Sunday 10 November 2019

ज्योतिषशास्रातील महत्त्वाचे नियम (भाग -१) - (ASTROLOGY TIPS-1)

ज्योतिषशास्रातील महत्त्वाचे नियम (भाग -१)
            (ASTROLOGY TIPS- part 1) 

                ज्योतिषशास्त्राचा खरोखर शास्त्रीय अभ्यास करावयाचा आहे ,त्याने निरनिराळी ज्योतिषशास्त्राची पुस्तके वाचून आपणाला पटणारी अशी काही जातक-शास्त्रीय तत्त्वे वा सूत्रे ( Rules of Predictive Astrology ) एकत्र करून नंतर ती अभ्यासून पहावीत,  हे करीत असतां ती तत्त्वे वा सूत्रे त्याने निरनिराळ्या जन्मपत्रिकांना लावून पहावी आणि पडताळ्याच्या स्वरूपांत तपासून घ्यावी
प्रत्येकाची कुंडली परीक्षणाची पद्धतनियमाचा वापर करण्याची हातोटीअंतीम फलादेशास पोहचण्याची पद्धत वेगळी असू शकते. एकाच घटनेसाठी काही ठिकाणी एकापेक्षा जास्त नियम दिलेले आढळतात, प्रत्येकाला येणारा अनुभव निराळा असल्याने प्रत्येकजण आपली स्वतःची पद्धत व नियम अनुभवांती ठरवित असतो. त्यामुळे एकापेक्षा जास्त नियम आढळले तर, नविन अभ्यासकांनी गोंधळुन जाण्याचे कारण नाही. ज्याने त्याने आपल्या अनुभवानुसार कोणता नियम किंवा पद्धत वापरावी हे ठरवावे. 

माझ्या अभ्यासांत, मी जी अनेक ज्योतिषशास्त्राची पुस्तके वाचली व त्यातील जे मला पटले:-                                                           त्या पुस्तकांमधीलशास्त्रीय तत्त्वे वा सूत्रे :-(Rules of Predictive Astrologyखाली एकत्र देत आहे.:- 
(हे नियम, पत्रिकेतील इतर शुभाशुभ योगांचा तारतम्याने विचार करूनच उपयोगात आणावेत )


(१) ज्यांच्या कुंडलींत रवि बिघडलेला आहे अशा व्यक्तींना, शरीरसुख चांगले मिळत नाही.
    राजदरबारी त्रास भोगावा लागतो. बिघडलेला रवि पितृसौख्याचीहि हानि करतो.

(२) रवि तृतियांत असेल तर, असा मनुष्य आपल्या भावंडात वडील असतो.

(३) रवि चतुर्थात असेल तर, त्या व्यक्तीला पित्याकडून सांपत्तिक लाभ होईल.

(४) रवि पंचमांत असेल तर, प्रथम संतति पुत्रसंतति असण्याची शक्यता असते.

(५) सप्तमांत रवि असलेला मनुष्य अनेक स्त्रियांचा उपभोग घेतो.

(६) कुंभ लग्न असून, सप्तमेश रवि जर का सप्तमांतच असेल तर, अशा मनुष्याला एक किंवा दोन      यापेक्षा जास्त संतति होत नाही.

(७) सप्तमस्थानी रवि असतां, अशी माणसे आपल्या आवडत्या माणसांवर निःसीम प्रेम करतांना        आढळतात. ईश्वर भक्त असल्यास ही माणसें ईश्वराची निष्काम भक्ति करतात. संसारांत कितीहि    संकटें आलीं तरी ही माणसे ईश्वरभक्तीपासून परावृत्त होत नाहीत.
   
(८) रवि सप्तमांत असलेली स्त्री, आपल्या नवऱ्याच्या कह्यांत कधीहि राहणार नाही. ती हट्टी, मानी     आणि वादविवादकुशल असेल. मात्र, वैवाहिक सुख तिला बेताचेच मिळेल.
     
(९) रवि लग्नांत असून, मंगळ पंचमांत असेल तर संतति होण्याची आशा फार कमी असते.

१०) अष्टमांत रवि किंवा रवि अष्टमेश असतां हुंडा मिळत नाही. पत्नी गरीब घराण्यातील असते.

(११) रवि हा शनीने युक्त असेल तर मनुष्याला पाठीच्या कण्याचे विकार होण्याची शक्यता असते.

(१२) रवि व शुक्र यांची अंशात्मक युति, लग्न किंवा षष्ठस्थानी झाल्यास मधुमेहाचा विकार होतो.

(१३) रवि मंगळ धनस्थानांत असलेल्या व्यक्तीला मुखरोग होतात.

१४) रवि तृतियांत अगर सप्तमांत असून मंगळ लग्नांत असल्यास मातृसौख्याच्या दृष्टीने कुयोग      होतो.

(१५) रवि-मंगळ अंशात्मक युति (विशेषतः २-६-१० राशीत) असल्यास कर्णरोग होतात.

(१६) रवि हा षष्ठस्थानी, पापग्रह युक्त व पापग्रह दृष्ट असतां, मनुष्याला नेहमी आम्लपित्ताचा त्रास       होतो.

(१७) लग्नी रवि असून, त्यावर मंगळाची दृष्टि असेल, म्हणजेच मंगळ जर ६, ७ किंवा १० या स्थानी          असेल तर मनुष्याला श्वासरोगाचा उपद्रव होईल.

 (१८) रवि लग्नी असतां आप्तेष्ट, नातलग यांच्याशी पटत नाही.

 (१९) पंचमस्थानी वंध्या राशीस रवि (अगर मंगळ) असेल तर संततिसुखाची आशा बाळगणे व्यर्थच     होय!

(२०) सिंह राशीचा रवि लग्नी असतां मनुष्याला नेत्ररोग होतात.

(२१) कर्क राशीचा रवि लग्नी असतां मनुष्याचे डोळे पिचके असतात.

(२२) रवीच्या द्वितीय स्थानी मंगळ असतां, मनुष्याची दृष्टि कमी असते.

(२३) रवि षष्ठांत व चंद्र व्ययस्थानांत असेल तर नेत्रविकार उद्भवतात.

(२४) रवि कर्क राशींत दूषित असेल तर मोतीबिंदूचा (cataract) त्रास होतो.

(२५) रवि चंद्रासह नवमांत असल तरीहि नेत्रविकार संभवतात.

(२६) रवि हा मंगळ, गुरु व बुधासह पत्रिकेत कोठेहि अलेल तरी नेत्रविकार देतो.

२७) लग्नस्थ रवि ,चंद्र आणि शुक्र यांचेबरोबर असतां दंतविकार उद्भवतात.

२८) रवि व मंगळ शनीने किंवा केतूने युक्त असतां पोटदुखीचा) आजार निर्माण होतो.'

(२९) रवि व मंगळ लग्नस्थानीं अग्निराशीत असतील तर त्या मनुष्याला नेहमी उष्णतेच्या   विकारांपासून पीडा होईल.

(३०) चंद्र हा उच्चीचा किंवा मित्रगृहीं असेल तर अनेक संकटांचा नाश करतो.

(३१) चंद्र बलवान् असेल व शुक्र शुभग्रहयुक्त वा दृष्ट असेल तर अशा मनुष्याची माता दीर्घायु असते.

(३२) चंद्र कोणत्याही केंद्रांत (१,, ,१० या स्थानी )  असतां आर्थिक स्थिति चांगली  ठेवतो.

(३३) चंद्र बुध अंशात्मक युति (विशेषतः ३-७-११ या राशीत) असतां अशी माणसें हंसत बोलणारी आढळतात.

३४) चतुर्थस्थानांतील चंद्र आध्यात्मिक मार्गाची आवड दर्शवितो.

 ३५)चंद्राच्या पंचमांतील ( अंशात्मक) शुभग्रह उत्कृष्ट प्रतीचा धनयोग करतात.

(३६) चंद्र- मंगळ युति, हा लक्ष्मीयोग असून मनुष्याला श्रीमंत करतो
.
(३७) चंद्र धनस्थानांत असता व्यक्तिला गोड पदार्थांची आवड दिसून येते.

