवा पद्धत वापरावी हे ठरवावे. 
माझ्या अभ्यासांत, मी जी अनेक ज्योतिषशास्त्राची पुस्तके वाचली व त्यातील जे मला पटले:-                                                           त्या पुस्तकांमधीलशास्त्रीय तत्त्वे वा सूत्रे :-(Rules of Predictive Astrologyखाली एकत्र देत आहे.:- 
(हे नियम, पत्रिकेतील इतर शुभाशुभ योगांचा तारतम्याने विचार करूनच उपयोगात आणावेत )


(१) लग्नेश बलवान् असलेला मनुष्य प्रामाणिक व भाग्यवान असतो.

(२) लग्नेश लग्नांत असलेल्या मनुष्याचे शरीर निरोगी असते. 

(३) लग्नांत शुभग्रह असणे हे भाग्यशालीपणाचे द्योतक होय.

(४) लग्नेश निर्बली असलेला मनुष्य भाग्यहीन असतो. 

(५) लग्नाचा अधिपति जर प्रथम किंवा द्वितीय स्थानांत असेल तर प्रथम संतति पुत्र होतें. 

(६) लग्नस्थानी असलेले पापग्रह मनुष्याला दुःखी करतात.

(७) लग्नेश व चतुर्थेश जर का मित्रग्रह असतील तर अशा मनुष्याचा मित्रपरिवार फार मोठा        असेल. 

(८) जर लग्नस्थानावर निर्बल मंगळाची दृष्टि असेल तर मनुष्याचा, स्वभाव भित्रा असतो. 

(९) लग्नांत जलराशि असून ते शुभग्रह युक्त किंवा दृष्ट असेल तर मनुष्याचे शरीर बळकट राहील.

१०) लग्नेश षष्ठांत किंवा षष्ठेश लग्नांत असलेला मनुष्य- शूर वा धाइसी स्वभावाचा असतो. 

११) लग्नेश पापग्रहयुक्त असून,जर का ६,८ किंवा १२ या स्थानी असेल तर  मनुष्याला शरीरसौख्य मिळणार नाही. त्याच्या प्रकृतीची  नेहमी  काहींना कांहीं रड राहील. 

१२) लग्नेश ६ किंवा ८ या स्थाना  मनुष्य तापट स्वभावाचा असतो 

(१३) लग्न व अष्टम या स्थानांचे अधिपति जर ६ किंवा १२ स्थानी असतील तर मनुष्य अल्पायु होईल. 

(१४) लग्नेश निर्बली असून, जर का ६, ८ व १२ या स्थानी पापग्रह असतील तर मनुष्य अल्पायु होईल. 

१५) लग्नेश आणि धनेश पंचमांत असलेला मनुष्य भाग्यशाली असतो. 

(१६) लग्नेश चतुर्थात व चतुर्थेश लग्नांत असा योग असेल तर मनुष्याला घरदार व वाहन यांचा लाभ होतो. (गोचरीने ज्यावेळी लग्नेश चतुथीत येतो त्यावेळी मनुष्याच्या मनांत घरासंबंधी विचार निर्माण होतात. हा नियम शीघ्रगती ग्रहांच्या बाबतीत अनुभवास येणार नाही.) 

१७) धनस्थानाचा अधिपति जर शनीयुक्त असेल तर आयुष्याच्या उत्तरार्धात संपत्ति योग येतो. 

१८) धनस्थानांत पापग्रह असलेल्या मनुष्याचा चेहरा भव्य असतो. 

(१९) धनस्थानाचा अधिपति व गुरु हे जर धनस्थानांत किंवा केंद्रांत असतील तर मनुष्य संपत्तीमान होईल. 

(२०) धनेश लाभांत, लाभेश भाग्यांत व भाग्योश धनांत या योगावर जन्मलेला मनुष्य निःसंशय भाग्यशाली होईल. 

(२१) धनस्थानाचा अधिपति जर चतुर्थेशाबरोबर असेल किंवा त्याच्या योगात असेल तर मनुष्याला त्याच्या मातेकडून सांपत्तिक लाभ होईल. 

(२२) धनेश स्थिर राशीत असतां मनुष्य सावकाश जेवणारा असतो. 

(२३) धनेश बुधाबरोबर असतां मनुष्य वक्ता होतो. 

(२४) धनेश शुक्राबरोबर असेल तर नेत्ररोग निर्माण होतील. 

(२५) धनस्थानांत चंद्र+शक्र, चंद्र + बुध, चंद्र + गुरु असे योग असलेली माणसें गोडबोली असतात. 

