Friday 2 August 2019

कुंडलीनुसार बुध ग्रहाची स्थानगत फले (MERCURY IN VARIOUS HOUSES)


कुंडलीनुसार - बुध ग्रहाची  स्थानगत फले 

बुध हा सूर्याला अतिशय जवळचा ग्रह असून, तो ग्रह मालेत 'युवराज' म्हणून ओळखला जातो. कारण हा इतर सर्व ग्रहांपेक्षा आकाराने लहान ग्रह आहेबुध हा बुद्धीचा कारक तसेच तो वाणीचा कारक असल्याने वक्तृत्व, उत्तम वक्ते, वकील, सेल्समन, विमा एजंट, राजकीय नेते इ. चा देखील कारक आहे.

बुध हा अत्यंत बुद्धिमान आहेबुध विचारांचे व्यक्त स्वरूप आहे. त्यामुळे बोलणे व लिखाण-साहित्य या गोष्टी बुधावरून पाहतात. तसेच तो भाषा, गणित इ. चा देखील कारक ग्रह आहे. त्यामुळे प्रकाशक, लेखक, संपादक, वृत्तपत्रकार, कारकून, अकाउंटंट, प्रोफेसर, शिक्षक, यांचा कारकदेखील बुध आहे

बुध व्यापाराचाही कारक आहे तसेच बुध मध्यस्थांची कामे करणारा असल्याने दलाल, दलालीचे व्यवसाय, सर्व प्रकारचे एजंट्स बुधावरूनच पाहतात. सर्व त-हेच्या कन्सल्टन्सी सर्व्हिसेस बुधाच्याच अमलाखाली येतात

निसर्ग कुंडलीत तृतीयात व षष्ठात बुधाच्या राशी येतात, ज्यावरून लहान भाऊ व मामा यांचा विचार केला जातो. त्यामुळे या गोष्टी पाहताना बुधाचा विचार केला जातो

बुध हा शरीरातील त्वचेचा, मज्जासंस्थेचा व लहान मेंदूचा कारक आहे, त्यामुळे यांसंबंधीचे आजार व दोषदेखील बुधावरूनच पाहतात. तसेच बुध हा संदेशवहनाचे मध्यवर्ती कार्य करतो, त्यामुळे पोस्ट, तारखाते, कुरियर सव्र्हिसेस इ. वर बुधाचा अंमल असतो. शरीरातील मज्जातंतूच्या जाळ्याचा विचार ज्याप्रमाणे बुधावरून होतो.  दळणवळणाचे मार्ग, रेल्वे, कम्युनिकेशन सिस्टीम इ. चा विचारही बुधावरून करावा.

 बुध हा द्विस्वभावी वृत्तीचा ग्रह आहे. कोणतीही गोष्ट दोन वेळा किंवा अधिक वेळा करावयास वतो. पत्रिकेत बुध चांगला असता किंवा बुधाची महादशा असता उत्तर दिशेला गेल्यास जातकाचा भाग्योदय होतो.

स्वभाव वैशिष्ट्ये - बुद्धिमान, विनोदीवृत्ती, बडबड्या स्वभाव, चंचल, सर्व गोष्टींचा हव्यास, उत्तम ग्रहणशक्ती व आकलनक्षमता, वाक्चातुर्य, आकर्षक बोलणे, तरतरीतपणा, धरसोडवृत्ती, चिकित्सक, तर्कज्ञ, वादविवादपटू, समयसूचकता, उत्तम वक्ता, व्रात्य व खेळकर स्वभाव, बालीशवृत्ती, हट्टी

शरीराचे अवयव - जीभ, कान, मज्जासंस्था व मज्जातंतू, खांदे, श्वसनसंस्था, हात, बोटे
रोग/आजार - श्वसनसंस्थेचे आजार, अपचन, मज्जासंस्थेशी संबंधित आजार, कर्णविकार, बहिरेपणा, वाणीतील दोष, मुलेपणा, तोतरेपणा, स्मृतिभ्रंश, त्वचाविकार, अॅलर्जी, वेड, फिट्स येणे, ज्ञानतंतूंचे रोग, वंध्यत्व, नपुंसकत्व, दमा, क्षयजातानद्रा, डोके जड होणे, कोरडा खोकला, नाक चोंदणे, आंकडी येणे, वातविकार

नोकरी-व्यवसाय - शिक्षक, प्रोफेसर, वकील, ज्योतिषी, गणिती, भाषातज्ज्ञ, भाषांतरकार, व्याकरणतज्ज्ञ,  तपासनास, लेखनिक, कॅशियर, वृत्तपत्र संपादक, पत्रकार, मुद्रित तपासनीस, तत्त्वज्ञानी, व्यापारी, एजंट, दलाल, मध्यस्थ, व्याख्याते, कॉपी रायटर, जाहिरात कंपनी, जनसंपर्क अधिकारी, पोस्टमन, टपाल व तारखाते, दूरध्वनी केंद्र, टालान आपरेटर, दळणवळण खाते, प्रवासी संस्था, मुद्रक, प्रकाशक, स्टेशनरी विक्रेता, चलनाची अदलाबदल करणारे (मना एक्स्चेजर), व्याजाचा धंदा करणारे, रजिस्ट्रार, बँका-पतपेढ्या यांमधील क्लार्क, स्टॅम्प व्हेंडर, ठसेतज्ज्ञ, हस्तरेषातज्ज्ञ, स्टेनोग्राफर, टायपिस्ट, चिटणीस, स्वीय सहाय्यक, संख्याशास्त्रज्ञ, स्टॅटिस्टीशियन, करवसुली, कॉम्प्यूटर प्रोग्रामर व ऑपरेटर, डी.टी.पी. ऑपरेटर, स्क्रीन प्रिंटिंग, झेरॉक्स मशीन ऑपरेटर, टेलेक्स किंवा टेलिप्रिंटर, रेडिओ व आकाशवाणी इत्यादी .  

ज्या दिवशी बुधाच्या राशीत किंवा नक्षत्रात चंद्र असतो अशा वेळी गणितात व हिशेबात चुका होणे, एकाच कामासाठी किंवा एकाच व्यक्तीला भेटण्यासाठी दोन-तीन वेळा खेटे घालावयास लागणे, इच्छित व्यक्ती न भेटणे अशा गोष्टी हमखास घडतात. त्यामुळे बुधाच्या मिथुन किंवा कन्या राशीवर किंवा आश्लेषा, ज्येष्ठा व रेवती नक्षत्रांवर महत्त्वाची कामे करणे किंवा महत्त्वाच्या व्यक्तीला भेटावयाचे टाळावे.

 बुध हा द्विस्वभावी ग्रह असल्यामुळे कोणत्याही गोष्टीची पुनरावृत्ती करतो. त्यामुळे पुस्तक किंवा ग्रंथ प्रकाशन बुधाच्या महादशेत किंवा अंतर्दशेत केल्यास पुन्हा-पुन्हा आवृत्ती निघत राहतात. मात्र बुधाच्या दशेत महत्त्वाची शस्त्रक्रिया करावयाची झाल्यास, शस्त्रक्रियेसाठी बुधाच्या राशी, बुधाची आश्लेषाज्येष्ठा व रेवती ही नक्षत्रे व मिथुन किंवा कन्या लग्नाची वेळ इ. टाळावे. अन्यथा शस्त्रक्रिया यशस्वी न होता, पुन्हा शस्त्रक्रिया करण्याची वेळ येते. 

बुध हा बुद्धिमत्तेचा ग्रह इतर ग्रहांच्या साहचर्याने परिणाम करीत असतो. पत्रिकेत बुध अभ्यासताना प्रत्येक स्थानात त्याची फले महत्त्वाची नसतात. तो इतर ग्रहांशी कसे सहकार्य करतो ते महत्त्वाचे असते. बुध हा ग्रह रवीच्या सान्निध्यात असतो तसाच शुक्रही असतो; त्यामुळे ह्या दोन ग्रहांच्या अनुषंगाने बुधाचे स्थानगत फलित ठरत असते. बुधाला पत्रिकेत महत्वाची स्थाने म्हणजे प्रथम, तृतीय, नवम व दशम ही होत.

                        बुध ग्रहाची  स्थानगत फले 

                                 बुध प्रथम स्थानात

१) प्रथम स्थानात बुध असलेल्या व्यक्ती बुद्धिमान, व्यवहारचतुर, चौकस व बोलक्या स्वभावाच्या असतात. विनोदी वृत्ती व हजरजबाबीपणा असतो. चौकसपणा, अभ्यासूवृत्ती, ज्ञानग्रहण करण्याची उत्तम पात्रता, भावना वा विचार प्रकट करण्याची उत्कृष्ट शक्ति देतो. अशा लोकांची तर्क पद्धिति चांगली असते. सर्व गोष्टीत तत्परता हा ह्या स्थानातील बुधाचा महत्त्वाचा गुण होय. ह्या व्यक्तींना कोणतीही गोष्ट लवकर समजते. हयांची स्मरणशक्ति, बुद्धि चलाख असते. हे अष्टावधानी असतात.

२)प्रथम स्थानात बुध  असलेल्या व्यक्ति कित्येक वेळा हजरजबावी, राजकारणी वृत्तीच्या,
टिक डावपेच खेळण्यात पटाईत असतात. धूर्त व चातुर्याने वागणा-या असतात. वाक्चातुर्य चांगले असते, कल्पनाशक्ति चांगली असते.

३) बुध जन्मकाळी लग्नामध्ये असतां - बुध लग्नामध्ये अग्निराशीचा-मेष, सिंह व धनु-असतां स्वभाव तीक्ष्ण, कडक, झणझणीत, धाडशी, लवकर राग येणारा, वाक्सामर्थ्य चांगले असणारा, स्पष्टवक्ता, बोलण्याच्या कामांत पटाईत, नाटक व ललितकलांची आवड बाळगणारा, उत्तम गणिती, विचारशक्ति किवा कल्पनाशक्ति चांगली असणारा असा असतो. अग्निराशींपकी मेष व सिंह या राशींमध्ये धनु राशीपेक्षा चांगली फळे दर्शवितो. धनु राशीमध्ये लग्न बुध असतां स्वभावामध्ये आचरटपणा, वाचाळता व मूर्खपणाच जास्त पाहण्यास मिळतो

४) लग्न वृषभ किंवा मकर राशींमधील बुध स्वभावामध्यें धूर्तपणा, कावेबाजपणा, हेकटपणा, खुनशीपणा, आपलेंच म्हणणे धरून बसणारा, दुराग्रही, खादाड, अधाशी, आपल्याच सुखाची पर्वा करणारा इत्यादि दुर्गुण व्यक्त करितो.