३८) चंद्र मकर राशीत असेल तर मनुष्यावर बडतर्फ होणे, सस्पेंड होणे ,खटला होणे, अपघातांत सांपडणे, शाळा कालजातून रस्टिकेट होणे अशा सारखे प्रसंग उद्भवतात

३९) मकर राशि चंद्राची शक्ति व गुणधर्म नाहींसे करते. या राशीत चंद्र फारच दुबळा असतो. त्यामुळे मकर राशीचे लोक नाजूक  व अशक्त असून लहानपणी नेहमी आजारी असतात.

(४०) चंद्र जर शुभग्रहांच्या कर्तरित असेल तर, मनुष्य सर्वसाधारणपणे सुखी असतो. त्याची आर्थिक स्थितीहि चांगली असते.

(४१) चंद्राच्या दशमांत गुरु (अंशात्मक) असल्यास उत्कृष्ट दर्जाचा  धनयोग होतो.

(४२) चतुर्थात क्षीण चंद्र असल्यास वाहनांपासून भय संभवते.

(४३) चंद्र राहु युति पत्रिकेत कोठेहि असली तरी त्यायोगें दृष्टिदोष निर्माण होतो.

(४४) लग्नस्थानांत चंद्र मंगळ व केतु असतील तर मनुष्याला देवीचा आजार उद्भवेल.
(४५) चंद्र मेष राशीत असून जर का शनीने दृष्ट असेल तर असा मनुष्य धनहीन परंतु पैशाचा लोभी असेल.

४६) चंद्र आणि गुरु यांचा नवपंचम योग असतां मनुष्याला प्रसिद्धी मिळते.

(४७) स्त्रियांच्या पत्रिकेत चंद्र+मंगळ सप्तमांत किंवा अष्टमांत असतां मासिक पाळीची तक्रार असते.

(४८) मेष राशीचा चंद्र, मंगळाने दृष्ट असा लग्नीं असेल तर मनुष्याच्या तोंडाला दुर्गंधी सुटेल.

४९) मेषेच्या चंद्रावर शनीची दृष्टि असेल तर मनुष्य भिक्षा मागून उदरनिर्वाह करील.

(५०) प्रश्नकाली चंद्र ६, , १२ या स्थानी असून, मंगळ जर त्याच्या अष्टमांत असेल तर रोगी सहसा वांचणार नाही.

(५१) चंद्र हा लग्नेश आणि षष्ठेश यांनी युक्त असतां पाण्यात बुडून मरण संभवते.

(५२) कर्केचा चंद्र षष्ठस्थानी असतां उदर विकार संभवतात. मात्र हा चंद्र पापग्रहाने युक्त किंवा दृष्ट असेल तरच हे फल देईल.

(५३) चंद्र द्वितीयांत किंवा अष्टमांत असेल तर मनष्याला नेहमी घाम येईल.

५४) चंद्र धनु राशींत असून ,बिघडलेला असेल तर मनुष्याचे दात मोठे असतील.

५५) चंद्र चतुर्थात असतां ,मनुष्य दयाळू बुद्धीचा असतो.

(५६) चंद्र आणि शनि हे मंगळासह ६, ८ किंवा १२ या स्थानी असतां मनुष्य नेत्रहीन होतो.

५७) चंद्र आणि रवि व्ययस्थानी असतां नेत्रविकार देतात. कांहीं वेळां मनुष्य नेत्रहीन असतो.

(५८) चंद्राच्या दशमांत किंवा शनीच्या चतुर्थात शुक्र असतां मनुष्य अतिशय कामी असतो. या योगावर जन्मलेला मनुष्य व्यभिचारी असण्याची शक्यता असते.
     
(५९) षष्ठस्थानांत चंद्र असणे आरोग्याच्यादृष्टीने चांगले नाहीं.अशावेळी तो जर पापग्रहाने युक्त किंवा दृष्ट असेल तर मनुष्याला एखादा कायमचा आजार (रोग) निर्माण करतो.

(६०)  चतुर्थस्थानाचा अंमल (हृदयावर) आहे. चंद्र (किंवा) रवि हे षष्ठस्थानाचे अधिपति असून ,चतुर्थात असणे केव्हांहि चांगले नाही. चतुर्थस्थानी असा योग घडल्यास मनुष्याला हृदयविकार होण्याची  भीति असते.
           
(६१) सप्तमस्थानांत कर्केचा चंद्र असेल तर, मनुष्याला नेहमी प्रवास करावे लागतील.

(६२) कर्क राशीचा चंद्र लग्नी असून, त्यावर शनि व मंगळ यांची दृष्टि असेल तर मनुष्य कुबड़ा होतो.

६३)लग्नस्थानांतील मंगळ व्यक्तीला तापट, मानी व चिडखोर बनवितो.

(६४) लग्नस्थानांतील अग्निराशीचा मंगळ मनुष्याला उत्तम व्यक्तिमत्व देतो

(६५) धनस्थानांतील मंगळ, शनि, हर्षल यासारखे पापग्रह वैवाहिक सौख्याची हानि करतात.

 (६६) मंगळ धनस्थानांत असल्यास मनुष्याला पैसा पुरत नाही, गोचरीने मंगळ धनस्थानांत आला तरीसुद्धा अनेक कारणाने खर्च खिसा ' थंड' होतो!
(६७) मंगळाच्या तृतियस्थानी शनि, राहु अगर केतु असल्यास भावंडे अल्पायुषी होतात.

६८) चतुर्थात मंगळ असून दशमांत रवि असेल तर वाहनामुळे मृत्यु संभवतो.

६९) मंगळ व गुरु यांची युति पंचमस्थानी असेल तर, विद्याभ्यासाच्या दृष्टीने तो एक अनुकूल योग होतो. या योगामुळे विद्याभ्यास सहजपणे पूर्ण होऊ शकतो
.
(७०) मंगळ हा शुक्राच्या युतीत असेल तर मनुष्याला वारंवार लघवीस जावं लागेल.

(७१) मंगळ व रवि यांची युति असल्यास नाडीचे ठोके जलद पडतील.

(७२) मंगळ व चंद्र यांची युति स्त्रियांच्या पत्रिकेत असल्यास अशा स्त्रियांना प्रदरासारखे रोग निर्माण होतात. या स्त्रियांना विटाळहि अधिक जातो.

(७३) मंगळ हा शनीने युक्त असेल तर सांधेदुखी, पोटदुखी, हाडे मोडणे या सारखी दुखणी उद्भवतात.

(७४) मंगळ धनस्थानांत असून शुभग्रहाच्या योगांत असेल तर, मनुष्य उत्कृष्ट गणिती होईल.

(७५) मंगळ तृतियांत असून जर का क्रूर नक्षत्रांत असेल तर भावंडांचे सौख्य फारच अल्प प्रमाणांत लाभते. भावडे अल्पायुषी होतात. त्यांची संख्या कमी असते. त्यांचे एकमेकांशी पटत नाहीं.
     
(७६) पंचमात शनि + मंगळ, मंगळ + राहु असा योग तर ,विद्येत अपयश येईल.

 (७७) मंगळ -राहू युति पत्रिकेत कोठेहि असली तरी ती भ्रातृसुखाच्या दृष्टीने हानिकारक असते. कांहीं भावण्डे मृत्युमुखी पडतात.
(७८) मंगळ तृतिय किंवा दशम स्थानी असेल तर असा मनुष्य हरहुन्नर करून पैसा मिळवील. तो कधींहि उपाशी मरणार नाहीं.

(79) प्रथमस्थानी मंगळ असलेले लोक स्वभावाने कांहींसें उतावळे असतात. एक घाव दोन तुकडे अशी काहींशी त्यांची वृत्ति असते. त्यामुळे ही माणसें मुत्सद्दी होऊ शकत नाहीत.

 (80) तृतियांत मंगळ पापग्रहाने युक्त असता प्रवासात त्रास होणे, वस्तु हरवणे असे प्रकार घडतात.

