Sunday 24 November 2019

ज्योतिषशास्रातील महत्त्वाचे नियम (भाग -४) (ASTROLOGY TIPS-PART-४)


ज्योतिषशास्रातील महत्त्वाचे नियम (भाग -४)
(ASTROLOGY TIPS-PART-४)
ज्योतिष शास्त्राचा खरोखर शास्त्रीय अभ्यास करावयाचा आहे त्याने निरनिराळी पुस्तके वाचून आपणाला पटणारी अशी काही जातक-शास्त्रीय तत्त्वे वा सूत्रे ( Rules of Predictive Astrology ) एकत्र करून नंतर ती अभ्यासून पहावी. हे करीत असतां ती तत्त्वे वा सूत्रे त्याने निरनिराळ्या जन्म-पत्रिकांना लावून पहावी आणि पडताळ्याच्या स्वरूपांत तपासून घ्यावी.
प्रत्येकाची कुंडली परीक्षणाची पद्धत, नियमाचा वापर करण्याची हातोटी, अंतीम फलादेशास पोहचण्याची पद्धत वेगळी असू शकते. एकाच घटनेसाठी काही ठिकाणी एकापेक्षा जास्त नियम दिलेले आढळतात, प्रत्येकाला येणारा अनुभव निराळा असल्याने प्रत्येकजण आपली स्वतःची पद्धत व नियम अनुभवांती ठरवित असतो. त्यामुळे एकापेक्षा जास्त नियम आढळले तर, नविन अभ्यासकांनी गोंधळुन जाण्याचे कारण नाही. ज्याने त्याने आपल्या अनुभवानुसार कोणता नियम किंवा पद्धत वापरावी हे ठरवावे. 
माझ्या अभ्यासांत, मी जी अनेक ज्योतिषशास्त्राची पुस्तके वाचली व त्यातील जे मला पटले:-                                                           त्या पुस्तकांमधीलशास्त्रीय तत्त्वे वा सूत्रे :-(Rules of Predictive Astrologyखाली एकत्र देत आहे.:- 
(हे नियम, पत्रिकेतील इतर शुभाशुभ योगांचा तारतम्याने विचार करूनच उपयोगात आणावेत )
(१) फलिताच्या दृष्टीने, चंद्र हा,खरोखरच महत्त्वाचा ग्रह आहेकालपुरुषाच्या वृक्षाचे मूळ चंद्र आहे. इतर ग्रह त्या वृक्षाच्या शाखा आहेत. मूळ जर शुद्ध आणि शक्तिमान असेल तर शाखा फोफावतील. चंद्राचीच स्वतःची वा इतर ग्रहांबरोबर होणारी स्थिति जर चांगली नसेल तर गुरु, शुक्र आणि बुध चांगले असून काय करणार? म्हणून चंद्राकडून होणाऱ्या योगाकडे कुंडली बघतांना,अगदीच दुर्लक्ष करून चालणार नाही

२) चंद्र हे कुंडलीचे मन (Mind) असून, रवि हा आत्मा (Soul) आहेचंद्राची स्थिती आणि त्याचे इतर ग्रहांशी होणारे योग संबंध ह्यावरून माणसाची मानसिक शक्ति समजावी

३) रवीच्या स्थिती वरून आध्यात्मिकनैतिकव्यावहारिक आणि आधिभौतिक किंमत काढावीरवि चंद्राचे इतर ग्रहांशी होणाऱ्या योगांवरून माणसाची आध्यात्मिक वा आधिभौतिक किंमत ओळखता येते

४)आध्यात्मिक शक्तीचा विचार करतांना गुरूचा विचारअवश्य करावा लागतो. अशा वेळेस तृतीयस्थानव्ययस्थान, नवमस्थान आणि अष्टमस्थान अवश्य लक्षात घ्यावे लागते

(५) कुंडलीत जन्मकाली जे दोन वा अनेक ग्रहांत वा ग्रहामध्ये परस्पर योग होतात ( Aspects ) ते माणसांवर जन्मभर ह्या नाही त्या स्वरूपांत परिणाम करीत असतात. म्हणून जन्मकालीन ग्रह-योग ( Planetary Aspects ) संपूर्ण प्रकारे अभ्यासावे लागतात

(६) पत्रिकेंत ६, , १२ ह्या स्थानाचे अधिपति ज्या स्थानात पडतात किवा ज्या स्थानाच्या आधिपतीला घेऊन पडतात त्या स्थानाबद्दल वा त्या  भावेशाला घेऊन पडतात, त्या भावाबद्दल फलांत वैगुण्य वा वैचित्र्य निमाण करतात.