५) लग्नीं मिथुन, कन्या, तुला, किंवा कुंभ राशींचा बुध उदय पावत असतां बुद्धिमत्ता व कल्पनाशक्ति चांगली असते. या मंडळींना कोणतीही कला किंवा विद्या सहज प्राप्त होते
बुद्धि तीव्र व कुशाग्र असते. या राशींमधील बुध शास्त्रीय विषयाची आवड देऊन प्रतिभाशक्ति व वाकसामर्थ्य चांगल्या प्रकारचे देतो, वृश्चिक राशी मधील लग्नांत उदय पावणारा बुध रसायनविद्या, डॉक्टरकी - वैद्यकीची आवड दर्शवितो, बुद्धि चांगली तीव्र असते परंतु स्वभावामध्ये खुनशी पणा, लबाडी, लुचेगिरी व गूढपणा पाहण्यास मिळतो; म्हणून असल्या- व्यक्तींबरोबर जपूनच वागलेलें बरें.

६) लग्न कर्क किंवा मीन राशींमध्ये बुध उदय पावत असतां बुद्धिमत्ता इतक्या चांगल्या उच्च दर्जाची पाहण्यास मिळत नाहीं. स्वभाव लहरी, मूर्ख, बडबड्या, वाचाळ, आत्मप्रौढी पुष्कळ असणारा, घमेंडखोर, हलकट, दारुबाज व विचित्र असतो. यांत मीनेपेक्षा ककैमध्यें जरा किंचित् कांहीं कमी वाईटपणा पाहण्यास मिळेल एवढेच

७) वृश्चिकेचा बुध टीकाकार वृत्ती देतो. लग्नी शनि-बुध किंवा बुध-राहु युती असल्यास थापा मारणे, खोटे दस्तावेज तयार करणे, खोट्या सह्या करणे इ. गोष्टी हातून घडतात.

 ८) स्त्रियांच्या पत्रिकेत बुध-गुरु युती लग्नात असता अशा स्त्रीया स्वत:च्या बुद्धिमत्तेने, वाक्चातुर्याने व लाघवी स्वभावाने त्या इतरांना आपलेसे करून घेतात. 
.

                             द्वितीय स्थानात बुध

१) धनस्थानात बुध असलेली व्यक्ती बोलक्या व विनोदी स्वभावाची, हजरजबाबी, व्यवहारीचतुर असते. हया स्थानातील बुध व्यक्तीला बोलण्यात पटाईत करतो. सतत बडबडणा-या व्यक्तींपासून उत्कृष्ट वक्तृत्व असलेल्या व्यक्तीपर्यंत हा बुध परिणामकारक सापडतो

२) शुक्राबरोबर असता व्यक्ति अतिशय लाघवी, गोड बोलणा-या, गायनाची आवड असणा-या असतात. हा योग सांपत्तिक दर्जा उत्कृष्ट ठेवतो

३) येथे बुध जर शनि, राहु किंवा हर्षलाच्या युतीत असेल तर वाणीमध्ये दोष असतो. बुध-हर्षल युती टीकाखोर वृत्ती दर्शवते. हे लोक मर्मभेदी व दुस-याला झोंबणारी टीका करतात.

४) बुध-राहू योग असता लहान मुले अतिशय उशीरा वोलायला लागतात. कित्येक वेळा मुकेपणासुद्धा असू शकतो. बुध-राहू योग बोलताना अडखळणे, काही शब्द अजिबात उच्चारता न येणे, बोलताना लवकर वोलता न येणे वगैरे दृष्टीने अभ्यासण्यासारखा असतो

 ५) लेखन, प्रकाशन, व्यापार, एजन्सी, यांपासून चांगला पैसा मिळू शकतो.
हे लोक उत्तम वक्ते, व्याख्याते, नकलाकार, प्रवचनकार, सेल्समन होऊ शकतात.

६) रवि-बुध युती येथे उत्तम गणिती किंवा ज्योतिषी निर्माण करते

७) येथे बुध असलेल्या स्त्रियांचे व्यक्तिमत्त्व आकर्षक असते. त्यांच्या वाक्चातुर्यामुळे व मधुर भाषी स्वभावामुळे त्या सेल्सगर्ल, रिसेप्शनिस्ट, जाहिरात संस्था व तत्सम प्रसिद्धी माध्यमात चमकतात.

 ८)कमिशनवर चालणारे धंदे, बद्धीच्या चातुर्यावर चालणारे धंदे, द्वितीयातील बुध उत्कृष्ट करू शकतो. लेखन वाचनाला लागणा-या सर्व गोष्टींचे धंदे करण्यातसुद्धा अशा व्यक्ति पटाईत असतात.

९) द्वितीयात जो  ग्रह असतो तो पैसा मिळविण्याच्या मार्गाचे कित्येकवेळा उत्कृष्ट दर्शन करून देतो. त्याच्या कारकत्वात येणा-या गोष्टी महत्त्वाच्या असतात.

 १०) द्वितीयातील बुध हा अत्यंत व्यवहारी बुद्धिमत्ता दाखवितो. प्राप्त ज्ञानापासून पैसा मिळविण्याचे मार्ग हा शोधत असतो

११) या  स्थानात बुध असणा-या व्यक्ति हसतहसत विनोदाने आपले काम साधून घेणान्या असतात.

१२) शुभसंबंधीत बुध असता उत्तम वाचाशक्ती असते. नटांना व वकिलांना आवश्यक असलेले वक्तृत्व हा बुध देतो. हा बुध आर्थिक स्थिती चांगली दर्शवितो. यांना पैसा कमावण्याची कला चांगलीच साध्य झालेली असतेआपल्या बुद्धीमत्तेचा व्यवहार्य उपयोग हे लोक करतात

 १३) हा बुध दूषित असता जीभ जड असते. वाणीत दोष असतो. अडखळत वा शब्द गाळत भरभर बोलणे असे दोष उत्पन्न होतात. वाणीत प्रभाव नसतो. खोटे बोलण्याची सवय असते. भुलथापा देऊन, फसवाफसवी करून, खोट्या सह्या व दस्तऐवज तयार करून पैसे मिळविणारे व याला बळी पडणारे असे दोन्ही प्रकारचे लोक या बुधावर आढळतात. कागदपत्रे, चेक्स, हुंड्या, दस्तऐवज यांच्यावर सही करताना व ती जपून ठेवताना फार काळजी घ्यावी.

१४) दूषित बुध विद्याभ्यासात अडथळे आणतो. लेखनचौर्यामुळे नुकसान होते. बोलण्या मध्ये उद्धटपणा व तुसडेपणा असतो. चौर्यकर्मामुळेही पैसा कमावतो. बुद्धी नसते व असली तर वक्रमार्गाने चालते. खाण्यापिण्यामध्ये हे लोक अतिशय चिकित्सक असतात. इतर योग बाईट असल्यास आर्थिक दृष्टया दुषित बुध वाईट. लायकीपेक्षा कमी दर्जाचे काम करावे लागते

                               तृतीय स्थानात बुध

१) या स्थानातील बुध व्यक्तीला हुशार व बुद्धिमान बनवतो. वाचन व लेखनाची आवड असते.
 हा बुध व्यक्तीला संपादक, कवी, लेखक, साहित्यिक, नाटककार किंवा प्रकाशक बनवतो.
बुध-मंगळ शुभयोग पुस्तक प्रकाशन, प्रिंटिंग प्रेस, वृत्तपत्र इ. व्यवसायात यश देतो. येथे बुध असलेल्या व्यक्ती दळण-वळण विभाग किंवा जनतेशी संपर्क येणा-या खात्यात उदा. टपाल खाते, टेलिफोन ऑपरेटर, नोकरी देतो.

 २) तृतीय स्थानात बुध असलेले लोक मनमिळाऊ व समंजस वृत्तीचे असतात. यांची स्मरणशक्ती चांगली असते. बुध-शुक्र येथे फोटोग्राफीच्या क्षेत्रात यश देतात. जेथे वक्तृत्व व बुद्धिमत्ता यांची नितांत गरज असते अशा व्यवसायात उदा. वकील, शिक्षक, प्राध्यापक, पत्रकार इ. मध्ये यांना चांगले यश मिळते.

 ३) बुध-राह येथे असता व्यक्तीने पैशांच्या व लेखी व्यवहारात सावध राहावयास हवे.

४) तृतीयात रवि-बुध व धनस्थानी शुक्र किंवा याउलट असता हे लोक नैसर्गिक ज्योतिषी असतात

५) तृतीय स्थानात स्त्रियांच्या कुंडलीत बुध असता टायपिस्ट, स्टेनोग्राफर, पर्सनल असिस्टंट अशा पदांवर काम करताना आढळतात. बुध-शुक्र युती गायन-वादन व ललितकलांचे आकर्षण देते व त्यामध्ये यशदेखील मिळते. या उत्तम संगीत शिक्षिका होऊ शकतात. येथील बुध प्रवासाची आवड देतो. सुंदर व आकर्षक राहणीमानाची व विविध वस्तू जमविण्याची आवड असते.

६) तृतीय स्थान  बुधाच्या कारकत्वाला अत्यंत पोषक स्थान आहे. ह्या स्थानातील बुध असणारे लोक सर्व गोष्टीत चौकस असतात. ज्ञान प्राप्त करून घेण्याचा वेग, शक्ति प्रचंड असते. उत्कृष्ट तर्कज्ञान व आकलन शक्ति देणारा बुध आहे.ह्या लोकांची बद्धि, मन विचार अत्यंत चलाख असतात. ह्या लोकांना कोणत्याही ज्ञान शाखेत प्रगति करता येते. सतत वाचन, मनन, चिंतन, परीक्षण ह्यामुळे असे लोक म्हणजे बुद्धि आणि ज्ञान हयांचे चालतेबोलते वाचनालय असते. हे लोक उत्कृष्ट वक्ते होऊ शकतात. उत्कृष्ट लिखाण करू शकतात.

 ७) गूढशास्त्र, ज्योतिषशास्त्र, वाङमय वा कोणतेही शास्त्र या सर्व दृष्टीने हा बुध महत्त्वाचा आहे.
तृतीयांत बुध, पंचमात, सप्तमात गुरू-हर्षल वगैरे योगात अत्यंत बुद्धिमान व्यक्ति असतात,
 तृतीयातील बुध बंधुप्रेम चांगले देतो. भावंडांकडून सौख्य लाभते.