(81) वधु किंवा वराच्या पत्रिकेत मंगळ सप्तमांत असेल तर विवाह जमतांना अनपेक्षित अडथळे येतात. हा मंगळ वक्री असेल तर ठरलेला विवाह अचानक मोडतो. हा मंगळ चंद्र किंवा शुक्राच्या प्रतियोगांत असेल तर ही फलें हमखास मिळतात.
         
82) मंगळ हा चंद्रासह जर ६ किंवा ८ या स्थानी असेल तर मनुष्याला सापासून भय राहील.

(83) चतुर्थात स्वगृहींचा मंगळ असेल तर भूमिलाभ होतो.

(84) चतुर्थात पापग्रहयुक्त असा मंगळ असल्यास वाहन अपघात होण्याचा संभव असतो.

(85) अष्टमस्थानांत अशुभ किंवा नीच राशीत मंगळ असणे हा स्त्रियांच्या पत्रिकेत एक कुयोगच आहे. या योगावर बालवैधव्य, कौटुंबिक आपत्ति, गर्भपात, बाळंतपणांत मृत्यू यासारख्या दुर्दैवी घटना घडतात.      (हा मंगळ नीट अभ्यासूनच फलें वर्तवावीत.)
       
(86) मंगळ व्ययस्थानी असणे हा देखील स्त्रियांच्या पत्रिकेत एक कुयोगच आहे. या योगावर नानाप्रकारचे गुह्यरोग, पतिसुखाची हानि, द्रव्याच्या अडचणी, या दुर्दैवी घटना घडून येतात. अशा योगावर जन्मलेल्या स्त्रिया काही वेळा नीच लोकांच्या कारस्थानाला बळी पडतात. मात्र अशावेळी हा मंगळ नीच किंवा अशुभ राशीत असतो.
   
(87) स्त्रियांच्या पत्रिकेत मंगळाच्या व्ययांत शनि हा योग देखील, पतिसौख्याची हानि करतो.

(88) मंगळ षष्ठस्थानांत असेल तर तो ज्या राशीत असेल त्या राशीच्या अंमलाखाली येणाऱ्या शरीराच्या भागावर तीळ, व्रण यासारखी चिन्हें आढळतात.

(89) षष्ठस्थानांतला मंगळ, हर्षल या पापग्रहाने युत असेल तर मनुष्याला अग्नीपासून भय राहील.

(90) मंगळ अष्टमांत असेल तर मूळव्याध होण्याची भीति असते.

(91) सप्तमांत मंगळ आणि लग्नांत शनि असा योग पत्रिकेत असल्यास त्या मनुष्याच्या ४५ व्या वर्षी त्याच्या पत्नीवर आकस्मिक गंडातर येतें.

(92) मंगळ षष्ठस्थानी असतां मनुष्याचा शेवट चांगल्याप्रकारें होत नाही.

(93) षष्ठस्थानी मंगळ, रवि व चंद्र असतां डोकेदुखीचा विकार उद्भवतो. (हे ग्रह मेष राशीत असल्यास अनुमानास निश्चितता द्यावी.)

(94) मंगळ भाग्यस्थानी असतां वयाचे २८ व्या वर्षी मनुष्याचा अचानक भाग्योदय होतो.

(95) बुधाच्या राशीत असलेला (मिथुन किंवा कन्या) मंगळ मनुष्याला चिकित्सक व संशयी बनवितो.

96) सप्तमस्थानांतील पापग्रहयुक्त मंगळ मातृसौख्याची हानि करतो.

 (97) मुलींच्या पत्रिकेत मंगळ पंचमांत असेल तर त्यांचा विवाह केव्हाही लवकर होणार नाहीं

(98.) मंगळ धनस्थानांत (कुटुंबस्थानांत) असतां मनुष्याचे आपल्या कुटुंबातील मंडळींशी पटत नाहीं.

(99) लग्नेश व षष्ठेश हे मंगळाने युक्त असतील तर मनुष्याला स्फोट किंवा युद्ध यापासून भीति राहील.

(100) मंगळ लग्रांत असेल तर लहानपणीं खरूज होण्याची शक्यता असते.

(101) मंगळ हा चंद्रासह मेष राशीत किंवा इतर राशीत असतां दंतरोग निर्माण होतात.

102) मंगळ हा शुक्रासह अष्टमस्थानी असतां वृषणवृद्धीचा विकार होतो ,ही युती वृश्चिक राशीत झाली तरीही , हा विकार उद्भवतो.

103) मंगळ सप्तमात असेल तर स्त्रीचा काही काळ वियोग होतो. अशा मंगळावर शनीची दृष्टी असेल तर, त्या मनुष्याची स्त्री फार काळ वांचणार नाही.

104) मंगळ, शुक्र किंवा गुरु यांच्या युतींत असेल किंवा या दोन  ग्रहांच्यामध्ये असेल तर मनुष्यास नेत्रविकार उद्भवतील

105) मंगळ लग्नस्थानी असलेला मनुष्य आपल्या आप्तस्वकीयांत कलह उत्पन्न करणारा होईल.

(106) मंगळ हा शनीसह सहाव्या किंवा चवथ्या स्थानी जलराशीस, असतां अशा मनुष्याची स्त्री वंध्या असेल.

107) बुध हा वाणीचा कारक आहे. तो अस्तंगत, वक्री किंवा राहुयुक्त असल्यास वाणीत दोष निर्माण करतो. बोलतांना अडखळणे, सावकाश बोलणे, धुंकी उडणे  अशा गोष्टी या योगावर आढळतात. असा बुध धनस्थानी असून शनि किंवा मंगळाच्या प्रतियोगांत असेल तर ही फले हमखास अनुभवास येतील.
(108) बुध जर शुभग्रहाबरोबर असेल तर अशा मनुष्याला गोड वस्तूची विशेष आवड असते.

(109) बुध जर शुभग्रहांच्या कर्तरीत असेल तर ,मनुष्याला त्याच्या मातुल घराण्याकडून सुख लाभेल.

110) बुध लग्नस्थानांत स्वगृहींचा असेल तर मनुष्याला लेखनाची आवड देता. असा मनुष्य अनेक विद्यांत पारंगत असतो.

111) मिथुन किंवा कन्या राशीत बुध असलेल्या लोकांना ज्योतिष शास्त्राची आवड असते.

 112) बुध व केतु लग्नांत असलेल्या मनुष्याची पत्नी नेहमी आजारा राहील.

(113) बुध व शुक्र धनस्थानी असलेले लोक धनवान असतात.

(114) सप्तमस्थानांतील बुध विनोदवृत्ती व वक्तृत्व देतो. परंतु तें फक्त चार परिचित मंडळींपुरतेच असते. अशा लोकांच्या अंगी सभाधीट पणा मात्र अजिबात नसतो !

(115) स्त्रियांच्या पत्रिकेत अष्टमांत बुध व गुरु हे दोन ग्रह असतील तर त्यांची आपल्या पतीपासून ताटातूट होईल.

(116) बुध आणि शुक्र यांची युति हा एक शुभयोगच होय. या योगामुळे मनुष्याला उत्तम शिक्षणाचा लाभ होतो. त्याची आर्थिक स्थिति चांगली असते. तो सद्गुणी असतो.

(117) बुध अष्टमस्थानी असलेल्या स्त्रीला फक्त एकच संतति होते.

(118) बुध शुक्रासह अष्टमस्थानी असेल तर अशा मनुष्याचा मृत्यु झोपेत होईल.

119) मीन राशीचा बुध प्रथम किंवा द्वितीय स्थानी असतां मनुष्य फार बोलको असतो. मात्र, त्याच्या बोलण्यावर फारसा विश्वास ठेवू नये.

(120) बुध सप्तमांत असतां मनुष्य परस्त्री गामी होतो.

 (121) लगेश व षष्ठेश बुधाने युक्त असता मनुष्य पित्तरोगी होतो.

(122) बुध हा धनस्थानी शुभग्रहाने दृष्ट असतां मनुष्याला धनवान करतो

(123) बुधाचा दशमस्थानाशी संबंध येईल तर मनुष्य व्यापारी वृत्तीचा होईल.