(७ कुंडलीतील ग्रहांचा  तुटक तुटक ( Individually )विचार करण्याएवजी पत्रिकेचा वर्ग वा दर्जा ठरविण्याच्या दृष्टीने सर्व ग्रहांचा एक संघ म्हणून विचार करावाः ( Examine the team of planets) ग्रहांच्या परस्पर योगामुळे पत्रिकायोग बलवान वा कनिष्ठ होण्याची शक्यता असते. ग्रह स्वतंत्र असे जरी चांगले पडलेले असले तरी, इतर ग्रहांच्या योगात केव्हां केव्हां ते फार वाईट पडलेले असतात वा उलटपक्षी ग्रह स्वतंत्र असले तरी इतर ग्रहांच्या योगांत फार शुभ पडलेले असतात. म्हणून हा नियम फार महत्त्वाचा आहे.. 

(८) ज्या ग्रहाचा तुम्हांस विचार करावयाचा आहे तो ग्रह ज्या राशीलापडला आहे त्या राश्याधिपतीची चौकशी प्रथम करावी. तो राश्याधिपती शुद्ध आणि सुस्थानी असेल तरच त्या ग्रहाला प्राधान्य फलितांत द्यावे.यजमानच जर सुस्थितीत नसेल तर पाहुणा त्याच्या घरी येऊन काय दिवे लावणार

(९) राहु हा पापग्रह ज्या ग्रहाशी युतीत असतो, त्या ग्रहाच्या कारकत्वाने ज्या गोष्टी दाखविल्या जातात, त्याबाबतीत वैगुण्य दाखवितो वा विचित्र फलें देतो

(१०) राहु हा पत्रिकेत ज्या स्थानाच्या अधिपतीने युक्त होऊन पडतो त्या स्थानांबद्दल विवंचना, वैगुण्य वा विचित्र फलें देतो. बऱ्याच वेळेस अनुभवास येणारा हा नियम आहे

(११) ग्रह ज्या राशीत असतात त्यानुसार, ज्या भावांत असतात त्यानुसार, ज्या ग्रहाच्या वा ग्रहांच्या दृष्टीत वा योगांत असतात त्यानुसार फले निर्माण करतात. ग्रहांची वैशिष्टयपूर्ण शुभ वा अशुभ फलें त्यांच्या दशा अन्तर्दशेतच मिळतात. 

(१२)  नवमांश पद्धती ही ग्रहांची शक्ति मोजण्याची एक उपयुक्त पद्धती आहे. फलज्योतिष (Natal Astrology ) बघतांना ग्रहांचे नवमांश बल अवश्य लक्षात घ्यावे. साधी पत्रिका बघतांना भावचलित कुंडली व कमीत कमी नवमांश लक्षांत व्यावे

(१३) जो भाव (स्थान) तुम्हांस विचारांत घेणे असेल,त्याच्याकडून भावांतील ग्रहांचा त्या भावाच्या दृष्टीने शुभ वा अशुभ फलाबद्दल विचार करावा लागतो. येथे एक उदाहरण देतो. समजा, चतुर्थस्थानांत शुभ ग्रह आहे म्हणून मातृसुख उत्तम असें अनुमान तुम्ही घ्याल. पण सप्तमांत दोन किंवा अधिक पापग्रह पडल्यास अनुमान चुकण्याची शक्यता असते. नीट पर्यायाने विचार करून फल निर्णायक सांगावें. प्रत्येक भावाचा विचार करतांना अशा गोष्टी लक्षांत व्याव्या लागतात

(१४) तृतीय स्थानांत आधिक्याने असलेले पापग्रह आयुर्दायावर परिणाम करतात. कारण तृतीयस्थान हे अष्टमस्थानाचे मृत्युस्थान आहे

(१५) व्ययस्थानांत आधिक्याने असलेले पापग्रह संतानसुखाला चांगले नाहीत. व्ययस्थान हे पंचमस्थानाचे अष्टमस्थान आहे. पंचमेश व्ययात पापग्रह युक्त असतां आणि पुत्रकारक ग्रह गुरु बिघडलेला असल्यास संतानसुखाला चांगले नाही. 