८) तृतीयांत बुध लहान लहान प्रवास. योग करतो. हा बुध अंकगणित, अकौन्टन्सी शॉर्टहँड, टायपिंग, वत्तपत्रे, नियतकालिके, वाचनालय, छापखाना, पुस्तक-प्रकाशन वगैरे गोष्टींच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो.

९) बुध-शुक्र रवि-बुध, बुध-गुरू हे योग लिखाणास चांलले असतात. शिक्षण पूर्ण होते. बुध-शुक्र कोणत्याही कलेस, विशेषतः गायनासउत्कृष्ट असतो. बुध-नेपच्यून स्फूति देणारा योग आहे. बुध-हर्षल गुढशास्त्रात प्राविण्य देतो. तृतीयांत , बुध असता हस्ताक्षर चांगले असते. 

१०) हे स्थान नैसर्गिक बुद्धिस्थान आहे. या स्थानाचा मालक नैसर्गिक कुंडलीत बुध आहे. त्यामुळे बुधाची येथील स्थिती शुभ असता फारच चांगली असते हा बुध विद्याव्यासंगी वृत्ती, शास्त्रीय विषयांची आवड, खूप वाचन व लेखन, उत्तम स्मरणशक्ती, सुंदर अक्षर, प्रवासाची आवड, ग्रंथप्रकाशन दर्शवतो.

११) कोणत्याही बौद्धिक पराक्रमात हे मागे असत नाहीत. मंगळाची जोड असल्यास मैदानी खेळात, कुस्तीत चमकतात. शुक्राबरोबर ललितकला, गायनवादन प्राविण्य दर्शवितो. यांना गूढविद्या, हस्तसामुद्रिक, कुंडलीशास्त्र, अंकशास्त्र हे विषय आवडतात. भावंडांचे सौख्य चांगले मिळते. यांचा दृष्टीकोन प्रागतिक व विशाल असतो. प्रवासासंबंधी लेखन होते. इतिहास व चरित्र लेखनही होते. लोकहिताची कामे होतात. व्यापारी व उद्योगपतींशी ओळख असते. प्रवासात यांची इतरांशी चटकन मैत्री होते

१२) या ठिकाणी दूषित बुध असता अस्थिर चित्त, भित्रा स्वभाव, बुद्धिमांद्यता व निंदक वृत्ती दर्शवितो. यांचे मन नेहमी चिंताग्रस्त असते. यांना कानाचे विकार विशेषतः बधिरता येते. हस्ताक्षर खराब असते. हे लोक जडबुद्धीचे व विस्मरणशील बनतात. विद्याभ्यासांत अपेक्षित यश मिळत नाही. नर्व्हस ब्रेकडाऊन' होऊन हे लोक निरुत्साही बनतात. शेजारपाजाच्यांशी पटत नाही. प्रवासात बौद्धिक शैथिल्य व नर्हसनेस असतो. धर्मावर श्रद्धा नसते. भावंडाच सुख मनासारखे मिळत नाही. बुद्धीचा विकास कमी होतो. वृत्तपत्रीय वा इतर लेखनातून त्रास होतो. खाजगी पत्रे गहाळ होतात वा महत्व संपून गेल्यावर मिळतात. काहींना बुद्धी असून शिक्षणास पुरेशी संधी नसते लेखन-प्रकाशन अडथळे येतात व दिरंगाई होते . 

                                            चतुर्थ स्थानात बुध

१) चतुर्थ स्थान  या स्थानातील बुध व्यक्तीला बुद्धीमान बनवतो. लेखन, साहित्य यांची तसेच कविता करण्याची आवड असते. सुसंस्कत असतात. हे लोक उत्तम गणिती किंवा ज्योतिषी असतात. बुधाचा मंगळाशी शुभयोग उच्च गणितात यश मिळवन देतो. वध-शक यती व्यक्तीला उत्तम कलाकार, अभिनेता, लेखक किंवा वक्ता बनवते,

 २)  चतुर्थात बध असता आयुष्यात अनेक घडामोडी घडतात. या दृष्टीने बुध-हर्षल युती फार वाईट मानलेली आहे. यांना नोकरीच्या निमित्ताने किंवा इतर कारणांमुळे वारंवार घरे बदलावी लागतात. येथे बुध असलेले लोक अनेक लहान-सहान कोर्सेस करतात.

 ३) येथे बुध  मंगळ किंवा बुध-शनि युती असता स्थावर इस्टेटीबाबत जवळच्या नातलगांकडून किंवा मित्रांकडून फसवणूक व विश्वासघात संभवतो. 

४) चतुर्थात बुध पीडित नसावा. त्यामुळे उतारवयामध्ये फार त्रास होतो, मानसिक दुर्बलता भासते. चतुर्थामधील बुध स्वभावामध्यें अनिश्चितता उत्पन्न करितो,

५) चतुर्थात बुध असलेल्या स्त्रिया अल्पसंतुष्ट असतात. महत्त्वाकांक्षी वत्ती नसते. आहे त्यात समाधान मानणाच्या असतात, त्यामुळे बहुधा यांचा संसार सुखाचा होतो. येथे बुध असलेल्या स्त्रियांच्या पतीची नोकरीत वारंवार बदली होते व त्यामुळे स्थलांतर करावे लागते. 

६) चतुर्थस्थान - हया स्थानातील बुध बौद्धिकदृष्ट्या तितकासा महत्त्वाचा होत नाही. हा व्यक्तिला प्रेमळ बनवितो. अशा लोकांना गप्पांची, संभाषणाची जास्त आवड असते. ह्या लोकांना आप्तबांधव, मित्र भरपूर असतात. सर्व साधारण हा बुध सुखाच्या दृष्टीने चांगला असतो. व्यक्तीला मातृसौख्य चांगले देतो.

६)  हया स्थानात बुधाबरोबर मंगळ असता अशा व्यक्तीचे घरात पटत नाही. गुरू, शुक्र, रविबरोबर असलेला बुध शिक्षणास चांगला असतो.

७) चतुर्थामध्ये बुध केन्द्रामध्ये येतो ही गोष्ट खरी आहे, परंतु येथे बुध शुभसंबंधित किंवा राशिबली वगैरे असल्याखेरीज विशेष चांगली फलें देत नाही असे म्हटले असतां हरकत नाहीं.

८) कुंडलीत या स्थानी शुभसंबंधीत असलेला बुध स्थावर इस्टेट, घरदार, बागबगीचे वाहनादी सौख्य, शेतीवाडी चांगली दर्शवितो. परंतु या व्यक्तीचा पाय घरामध्ये स्थिर नसतो. काहींना घर बदलण्याची संवय लागून गेलेली असते.

९)  यांचे घराणे सुसंस्कृत असते. आई बुद्धिमान असते व तिचा घरात प्रभाव असतो. घरांतल्या वस्तू इकडे तिकडे हलवण्याची, रंगरंगोटी करण्याची, वाहनादी बदलण्याची संवय असते. एकाच उद्योगधंद्यात हे स्थिर नसतात. जमीनजुमला, खाणी, वृत्तपत्रे, लायब्ररी, पुस्तके आदींपासून लाभ होतात.

१०) घरामध्ये आनंदीआनंद असतो. हे केंद्रस्थान असल्याने येथील स्वगृहीचा बुध त्याचप्रमाणे शुक्राच्या राशीतील बुध फार चांगली फले, देतो. तूळेतील बुध भाषासौंदर्य तर मीनेतील बुध तत्त्वज्ञानप्रियता दर्शवितो. अंतःकरणाने हे लोक शुद्ध असतात.

 ११) बुधाच्या महादशेत हे लोक जमिनीच्या धंद्यात खूपच यशस्वी झालेले आढळतात. यांच्याकडे वाहनांची रेलचेल असते. आयुष्याच्या अखेरपर्यंत हे लोक विद्याव्यासंग करीत असतात. लेखकांचे लेखन चालू असते. यांच्या हातून विपुल लेखन होते व त्यामुळे यांना मानाचे स्थानही लाभते. अखेर शांतपणे होते

१२) या स्थानातील अशुभ बुध आईची मानसिक स्थिती वाईट दर्शवितो. मातृसौख्य कमी मिळते. स्वभावात चंचलता असते. आप्तेष्टांचा विरह व मान सिक दुर्बलता प्राप्त होते. वाईट बातमीमुळे वा घटनेमुळे आयुष्याचा अंतःकाल वेडेपणात जातो. घरामध्ये काही न्यूनत्व वा वैगुण्य असल्याने अंतःकाल चिंताग्रस्त असतो. आपल्या तत्त्वमूल्यांचे अपयश पाहाण्याची त्याला वेळ येते. उराशी बाळगलेली ध्येये वा रंगवलेली स्वप्ने भंग पावतात. कागदोपत्रीच्या फसवणुकीने इस्टेटीत वांधा निर्माण होतो. चोरी, फसवणूक व विश्वासघात यांचा घरात उपद्रव असतो. काहींना घर म्हणजे मूर्खाचा बाजार असा अनुभव येतो, नातेवाईक बोलत नाहीत वा बोलल्यास तुसडेपणा असतो. विद्याभ्यास अपुरा राहातो. स्वतःचे भाईबंद उलटे फिरतात. स्वार्थी लोकांचा भरणा असतो. घर  वेड्यांचे इस्पितळ असते



                               पंचम स्थानात बुध

१) पंचमस्थान - हया स्थानातील शुभ ग्रहांबरोबर असलेला बुध उच्च शिक्षण पूर्ण करतो. ह्या बुधाची बौद्धिक बाजू तृतीय स्थानातील बुधाप्रमाणेच आहे.

२) ज्योतिषी, ग्रंथ-लेखन, गणिती लोकांना हा बुध चांगला असतो. शनि हर्षल, नेपच्यून वगैरे ग्रहांबरोबर असलेला बुध उत्कृष्ट बुद्धिमत्ता देतो. पण अशा युति नीट अभ्यासाव्या लागतात. कारण हे योग मेंदूवर अनिष्ट परिणाम करणारे सुद्धा असू शकतात.

 ३) पंचमातील एकटा बुध संतति कमी देतो. बुध-शनि, संतति देत नाही. बुद्धिमत्ता उत्कृष्ट असते. पण बौद्धिक लुच्चेगिरी व फसवेपणाची त्यात बाजू असू शकते. बुध-मंगळ इंजिनिअरिंग विद्येला चागला. तसाच हा योग लुच्चेगिरी दाखवणारा आहे. खोटे बोलणारी माणसे असतात. मेंदूवर परिणाम करतो. बुध-नेपच्यून-गूढ शास्त्र, मंत्रतंत्र, जाविद्या यांची आवड देतो. बुध-हर्षल-शास्त्रज्ञ संशोधक असतात. बुध-राहू-मेंदूविकार, फीट्स्, मंदपणा - दाखवितो.