(124) बुध शनीसह नवमांत असतां मनुष्याला असत्य भाषण करण्याची आवड असते.

(125) सिंह राशीत बुध हा रवीसह एकत्र असेल तर मनुष्य बोलतांना अडखळतो किंवा वेडीवांकडीं तोडें करतो.

126)  गुरुने दृष्ट असलेल्या ग्रहाचे कुपरिणाम होत नाहीत.

(127) गुरु हा ग्रह लग्नस्थानांत असलेली माणसे भोजनशूर असतात.

128) गुरु हा ग्रह जर का लग्नात असेल किंवा त्याची लग्नावर दृष्टी तर मनुप्याचें शरीर पुष्ट असते. मीन ह्या गुरुच्या लग्नावर लेल्या व्यक्तीहि शरीराने लठ्ठ आढळतात. त्यांचे शरीर वातळ असते.

129) लग्नेशापेक्षा पत्रिकेत जर गुरु आधिक बलवान् असेल तर, तो मनुष्य निःसंशय सुखी असेल.

(130) लग्नी असलेला गुरु,शुक्राने दृष्ट असेल तर मनुष्य निष्कपटी  व पवित्र विचारांचा असेल.

(131) गुरु लग्नांत (किंवा धनांत) असलेला मनुष्य सत्यवक्ता व गोड भाषण करणारा असतो.

(132) वक्री गुरु सामान्यतः कन्या संतति देऊन,पुत्रचिंता निर्माण करतो.

(133) गुरु हा राहुसह लग्नांत असेल तर मनुष्याला दंतरोगनिर्माण होतील.

(134) गुरु जर का दोन पापग्रहांच्या कर्तरीत असेल तर,मनुष्याला  संततिसंबंधी चिता निर्माण करील.

(135) गुरु वृश्चिक राशीत असेल तर, मनुष्याला कन्या संतति अधिक प्रमाणांत देईल.

(136) गुरु पंचमांत असून त्याच्या पंचमांत जर पापग्रह असेल तर, संतति होण्याची शक्यता फार कमी असते.

137) गुरु हा ग्रह संतति कारक आहे. गुरुच्या पंचमांत शनि असल तर संतति अल्प होते. दोन संततीत अंतर बरेंच असते.

138) षष्ठस्थानांत गुरु असलेले लोक अति खाण्यामुळे आजार बाढवून घेतात. लंघन केल्यास त्यांची प्रकृति पूर्ववत् होते.

139) सप्तमस्थानांतील धनु राशीचा गुरु वैवाहीक जीवनांत तीव्र असमाधान देतो. काही वेळा अशा व्यक्ता काही वेळा अशा व्यक्तींचा विवाहच होत नाही. विवाह  झालाच तर वैवाहिक जीवन सुखाचे ठरत नाही. घटस्फोट, जोडीला अकाली मृत्यु अशा दुर्दैवी घटना निर्माण होतात.

(140) गुरु नवमस्थानी असतां पुढे होणाऱ्या घटना अगोदर शकतात. अशा मनुष्याच्या हातून समाजसेवा व लोकोपयोगी कामें घडतात. हा गुरु अध्यात्मक्षेत्रांत फार लवकर प्रगति करतो.

(141) गुरु राह युति पत्रिकेंत कोठेंहि असतां पुत्रचिंता निर्माण होतें. (सर्पशापामुळे अशी कुण्डली दूषित होते.) या योगावर गर्भपात होणे, मुलांना एकाएकी घटसर्पासारखे रोग होणे, त्यांचा आकस्मिक मृत्यु होणे असे दुर्दैवी प्रकार घडतात.

(142 ) दशमस्थानी असलेला गुरु गंगास्नानाचा योग आणतो. 

143) गुरु व शुक्र यांची अंशात्मक युति अष्टमांत असल्यास वडिलोपार्जित घर, स्थावर वा पैसा मिळतो. दरिद्री असल्यास माणसाला केव्हातरी श्रीमतीचे सुख चाखावयास मिळते. वारसा, हुण्डा किंवा दत्तक जाणे या मार्गानेंहि सांपत्तिक स्थिती अचानक सुधारते.

144) गुरु अष्टमस्थानी असतां व्यक्तीला अतिशय शांतपणे मरण येते.

(145) गुरु हा जर का राहु किंवा केतू यांनी युक्त असेल व त्यावर पापग्रह पहात असतील तर मनुष्याचे हातून अनेक नीच कृत्ये होतील.

(146) गुरु नीच असून त्यावर नीच ग्रहाची दृष्टि असेल तर मनुष्य नेहमीं नीच कृत्ये करण्यांतच गढून जाईल.

147) पंचमेश गुरु असून पूर्ण बलवान् असेल किंवा पंचमेश गुरुवर लग्नेशाची पूर्ण दृष्टि असेल तर निश्चितपणे पुत्रप्राप्ति होईल.

(148) नवमस्थानी गुरु व चंद्र एकत्र असतील तर, मनुष्याची कीर्ति त्याच्या मृत्युनंतरहि राहील.

(149) जन्मतः अष्टमांत गुरु असेल किंवा अष्टमांत गुरुची रास असेल तर गोचरीचा गुरु ज्या ज्या वर्षी अष्टमांत येईल त्या त्या वर्षी कुटुंबांत मृत्यु घडेल

(150) पत्रिकेत गुरु व शुक्राचा अस्त असून लग्नेश जर दुःस्थानांत असेल (६, , १२) तर खडतर दारिद्ययोग समजावा.

151) तृतियस्थानी गुरु (अगर शुक्र) असतां व्यक्तीचे हस्ताक्षर वळणदार आढळतें.

152) गुरु हा स्वराशी सोडून अन्य राशींत ६ किंवा १२ या स्थानी असेल तर मनुष्याची सांपत्तिक स्थिति नीट रहात नाहीं.

153) गुरु व मंगळ एकत्र किंवा प्रतियोगांत असणे हे भाग्यशालीपणाचे द्योतक आहे. परंतु अशावेळी ते स्थानबली व राशिबली असावेत.

154) शुक्र व गुरु यांचा प्रतियोग असेल तर विवाह लवकर जमतो.

155) शक्र जर पापग्रहाने युक्त असेल तर व्यक्तींत कामवासना अधिक असते.

(156) शुक्र जर शुभग्रह युक्त वा दृष्ट नसेल तर पत्नी सुखाच्या दृष्टीने तो एक कुयोग होतो.

157) शुक्र व चंद्र दोन्हींहि जलराशीत असतील तर विवाह लवकर जमतो.

(158) शुक्र हा वैवाहिक सौख्याचा कारक आहे. हा ग्रह जर  दोन पापग्रहांच्या कर्तरीत असेल तर वैवाहिक सौख्य मनाप्रमाणे लाभणार  नाही.

(159) शुक्र मेष किंवा वृश्चिक या मंगळाच्या राशीत असतां व्यक्तीची कामवासना प्रबळ असते.

160) शुक्र मंगळाने युक्त असेल तरीहि व्यक्तीची कामवासना प्रबळ असते.

161) शुक्र -चंद्र लग्नी असतां एकापेशा  अधिक विवाह होतात, अशा माणसांची कामवासना प्रबळ असते.

162) शुक्र जर का कृत्तिका नक्षत्रांत असेल तर, व्यक्तीच्या वैवाहिक जीवनांत असमाधान आढळते.    या योगावर घटस्फोट, जोडी दाराचे  अनारोग्य , कुवारपणी मातृत्व, विवाहोत्तर प्रेमप्रकरणे अशा सारख्या  विचित्र व दुर्दैवी घटना पहावयास सांपडतात.

 (163) शुक्र जर स्वनवमांशात असेल तर, मनुष्याची कामवासना  अतिशय प्रबळ असते.

(164) शुक्र स्वराशींत, उच्च राशीत किंवा चंद्राच्या युतींत असतां सुंदर पत्नीचा लाभ होतो.

165) शुक्र द्वितीय स्थानी असतां बायको देखणी मिळते.

(166) मिथुनेतील शुक्रामुळे व्यक्ति स्त्रियांच्या आधीन होते.