(२६) धनस्थान व लाभस्थान,यांचे अधिपति जर पापग्रहांशी युति करतील तर मनुष्याचीआर्थिक स्थिति केव्हांहि समाधानकारक राहणार  नाही. 

(२७) धनेश शुभग्रह असून अष्टमांत असेल तर अचानक आर्थिक लाभ होतील.

(२८) धनेश अष्टमांत असलेली माणसे आपल्या कुटुंबियांचे हाल करून धनसंचय करतात. 

(२९) धनेश व्ययांत असलेला मनुष्य स्वाभिमानी परंतु धनहीन असेल. 

(३०) धनेश व्ययांत आणि व्ययेश धनांत असा योग असेल तर निःसंशय धननाश होईल. 

(३१) तृतियेश तृतियांत असून शुभग्रहाने दृष्ट असेल तर मनुष्याला भावंडांकडून सुख मिळेल. 

(३२) तृतियस्थानांत पापग्रह असतील किंवा त्या स्थानांवर पाप ग्रहांची दृष्टि असेल तर भावंडांची खचित् हानि होईल. (कांहीं भावंडें मृत्युमुखी पडतील.) 

३३) तृतियेश जर शुभग्रहाने युक्त असा केंद्रांत असेल मनुष्याला भावंडांचे सुख मिळेल.  

३४) तृतिय व प्रथम स्थानांचे अधिपति जर एकमेकांचे मित्र तर मनुष्याचे आपल्या भावंडांशी पटेल, (मित्र नसतील तर  अर्थातच पटणार नाही.) 

३५) तृतीय स्थानांत शनि असून त्यावर मंगळाची दृष्टि असेल तर पाठची भावंडे वाचणार नाहींत. 

३६) तृतियेश जर बुधाने युक्त असेल तर गळ्याचे रोग हातील. 

३७) प्रथम व तृतीय स्थान तृतीय स्थानांच्या अधिपतींची जर युति असेल तर हा मनुष्य साहसी व पराकमी असेल.

(३८) तृतिय स्थानांत दोन किंवा आधिक पापग्रहांची युति असेल सर आधीं जन्मलेल्या किंवा नंतरच्या भावास अपघात होण्याचे भय असते. 

(३९) तृतियेश जर हर्षलच्या प्रतियोगांत असेल तर भाऊ, बहिणी किंवा शेजारी-पाजारी यांच्याशी कांहीं विचित्र कारणामुळे पटणार नाही. 

(४०) तृतियेश लग्रस्थानांत असून जर का राहुयुक्त असेल तर सर्पापासून भय राहील. 

(४१) तृतियस्थानांत किंवा मिथुन वा धनुराशीत शनि, मंगळ या सारखे पापग्रह असतील तर (श्वास, दमा, खोकला) यासारखे विकार उद्भवतील. 

(४२) चतुर्थ स्थानांतील शुभग्रह मनुष्याला सुखी करतात. 

(४३ चतुर्थांचा अधिपति जर गुरुच्या शुभयोगांत असेल तर मनुष्य. सुखी असतो. 

(४४) चतुर्थेश बलवान् असलेली माणसें निष्कपटी व क्षमाशील असतात. चतुर्थात शुभ ग्रह असल्यासहि हीच गोष्ट आढळून येते. 

(४५) चतुर्थेश व लग्नेश यांचा अन्योन्य योग असेल (ते एकमेकांच्या घरांत असतील) तर मनुष्याला गृहलाभ होईल. 

(४६) चतुर्थात शुभग्रह असून चतुर्थेश जर शुभग्रहयुक्त असेल तर मनुष्याला उत्तम भूमीचा लाभ होईल. 

(४७) चतुर्थेश बलवान् असून शुभग्रह युक्त वा दृष्ट असा केंद्रांत असेल तर मनुष्याला घराचा लाभ होईल. 

(४८) चतुर्थस्थानी जर चर रास असेल व चतुर्थेशहि जर का चर राशींत असेल तर मनुष्याला राहण्याचें घर वारंवार बदलावे लागेल. (चतुर्थात हर्षल असतांहि हाच अनुभव येईल.) 
      
(४९) याउलट चतुर्थात स्थिर राशि असेल व चतुर्थेशहि स्थिर राशात असेल तर मनुष्याचा वास एकाच घरांत अनेक वर्षे होईल. 