४) पंचमामध्यें बुध विद्येची व गायनवादन, कवित्व, नाटक, मौज, घोक यांची आवड दर्शवितो, या माणसांना दुस-याची नक्कल सहज करता येते. यांना मुलांची विशेष आवड असते, पंचमामध्ये वंध्याराशीचा बुध असतां संततिसुख मिळत नाही. परंतु पंचमामधला बलवान् बुध फार लवकर लवकर संतति देतो. या स्थानामध्ये कर्क, मीन, वृश्चिक या राशींमधील आणि शनि, नेपच्यून किंवा मंगळ यांनी पीडित किंवा अशुभसंबंधित असलेला बुध संतति वेडी, खुळी किंवा व्यंग असलेली दर्शवितो. कित्येकांना याच योगावर जुगारीचे, दारू पिण्याचे वगैरे व्यसन असलेले पाह ण्यास मिळते

५) पंचम स्थान : या स्थानी शुभ बुध असणे चांगले. हे सद्सद्विवेक बुद्धीचे स्थान आहे. त्याचप्रमाणे मौज, करमणूक, चैन, प्रणय यांचेही स्थान आहे. हा बुध शारीरिक सुखापेक्षा मानसिक सुख देणारा आहे. त्यामुळे ललितकला, गायन, वादन, अभिनय, साहित्य यामध्ये गती असते. हे विद्वान, विद्याव्यासंगी, साहित्योपासक, पंडित, कलावंत व मंत्रतंत्र जाणणारे असतात. हे राजकीय सल्लागार वा मंत्री असतात. हे वादविवादकुशल, राजकारणाच्या चाली उत्तम खेळणारे, उत्तम बुद्धिबळपटू असतात. मैदानी खेळापेक्षा बैठे खेळ वा टेबलटेनिस-बिलियर्ड्स, काडगेम्स आवडतात. काहींना पत्त्याच्या जुगारात चांगलेच यश मिळते. चातुर्याचा संबंध असलेल्या गोष्टींत हा इतरावर मात करतो. त्याची राजकीय खेळी चकित करणारी असते. राज कारणी लोकांना हा बुध चांगला असतो

 ६) हा बुध बुद्धिमान संतती देतो. चैनीच्या गोष्टींपासून विपुल धन देणारा हा बुध आहे

७) या स्थानी अशुभ बुध मानसिक दुबळेपणा दर्शवितो. यांची संततीही दुबळी, मेंदूरोगी निघते. मुली जास्त असतात. काहींना वीर्यशक्ती नसल्याने संतती होत नाही, दत्तक घ्यावी लागते. संततीमध्ये मानसिक दुर्बलता वा वेड असते. जुगारात व व्यसनात या लोकांचे तासनतास खर्च होतात. पैशाचा अपव्यय होतो. आळसामुळे वा मनोदौर्बल्यामुळे विद्या अपुरी राहाते. ऐषारामाची आवड असते. प्रेमप्रकरणात फसवणूक होते. काही वेळा व्यसनांचा अतिरेक  होऊन नपुंसकता येते बुद्धीचा दुरुपयोग, कपटनीती, वाळात घालवणे हे या दूषित बुधाचे फल आहे. 

  
                          षष्ठ स्थानात बुध

 १) षष्ठ स्थान - येथे बुध आरोग्य चांगले ठेवीत नाही. स्वत:च्या तब्येतीची उगाचच काळजी करत बसतात. विनाकारण औषधे घेण्याची सवय असते. यांना व्यायामाचा कंटाळा असतो. अपचनाचे विकार होतात. मध्यम वयानतर बद्धकोष्ठाचा त्रास होतो, वातविकार होतात. बुध दुषित असता नव्र्हस ब्रेकडाऊनचा त्रास होतो.

२) येथे बुध असता दुय्यम दर्जाची नोकरी करावी लागते. बहुधा कारकुनीपासून सुरुवात होते. षष्ठातील बुध नोकरांपासून त्रास दर्शवतो. महत्त्वाच्या कामांमध्ये पहिल्याच प्रयत्नात यश लाभत नाही.

३) स्त्रियांच्या कुंडलीत या स्थानातील बुध पोटाच्या व मासिक पाळीच्या तक्रारी निर्माण करतो.

 ४) षष्ठस्थान - हया स्थानातील बुध व्यवस्थित अभ्यासावा लागतो. हया व्यक्तींना नसती भांडणे उकरून काढण्याची, थापा मारण्याची, अविश्वास पसरविण्याची सवय असते. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवणे धोक्याचे असते. अत्यंत अविश्वासू, लबाड लुच्ची माणसे असतात.

५)  बुध-मंगळ असता वरील दोष महत्त्वाचे असतात. भांडणाने वितुष्ट निर्माण करतात. ह्या योगात त्वचारोग, फीट्स्, मेंदूचे ताप, मेंदूत पाणी होणे, हे रोग अभ्यासावे लागतात.
 बुध-राहू हा योग मेंदूवर परिणाम करणारा, बुद्धिभ्रंश करणारा आहे. अशा योगात पिशाच्चबाधा, सर्पदंश, घटसर्प होण्याची शक्यता असते.व्यक्तीच्या मामांना वेड, बुद्धिभ्रंश, पिशाच्चबाधा होते

६) बुध-हर्षल हा योग आकडी मज्जासंस्थेचे रोग, अविचारी, आत्मघातकी वृत्ति दाखवितो. बुध-शनि योग कफविकार छातीचे विकार, क्षय वगैरे दृष्टीने अभ्यासावा. बुधाशी होणारे शनीचे, राहूचे रोग कित्येक वेळा मुकेपणा, बहिरेपणा दाखवतात.

७) षष्ठस्थानामध्यें बुध बलवान् असतां वैद्यकी,डॉक्टरकी,सॅनिटरी खाते वगैरेसंबंधाने आवड किंवा तत्सम धंदा दर्शवितो. षष्ठस्थानामधील बुध चाकर, नोकर व हाताखालचे लोक यांच्यापासून फार त्रास देतो, बुध लग्नेश असुन षष्ठस्थानामध्ये धनु किंवा मीन राशीचा येत असतां क्षय किंवा फुप्फुसाचे विकार होण्याची फारच धास्ती असते. वारंवार दुखणी येतात. तो पापग्रहाने पीडित असतां अत्यंत अशुभ जाणावा.

८) षष्ठांतील बुध मज्जातंतूचे विकार दर्शवितो. म्हणून ज्यांच्या कुंडलीमध्ये षष्ठस्थानामध्ये बुध पीडित असेल त्यांनी अतिश्रम, काळजी, फार मानसिक श्रम, वाचन, लेखन वगैरे करू नये. षष्ठांत बुध मंगळानें पीडित असतां स्वभाव लहरी व रागीट असतो. या मंडळींना अविचारा मुळे किंवा अति तामसी भृत्तीमुळे चित्तभ्रम होण्याचा संभव असतो.

९) षष्ठस्थानामध्ये बुध असणा-या लोकांच्या खाण्याच्यासंबंधीं आवडी नावडी विचित्र असतात. षष्ठांत बलवान् बुध असलेली मंडळी कांहींतरी विचारी असतात. त्यांच्या आहारासंबंधींच्या कल्पना नैसर्गिक शास्त्रीय तत्त्वाला धरून तरी असतात; परंतु या स्थानामध्ये पीडित बुध असलेल्या लोकांच्या आहारासंबंधी कल्पना फार विचित्र, वेडगळ व चमत्कारिक असतात. 

१०)  या स्थानी बुध असता खाण्यापिण्याच्या बाबतीत हे पथ्य सांभाळून असतात. हे शत्रूवर बुद्धिचातुर्याने मात करतात. प्रकृती निरोगी ठेवण्यासाठी हे हलका व्यायाम घेतात. यांची बुद्धी सतत कार्यरत असते. नोकरीमध्ये या लोकांचा फायदा असतो. हाताखाली काम करणारी माणसे हुशार असतात. यांना सरकारदरबारी मान्यता मिळते. मनोरुग्णांच्या डॉक्टरला हा बुध उत्तम असतो

११) हा बुध जर दूषित असेल तर मात्र फारच वाईट. याला क्षय, श्वासरोग, त्वचारोग, मेंदूरोग होतात. फुफ्फुसे दुर्बल असतात. श्रवणेंद्रिये कमकुवत असतात. मानसिक व्याधीने फार पीडा होतात. मानसिक दुर्बलता असते. मनुष्य वेडा होऊ शकतो. आपल्याला काही तरी रोग झाला आहे असे नेहमी वाटते. औषध घेण्याची संवय असते. अती बौद्धिक श्रमाने मज्जातंतू दुर्बल बनतात. पोटाचे विकार असतात. खाण्यापिण्याची फॅडस असतात. आत्महत्येची प्रवृत्ती बळावते. मामाचे सुख नसते. कोर्टकेसेसमध्ये अपयश येते. शिक्षणात अडथळे येतात. क्षुद्र गोष्टीवरून भांडणे होतात. स्पष्टवक्तेपणाने शत्रुत्व येते. विरोधासाठी विरोध करतो. नोकर व हाताखालचे लोक फसवे निपजतात, व्यर्थ मानसिक परिश्रम घेण्याची संवय असते. अनेक मानसिक चिंतांनी प्रकृतीवर परिणाम होतो. यांना पक्षाघातासारखे विकार होतात. स्मृतिभ्रंश होणे हाही या स्थानच्या दूषित बुधाचा परिणाम आहे. हे लोक गैरसमजूत करून घेणारे असतात व शत्रुत्व करतात


                            सप्तम स्थानात बुध

१) सप्तमात बुध असता विवाह एक तर लवकर होतो किंवा फार लांबणीवर पडतो. जोडीदार बुद्धिमान, व्यवहारचतुर व बोलक्या स्वभावाचा असतो. सप्तमात बुध असलेले लोक परस्त्रीलोलुप व कामी असतात. मात्र सप्तमात शनि-बुध युती पुरुषाच्या कुंडलीत असता त्याला नपुसंक बनवते, तर स्त्रीच्या पत्रिकेत ही युती असता पती षंढ असतो. येथे बुध-राहु युती असता विधवा स्त्रीशी किंवा विधुर पुरुषाबरोबर विवाह करताना आढळतात

२) सप्तमात बुध असता लिखाण किंवा प्रवासामुळे प्रेम जुळून प्रेमविवाह होण्याची शक्यता असते.  या स्थानात बुध व लग्नी शनी असता कामसुखाच्या बाबतीत भयगंड असतो किंवा पती षंढ, हलकट व विकृत प्रवृत्तीचा मिळतो

३)सप्तमस्थान - हया स्थानातील बुध तृतीयांत गुरू, हर्षल, चंद्र वगैरे ग्रह असता बद्धिकदृष्टया अत्यंत बलवान होतो. हा व्यवहारकुशल, सुस्वभावी, सुशिक्षित पत्नी देतो.          