(167) शुक्र मंगळ दशमांत अगर सप्तमांत असतां मनुष्याचे नैतिक आचरण शुद्ध नसते.

(168) धनस्थानांत स्वगृहींचा किंवा उच्चीचा शुक्र असतां मनुष्याची आर्थिक स्थिति चांगली आढळते. मात्र, या शुक्राशीं शनि, रवि किंवा चंद्र यांचा अशुभ योग नसावा.

(169) धनस्थानांत वृषभ, तूळ किंवा मीन राशीचा शुक्र असेल तर व्यक्तीचा जन्म श्रीमान् घराण्यांत झालेला आढळतो. या स्थानांतील शुक्राशीं चंद्राबरोबर युति असेल तर अनुमानास निश्चितता द्यावी.

(170) धनस्थानांत शुक्र असतां ज्या वेळी मंगळ गोचरीने त्याच्या वरून जातो त्या वेळीं चैनीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी मनुष्याचा खर्च होतो.

171) तृतियस्थानी शुक्र असतां पाठचे भावण्ड बहीण दाखवितो.

172) लग्नेश व शुक्र दोन्ही जर विषम राशीत असतील तर मनुष्य अल्पवीर्य असतो.

173) स्त्रियांच्या पत्रिकेत शुक्र -मंगळ युति धन(२) किंवा केंद्रस्थानी(१,,,१०) असेल तर त्यांना स्थळ चांगले मिळेल.

(174) शुक्र किंवा चंद्र चतुर्थस्थानी नीच राशीत असतील तर पत्नीचा मृत्यु स्वतःचे अगोदर होईल.

175) तुळेचा शुक्र चतुर्थस्थानी असतां मनुष्याला घर व वाहन यांचा लाभ निश्चितपणे होतो.

176) शुक्र जर शनीबरोबर अंशात्मक युतीत असेल तर दृष्टिदोष निर्माण होईल.

177) शुक्र दशमेश असून धनस्थानी असेल तर हॉटेल किंवा खाणावळीच्या धंद्यात चांगले यश मिळतें.

(178) शुक्र व बुध हे दोनग्रह सप्तमस्थानी असतां मनुष्य भार्याहीन असतो.

179) शुक्र जलराशीत (४,,१२) असून लग्नस्थानी असेल तर मनुष्याचे शरीर स्थूल असते. अशावेळी मंगळहि तेथेच असेल तर अनुमान चुकत  नाही.

( 180) शुक्र जर षष्ठेशाबरोबर युति करून असेल तर पत्नीला धोका संभवतो.

(181) शुक्र जर चंद्रापासून ३ किंवा ११ या स्थानी असेल तर मनुष्याला वाहन सौख्याचा लाभ होईल.

(182) शुक्र कर्क किंवा मकर राशीत दुष्ट नक्षत्री असतां मनुष्य बाहेरख्याली होतो.

(183) शक्र जर का शनीच्या राशीत असेल तर मनुष्याच्या शरीराला नेहमी दुर्गधी येईल.

(184) शुक्राच्या चतुर्थ व अष्टमस्थानी पापग्रह असतां पत्नीला अग्निभय निर्माण होईल.

(185) शुक्र आणि (वक्री) हर्षल किंवा शुक्र आणि (वक्री) नेपच्यून यांचा केंद्रयोग झाल्यास, वैवाहिक सौख्य मनासारखे मिळत नाहीं.

(186) सप्तमांत पापग्रह असतील, किंवा शुक्राच्या सप्तमस्थानी पापग्रह असतील अथवा शुक्र पापग्रहाने युक्त असेल तर अशा मनुष्याला| स्वतःच्या पत्नीपासून मनासारखें लैंगिक सुख लाभणार नाही.

(187) शक्र जर पापग्रहाबरोबर द्वितीय किंवा व्ययस्थानी असेल तर मनुष्य एकाक्ष किंवा दृष्टिहीन असतो.

188) शुक्र व शनि यांचा प्रतियोग असल्यास व हा शनि वक्री असल्यास स्त्रीसुख लाभणे दुरापास्त होते.

189) शुक्र व मंगळ यांचा अन्योन्य योग असेल तर अशा व्यक्तींचे प्रेमसंबद्ध निर्माण होतात. हा योग स्त्रियांच्या पत्रिकेत झाल्यास कुठे ना कुठे प्रेमसंबध निमोण होतात तो स्त्रीला छचोर बनवितो. या स्त्रियांचे शील बिघडण्याची असते. विशेषतः सप्तमस्थान जर अशा वेळी बलवान् नसेल,गुरुची दृष्टि नसेल तर, अशा स्त्रिया परपुरुषाच्या नादी लागून  फसण्याची फार शक्यता असते.

 (190) दशमस्थानी शुक्र असणे व त्याच्या केंद्रांत आणि सनिक शुभग्रह असणे या योगावर सुंदर, कुलवान, धनवान् आणि सुलक्षणी अशी (स्त्री मिळते.

(191 ) शुक्र कन्या राशीत असतां विवाह विलंबाने होतो.

(192) शुक्र आणि चंद्र यांची एकमेकांवर दृष्टि असेल किंवा शुक्राच्या तृतीय स्थानीं चंद्र वा चंद्राव्या तृतीय स्थानीं शुक्र असेल तर मनुष्याला वाहनसुख प्राप्त होईल.

(193) जेव्हां लग्नि , धनस्थानांत किंवा चंद्राजवळ शुक्र असतो तेव्हां शरीर आणि नेत्र यांचा वर्ण तेजस्वी आढळतो.

194) शुक्र व्ययांत असतां व्यक्तीला शय्यासुख चांगले मिळतें.

१९5). शनि हा ग्रह जर मंगळाच्या पूर्णदृष्टीत ( अंशात्मक ) असेल तर व्यक्तीच्या आयुष्यांत जिवावरचे प्रसंग आल्याशिवाय रहात नाहींत.

196) शनि व राहु जर धनस्थानांत असतील तर व्यक्तीचा जन्म गरीब घराण्यांत झालेला असतो.

197) शनि व हर्षल धनस्थानांत असतील तर आयुष्यांत केव्हांतरी जबरदस्त आर्थिक तडाखा बसतो. हे सर्व आकस्मिक घडतें.

(198) शनि व मंगळ धनस्थानांत असणे हा  दारिद्ययोग असून सधन व्यक्तीहि अखेर निर्धन बनते.

(199) धनस्थानी पापग्रह युक्त शनि असेल तर ऋणग्रस्त स्थिात आढळते. अशा व्यक्तींना वडिलांचे कर्ज फेडण्याची पाळी येते.  

200) शनि व मंगळ यांची युति तृतियस्थानी झाल्यास मनुष्याला भातृसुख लाभत नाही. कांहीं भावंडांचा मृत्यु ओढवतो.

201)शनि तृतियांत असून मंगळाने दृष्ट असेल तर पाठची भावंडे वाचत नाहींत. नुसता वंध्याराशीतील शनि फार भावंडे देत नाही. 

202) धनस्थानीं मकर, कुंभ किंवा तूळ या राशी सोडून इतर राशीत शनि असेल तर मोठ्या प्रयासानेच पैसा मिळेल.

203) शनि व चंद्र यांची युति असलेली माणसें कठोर बोलणारी अप्रामाणिक असतात.

204) धनस्थानांत शनि असलेले लोक पैशाचा खर्च विचार करून करतात. वृत्ति कांहींशी कंजूष असते.

 (205) शनि व मंगळ यांचा केंद्रयोग केंद्रस्थानांतून झाल्यास केव्हा तरी अपघात होण्याचा संभव असतो.

(206) कर्क राशीत शनि वा मंगळ असतां दमा किंवा छातीचे विकार संभवतात.

(207) मेष लग्न असून तेथे शनि व बुध असतां आरोग्य नीट रहात नाही.

 (208) शनि चंद्र चतुर्थात असलेला मनुष्य अल्पवीर्य असतो.

(209) चतुर्थात शनि असलेला मनुष्य हृदयरोग पीडित, वाहनहीन, बांधवहीन व बाल्यावस्थेत रोगी असा असतो.