(१६) लग्नेश वा लग्न बिघडलेले असेल आणि अष्टमेश शुद्ध असेल तर तृतीयांतील शुभग्रहांचा आयुष्याला शक्तिपूरक आणि जोर देण्याकडे उपयोग होतोतृतीयांतील आधिक्याने असलेले शुभग्रह अष्टमस्थानाला वा अष्टमेशाला कांही अंशी साहाय्यक वा पूरक म्हणून काम करतात

(१७) तृतीयांतील आणि दशमांतील ग्रह प्रामुख्याने माणसाच्या मानस शास्त्रीय घडणीवर, त्याच्या मानसिक आणि वैचारिक पिंडावर परिणाम करतात. तृतीयस्थान मानसशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. दशमस्थान हे त्या घडणीच्या व्यवहाराचे माध्यम ( Medium) आहे

(१८) लग्नेश + राश्याधिपती + तृतीयस्थान + दशमस्थान + रवि ज्या राशीला आहे त्या राशीचा अधिपती = व्यक्तीचा मानसशास्त्रीय पिंड दर्शवितो. वरील प्रत्येक ग्रहाच्या गुणधर्माप्रमाणे व्यक्तीचा पिंड बनतो

(१९) ज्या भावाच्या (स्थानाच्या) ,,१२ स्थानांत आधिक्याने पापग्रह पडतात त्या भावांवरून लक्षांत व्यावयाच्या गोष्टींत कुंडलीत काही अंशी अशुभ फल मिळतें

(२०) ज्या भावाच्या ६, , १२ स्थानांत षष्ठेश, अष्टमेश आणि व्ययेश पडतो त्या भावाचीसुद्धां शुभ फल देण्याच्या दृष्टीने शक्ती कमी होते

(२१) कोठल्याहि भावाचा अधिपति त्या भावाच्या कारकग्रहांस जाऊन मिळेल वा त्यांनी युक्त (Conjunction ) होईल तर त्या भावांवरून ज्या गोष्टीचा विचार करतात त्यासंबंधी शुभ फल देऊन त्यासंबंधी चांगली स्थिती दर्शवितो
  उदा.  () तृतीय स्थानचा अधिपति मंगळयुक्त झाला
       () सप्तमस्थानचा अधिपती शुक्रयुक्त झाला
       () दशमस्थानचा अधिपती रवियुक्त झाला.
अनुमाने ()भावंडाचे सुख चांगले. भावंडे आधिक वगैरे सारखे 
       () पत्नी सुस्वरूप. लग्नामुळे भाग्योदय. वगैरेसारखे 
       ( ) वडील अधिकारी, सरकारी नोकर वा वडिलांचे सुख चांगले वगैरेसारखे             अनुमान अशीच अनुमाने इतर कारकग्रह आणि भावेश यांच्यावरून               घ्यावीत . 
(२२) जो ग्रह दोन पापग्रहांच्या कर्तरीत सांपडतो तो ग्रह ज्या गोष्टींचा कारक म्हणून प्रामुख्याने समजला जातो त्या बाबतीत आयुष्यात केव्हां तरी अशुभ फल निर्माण करतो व चिंता उत्पन्न करतो
उदा. शुक्र मेषेत असून वृषभेत राहु आणि मीनेंत मंगळ आहे. ह्यामलें पत्नीचे आरोग्य बिघडणे, द्विभार्या योग होणे अशासारखें फल मिळते. अशा स्थितीत सप्तमस्थान बिघडलेले असल्यास सर्वतोपरी अनमानास निश्चितता येते. अशा प्रकारे हा नियम इतर ग्रहांना कारकत्व लक्षात घेऊन लावावा