४) सप्तमस्थानामध्यें बुध पीडित असतां क्षुल्लक कारणाकरितां भांडणे, कजे, खटले दर्शवितो. धंद्यामध्ये पुष्कळ प्रतिस्पर्धी निर्माण होऊन त्यांच्या मुळे त्रासे, उघड शत्रुत्व लेख किंवा भाषणे याने होते. स्त्री वयाने फार लहान मिळते किंवा पीडित बुधगडखोर वाचाळ व अति बोलभांड बायको दर्शवितो. परंतु याच्या उलट बुध बलवान् असतां लिहितां वाचतां येत असलेली, शिकलेली, हुषार, कल्पक, विनोदी किंवा विद्याव्यासंगी स्त्री मिळते.

५) या स्थानी शुभसंबंधी बुध असता स्त्री बुद्धिमान व चतुर असते. ती बोलकी. व्यवहार चतुर, सुंदर, हुशार व विनोदी असते. तिला हस्तकला, भरतकाम, लेखन, वाचन यांची आवड असून बहुधा नोकरी करणारी आढळते. वयाने ती ९।१० वर्षाने लहान व दिसायला फार तरुण असते. रेल्वे, पोस्ट-ऑफिस, बँका, लायब्ररी यांमध्ये सेक्रेटरी, स्टेनो, टायपिस्ट, कारकून म्हणून कामे करणाच्या मुलींशी लग्न होते. राशीप्रमाणे स्वभाव व स्वरूप भिन्न असतात. परंतु नीट, नेटकेपणा, विनोदी बुद्धी, चातुर्य व व्यवहारीपणा आढळतो. हा बुध व्यक्तीला बुद्धिमान करतो. भागीदारही बुद्धिमान मिळतात. या व्यक्तींच्या स्त्रिया चांगल्या सल्लागार असतात. त्या आपली प्रकृती जपतात. हा बुध व्यापाराला व स्वतंत्र धंद्याला चांगला असतो. प्रवासामुळे खूप फायदे होतात. कायदा, तत्त्वज्ञान व चिकित्सक टीकात्मक लेखन यांना हा बुध उत्तम असतो. सप्तमात बुध असलेले लोक चरित्रलेखन करणान्यांचे विषय होतात. यांचे वक्तृत्व प्रभावशाली असते. यांचा तरुण स्त्रियांशी परिचय असतो. अनेक स्त्रियांचा भोग याला मिळाल्याने हा नपुंसक बनू शकतो. संतती होत नाही. याला बुध पापग्रहाने बिघडावा लागतो. एरवी संतती होते. विवाह लवकर होतो

६) या स्थानी दुषित बुध - स्त्री फालतू बडबड करणारी, आत्मप्रौढी करणारी, हुशार परंतु खोटेपणा करणारी दर्शवितो. विवाह उशीरा होतो व एकंदरीत सुख कमी मिळते. बुध फारच दूषित असेल ती मानसिक रोगी असते. शिक्षणाने कमी असणारी स्त्रीही मिळू शकते. बौद्धिक तफावत असते. भागीदार फसवणूक करतात. लेखनामुळे कटुता वाढते. प्रवासात डोकेदुखीने बेजार व्हायला होते. हे लोक मानसिक मैथुन करतात. त्यामुळे हस्तमैथुनासारखी विकृती असत. नपुंसकता येणे व स्त्री अतृप्त राहाणे हा या स्थानांतील दूषित बुधाचा विशेष दोष आहे
कोर्टाच्या कामात अपयश हाही एक या बुधाचा अनुभव आहे. विवादात यांचा पराभव होतो. लैंगिक अपयश हे या बुधाचे मुख्य कल असल्याने स्त्रियांना उन्माद, मनोदुर्बलता, चिडचिडेपणा येतो
  
                              अष्टम स्थानात बुध

१) अष्टमात बुध स्वराशीचा असल्यास आरोग्य व आयुष्य चांगले असतेमात्र बुध बलहीन असता नेहमीच आरोग्याबाबत तक्रारी असतात, व्यसनी वृत्ती आढळते.

२) अष्टमांत बुध पापग्रह युक्त किंवा दष्ट असता अपघात मारामारी व खन अशा गोष्टी घडण्याचा   संभव असतो.या लोकांनी विमा उतरवून ठेवावा हे बरे, भागीदारीत जपून रहावे.

३) स्वराशीचा बुध सट्टा, लॉटरी इ. मार्गानी आकस्मिक धनलाभ देतो. ज्योतिष व तत्सम गुढशास्त्रात प्रगती होते. अष्टमात तर अपना सहसा वडिलोपार्जित इस्टेट मिळत नाही. 

४) अष्टमात बुध असलेल्या स्त्रीला शालेय शिक्षणाच्या काळात गंडांतरे येतात.
पती चांगला , हसत-खेळत, मजेने संसार करणारा मिळतो. यांच्या विवाहाच्या वेळी किंवा विवाहानंतर भानगडी व घोटाळे निर्माण होतात. मंगळ-बुध युता किवा बुध-राहु युती स्त्रियांच्या कुंडलीत अष्टमात असता वैधव्य येण्याची शक्यता  असते . 

५) हा पाप ग्रहयुक्त असता कफविकार, मेंदूविकाराने मृत्यु दाखवतो. पाप ग्रहयुक्त बुध भावंडांचे आजार दर्शवितो. अष्टमात की बुध अतिविचार, अंश, भ्रमिष्टपणा दाखवितो. पंचमात पापग्रह असता अनुमानास निश्चित गते.

६) अष्टमस्थानांत बुध पीडित असतां मज्जातंतूसंबंधी विकार, मानसिक दुर्बलता दर्शवितो व बहुधा मृत्यु त्यामुळे येतो. या स्थानामध्ये बुध निर्बली आढळतो. तो या स्थानामध्ये हर्शल, नेपच्यून, मंगळ, शनि यांनी पीडित नसावा. या स्थानामधील अशुभसंबंधित असलेला बुध साधारणपणे सांपत्तिक अडचणी किंवा चिंता दर्शवितो, सांपत्तिक स्थिति एकसारखी नसते. लग्नानंतर सांपत्तिक बाबतींत वारंवार त्रास होतो. मृत्युपत्राधाराने इस्टेटीच्या वारसाचा लाभ मिळत नाही किंवा त्यापासून त्रासच होतो.

७) या स्थानी शुभसंबंधीत बुध असता प्रकृती चांगली राहून दीर्घायुष्य लाभते. या ग्रहाच्या जवळपास रवी किंवा शुक्र असण्याची शक्यता असते. एकटा बुध क्वचितच असतो. असा असल्यास आयुष्य चांगले मिळून सत्ता व अधिकारही मिळतो. तसेच अयत्न धनलाभही होऊ शकतो. यांचा पैसा परदेशात नोकरी धंदा करून जमवलेला असतो. यांचे आचरण चांगले असते.
 कन्येचा बुध हस्तसामुद्रिक, होमिओपथी वा आयुर्वेदाचा अभ्यास दर्शवतो. शनीच्या राशीत राजकारणाचे पट वा बुद्धिबळाचा पट चालविण्यात वाकबगार असतो. धनु राशीत तत्त्वज्ञानाचा अभ्यास होतो; अध्यात्मिक विद्येची आवड असते. हे परदेशात लोकप्रिय होतात. यांच्याकडे बेहिशेबी धन असते. व्यापारामध्येसुद्धा फायदा होतो. सासरा मालदार असतो. स्त्रीधन मिळते. गूढविद्या, ज्योतिष, सामुद्रिक शास्त्रांचा अभ्यास होतो. वारसाहक्काने पुस्तकांची रॉयल्टी मिळते. वडिलांची पुष्कळ पुस्तके त्यांच्या पश्चात् मिळतात. शेअर्समध्ये कमाई होते. बुधाजवळ रवी असल्यास सरकारकडून यांनी मानसन्मान प्राप्त होत असतो

८) या स्थानचा दूषित बुध दीर्घायुष्य देत नाही. मंगळाने युक्त असल्यास शस्त्रभय असते. बालवयात त्रास होतो. मानसिक दुर्बलता येते. डोकेदुखीचा भयंकर त्रास होतो. काहींना पक्षाघातासारख्या विकाराने जखडून पडावे लागते. मेंदूचे विकार होतात. भागीदारीच्या धंद्यात त्रास व अडचणी येतात. कधी कोर्टकचेयाही कराव्या लागतात. हे लोक खोटे बोलणारे, खोट्या सह्या करणारे, वाईट बुद्धीचे, अफरातफर करणारे असतात. दुस-याच्या खात्यातून पैसे काढून घेतात. वारसा हक्काचे धन काही खोटेनाटे व्यवहार केल्याने याला मिळत नाही. हे मृत्युस्थान आहे. या स्थानचा बुध ज्या राशीत असेल व त्या राशीचा मालक जसा असेल त्यावर मृत्यूचे स्वरूप सांगता येईल. याचे निर्भेळ स्वरूप मेंदू, फुफ्फुस, उदर यांचे विकार दर्शविते. त्याचप्रमाणे पक्षाघाताने हा मृत्यू दर्शवितो. शनीच्या वाईट योगात क्षय व दमा हे रोग होतात, तर मंगळामुळे आकडी, भोवळ येते. प्रे. केनेडींच्या अष्टमांत मेषेत बुध-मंगळ युती होती. त्यांच्या डोक्यांत गोळी घुसून मृत्यू झाला


   नवम स्थानात बुध

१) नवमस्थान - हा बुधाने बौद्धिक मूल्यमापन तृतीय आणि पंचमस्थानातील ग्रहाप्रमाणे ठरत असते. प्रथम स्थानातील ग्रहाला हा बौद्धिकदृष्ट्या अत्यंत पोषक असतो. नवजात बुध असलेल्या लोकांचे वक्तृत्व उत्कृष्ट असते. अशा लोकांच्या लिखाणास उत्कृष्ट प्रसिद्धि लाभते.