(५०) चतुर्थातील पापग्रहांच्या युत्या मातृसुखाला हानिकारकअसतात (रवि+मंगळ, रवि+शनि , रवि+ राहू , रवि+हर्षल, शनि+ हर्षल, राहु+मंगळ इ )

५१) चतुर्थात दोन किंवा अधिक पापग्रह असल्यास मनुष्य लहानपणीच पोरका होतो. 

५२) चतुर्थात बुध शुक्र असणारा मनुष्य माग्यवान् असतो.  

५३) चतुर्थेश गुरु किंवा शुक्र असून लग्नस्थानी असेल तर मनुष्याला वाहनाची प्राप्ति होईल. 

५४) चतुर्थेश व चंद्र हे राहुयुक्त दशमांत असल्यास मातृसौख्याची हानि होते. 

५५) चतुर्थस्थानावरून मातेचा विचार होतो. निसर्गकुण्डलीप्रमाणे कर्क रास चतुर्थात येते. त्यामुळे कर्क राशि पापग्रह संबंधामुळे बिघडली , असल्यास मातृसौख्याची हानि करते. 

(५६) चतुर्थेश जर का दुःस्थानांत म्हणजे ६, ८ किंवा १२ या स्थानी असेल तर मनुष्याच्या भूमीचा नाश होईल. (त्याला भूमिसौख्य मिळण्यात अडथळे येतील.)

(५७) चतुर्थस्थानाचा अधिपति पंचमांत असलेला मनुष्य विष्णूभक्त असतो. 

५८) चतुर्थेश अष्टमांत असणे हे अभागीपणाचे द्योतक आहे.  

५९)चतुर्थश भाग्यांत असेल तर गृहलाभ होऊन त्यापासून भरभराट होईल. अशा व्यक्ती धार्मिक असतात. 

(६०) चतुर्थश बलहीन असून पापग्रहयक्त असा व्ययांत असेल तर निःसंशय गृहनाश होईल. 

(६१) चतुर्थात शुभग्रह असतां व्यक्ती पदवीधर असण्याचा बराच संभव असतो. 

(६२) चतुर्थातील शुभग्रह आयष्याचा उत्तरार्ध, आनंदात व सुखा-समाधानात आयुष्य  जाणार असें दर्शवितात. 

(६३) चतुर्थात अग्निराशि असून तेथे रवि व मंगळ चतुर्थेशासह असता घराला आग लागण्याचा संभव असतो. 

(६४) चतुर्थ स्थानाचा अधिपति लाभ स्थानांत असून त्यावर किंवा चतुर्थ स्थानावर गुरुची दृष्टि असेल तर मनुष्याला वाहनसौख्य मिळेल

(६५) चतुर्थस्थानी नीच किंवा अस्तंगत ग्रह असतां पाण्यांतील अपघात होण्याचे भय असतें. 

(६६) चतुर्थस्थानी पापग्रह किंवा पापग्रह दृष्ट असा राहु असतां मनुष्याला गृहसौख्य मिळत नाही. 

(६७) चतुर्थेश अष्टमांत असलेल्या मनुष्याला गृहलाभ होणे कधीहि शक्य नाहीं. 

(६८) चतुर्थेश लग्नेश हे दोन्हीहि बलवान् असून तृतियांत शुभग्रह असेल तर मनुष्याला मोठ्या वाड्याची प्राप्ति होईल. 

(६९) चतुर्थेश केंद्रांत किंवा त्रिकोणांत बलवान् असतां मनुष्याला सुंदर घराचीप्राप्ति होईल. 

(७०) पंचम स्थानावरून संततीचा विचार होतो. पंचमेश व लग्नेश परस्परांकडे पहात असतील, त्यांची परस्परांशी युति असेल किंवा त्यांचा अन्योन्य योग असेल तर मनुष्याला संततीचा लाभ हमखास होईल. 

(७१) पंचम आणि लग्न स्थानाचे अधिपति जर एकमेकांचे मित्र असतील तर मनुष्याचे आपल्या मुलांशी पटेल.  

७२) पंचमस्थानाचा अधिपति जर त्याच्या उच्च राशीत असेल तर मनुष्य अतिशय कुशाग्र बुद्धीचा होईल. 

(७३) स्त्रियांच्या पत्रिकेत पंचमांतील पापग्रह गर्भपात घडवितात. 

(७४) पंचमस्थानी दोन किंवा अधिक पापग्रह असल्यास अपेंण्डीसायटीसचे ऑपरेशन करण्याची वेळ येते. 