(२३) वरील नियम खालील परिस्थितीत जास्त परिणामकारक होतो. कारकेश कारकस्थानांत कर्तरीत पडला
उदा. () शुक्र सप्तमांत पापग्रहांच्या कर्तरीत पडला 
     () गुरु धनांत पापग्रहांच्या कर्तरीत पडला
     () रवि दशमांत ( नवमांत ) पापग्रहांच्या कर्तरीत पडला

(२४) बुध शुक्र युति हा एक चांगला योग कुंडलीत समजतां येईल. जीवनांत आर्थिक उन्नति हळू हळू का म्हणाना होत जाते. आर्थिक दर्जा आणि व्यवहारिक किंमत समाजांत चांगली राहते. पत्रिकेतील इतर अधिष्ठान बघून हा योग चांगला वाचतां येईल. काही वेळां कवित्व वा लेखनशैली देतो. ह्या योगाला रवीच्यापुढे जास्त प्राधान्य द्यावें. रवि मात्र ह्या योगांत नसावा. ललित साहित्य, नाटके आणि सिनेमा ह्यांची आवड उत्पन्न करतो. बौद्धिक राशीत बौद्धिकदृष्टया प्राधान्य द्यावे. मिथुन राशींत कलांच्या दृष्टीने चांगला असतो

(२५) चंद्र गुरु युति हा "गजकेसरीयोग समजतात. अशा (प्रत्येक) युतीला फार प्राधान्य देण्यात अर्थ नाही. वृश्चिक, कर्क आणि मीन ह्या लग्नांना काही अंशी शुभ योग समजावा. मात्र धनु, मिथुन आणि सिंह लग्नांना बऱ्याच अंशी अशुभ फले मिळतात. अशा योगांत -५- ह्या लग्नांना मानसिक, व्यावहारिक आणि आध्यात्मिक दृष्टया फार वाईट फलें मिळतात. चंचलता, मानसिक बैठक बिघडणे, पैशाच्या अतिलोभामुळे नुकसानी वा सामाजिक अप्रियता वाढणे वगैरेसारखी फले मिळतात. ह्या योगांतर धनु लग्नाला काही वेळा गृह-त्याग वा स्थानत्याग करावा लागतो-५- ह्या लग्नांना ही युति सांपत्तिक उत्कर्ष कांहीं काळ करीत असली तरी खड्डा खणल्याशियाय रहात नाही

(२६) मीन राशीत आधिक्याने असलेले ग्रह, विशेषतः पापग्रह पादरोगी करतात. कांही ठिकाणी तळपायाची ठेवण विचित्र सांपडते. तळपायाचे ऑपरेशन झालेल्या माणसाच्या पत्रिकेत वा जळवात ज्या माणसांना आहे अशा माणसाच्या पत्रिकेत मीन राशींत रवि+मंगळ + हर्षल, रवि+ शनि+ मंगळ, रवि+चंद्र + शनि वगैरे सारखे योग सांपडतात. अशा वेळेस पायास पीडा वा पायास अपघात वगैरेसारख्या गोष्टी पहावयास मिळतात. वरील फलें मीन नवमांशांत आधिक्याने असणाऱ्या ग्रहामुळेंसुद्धां मिळतात

(२७) शनि मंगळ युति हा एक विचित्र योग जातकशास्त्रांत गणला जातो. आत्यंतिक आधिभौतिक प्रवृत्तीची माणसें असण्याचा संभव असतो. बऱ्याच वेळेस सांपत्तिक हाव जास्त सांपडते. मोठी महत्त्वाकांक्षी माणसे असतात. अधिकार शक्ति चांगली सापडते वा अधिकार असणाऱ्या व्यवहारांना चांगली असते ( Executive Ability). आंतल्या गाठीची आणि संशयी माणसे असतात. रवि चंद्र बिघडलेले असतील तर दुष्ट माणसे असतात. एक बोलतील आणि एक करतील. दुटप्पी वर्तन सांपडते. फारच बिघडलेली युति असेल तर स्वतःच्या बचावासाठी मित्राला फसवतील. मोठे व्यवहार अशा मंडळाशी जपून करावे. काही काळ उत्कृष्ट भोग भोगणारी आणि आयुष्यात व्यावहारिकदृष्टया वर आणणारी युति आहे. पत्रिका बिघडलेली असेल तर अशा मंडळींनी एक गोष्ट मात्र ध्यानात ठेवावी. सर्वच दिवस सारखे नसतात. २१ जून हा जसा मोठा दिवस आहे तसाच २१ डिसेंबर हा सर्वात लहान दिवस आहे. आयुष्यांत केव्हां तरी ही युति खाली आणते. शनि मंगळ युति असून कुंडलीत त्यांच्याशी बुध, गुरु वा रवि यांचा त्रिकोण वा लाभयोग होईल; तर मनुष्य फार मोठा व्यावहारिक योग्यतेचा होण्याची शक्यता असते. सांपत्तिक उत्कर्षही करणारा हा योग आहे. सांपत्तिक दृष्टया अशा योगांत शुक्राचा ह्या युतिशी लाभयोग असल्यास चांगले