२) नवमात बुध असणारे लोक वागण्यात कुशल, धोरणी, शिस्तीचे असतात. हा बुध तुतीय स्थानाप्रमाणेच अत्यंत चौकस, तरल बुद्धीचा, अभ्यासू आहे. अशा व्यक्तींना प्रवासाची व वाचनाची आवड असते. तृतीयातील बुधाप्रमाणे कोणत्याही बौद्धिक छंदाच्या दृष्टीने, ज्ञानशाखेच्या अभ्यासाच्या दृष्टीने हा बुध चांगली फले देतो. पंचमात हर्षल-नेपच्यून असता हा बुध उत्कृष्ट कल्पनाशवि कृति, अंतर्ज्ञानशक्ति देतो.

३) भाग्यस्थानातील बुध व्यक्तीला धार्मिक व विद्याव्यासंगी करतो. हे लोक संपादक, प्रकाशक, प्राचार्य, शिक्षकी पेशात किंवा ज्योतिषी असतात. प्रवासाची व तीर्थयात्रेची आवड असते . 
er-शक येथे असता गायन, संगीत इ. क्षेत्रात चमकतात.
गुरु-बुध शुभयोग शिक्षणात चांगले यश मिळवून देतो. बुध-शुक्र येथे असता गायन, संगीत इ. क्षेत्रात चमक, नावलौकिक व कीर्ती मिळवतात. यांना लिखाणापासूनदेखील खूप प्रसिद्धी  मिळते  बुध असता हातून अनेक सत्कर्मे घडतात. इतरांना मदत करण्याची प्रवृत्ती आढळते

४)  भाग्यस्थानात बुध असलेल्या स्त्रिया बुद्धिमान, स्वभावाने नम्र, गृहकृत्यदक्ष व संसाराची आवड असलेल्या असतात. स्वत:च्या सुखापेक्षा कुटुंबाच्या सुखाकडे जास्त लक्ष देतात. या स्त्रिया आतिथ्यशील असतात. वाचनाची व लिखाणाची विशेषतः कविता करण्याची, प्रवासवर्णने लिहिण्याची आवड असते.  शुक्र-बुध युती गायन व संगीताच्या क्षेत्रात यश मिळवून देते.

५) नवमस्थानामधला बुध बुद्धिमत्ता चांगली देतो. शोधकपणा, चौकस पृणा व अंगीं कल्पकता दर्शवितो. स्वभाव विद्याव्यासंगी व जिज्ञासु असून लेखनकलेची किंवा वाङ्मयाची आवड देतो. ही माणसे ज्ञानाचीं भोक्ती असतात. सर्व प्रकारच्या चमत्कारिक वस्तूंचा संग्रह करणारी,परदेश पाहण्याची आवड असणारी असतात, दूरचे प्रदेश व प्रवासवर्णने वगैरे संबंधाने यांना उत्तम ज्ञान असते. पुष्कळ वेळां यांच्या हातून प्रवासवर्णने फारच उत्तम वठतात, हीं माणसे सतत विद्याव्यासंगी व वाचनांतले किडेच असतात. यांना सर्व प्रकारच्या कला, शास्त्र, भाषा यांची आवड असते. एकाद्या पुस्तकावर भाष्य करणे, त्यावर नोट्स करणे, ग्रंथप्रकाशन करणे, वगैरे गोष्टींना या स्थानामधील शुभसंबंधित बुध फारच चांगला जाणावा. या माणसांचीं धार्मिक मतें व विचार साधारण जुन्या , मताला धरूनच असतात. सर्व गोष्टींवर विश्वास असतो, या स्थानामधला पीडित बुध मानसिक दुर्बलता उत्पन्न करणारा जाणावा. तसाच कागदपत्रे वगैरेपासून कायद्याचे प्रश्न उत्पन्न होतात व त्यामुळे त्रास होतो. या स्थानामधील बुध साधारणपणे सर्व विषयांमध्ये प्रगति दर्शवितो, फल ज्योतिष, सामुद्रिक वगैरे गूढ 

६) नवमस्थानात स्वतंत्र व शुभसंबंधीत बुध असता मनुष्य विद्वान्, धनवान् , उच्च विचारांचा, सदाचारी, वक्तृत्वकलासंपन्न व धर्मशील असतो. हे सन्मार्गाने जाणारे, साधुजनांची सेवा करून त्यांची कृपा संपादणारे, तीर्थयात्रा करणारे, धर्म व तत्त्वज्ञान यांचा अभ्यास करणारे असतात.
 हे सतत विद्याव्यासंग करणारे असून वेदवेदान्त, इतिहास, गूढशास्त्रे, संगीत, ललितकला, बाङ्मय यांचा अभ्यास असतो. दूरचे प्रवास, संशोधन, पुस्तके व वस्तूंचा संग्रह, परंपरावादी धर्ममते, योगाभ्यास, तप, ध्यानधारणा, कायद्याचा अभ्यास इत्यादी गोष्टी येथील बुध दर्शवितो. यांना अनेक भाषा अवगत असतात. बुद्धी धर्मकार्यात व पुण्य कार्यात मग्न असते. ह्यांना भक्तिभावपूर्वक गंगास्नान घडते. ब्रह्मविद्या व अध्यात्म यांची आवड असते. हे शास्त्रीय दृष्टिकोन बाळगतात. त्यांच्याकडून अशा प्रकारचे लेखन होते की त्यांना दिगंत कीर्ती लाभते. संगीतक्षेत्रात हे चिरस्मरणीय काम करतात. ज्योतिषशास्त्रात काही वेगळे करून आपला ठसा उमटवतात. यांना बुद्धिमत्तेच्या जोरावर आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी लाभते. यांना वडिलांचे सुख चांगले मिळते. भावंडांत विद्वान असतो. मुले बुद्धिमान व स्त्री चतुर असते. सरकारदरबारी मान मिळतो. हे स्वतःच्या कुलांत श्रेष्ठ ठरतात. मामाची मदत होते

 ७) या स्थानाचा बुध अशुभ असता बौद्धिक अहंकार असतो. धर्मामध्ये बुद्धीची लुडबुड असल्याने मानसिक स्थैर्य नसते. फारच बिघडला असेल तर धर्मपरि वर्तन घडते. निर्बल असून बिघडल्यास बुद्धिहीनता व वाणीदोष असतो. धार्मिक अनिश्चिती, नास्तिकता, संशयीपणा, पितृसुख नसलेला, गुरुजनांविषयी आदर नसलेला, परंपरा न जुमानणारा, धर्मग्रंथांबद्दल बौद्धिक संशय, कायदेकानूंकडे दुर्लक्ष करणारा, स्वार्थासाठी गुरुपूजा व देवपूजा करणारा, खोटेपणा-खोट्या सह्या वगैरे मार्गाने धन कमवणारा, बुद्धीचा दुरुपयोग करणारा अशी विविध फले या अशुभ बुधाची आहेत. ग्रंथप्रकाशनात अडथळे येतात. एक ना धड भाराभार चिंध्या अशी स्थिती असते. उच्चशिक्षणात व्यत्यय येतात व अर्धवट राहाते. बुद्धिमत्ता असून त्याचा व्यवहारासाठी उपयोग करीत नाहीत

 दशम स्थानात बुध

१) दशम स्थान - दशमात बुध असलेल्या व्यक्ती व्यवहारचतुर, व्यापारीवृत्तीच्या व हिशेबी प्रवृत्तीच्या असतात. येथे बुध एकटा असता बहुधा कारकुनी पासून सुरुवात होते. इतर ग्रहयोग चांगले असता लवकरच प्रगती होते, वरच्या पदावर जातात.

२) येथे बुध-गुरु असता आयुष्य सुखात जाते. शनि-बुध येथे आयुष्यभर खर्डेघाशी करावयास लावतात. हा एक दारिद्र्य योगच आहे. अशा लोकांनी जिथे पैशाचा संबंध येतो (उदा. कॅशियर) अशा ठिकाणी काम करु नये, अन्यथा बनावट कागदपत्रे, खोट्या सह्या, अफरातफर इ. करुन स्वत:वर संकट ओढवून घेतात. बुध-राहु युतीदेखील अशाच प्रकारची फळे देते. 

३) स्त्रियांच्या पत्रिकेत या स्थानी बुध असता टायपिस्ट, स्टेनोग्राफर, क्लार्क अशा पदांवर काम करतात. विवाहानंतर भागोदय होतो. रवि-बुध किंवा गुरु-बुध युती दशमात असता सर्व प्रकारची सुखे उपभोगावयास मिळतात. या स्त्रिया संसार सांभाळुनही चांगले अर्थार्जन करतात. 

४) दशम स्थानातील एकटा बुध हा व्यक्तीला अत्यंत व्यवहार चतुर बनवतो. हा बुध व्यवहारात हजरजबाबीपणा, हरहुन्नरी, बुद्धिमत्ता, चातुर्य, कल्पकता दाखवतो. दशमातील बुध असलेले व्यापारी कमिशन काढण्यात, फायदा काढण्यात अत्यंत हषार असतात. हया लोकांना धंद्याचे ज्ञान, पुढील परिस्थितीचा अंदाज उत्कृष्ट असतो. इतर ग्रहांच्या अनुषंगाने दशमात बुध असलेल्या व्यक्ति खालील व्यवसायात अस शकतात-लेखन, प्राध्यापक, पत्रकार, प्रिटिंग, शॉर्टहँड, टायपिस्ट, कारकन, अकौटट व बुधाच्या कारकत्वास येणा-या गोष्टीचे व्यवसाय. दशमांत बुधाबरोबर रवि असता व्यवसायात उत्कृष्ट नफा, अधिकारयोग मिळतो. नवमात रवि असता दशमातील बुध बलवान होतो.

५) दशमस्थानामध्ये बुध फार बलवान् असतो. अनेक धंदे करण्याची इच्छा किंवा आवड दर्शवितो. बुद्धि तीव्र असते. भाषणशैली चांगली असते, विनोदी भाषण किंवा कोट्या सहज करितां येतात, वायुराशीमधील बुध उत्तम वक्तृत्व देतो. मन फार चंचल असते. ते एकाच गोष्टीकडे किंवा एकाच धंद्याकडे दीर्घ काल टिकत नाहीं. कीर्तीचा व धंद्याचा दशमस्थानाबरोबर निकट संबंध असून हा ग्रह मानसिक शक्तीचा द्योतक असल्यामुळे तो या स्थानामध्ये ज्याप्रमाणे निरनिराळ्या राशींमध्ये असतो त्याप्रमाणे फार तीव्रपणानें फलें अनुभवास आलेली पाहण्यास मिळतात. दशमामध्ये बुध पीडित नसावा.