(७५) पंचमेश बिघडलेला असून गुरु व शनि हे ग्रह युतीत असतील तर पुत्रसंतती होण्याची शक्यता फारच कमी असते. 

(७६) पंचमस्थानी पापग्रहयुक्त हर्षल असल्यास संततीला फिट्सचा त्रास होतो. 

(७७) पंचमेश चतुर्थात असल्यास संतति होण्यास किंवा ती होऊन जगण्यास अतिशय प्रयास पडतात. 

(७८) स्त्रियांच्या पत्रिकेत पंचमेश + अष्टमेश, पंचमेश + व्ययेश, या युत्या किंवा पंचमेश व व्ययेश अष्टमांत असणे अथवा अष्टमेश व पंचमेश पंचमांत असणे, त्याचप्रमाणे पंचमांत मंगळ- हर्षल युति असणे हे सर्व योग निश्चितपणे गर्भपात घडवितात. 

(७९) पंचमांत मंगळ किंवा हर्षल असल्यास प्रसुतीसमयी ऑपरेशन करावे लागण्याचा संभव असतो.

(८०) पंचमेश अष्टमांत असता संततिसुख अल्पच मिळतें. 

(८१) पंचमेश मिथुन किंवा मीन राशीत असल्यास जुळी संतति होण्याची शक्यता असते. 

(८२) पंचमांत बुध व लाभांत (प्रतियोगांत) शनि किंवा पंचमांत शनि व लाभांत मंगळ असा योग स्त्रियांच्या पत्रिकेत झाल्यास त्यांचा वारंवार गर्भपात (Abortion)  होतो. 
 . 
(८३) पंचमस्थानापासून ४, ८ किंवा १२ या स्थानी पापग्रह असल्यास संततिसौख्य कमी प्रमाणात मिळतें. 

(८४) पंचमेश लग्नांत असून एकाहि शुभ ग्रहाने दृष्ट नसेल तर मनुष्य कर्जबाजारी होईल. 

(८५)  षष्ठस्थानाचा अधिपति षष्ठांत असेल तर मनुष्याचे त्याच्या पित्याकडील नातलगांशी वैर निर्माण होईल. 

(८६) षष्ठस्थानाचा अधिपति केंद्रांत असून पापग्रह दृष्ट असेल तर मनुष्याला नेहमीच त्याच्या शत्रपासून पीडा होईल. क्षुल्लक कारणावरून त्यास अनेक शत्रु निर्माण होतील. 

(८७) षष्ठांत जर का लाभस्थानाचा अधिपति असेल तर मनुष्य असाध्य रोगाने पीडित होईल. 

(८८) षष्ठांत शुभ ग्रह असलेल्या मनुष्याला त्याच्या आईकडील नातलगांपासून (मामा, मावशी) सुख लाभेल. षष्ठस्थानावर शुभग्रहांची दृष्टि असल्यासहि हाच परिणाम दिसेल. 

(८९) षष्ठस्थानाचा अधिपति जर का मंगळाने युक्त असेल मनुष्याला अग्नीपासून भय राहील. 

(९०) षष्ठस्थानाचा अधिपति लग्नांत असेल तर मनुष्याला त्याच्या शत्रूवर विजय मिळेल. 

(९१) षष्ठस्थानाचा अधिपति जर का ६, , किंवा १२ या दुःस्थानांत असेल तर त्या मनुष्याचे नैतिक आचरण चांगले असणार नाहीं. 

 (९२) सप्तमेश सप्तमांतच असेल तर बहुधा सप्तमेशाच्या वारीच व्यक्तीचा विवाह होईल. उदा. सप्तमेश रवि सप्तमांतच असेल तर विवाह रविवारी होण्याची अधिक शक्यता असते. हाच नियम इतर ग्रहांना लावावा. 

(९३) सप्तमेश सप्तमांत दुसऱ्या एखाद्या ग्रहाबरोबर असेल तर व्यक्तीचा एकदांच विवाह होईल.

(९४) सप्तमेश लग्नीं अगर द्वितीयस्थानी असल्यास विवाहानंतरच भाग्योदयास सुरुवात होईल. 

(९५) सप्तमांत तीन किंवा अधिक पापग्रह असल्यास द्विभार्या योग संभवतो. 