(२८) एखादा ग्रह ज्या वेळेस वक्री स्थितीतून गतिमान स्थितीत जातो वा गतिमान स्थितीतून वक्री स्थितींत जातो (जातक शास्त्राच्या दृष्टीने) म्हणजे तो ज्या विशिष्ट दिवशी वक्री होतो वा मार्गी दिवशी वा विशेषतः त्या वेळेस माणसाचा जन्म झाल्यास तो ग्रह ज्या  गोष्टीचा कारकग्रह म्हणून समजला जातो वा ज्या भावाचा अधिपती होतो त्या कारक गोष्टींबद्दल वा त्या भावांवरून ज्या गोष्टी अभ्यास जातात त्या बाबतींत अशुभ फलें उत्पन्न करतो. उदा. एखाद्या माणसाच्या कुंडलीत गुरु अशा स्थितीत आहे तर पुत्रशोक, सर्व मुली होणे, पुत्रचिंता वा एखादा मुलगा वेडा होणे वगैरेसारखे फल मिळण्याची शक्यता असते. भावेशावरून भावाधिष्ठित गोष्टीबद्दल अशीच अनुमाने घ्यावीत.  

(२९) वरील उल्लेख केलेल्या ग्रहस्थितीत, इतर ग्रहांचे त्यांवर दृष्टियोग वा इतर योग होत असल्यास काही वेळां विचित्र फले मिळतात. उदा. कुठल्याहि स्थानांत विशेषतः धनस्थानांत बुध स्तंभी ( Stationary) असल्यास त्यांवर शनि वा मंगळाची दृष्टि पडल्यास वा त्याच्याशी अशा ग्रहांची युति झाल्यास मनुष्याच्या वाणीत दोष सांपडतो

(३०) आश्लेषा, मूळ, कृत्तिका आणि विशाखा ह्या नक्षत्रांवर विकत घेतलेली वस्तू चोरीस जाण्याची फार शक्यता असते

(३१) घरांतील बायकामंडळींस कापड घेण्यास रोहिणी, हस्त, अनुराधा, रेवती, अश्विनी व पुनर्वसु ही नक्षत्रे त्यांतल्या त्यांत फारच चांगली असतात

(३२)चंद्र हर्षल युतीची मुले लहानपणी फार चौकस व धडपडी असतात. अशी मुले शालेय जीवनांत कोठे सहलीला निघाली तर शिक्षकांच्या ताब्यात बजावून द्यावी

(३३) ज्या मुलांच्या पत्रिकेत चंद्र केन्द्र हर्षल, हर्षल प्रतियोग नेपच्यून, शनि केन्द्र मंगळ, रवि केन्द्र हर्षल, मंगळ केन्द्र हर्षल, रवि युति हर्षल, रवि युति प्लुटो वगैरेसारखे योग आधिक्याने झालेले असतात अशा मुलांची सर्वच बाबतींत काळजी घेणे इष्ट असते

(३) अपघात (Accidents) होण्याच्या दृष्टीने वृषभ, कन्या आणि मकर ह्या राशी महत्त्वाच्या समजाव्या. कन्या आणि धनु राशीतून झाले पापग्रहांचे केन्द्र तसेंच वृषभ आणि सिंह राशीतून झालेले केन्द्र अपघाताच्या दृष्टीने जोरदार असतात. कृत्तिका आणि मघा नक्षत्रांना विशेष जोरदार फल, द्यावे. ( ह्या नक्षत्रांतून होणाऱ्या केन्द्रयोगांना ). 
  