६) या स्थानामधील बलवान् बुध वक्तृत्व, ग्रंथलेखन, वाङ्मयाच्या द्वारें कीर्ति आणि भाग्योदय दर्शवितो. दशमामधील बुध माणसाला अष्टपैलुत्व देतो व अनेक धंदे करणारा बनवितो. पोस्ट, टेलिग्राफ, टेलिफोन, ग्रंथलेखन, प्रकाशन, कमिशन एजन्सीचे धंदे, बुकडेपो, स्टेशनरी, व्यापार वगैरे धंद्यांमध्ये लाभ दर्शवितो. हेडक्लार्क, सेक्रेटरी, सुपरिन्टेंडस्, वगैरे प्रकारचे अधिकार देतो. शॉर्टहॅन्ड, टायपिंग, वर्तमान पत्रांसंबंधाने सर्व प्रकारची कामें, छापखान्याचे व्यवहार इत्यादिकांमध्ये कुशलता, हस्तकौशल्य व लाभ दशमामधील बुध दर्शवितो.

 ७) दशमामधील बुध हा लेखनकलेला फारच चांगला असतो, तो उत्तम बुद्धिमत्ता दर्शवितो. परंतु तो जर एकाद्या पापग्रहाबरोबर अशुभ संबंध करीत असेल तर व तो जर बराच पीडित असेल किंवा निर्बली असून पापसंबंधित असतां लुच्चेगिरी, फसवेगिरी, खोटे बोलणे, अप्रामाणिकपणा, वाह्यात वर्तन इत्यादि अनेक अनिष्ट दुर्गुणांचा द्योतकही होतो. अट्टल दरवडेखोरापासून खोटेनाटे कागद बनविणारे, लबाड, चोर, चहाडखोर व थापाडे याप्रमाणे तो ज्या राशीमध्ये असेल व ज्या मनाने इतर ग्रहस्थिति पोषक असेल

८) या स्थानामधील बुध कमीजास्त फलांची तीव्रता व त्यापासून संकटपरंपरा दृग्गोचर करितो. दुशमामध्ये मंगळाने पीडित असलेला बुध खोटे बोलणे, थापा मारणें, रागीट, वाह्यात बडबड करणा-या व्यक्ती दर्शवितो. शनीनें पीडित असलेला दशमामधील बुध बुद्धीची वाढ उशीरां करतो, हीं माणसे मुखदुर्बल व एकांतप्रिय आढळतात. या योगामुळे शिक्षणामध्ये व्यत्यय येतो. वृत्ति फाजील चिकित्सक व संशयी होते. दुशमामध्ये बुध हा मंगळ शनीने अशुभसंबंधित असतां नीचकर्म करणे, खोटे दस्तऐवज करणें, चोरी करणें, पैशाची अफरातफर करणे इत्यादि गोष्टी दर्शवितो. त्यामुळे संकटपरंपरा प्राप्त होण्याची धास्ती असते.

९) कर्मस्थानी बुधासारखा प्रह शुभस्थितीत असणे चांगले. हा बुध विविध विषयांत मती चालवतो. अधिकाधिक ज्ञान मिळवण्याची इच्छा असते. कमिशनचे धंदे, दलाली व व्यापारात यश मिळते. बौद्धिक कार्यात हे यशस्वी होतात. एकापेक्षा अधिक नोकरीधंदा करण्याकडे कल असतो. हे लोक नोकरी वा व्यवसाय सतत बदलत असतात. हे विद्याव्यासंगी, ज्ञानी, सत्कर्मी व लोकप्रिय असतात. विनोदी लेखक, वक्ते म्हणून हे प्रसिद्ध होतात. संभाषणचातुर्य असते. भाषाशास्त्र, गणित, ज्योतिषशास्त्र, इंजिनियरिंग, इतिहास, वेदान्त, विद्युत्शास्त्र आदी विषयांचा अभ्यास असतो. शिक्षणसंस्थांशी संबंध असतो. बुधाच्या, शुक्राच्या व कुंभ राशीत ललितकला, साहित्य, तत्त्वज्ञान यांचा अभ्यास होतो तर गुरूच्या राशीत शिक्षण, संस्कृतभाषा, वेदवेदान्त, ज्योतिषाचा संबंध असतो. तूळेमध्ये कलोपासना असते; हस्तकला, पेंटिंग, शिल्पकला, अभिनय कला यांत प्राविण्य असते. मकरेत राजकारण कुशलता, वृश्चिकेत युद्धकौशल्य, कन्येत सेवावृत्ती असते. यांना स्मरणशक्ती, समयसूचकता, प्रसंगावधान, चातुर्य यांची देणगी असते. त्यामुळे जीवनात यशस्वी, धनवान् व कीर्तिमान होतात. सरकारतर्फे यांना मानसन्मान मिळतो. व्यापारी पेढ्या, बँका, रेल्वे, पोस्ट ऑफिस यांमध्ये टायपिस्ट, स्टेनो, कारकून, अकाउंटन्ट म्हणून कामे, वर्तमानपत्राचे संपादक, प्रकाशक, मुद्रक, स्टेशनर्स, लेक्चरर्स, शिक्षक, इंजिनियर्स म्हणून नोक-या हा बुध दर्शवतो.

 १०) दूषित बुध चोरी, थापेबाजी, खिसेकापूगिरी, खोटे दस्तऐवज, खोट्या सह्या व साक्षी, लांच घेणे, अप्रमाणिक वर्तन दर्शवितो. बढतीत अडथळे येतात. ज्युनियर्स पुढे जातात. शिक्षण अपुरे राहाते. प्रकाशनात विलंब होतो. चौर्यकर्म करून कॉपीराइट हक्काचा भंग करतात. लफंगेगिरीत कमिशन लुटतातसध्याच्या अकाउंटसमधून पैसे काढतात. खोटी सर्टिफिकेटस वा पासपोर्ट विकतात. लेखनामुळे अपकीर्ती होते. जीवनात अस्थिरता असते.

११) दशमस्थानी बुध असलेल्या व्यक्ती स्वतःच्या बद्धिमत्तेच्या जोरावर चांगल्या अगर वाईट मार्गाने प्रसिद्धी मिळवतात. 

 एकादश स्थानात बुध

१) लाभस्थानात बुध असलेल्या व्यक्तींचा स्वभाव अत्यंत गोड असतो. सहसा दुसन्याला दुखवत नाहीत. यांचा मित्रपरिवार मोठा असतो. समाजातील सर्व थरांतील व सर्व वयोगटांतील माणसांशी यांची मैत्री असते. विशेषतः आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या माणसांबरोबर यांचे चांगले जमते व अडचणीच्या प्रसंगी त्यांच्याकडून मदतही लाभते. सहली किंवा तत्समप्रसंगी यांची अनुपस्थिती सर्वांना जाणवते.

 २)  हे लोक हुशार, व्यवहारी, काटकसरी व व्यापारीवृत्तीचे असतात. बुध-शुक्र युती लाभात असता गायनाची आवड असते. येथील बुध भाषेवर प्रभुत्व दर्शवतो. वक्तृत्व चांगले असते. अनेक मार्गांनी पैसा मिळतो. शेअर्समध्ये फायदा होतो. 

३) ज्या स्त्रियांच्या कुंडलीत एकादश स्थानी बुध असतो अशा स्त्रिया लहान मुलांमध्ये चांगल्या रमतात. पाळणाघर चालविणे किंवा बालवाडी चालविण्यासाठी हा योग चांगला आहे. यांना संततीसौख्य चांगले लाभते. बुध-शुक्र गायनकलेत प्रावीण्य देतात. 

४) या स्थानात बुध असलेल्या व्यक्तींना आपल्यापेक्षा वयाने कमी असलेल्या लोकांची, तरुण लोकांची मैत्री आवडते. हा बुध गपिष्ट पण अभ्यासू व्यक्तीची मैत्री दाखवतो. हया बुधाबरोबर शनि असल्यास फसवे, लबाड भित्रे असतात. मंगळबुध असता मित्रांशी वारंवर भांडणे होतात. हा बुध व्यापारात आर्थिक लाभ चांगले दाखवितो. 

५) एकादशस्थानामधील बुध विद्या, शिक्षण व मानसिक उन्नति यांना चांगला असतो. शास्त्रीय विषय व वाङ्मयचर्चा यांची आवड असते. बुद्धि चांगली असते. ती एकाच गोष्टीकडे स्थिरपणाने लावता येते. ध्यानधारणाशक्ति चांगली असते. फलज्योतिष, सामुद्रिकशास्त्र इत्यादि विषयांची आवड पाहण्यास मिळते. मित्रांची विशेष आवड असते. ओळखी  पुष्कळ असतात परंतु खरे स्थिर वृत्तीचे व कायमचे मित्र असे फारच थोडे असतात. या स्थानामधला बुध प्राप्तीचें मान सारखें दर्शवीत नाहीं. शास्त्रज्ञ व वाङ्मयसेवक यांच्याबरोबर सहवास घडतो. या स्थानामधला पीडित बुध खोटे बोलणारे, लफंगे व काबेबाज मित्र दर्शवितो, त्यांपासून अत्यंत मानसिक त्रास होतो. या स्थानामध्ये बुध असून तो गुरूबरोबर अशुभसंबंधित असतां मित्रांना सांपत्तिक व्यवहारामध्ये जामीन राहू नये, कारण जामिनकी अंगावर खात्रीने येऊन सांपत्तिक नुकसान झालेले पाह ण्यास मिळते. या स्थानामध्ये बुध पीडित असतां ज्या माणसाकडून थोडा बहुत त्रास होईल अशांचे बरोबर सहवास घडतो. या स्थानामधील मंगळ, हर्शलनेपच्यून किंवा शनीने पीडित असलेला बुधु फार तीव्र अनिष्ट फलें दर्शवितो. या माणसांनीं मित्र व ओळखीचे लोक यांच्याबरोबर पत्रव्यवहार करतेवेळीं अत्यंत दक्षता बाळगली पाहिजे 