(210) लमांत शनि व षष्ठांत मंगळ असा योग असल्यास भाजण्याचे अपघात होतात.

(211) शनि व राहु यांच्या युतीमुळे दंतरोग निर्माण होतात.

(212) शनि व मंगळ यांचा षडाष्टक योग लग्न व षष्ट किंवा लग्न अष्टम या स्थानांतून झाल्यास अपघातामुळे हाडांची मोडतोड होते.

213) शनि व मंगळ अष्टमस्थानी असतां व्यक्तीचा मृत्यु अपघातान शक्यता असते. ( अशा वेळी लग्न, लग्नेश व अष्टमश या परस्पर योग नीट अभ्यासावेत.)

214) शनि अष्टमस्थानी असलेल्या स्त्रीचा पति नेहमीं रोग राहील.

215) शनि व रवि अष्टमस्थानी असलेली स्त्री बंध्या असते.

(216) अष्टमांत एकटा शनि असेल तर मृत्यु दीर्घमुदतीच्या आजाराने येईल.

(217 ) शनि व मंगळ दशम किंवा नवम स्थानांत असतां संतति होत नाही.

(218) शनि जर गुरुने युक्त असेल तर ,लीव्हर चे कार्य नीट चालणार नाही.

(219) शनि व बुध सप्तमस्थानी युतीत असलेल्या स्त्रीचा पति घंढ असतो.

(220) सप्तमेश शनि असतां पति किंवा पत्नी सुस्वरूप अशी पहावयास सांपडत नाहीत. ती बहुधा विजोडहि असतात. (उदा. पति उंच तर पत्नी ठेंगू, पत्नी गौरवर्णी तर पति काळा इत्यादि.)

(221) शनि हा बुध युक्त असेल तर फुप्फुसाची क्रिया नीट चालणार नाही. मज्जातंतूतहि बिघाड होईल. (बुध हा शनीमुळेच सर्वात अधिक बिघडतो.)

(222) शनि मंगळ आणि गुरु हे तीन ग्रह चतुर्थस्थानी असतां हृद्रोग निर्माण होईल.

(223) शनि राहु व रवि सप्तमांत असतां सर्पदंशामुळे मृत्यु ओढवेल.

(224) शनि + रवि २, ८ किंवा १२ या स्थानी असतां फौजदारी होते.

(225) शनि लग्नेश असलेल्या लोकांना जुन्या घरांत राहणे अधिक आवडते.

(226) शनि लग्नेश असून व्ययांत पापग्रह दृष्ट असेल तर प्रकृतीचा (रड) आयुष्यभर राहील.

(227 ) शनि पंचमस्थानी असता संतति सुख मिळत नाही.

(228 ) शनि लग्नेश, भाग्येश किंवा दशमेश असतां वयाच्या ३६ वर्षी एकदम भाग्योदय होतो. तोपर्यतच्या काळांत मानहानि सहन करावी गते. परिस्थितीने गांजल्याचा, कसलेतरी दडपण पडल्याचा अनुभव यापूर्वीच्या आयुष्यात येतो.

 (229) शनि नवमस्थानांत असलेले लोक पुराणमतवादी व कर्मठ तीचे असतात.

(230) व्ययांतला शनि पूर्वजन्मींची उपासना दाखवितो. व्ययांत शनि असतां या जन्मी चांगली उपासना घडते.

(231) शनि अष्टमस्थानी आयुष्यवृद्धि करतो. तो त्या स्थानी वक्री किंबा अतिवक्री असेल तर भरपूर आयुष्य देतो.

(232) आयुर्दायाचा विचार शनीच्या अष्टमस्थानावरूनहि करावा. शनीच्या अष्टमांत पापग्रहांचे अधिक्याने असलेले अधिष्ठान आयुर्दाय कमी करतें. या पापग्रहांमुळे अपघाती किंवा तडकाफडकी मृत्यु ओढवतो.

233) शनि मंगळ या दोन पापग्रहांची युति लग्नाच्या व्ययांत किंवा रवीच्या व्ययांत झाल्यास जन्मभर कर्जबाजारी रहावे लागते.

(234) शनि मंगळ अंशात्मक प्रतियोग असतां आयुष्यांत जिवावरचे प्रसंग  येतात.

(235) धनस्थानी शनि पापग्रहयुक्त किंवा दृष्ट असतां कुत्रा चावण्याचे भय राहील.

236) धनेश व शनि एकत्र असतील किंवा द्वितीयेशावर अथवा द्वितीय स्थानावर शनीची दृष्टि असेल (किंवा द्वितियेशाची शनीवर दृष्टि असेल ) तर कुत्रे चावण्याची भीती असते. हा नियम सहसा चुकत नाही.  

237) शनि तृतीय स्थानी असतां पाठीवर बहिण असते. मात्र ती दीर्घायुषी होत नाही.

238) सप्तमस्थानी ७, १० व ११ या राशींखेरीज शनि असतां व्यक्ती  बाहेरख्याली व व्यभिचारी होते .

239) शनि मकर व चंद्र तुला राशीत असतां स्त्रियांना विटाळ त्यामुळे अशा स्त्रियांना संतति होण्याची शक्यता नसते.

 240) लग्नेश व षष्ठेश हे शनीने युक्त असतां मनुष्य वातरोगी होतो

(241) दशमस्थानांत शनि असून रात्रीचा जन्म असतां मनुष्य मित्रा असतो.

(242) शनि मकर, कुंभ वा मीन राशीत मंगळासह षष्ठस्थानांत असेल तर मनुष्याला निश्चयाने पायाचे रोग होतील.

(243) शनि हा मंगळासह चतुर्थात असेल तर मनुष्याला गृहसौख्ये कधींहि मिळणे शक्य नाही.

(244) शनि नवमस्थानांत असेल तर पित्याचें सुख फार काळ मिळणार नाहीं.

(245) षष्ठांत वृश्चिक राशीत शनि हा मंगळासह असेल तर अंतर्गळासारखे (हार्निया) विकार उद्भवतात. अशावेळी ऑपरेशन करावें लागते.

(246) शनि (किंवा अष्टमेश) जर एखाद्या उच्च ग्रहाने युक्त असेल तर तो मनुष्याला दीर्घायु करतो.

(247) शनि दुःस्थानांचा (६, , १२) अधिपति असून कर्केत असेल तर दांत लवकर पडतील.

248). लग्नस्थानांत राहु असतां मनुष्याला जपजाप्याची आवड असते.

(249) राहु चंद्र एकत्र असतां आयुष्यात एकदा तरी फार मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागते.

(250) राहु व शनि लग्नांत असणे (किंवा क्षीण चंद्र शनीसह अष्टमांत असणे) या योगामुळे पिशाच्च पीडा संभवते.

(251) राहु प्रथम किंवा पंचमस्थानी असतां मनुष्याचे दांत वेडेवांकडे व काहीसे मोठे असतात. या योगावर दंतपीडाही संभवते.

(252) राहु द्वितीयस्थानी असतां वाणीत दोष आढळतों.

 (253) तृतियस्थानी राहु असतां जन्म देवस्थानाजवळ होतो.

254) तृतियस्थानी कोणत्याहि राशीचा राहु असतां, लहानपणीं कान फुटण्याचे विकार होतात.

255) धनांत पापग्रह व तृतियांत राहु यामुळे बंधुसौख्याचा नाश होतो.

(256) चतुर्थातील राहुमुळे प्रथम संतती मृत होते. उत्तम बुद्धिमत्ता असनहि स्पर्धेत यश मिळत नाही. विद्या अपुरी राहते.

(257 ) पंचमांतील राहुमुळे विद्या अपुरी राहते. विद्येत अपयश.

 (258) षष्ठस्थानांत राहु व चंद्र असतां पोटाचे विकार होतात.

(259) षष्ठांतील राहु मामाचे सुख लाभू देत नाही. भांडखोर वृत्ति असते.

(260) राहु लाभस्थानांत असतां मनुष्याला त्याच्या म्हातारपणीं पुत्रांकडून सुख मिळतें.