(३) अपघाताच्या दृष्टीने पृथ्वी (२,६,१०) आणि अग्नी तत्वाची लग्ने सामान्यतः आघाडीवर असतात

(३) खालील नक्षत्रांतून होणारे पापग्रहांचे प्रतियोग अपघाताच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात.;-
() आर्द्रा (मिथुन ) प्रतियोग मूळ (धनु). 
() कृत्तिका (वृषभ ) प्रतियोग विशाखा ( वृश्चिक
() कृत्तिका (मेघ) प्रतियोग विशाखा (तुळ). 
() मघा (सिंह) प्रतियोग धनिष्ठा ( कुंभ). 

(३) खालील स्थानांतून झालेले पापग्रहांचे केन्द्रयोग अपघाताच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात. () लग्न-चतुर्थ () लग्न-दशम () व्यय-तृतीय

(३) खालील स्थानांतून होणारे प्रतियोग अपघातास कारणीभूत होण्याची शक्यता असते() लग्न-सप्तम, तृतीय-नवम, धन-अष्टम() या प्रमाणे एखादा प्रतियोग असून आणखी लग्न--अष्टम, सप्तम--धन ह्यांतून एखादा षडाष्टक योग झाल्यास अशा योगांचा जोर वाढतो

३९) अपघात वर्तवितांना साध्या पत्रिकेतील कुयोग नवमांशांत झाल्यास त्या योगास जास्त प्राधान्य द्यावें

४०) रवि, चंद्र आणि लग्न वा लग्नेश ह्यापैकी जास्तीत जास्त मंडळी अपघात करण्यासाठी अशुभ झाली पाहिजेत. म्हणजे बऱ्याच अशुभ योगात असली पाहिजेत. (विशेषतः ही मंडळी पापग्रहांच्या प्रतियोगांत वा केंद्रांत असावी.) नवमांश पत्रिकेंतसुद्धां हे ग्रह आणि लग्नेश अशुभ असावे

(४) लहान मुलांच्या पत्रिका बघतांना खालीलप्रमाणे ग्रहस्थिती असल्यास विशेष जातक वर्तवू नये
() रवि पापग्रहांनी विशेषतः राहूनें युक्त असून, लग्नेश वा अष्टमेश आहे
() चंद्र पापग्रहांनी विशेषतः राहूने युक्त असून, लग्नेश वा अष्टमेश आहे
() राश्याधिपती आणि लग्नेश पापग्रहांनी युक्त असून, लग्नेश शुद्ध नाही
() अष्टमेश तोच लग्नेश होऊन राहूने युक्त आहे. (तुला आणि मेष लग्नांना हा योग येईल.) 

(४) मूळ, विशाखा, कृत्तिका, आश्लेषा, आर्द्रा ह्या नक्षत्रांतून रवि, चंद्र, लग्नेश आणि अष्टमेश आधिक्याने ( Majority ) बिघडलेले आहेत 

(४) लग्नेश अष्ठमांत राहुयुक्त असल्यास बरा नाही. तसेच अष्टमेश                लग्नात, तृतीयांत आणि व्ययांत राहुयुक्त बरा नाही

(४) लहान मुलांच्या पत्रिकेत:-
() चंद्र हा हर्षल वा राहु वा नेपच्यून वा शनि याने युक्त 
() रवि हा हर्षल वा शनि वा मंगळ वा राहु याने युक्त 
(लग्नेश पापग्रहांनी युक्त क्रूर नक्षत्री 
() अष्टमेश वा षष्ठेश पापग्रहांनी युक्त क्रूर नक्षत्री वगैरेसारखी परिस्थिती असल्यास अशा मुलांना एकदम आजार येण्याची शक्यता असते

(४५) ज्या ग्रहाच्या परस्पर (दशा आणि अन्तर्दशा) चालू असतात त्या ग्रहांमध्ये जन्मकुंडलीत षडाष्टक, केन्द्र वा प्रतियोग असल्यास आणि विशेषतः ते पापग्रह असल्यास अशा वेळेस शंभर टक्के ते ग्रह शुद्ध असून सुद्धां शुभ फल मिळत नाही वा अशुभ फल मिळण्याची शक्यता असते