६) या स्थानातील शुभसंबंधीत बुध लेखनकलेपासून लाभ दर्शवितो. शिक्षणा मध्ये उत्तम यश लाभते. विद्वत्तेचा सरकारकडून गौरव होतो. त्याच्या बुद्धिवैभवामुळे त्याला अनेक प्रकारे लाभ होतात. गायनकला व वैद्यकीमुळे संपत्तीलाभ होतो. हे लोक वृत्तपत्राचे मालक, लायब्ररी काढणारे, शाळा उघड णारे असतात. वक्तृत्वाच्या जोरावर यांना पैसा मिळतो. साहित्यिक, वकील, सल्लागार, राजदूत, दिवाण म्हणून हे आपल्या कार्यात यशस्वी होऊन धनलाभ मिळवितात. यांना वाहनसौख्य, मानसन्मान, पारितोषिके मिळतात. व्यापारी वर्ग व उद्योगपतींच्या लाभस्थानी हा बुध आढळतो. आपल्या तल्लख बुद्धीने व मधुर भाषणाने हे लोक अनेक मित्र जमवतात. विद्वान, बुद्धिजीवी लोकांत त्याचप्रमाणे लेखक वर्गात ओळखी असतात, परंतु यांची मैत्री चिरकाल टिकणारी नसते. यांचे इष्ट हेतु सिद्धीस जातात. उत्कृष्ट मनोबल व विद्याव्यासंग यांमुळे हे सदैव प्रसन्न असतात. भरपूर जीवनानुभव अभ्यासल्यामुळे यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोण व्यापक असतो. शिक्षणसंस्थांना, वाचनालयांना हे उदारहस्ते मदत करतात. तरुण वर्गामध्ये हे लोकप्रिय असतात. व्यापा-यांशी ओळखी असल्याने त्यांच्यापासून फायदे होतात. सट्टा, लॉटरी व शेअर्समध्ये पैसा मिळतो. मामा वा मावशीकडून धनप्राप्ती होते. शब्द-कोड्यांमधून बक्षिसे व पत्त्याच्या खेळामध्ये धन मिळते. एकंदरीत या स्थानातील शुभबुध बुद्धीच्या जोरावर अनेक प्रकारचे लाभ देतो

७) या स्थानातील बुध अशुभ असता यांचे मित्र क्षणात शत्रू बनतात. यांची अपकीर्ती करणारेच पुष्कळ होतात. या लोकांनी मित्रांवर जास्त विसंबून राहू नये; हे मित्र केसाने गळा कापणारे असतात. अशा मित्रांना कधी जामीन राहू नये. आयत्या वेळी तोंडघशी पाडतील. काही मित्र जुगारी असल्याने त्यांच्या मुळे नुकसान होते. पत्रव्यवहारामुळे व लेखनामुळे ह्या लोकांबद्दल फार गैर समज पसरतात. दिलेले पैसे पुन्हा परत मिळत नाहीत. विद्येत अडथळे येतात. वडील भावंडांचे सुख मिळत नाही. चांगल्या संधी फुकट दवडल्या जातात. शेअर्समध्ये नुकसान होते. महत्त्वाची इच्छा अपुरी राहुन जाते. संतती बुद्धिहीन असते. स्मृतिभ्रंशतेमुळे परीक्षा बुडते वा अपेक्षित यश मिळत नाही

                                  द्वादश स्थानात बुध

१) व्ययस्थानात बुध असलेल्या व्यक्ती देवभोळ्या असतात. अशा व्यक्ती बुद्धिमान असतात परंतु त्यांच्या बुद्धीला पुरेसा वाव मिळत नाही. हे स्कॉलर म्हणून यश मिळवू शकत नाहीत. कोणत्याही विषयाचा सखोल अभ्यास न करता अनेक विषयांचा वरवर अभ्यास करुन टेंभा मिरवण्याची संवय असते.

 २) या बुधाचा राहु, हर्षल, शनि किंवा मंगळाबरोबर अशुभयोग होत असेल तर बंधनयोग घडतो. या स्थानी बुध-राहु असणा-या व्यक्ती फसवाफसवी करून, हिशेबात अफरातफर किंवा खोटी कागदपत्रे तयार करून तुरुंगात जाऊ शकतात. येथे बुधाबरोबर पापग्रह असता मनुष्य नेहमी कर्जबाजारी असतो. धंदा-व्यापारात दिवाळे निघण्याचा संभव असतो

३)  स्त्रियांच्या पत्रिकेत व्ययात बध असता अशा स्त्रिया वायफळ बडबड करणाच्या असतात. नसत्या चौकशा करण्याची सवय असते. यांच्या डोळ्यांमध्ये काहीतरी व्यंग असण्याची शक्यता असते. नको तेव्हां, नको तिथे, नको ते बोलणे यांमुळे या स्त्रिया स्वतः अडचणीत येतात व दुस-यालाही पेचात टाकतात. महत्त्वाचे किंवा गुप्त कागदपत्र यांच्या हातात कधीही देऊ नयेत. 
व्ययस्थानात पापग्रहाबरोबर असलेला बुध व्यक्ति लच्ची लबाड दाखवतो. व्यक्तीला खोटे दस्तऐवज, खोट्या सह्या वगैरे गोष्टी किंवा थापा, बनवाबनवी करण्याची सवय असते. हा स्थानात बुध असता जामीन राहिल्याने आर्थिक हानी होते. हचा स्थानातील बुध व्यक्तीला गूढ रहस्यमय गोष्टींची व प्रवासाची आवड देतो.

४) व्ययस्थानामध्यें बुध लेख, वर्तमानपर्ने, कागदपत्रे, वगैरेमुळे शत्रुत्व व संकटे दर्शवितो. पुष्कळ वेळां नाना होगा कड्या, वाईट बातम्या  प्रसिद्ध होऊन दुलकिक होतो. या स्थानामध्ये वृषभ, कर्क, वृश्चिक व मकर राशींमधील पीडित किंवा शनि-मंगळ-नेपच्यून-हर्शलबरोबर अशुभसंबंधित असलेला बुध फारच वाईट फलें दर्शवितो, या योगावर गुप्त शत्रुत्व व त्यापासून मानसिक त्रास उत्पन्न होतो. वर्तमानपत्रे, कागदपत्रे, लिखाण इत्यादिकांमुळे तुरुंगवास वगैरे अनिष्ट गोष्टी घडण्याची धास्ती असते. या स्थानामध्ये मिथुन, तुला, कुंभ किंवा कन्याराशीमधला शुभसंबंधित अस लेला बुध वक्तृत्व, वाड्मयामध्ये आवड, गुप्त किंवा गूढ शास्त्रांची आवड, प्रवास वगैरेंपासून फायदे इत्यादि बरीच चांगली फलें दर्शवितो, व्ययस्थाना मध्ये बुध पीडित असलेल्या व्यक्तींनी लिहिण्यामध्ये विशेष खबरदारी घ्यावी. या स्थानामधील पीडित बुध मानसिक दुर्बलता उत्पन्न करण्यास  पुष्कळ वेळां कारणीभूत होतो. तो मज्जातंतूचे विकार किंवा चित्तक्षोभ, वेड  लागणे, फुप्फुसांचे विकार, कफक्षय इत्यादि दर्शवितो. 

५) व्ययस्थानामध्ये बुध असणा-या लोकांनीं भाषणामध्ये विशेष दक्षता बाळगली असतां पुष्कळ वेळां भाषणानें उत्पन्न होणारा गैरसमज व शत्रुत्व सहज टाळता येईल. चित्तक्षोभ होईल असल्या कृत्यांपासून दूर राहावें, मन शांत व प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करावा. अति अभ्यास किंवा विचार करूं नये. या स्थानामधील पीडित बुध वेड्याच्या इस्पितळामध्ये रवानगी  करण्यास समर्थ असतो. 

६) या स्थानात शुभसंबंधीत बुध असता लेखनकलेत चांगले यश देतो. मोठ मोठे नामांकित साहित्यिक या बुधावर विशेषतः मिथुन व मकरेत असताना जन्मले आहेत. गूढ शाखे, अध्यात्म यांच्या अभ्यासास हा बुध चांगला. परराष्ट्रातील राजदूत वा परराष्ट्रमंत्री म्हणून राजकारणी चमकतात. परदेशगमन होते. यांच्या विद्वत्तेबद्दल परदेशात नावलौकिक होतो. लोकमान्य टिळकांच्या व्ययातील मिथुनस्थ बुधाने तुरुंगात असताना 'गीतारहस्य' हा ग्रंथ लिहविला व त्यामुळे त्यांना परदेशातही कीर्ती मिळाली. वृत्तपत्रीय लेखन, जाहीर सभेतील व संभाषणातील वक्तव्याने हा बुध संकटे व अपकीर्ती दर्शवितो. हे परदेशात व्याख्यानांमुळे पैसे मिळविणारे असतात. सरकारच्या विरोधी पक्षातील वक्त्यांच्या व्ययांत बुध असू शकतो. अज्ञात भूप्रदेश व अंतराळ-संशोधनास शास्त्रीय राशी (३॥७॥११) मधील बुध चांगला असतो. उपासना, ध्यानधारणा व अध्यात्माच्या दृष्टीने गुरूच्या राशीमधील व स्वगृहीचा बुध उत्तम असतो. तसेच येथील बुध इस्पितल व तुरुंगात कारकुनी दर्शवितो.

 ७) या स्थानाचा अशुभ बुध व्यक्तीस उथळ विचारांचा, चहाडखोर व भित्रा, बनवतो. अंविचारयुक्त बडबडून हे आपल्याच हाताने आपल्या पायावर धोंडा मारून घेतात. विद्याभ्यास होत नाही वा अर्धवट राहातो. इतर विषयांचेही जेमतेम ज्ञान असते. वाचाळतेने शत्रू बनवतात, त्याचप्रमाणे लेखनाने शत्रू होतात. वाणीदोष असतो. काहींची वाचा जाते. मामाचे सुख नसते. व्यभि चाराच्या अतिरेकाने नपुंसकता येते. फालतू गप्पांत वेळ घालवून, क्षुल्लकशा गोष्टीवरून वादविवाद करून, नीच माणसांच्या संगतीत राहून हे आपला काळ कंठतात. अब्रुनुकसान, कोर्टाचा अवमान, चौर्य, खोटेपणामुळे तुरुंगवास घडतो. हे दुर्बुद्धी, निर्बुद्ध, विद्याहीन, चंचलचित्त, आळशी, विश्वासघातकी, कावेबाज असतात, अयोग्य जामिनामुळे नुकसान होते. यांच्याबद्दल लोकापवाद पसरतात. मानसिक दुर्बलता येऊन वेड्याच्या इस्पितळात राहावे लागते. दुसन्यावर विश्वास ठेवून फसतात. राजद्रोहाबद्दल फाशी होते. शेअर्स व पत्त्याच्या 
जुगारात नुकसान होते. लैंगिक विकृती असते