(261) राहु व मंगळ सप्तमात असतां वैवाहिक सुखाचा बोजवारा  उडतो.

(262) राहु आपल्या राशींत किंवा ९ अगर १० या स्थानी असेल तर मनुष्याला उच्च दशा प्राप्त होते.

(263) राहु व मंगळ एकाच स्थानी अथवा प्रतियोगांत असतील तर ऑपरेशनचा संभव अगर अपघात अशी फले मिळतात.

264) राहु व रवि लग्नांत असतां दृष्टिनाश संभवतो.

(265) राहु चतुर्थस्थानी पापग्रहांनी दृष्ट असेल व लग्नेश निर्बली असेल तर हृदयरोग  संभवतो.

(266) मूळ राहू  वरून गोचरीच्या राहूचें भ्रमण होत असतां आजार व दंतरोग उद्भवतात. मुळांत दंतदोष असल्यास दांत काढण्याची देखील वेळ येते.

267) राहु वरून मंगळाचे किंवा मंगळावरून राहु भ्रमणहि प्रकृति बिघडविते.

268) राहु (अगर गुरु) नवमांत असतां पुष्कळ तीर्थयात्रा होतात.

(269) अष्टमस्थानी राहु अगर हर्षल असेल तर अनेकवेळा लग्न  फिसकटेल. त्याचप्रमाणे स्त्रीधन मिळणार नाही . 

 270) ज्या लोकांना लिहितांना तोंड वेडेवांकडे करण्याची असते त्यांच्या लग्नांत अगर धनस्थानांत राहु असतो.

271) राहु ( किंवा केतु) षष्ठस्थानांत असतां दंतरोग किंवा ओघ रोग होतात.

(272) राहुचें (किंवा शनीचे) द्वितीयांतील किंवा सप्तमांतील गोचरीचे भ्रमण चालू असतां दंतपीडा होते.

(273) राहु लग्नी किंवा द्वितीय स्थानी असतां मनुष्याचे दात मोठे असतात.

274) केतु जर लग्नांत असेल तर (जन्म) बहुधा नवसाने किंवा गुरुप्रसादाने झालेला असतो.

(275) केतु लग्नांत असतां बोजड शरीर देतो.

(276) केतु धनांत असेल तर मनुष्याच्या शरीरावर अकाली वृद्धत्वाची चिन्हें दिसतील.

(277) केतु तृतियस्थानी असलेली माणसें कलहप्रिय असतात.

(278) केतु चंद्रासह तृतियांत असेल तर असा मनुष्य भातृहीन परंतु धनवान् असेल.

 (279) केतु रवीने युक्त असतां फौजदारी खटले होतात.

(280) केतु हा शुक्रासह १, , किंवा ५ या स्थानी असेल तर ज्योतिषविद्या साध्य होतें.

(281) केतु धनस्थानी असतां आजोबा संन्यासी किंवा विरक्त असतात.

(282) चतुर्थस्थानीं केतु असतां जन्मघरांत पिशाच्च असते.

(283) केतु मंगळासह चतुर्थात असतां हृदयविकार संभवतो.

284) हर्षल तृतियस्थानी असतां सामान्यतः फल ज्योतिष व इ, गूढ शास्त्रांची आवड असते. असामान्य व विचित्र विषयांवरील लेखन वाचन होते. शेजाऱ्यांशी व भावंडांशी खटके उडतात.

 285) हर्षल व मंगळ यांची युति कोणत्याहि स्थानी  झाल्यास पघात होणे, कापणे, भाजणे यासारखे अनुभव येतात.

286)  हर्षलच्या केंद्रयोगांत चंद्र वा शुक्र असेल किंवा त्यांचा योग असेल तर लग्न जमताना काही ना काही अडचणी येतात. ठरलेला विवाह  आयत्या वेळी मोडतो. विवाहाच्या संबंधाने एखादी दीर्घकाळ लक्षांत राहील अशी वैचित्र्यपूर्ण घटना घडते.

(287) हर्षल चतुर्थात असतां व्यक्ती भांडखोर, चिरचिरी व हेकट असते. या स्वभावामुळे अशा व्यक्तींना वास्तुसौख्य लाभत नाहीं. भांडणामुळे घर वारंवार बदलावे लागते.

(288) हर्षल (वा नेपच्युन) ३, , १२ या स्थानी असतां दूरचे प्रवास घडतात.

(289 ) हर्षल गुरुने युक्त असतां मधुमेहाचे दुखणे देतो.

(290) हर्षल सप्तमांत असतां लग्न ठरताना घरांत मतभेद होणे, भांडणतंटे होणे, विवाह फिसकटणे अशा चमत्कारिक घटना घडतात.

291) दशमांतील हर्षल रवीच्या केंद्रयोगांत वा प्रतियोगांत असतां वडिलांचे निधन आकस्मिक होतें.

(292) हर्षल अष्टमांत असतां हृदयविकार किंवा रक्तदाब यापासून त्रास होतो.

(293) हर्षल दशमांत असतां वडिल साधारण चमत्कारिक स्वभावाचे असतात.

(294) दशमांतील हर्षल वडिलांना हृदयविकार किंवा रक्तदाब दर्शवितो.

295) धनस्थानांत पीडित नेपच्युन असेल तर अशा व्यक्ति जल्मल्या नंतर थोड्याच काळांत घराण्यातील कर्त्या व्यक्तींचा अस्त होता.

296) धनस्थानांत पीडित नेपच्युन असलेल्या व्यक्तींनी पैशाचे व्यवहार जपून करावेत.

297) सप्तमांत वक्री नेपच्यन असतां वैवाहिक सौख्य लाभत नाही

298) अष्टमस्थानांत नेपच्युन असतां मृत्यु गूढ प्रकाराने होतो 

299) अष्टमस्थानांत जलराशीतील नेपच्युन असतां पाण्या धोका संभवतो.

 300) कन्या राशीतील नेपच्युन मंगळ युति पोटाचे विकार देते.

301) नेपच्युन नवमस्थानांत असतां अध्यात्मिक प्रगतीला पोषक होतो. उपासनेत फार चांगली प्रगति होते. परंतु पापग्रहाबरोबर असतां ढोंगीपणा, बुवाबाजी दर्शवितो.

302) षष्ठस्थानांत नेपच्यून असलेल्या व्यक्तींना आपल्याला काही तरी आजार झाला आहे असे उगाचच वाटत असते.

303) प्लुटो ३, , किंवा १२ या स्थानी असतां दूरवरचे प्रवास होतात. अशा वेळी हर्षल व नेपच्यूनहि यांपैकी एखाद्या स्थानांत असल्यास परदेशगमनाचा योग हमखास येतो.

304) धन किंवा व्ययस्थानी पापग्रहयुक्त प्लुटो असतां आर्थिक घोटाळे निर्माण होतात.

(305) प्लुटो जर शुक्राच्या युतीत असेल तर विवाहांत वैचित्र्य निर्माण करतो. वैवाहिक सौख्य मनासारखें मिळत नाही.

306) प्लुटो गुरूच्या युतीत असतां अध्यात्मिक अनुभव येतात.

307) प्लुटो मंगळाच्या युतीत असेल तर भावंडांना त्रास होतो.

308) चतुर्थस्थानांत पापग्रह युक्त प्लुटो असतां वास्तूत दोष असतात. हा प्लुटो घराण्यांत मोठी स्थित्यंतरें घडवितो.

309), जो ग्रह ज्या गोष्टीचा कारक असेल त्याच्या दशेत व अंतर्दशेत त्या गोष्टी त्या ग्रहाच्या बलानुसार सिद्धीस जातात.

(310) राहुयुक्त ग्रहाची दशा कष्टकारक जाते.

(311) वक्री ग्रहाची दशा चालं असताना मनुष्याचा लोकिक, त्याचे समाजातील स्थान व सुख यांचा       नाश  होतो.

312 ) रवि चंद्राच्या षडाष्टकांत असणारे ग्रह आपल्या दशेत अशुभ फल निर्माण करतात.