(४६) राहूयुक्त जो ग्रह असेल त्या ग्रहाची वा ग्रहांची दशा, राह राजयोगकारक ग्रह नसेल वा ज्या ग्रहाशी युक्त असेल तो राजयोगकारक ग्रह नसेल तर चांगली जात नाही किंबहुना बऱ्याच अंशी अशुभ वा प्रतिकूल फल देते

(४७) राहुयुक्त ग्रहांची वा ग्रहांची दशा सामान्यतः अशुभ फल उत्पन्न करते

(४८) व्ययस्थानांत, अष्टमस्थानांत वा लग्नात जो ग्रह राहुयुक्त असतो त्याची आणि राहूची दशा प्रतिकूल जाते

(४९) कुंडलीत राहु मिथुन वा कन्या राशीत असल्यास वा गुरूच्या त्रिकोणांत असेल वा गुरु दृष्ट असेल तर राहूची दशा उत्कृष्ट जाते(स्थानबल पर्यायाने लक्षात घ्यावे.) 

(५०) दोन पापग्रह ज्या भावांतून प्रतियोग करतात, त्या दोन भावांतून ज्या गोष्टीचा विचार करतात, त्या गोष्टीसंबंधी त्यांच्या दशेअन्तर्दशेत प्रतिकूल फल मिळतें

(५१) वरील नियम दोन पापग्रहांच्या केन्द्रयोगालासुद्धा तसाच लावावा

(५२) दशा-फल विचारांत ग्रहांचे मूळचे (Radical Aspects ) पुढील योग विशेष करून लक्षांत व्यावे() प्रतियोग () युति (३) केन्द्र () त्रिकोण (क्रमशः बलाबलाने.) 

(५३) केन्द्र -त्रिकोण अधिपतींच्या युत्यांचा विशेष विचार करावा

(५४) नवमांश बल आणि स्थानबल तरी सामान्यतः विचारांत घ्यावे. षड्वर्गबल विचारांत घेतल्यास उत्तमच

(५५) ग्रह वक्री, स्तंभी, कर्तरीत वा स्थानकर्तरीत असल्यास विशेष लक्ष द्यावे

(५६) ग्रह शुभ ग्रहाने युक्त केन्द्रांत वा त्रिकोणांत शुभकर्तरींत वा इतर शुभ ग्रहाने युक्त वा दृष्ट असल्यास प्राधान्य द्यावे

(५७) ग्रह, दुःस्थानाच्या(६,८,१२) अधिपतीने युक्त असल्यास त्याचा दर्जा, दशेच्या दृष्टीने कमी होतो

(५८) योगकारक ग्रहांना वर्गबल आणि स्थानबल दशेसाठी अवश्य आहे

(५९) दशेचे फलित वर्तवितांना ज्या राशीतून, ज्या भावांतून आणि ज्य अधिपतीकडून सदर योग (म्हणजे युत्या प्रतियोग, षडाष्टक, वा केन्द्र) होतात,त्या त्या गोष्टीवरून वर्तविल्या जाणाऱ्या गोष्टीचा शुभाशुभ फलाच्या विचार करावा
६०) एक ग्रह उच्च व त्याच राशींत एक ग्रह स्वगृहींचा असेल तर,त्याच्या महादशेत चांगले योग येतात किंबहुना सदर दशा चांगल्या जातात

(६१) उच्च आणि वर्गोत्तम ग्रहांच्या दशा चांगल्या जातात हा सामान्य नियम आहे

(६२) षड्वर्गात चांगले बल मिळालेल्या ग्रहांच्या दशा सामान्यतः चांगल्या जातात. त्यांतून तो ग्रह राजयोगकारक असल्यास उत्तमच

(६३) दोन उच्च ग्रह एकमेकांच्या केन्द्रांत असल्यास दशेच्या दृष्टीने कुचकामाचे होतात. कमीत कमी एकाची दशा प्रतिकूल जाते



No comments:

Post a Comment