(९६) सप्तमस्थान दोन पापग्रहांच्या कर्तरीत असल्यास विवाह सौख्य मिळणे दुरापास्त होते. (शुभग्रहांच्या कर्तरीत असतां चांगले. ) 

९७) सप्तमांत शुक्र किंवा चंद्र वा हे दोन्ही ग्रह असल्यास व्यक्तींचा विवाह लवकर होतो. ज्या मुलींच्या पत्रिकेत असे योग असतील तिच्या विवाहासाठी तिच्या वडिलांना फार उंबरठे झिजवावे लागत नाहींत.बहुधा २।४ ठिकाणी दाखविल्यावरच विवाह जमतो. याउलट सप्तमात शनि सारखे पापग्रह असतील किंवा सप्तमेश शनीने युक्त असेल तर विवाह जमण्यास बराच विलंब लागतो.   

(९८) सप्तमांत बलवान् मंगळ असलेली माणसें रागीट स्वभावाची असतात. 

(९९) सप्तमस्थानी शनि मंगळ व शुक्र हे तीन ग्रह असल्यास व्यक्तीला संतान सौख्य लाभत नाहीं.

(१००) सप्तमेश जितक्या ग्रहांबरोबर असेल तितक्या स्त्रियांशी मनुष्याची मैत्री असते वा संबंध असतो. 

(१०१) सप्तमेश लाभांत असतां पत्नीकडून आर्थिक लाभ होतो. पत्नी मिळवती असते. लाभेश सप्तमांत असेल किंवा लाभेश व सप्तमेश यांचा अन्योन्य योग असेल   तरीहि असेंच फल मिळतें. 

(१०२) सप्तमांतील पापग्रह, शुभग्रहांनी दृष्ट नसल्यास दंतरोग उद्भवतात. 

(१०३) सप्तमेश (किंवा द्वितीयेश) शुक्राच्या राशीस शुक्राने युक्त असतां मनुष्य अतिशय कामी होतो. 

(१०४) अष्टमस्थानाचा अधिपति जर प्रथम किंवा सप्तमस्थानांत असेल तर द्विभार्या योग्र संभवतो. 

(१०५) अष्टमस्थानाचा अधिपति जर पापग्रहाबरोबर षष्ठ किंवा व्ययस्थानी असेल तर मनुष्याला अल्पायु करतो. 

(१०६) अष्टमेश धनस्थानांत असेल तर आयुष्यांत केव्हातरी कर्जबाजारी होण्याचा प्रसंग येतो. 

(१०७) अष्टमेश धनस्थानांत असल्यास तो मनुष्याला चौर्यकर्म करण्यास प्रवृत्त करतो. 

(१०८) अष्टमस्थानाचा अधिपति जर लाभांत असेल तर मनुष्याचें सुरुवातीचे आयुष्य दुःखांत जातें.

(१०९) अष्टमस्थानांत शुभग्रह असतील किंवा तें स्थान शुभग्रहा दृष्ट असेल आणि भाग्यस्थानाचा अधिपति जर का शुभग्रह असेल तर मनुष्याचा मृत्यु तीर्थक्षेत्रीं किंवा एखाद्या पवित्र स्थळी होईल. 

(११०) अष्टमेश पंचमांत असतां वारंवार गर्भपात होणे गर्भाशय विकृति, संततीत व्यंग, कर्ती मुले म्हातारपणी जाणे असें दुर्दैवी प्रकार घडतात. 

(१११) अष्टमस्थानाचा अधिपति लाभांत असेल तर मनुष्य लहान पणीं दुःखी परंतु मोठेपणीं सुखी असतो. 

(११२) अष्टमांत तीन अथवा चार पापग्रह असतां मनुष्याला गुह्यरोग होतात. 

(११३) अष्टमेश अष्टमांत व लग्नेश लग्नांत असतां मनुष्य दीर्घायु होतो. 

(११४) भाग्येश भाग्यांत असलेल्या मनुष्याला प्रसिद्धी फार लवकर मिळते. 

(११५) भाग्यस्थानाचा अधिपति जर शुभग्रह युक्त किंवा दृष्ट असेल तर मनुष्य दानशूर असतो.

(११६) भाग्येश शुभग्रह युक्त असलेली माणसें भाग्यशाली असतात. 

(११७) भाग्यस्थानाचा अधिपति तर का लाभांत असेल तर मनुष्याचा राजदरबाराकडून सन्मान होतो.

(११८) भाग्य व दशमस्थानाचे अधिपति जर एकत्र असतील तर मनुष्याला अनेक तीर्थयात्रा घडतील. 

(११९) भाग्य व लाभ या दोन स्थानांच्या अधिपतींची जर युति असेल तर मनुष्य अतिशय भाग्यशाली असतो. 