(313) नीच राशीचे किंवा शत्रूक्षेत्री असलेले ग्रह आपल्या महादशेत अशुभ फल निर्माण करतात.

(314 ) जे ग्रह एकमेकांपासून ६ वे व ८ वे असतात ते परस्परांच्या अंतर्दशेत अशुभ फल देतात.

315) लग्नेशाची दशा सर्वसामान्यतः अनुकूल असते. या काळांत व संपत्ति यांचा लाभ होतो. मात्र अशा वेळी लग्नेश अष्टमांत नसावा. तसा असेल तर लग्नेशाची दशा प्रतिकूल जाईल.

(316) धनेशाची दशा कष्टदायक जाते. मात्र या दशेत आर्थिक लाभ  होतात.

(317) तृतियेशाची दशा सामान्यतः कष्टदायकच जाते.

(318) चतुर्थेशाच्या दशेत मनुष्याला सुखप्राप्ति होऊन घर, वाहन, इत्यादी  गोष्टींचा लाभ होतो.

(319) पंचमेशाच्या दशेत मनुष्याला पैसा व विद्या यांची प्राप्ति होतें.

(320) षष्ठेशाच्या दशेत शत्रूकडून भय निर्माण होतें.

(321) सप्तमेशाची दशा कष्टदायक जाणावी.

(322) अष्टमेशाच्या दशेत मनुष्याला मृत्यूपासून भय संभवते.

(323) नवमेशाच्या दशेत मनुष्य धार्मिक कृत्ये व तीर्थयात्रा करतो.

(324) दशमेशाच्या दशेत धनप्राप्ति होऊन राजमान्यता वाढते.

(325) दशमेश जर अष्टमेश युक्त असेल तर त्याच्या (दशमेशाच्या) दशेत पित्याचें निधन होतें.

(326) लाभेशाची दशा सर्व बाजूने लाभदायक जाते.

(327) व्ययेशाच्या दशेत धनहानि होऊन इतरहि अनेक प्रकारचे कष्ट सोसावे लागतात.

328) पापग्रहाच्या महादशेत शुभग्रहाची अंतर्दशा चालूं असेल सुरुवातीला कष्ट व नंतर सुख असा अनुभव येईल.

329) शुभग्रहाच्या महादशेत पापग्रहाची अंतदशा असेल तर प्रथम सुख व शेवटा दुःख असा अनुभव येईल,

330) शुभग्रहाच्या दशेत  शुभग्रहाचीच अंतदशा चालू असेल  तो काळ मोठा सुखाचा जाईल.

331 ) कोणत्याहि भावाचा अधिपति केंद्रांत किंवा त्रिकोण शुभफल मिळतें.

332 ) ज्या भावांत शुभग्रह असतील किंवा जो भाव शुभग्रहाणें दृष्ट असेल त्या भावाचे फल शुभ मिळेल.

333 ) जो भावेश स्वगृहीं, उच्चराशीत असतो अगर स्वगृहाला  पाहतो तेव्हा त्या भावाच्या फलाची वृद्धि करतो.

334 ) जो भाव अगर भावेश शुभग्रहांच्या कर्तरीत असतो त्या  भावाची शुभफले मिळतात.

335) कोणत्याही  भावापासून अगर भावेशापासून केंद्र अगर  त्रिकोणांत पापग्रह असतील तर त्या भावाचें फल अशुभ मिळतें.

336) दोन भावेश युतीत असतां ते कोणत्या स्थानांत आहेत याला  महत्त्व आहे. उदा. दशमेश -नवमेश युति केंद्र- कोणात फार शुभ फल देते , याउलट व्ययेश -अष्टमेश युति दशमांत झाल्यास नोकरी धद्याचे दिवाळे वाजतें.

337) कोणत्याहि भावाचा अधिपति दुःस्थानांत (६, , १२. )असतां त्या भावाच्या फळाची हानि होते. त्याचप्रमाणे दुःस्थानांच अधिपति ज्या भावांत असेल त्या भावाच्या फलाचीहि हानि होते.

338) कोणत्याहि भावापासून अगर भावेशापासून ६, , व १२ या स्थानी पापग्रह असता त्या भावाच्या फळाची हानि होते.

339 ) जो भावेश नीच राशीतील ग्रहाने युक्त असतो त्या भावाचे अशुभ फळ मिळतें.

340) वक्री ग्रह आधिक बलवान् असतात.

341) वक्री ग्रहाच्या युतीत असलेला ग्रह कारकत्त्वाच्या दृष्टीने अधिक बलवान् होतो.

342) अस्तगत ग्रह फलाच्या दृष्टीने निरुपयोगी असतात.

343) कुंभ लग्नाच्या व्यक्ति अत्यंत अध्यात्मिक किंवा अत्यंत भौतिक आढळतात.

344) वृषभ राशीत पापग्रह असतां गळ्याचे विकार होतात. टौन्सिल्सचे ऑपरेशन करावे लागतें.

345) कृत्तिका, आश्लेषा, मघा, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, मूळ, धनिष्ठा व शततारका ही नऊ नक्षत्रं परमउग्र,  दाहक, भेदक व मारक सन कंडलीत कोण याहि भावांत या नवापैकी एखादें नक्षत्र पापग्रह युक्त थवा दृष्ट असतां त्या भावजन्य फलाची हानि करतें.


346) जन्माचे वेळीं मेष, वृषभ, मिथुन सिंह किंवा धनु यापैकी खादें लग्न उदय पावत असेल तर जन्मणारे मूल अतिशय रडवें असेल.

347) दशमेश शनि किंवा गुरु असतां हे ग्रह ज्या वेळीं गोचरीनें सप्तमांत येतात त्या वेळी दशमभावाचे फल मिळते. विशेषतः प्रमोशनच्या बाबत हा नियम सहसा चुकत नाही. उदाहरणार्थ, दशमेश गुरु ज्या वेळी गोचरीने सतमांत येतो त्या वेळी (त्यावर्षी) व्यक्तीला नोकरीत प्रमोशनचा योग येतो. अशा वेळी दशमेश दशमाच्या दशमांत येत असल्यामुळे अधिक बलवान् होतो.

348) एखाद्या भावाचा अधिपति त्या भावाच्या व्ययस्थानी असतां फल देण्याच्या बाबतीत विलंब करतो. उदाहरणार्थ कुंभ लग्नाचा - दशमेश  मंगळ जर नवमस्थानी  (दशमाच्या व्ययात) असेल तर दशम भावाचे फल उशिरा मिळेल. (हा योग प्रमोशनच्या दृष्टीने अभ्यासावा.)

349) गोचरीचा गरु भाग्यस्थानांतून भ्रमण करीत असतां मनुश्याला याला तीर्थयात्रा घडतात. उपासना मार्गात असलेल्या लोकांची उपासना काळात अधिक वाढते साधसंतांची दर्शन होतात. जपजाप्य, धार्मिक स्तोत्रांचं वाचन याबाबत गोडी निर्माण होते.

350) मूळ रवीशी गोचरीचा शनि ज्या वेळी केंद्रयोग करतो तो काळ मनुष्याला अनेक दृष्टीने त्रासदायक जातो.

351) गोचरीचा शनि एखाद्या भावात येऊन त्या भावेशाकडे पहात असेल तर त्या भावाच्या फलाची नि;संशय  हानि करील. उदाहरणार्थ गोचरीचा शनि तृतियांत येऊन तृतियेशाकडे पाहत  असेल तर तृतियस्थानाने सूचित होणाऱ्या गोष्टींची हानि करील ,हा नियम सहसा चुकणार नाही.

(352) शनि मकर राशीत असलेल्या लोकांचे एकत्र कटंबांत काळ जमत नाही. अशा लोकांनी वेगळे राहणेच इष्ट असते.

(353) ठेंगण्या मनुष्याचें लग्न बहुत करून वृश्चिक किंवा मीन असते. किंवा त्याचा चंद्र तरी या         राशीत असतो.

(354) रोहिणी नक्षत्रांत चंद्र असलेली स्त्री अतिशय देखणी असते.


No comments:

Post a Comment