(१२०) भाग्य, दशम आणि लाभ या स्थानांचे अधिपति जर का चतुर्थस्थानी असतील तर मनुष्याला निश्चितपणे वाहनसुखाचा लाभ होईल

(१२१) भाग्यस्थानांत पापग्रह असलेल्या माणसाचे हातून अनेक पापकृत्ये होतात. 

(१२२) अष्टमेश आणि लग्नेश हे दोन्हीहि निर्बली असून मंगळ जर का सप्तमेशाने युक्त असेल तर युद्धांत मृत्यु होतो. 

(१२३) दशमेश शनि दृष्ट असेल किंवा दशमांत शनि असेल अथवा दशमेश शनियुक्त असेल तर मनुष्याला काही काळ तरी नोकरी (गुलामी) करावीच लागते. 

(१२४) दशमेश नवमस्थानी असलेल्या व्यक्तींची नोकरीधंद्यांत लवकर प्रगति होत नाही. लायकी असूनहि वरची जागा न मिळणे, एकाच जागेवर (post) अनेक वर्षे काम करावे लागणे असे प्रकार घडतात. 

(१२५) दशमस्थानांत शुभग्रह असून द्वितीय स्थानांत पापग्रह असेल तर दारिद्ययोग होतो. 

(१२६) दशमेश जर शुभग्रहांच्या कर्तरीत असेल तर मनुष्याला मानसन्मानाची प्राप्ति होईल. 

(१२७) दशमस्थान जर का पापग्रहांच्या कर्तरीत असेल तर असा मनुष्य दुसऱ्याला उपद्रव देण्यातच नेहमीं समाधान मानील. 

(१२८) दशमेश जर का बुध किंवा गुरु असेल तर Executive प्रकारची नोकरी मिळूनहि मनुष्याला त्या नोकरीतील बराच काळ कारकुनी कामच करावे लागेल. 

(१२९) दशमेश व भाग्येश यांची युति डॉक्टर, ज्योतिषी वगैरे जनविश्वासावर चालणाऱ्या व्यावसायिकांना चांगली असते. 

(१३०) दशमेश जितक्या ग्रहाबरोबर असेल तितक्या नोकऱ्या होतात, हा नियम सहसा चुकत नाही. 

(१३१) दशमस्थानांतून होणारे गोचरीच्या शनीचे भ्रमण, (नोकरी) व्यवसायांत त्रासदायक प्रसंग निर्माण करते. 

(१३२) लाभस्थानांत तीन शुभग्रहांची युति झाल्यास तो एक उत्कृष्ट प्रकारचा धनयोग होतो. 

(१३३) लाभस्थानांत शुभग्रह असलेली माणसें आनंदी स्वभावाची असतात. 

(१३४) लाभस्थानांत शुभग्रहाबरोबर शुक्र असल्यास तो एक उत्कृष्ट प्रकारचा वाहनयोग होतो. 

(१३५) लाभस्थानांत शुभग्रह असल्यास मनुष्याला अनेक मित्र असतात

(१३६) लाभस्थानांतील पापग्रहांचे अधिष्ठान, संततिसुखाला घातक ठरते. 

(१३७) लाभस्थानाचा अधिपति षष्ठांत असेल तर, मनुष्याला विचित्र प्रकारचे आजार होतील. 

(१३८) व्ययेश लग्नी असलेला मनुष्य अनेक तीर्थयात्रा करतो. 

(१३९) व्ययेश व्ययांत असलेली माणसें, हात राखून खर्च करणारी असतात. 

(१४०) व्ययेश नीच राशीत असेल तर, तो मनुष्याला चौर्यकर्म करण्यास प्रवृत्त करतो. 

(१४१) व्ययेश तृतीयांत असेल तर, मनुष्याला चौर्यकर्म करण्यास प्रवृत्त करतो. 

(१४२) व्ययस्थानांत पापग्रह असून, त्यावर पापग्रहाची दृष्टि असेल तर, चुलते किंवा आत्या यांच्याशी जमत नाही. एखाद्या चुलत्याच्या आयुष्याची शोकांतिका असते 
        .          
(१४३) व्ययस्थानी पापग्रह असल्यास, मनुष्याला शय्यासुख लाभत नाही. 

(१४४) व्ययस्थानी बलहीन ग्रह असून, व्ययेश बलवान् असतां धनहानि होते. 

(१४५) व्ययेश बलवान् असतां,मनुष्य दीर्घायु होतो. 


No comments:

Post a Comment