Wednesday 26 March 2014

NUMEROLOGY- अंकशास्त्रावरुन व्यक्तीची स्वभाव ओळख



अंकशास्त्रावरुन व्यक्तीची स्वभाव ओळख
 अंकशास्त्राचा आपल्या जीवनावर भरपूर प्रभाव पडत असतो. मात्र अंकशास्त्राचे कार्य कशा पध्दतीने चालते याचे फारसे ज्ञान आपल्याला नसते.अंकशास्त्र हे ज्योतिषशास्त्रा प्रमाणेच मानवी जीवनाच्या भूत, भविष्य, वर्तमान याचा शोध घेणारे एक शास्त्र आहे. या शास्त्रावरून व्यक्तीचा स्वभाव, गुण-दोष, प्रकृती आणि भविष्याचा वेध घेता येतो. या शास्त्रामध्ये जन्मतारखेची बेरीज करून, त्यावरून व्यक्तीचा मूलांक काढून त्यावरून त्या व्यक्तीचा स्वभाव, संभाव्य आजार, मित्र क्रमांक, शत्रु क्रमांक, शुभवार, भाग्य महिना, भाग्यरत्न संबंधित राशी, इ.माहिती मिळते.

अंकशास्त्रातही प्रत्येक अंकावर नऊ ग्रहातील एका ग्रहाचा अंमल असतो व तो खालीलप्रमाणे.
 १ = रवी;  ४ = हर्षल;  ७ = नेपच्यून;  २ = चंद्र;  ५ = बुध;  ८ = शनी 

 ३ = गुरू;  ६ = शुक्र;   ९ = मंगळ.

साधारणपणे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर त्या व्यक्तीचा जो मूलांक आहे त्या नुसार प्रभाव असल्याचे लक्षात येते त्या व्यक्ति मधे तिच्या मूलांक नुसार गुणधर्म असल्याचे दिसून आले आहे.मूलांक नुसार आपणास त्या
व्यक्तिचा स्वभाव समजायला मात्र खुप मदत होते.

सर्व प्रथम आपण मूलांक समजुन घेऊ:

समजा तुमची जन्म तारीख ४.७.१९६४ आहे. या जन्मतारखेत ही व्यक्ति  ४  या तारखेला जन्मलेली आहे. तेव्हा या व्यक्तीचा मूलांक ४  आहे. समजा ही व्यक्ति १३, २२, ३१  या तारखेला जन्माला आली असती, तर तिचा मूलांक ४  आला असता. याचे कारण म्हणजे १३=१+३=४  किंवा २२= २+२=४  आणि ३१  =३+१=४

मूलांक एक 

कोणत्याही महिन्याच्या १,१०,१९,२८ या तारखेला जन्म असलेल्या लोकांचा मूलांक १ येतो. १ हा रवी म्हणजे सूर्याचा अंक आहे या अंकाचा कारक ग्रह रवि असून स्वतंत्र विचार, उद्योग, स्फूर्ति, उत्साह, तल्लख बुद्धि व कले बद्दल प्रेम या गोष्टींचा बोध होतो.

या लोकांची स्वभाव वैशिष्टे :- 

1. मूलांक १ च्या व्यक्तीमध्ये   नेतृत्व करण्याची जबरदस्त ताकद असते,  शारीरिकदृष्टय़ा  सक्षम असतात. ह्यांची प्रतिकारशक्ती उत्तम असते. कायम उत्साही असणे, कार्यमग्न रहायला आवडणं ही त्यांच्या स्वभावाची प्रमुख वैशिष्ट्यै आहेत.

2.मूळातच अशा व्यक्ती बुद्धिमान असतात, त्यामुळे नवीन काही शिकण्यासाठी त्यांना विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत. यांना प्रबळ इच्छाशक्ती, ऊर्जा व उत्तम आरोग्य लाभते.

3. मूलांक एक असलेल्या व्यक्ती स्वतंत्र विचाराच्या असतात. स्वत चे निर्णय स्वतः घेण्या कड़े कल असतो.

4.प्रामाणिक, कष्टाळू, महत्त्वाकांक्षी व तापट असतात. तापटपणा त्यांच्या फार अंगलट येतो व शत्रुत्व ओढावून घेतात.
ब-याचदा शिस्तीच्या अतिरेकामुळे त्यांचे इतरांशी वाजते.कधी रुक्ष स्वभाव आणि कटु भाषेचा प्रयोग केल्याने या व्यक्ती मैत्रीपूर्ण संबंध आणि शुभचिंतकांना दुरावतात.


5. दुसऱ्याच्या आदेशा चे पालन करने तुम्हास जमत नाही. सहजासहजी दुसर्‍यांचा सल्ला घ्यायला आवडत नाही व घेतही नाहीत. बहुधा ह्याच गुणांमुळे आयुष्यातल्या बर्‍याच संधी गमवून बसतात. आणि त्याचबरोबर संवाद कमी होतो. दुरावा वाढतो.

6.एक  अंक प्रसिद्धीचा कारक आहे. यांनी जर आपली ऊर्जा, साहस, नेतृत्व, योग्य दिशेस लावल्यास समाजात व आयुष्यात चांगल्या स्थानावर पोहोचू शकतात.

7. सार्वजनिक कार्यात मग ते रंगमंच असो वा राजकारण, आपली विशेष छाप सोडण्यात यशस्वी होतात. जितके सामाजिक तितकेच कौटुंबिकही असतात. उच्च विचार, प्रबळ इच्छाशक्ती, कृतज्ञ, दिलेला शब्द पाळणारे आणि नि:स्वार्थीपणे सहाय्य करणारे असे हे व्यक्तिमत्त्व आहे.

8. व्यवसायात स्थिरता नसते, दर ३ ते ४ वर्षानी नोकरी बदलता. या व्यक्तींनी विशिष्ट काळानंतर कामातून बाहेर पडून ब्रेक घेणे गरजेचे आहे.  

9. ह्यांना हृदय विकार, हृदय जास्त धडधडनणे , रक्तदाब, पित्त विकार, डोके दुःखी, ताप, गुडघेदुखी, मुत्रपिंड आजार उष्णता, डोळ्यांचा विकार, मुळव्याध, बद्धकोष्ठ, अपचन, जास्त घाम येणे, , ह्यापैकी काही त्रास संभवतात. ह्यांना ध्यानधारणा करणे, सुर्यनमस्कार करणे, आणि जास्त पाणी  पिणे व आपल्या कुलदैवतेची उपासना करणे लाभदायक ठरते.

10. ज्या व्यक्तिंचे मूलांक एक, चार आणि नऊ आहेत त्या व्यक्तिंशी यांचे चांगले पटते. शक्यतो सहा आणि आठ मूलांक असलेल्या व्यक्तिंशी फारसे वाकडे घेऊ नये.


11.भाग्यशाली तारखा: यांच्यासाठी प्रत्येक महिन्यातील 1,2,10,11,19,20,28,29 या तारखा शुभ आहेत. याशिवाय 7,16 आणि 25 या लाभ देणाऱ्या तारखा आहेत. कोणतेही चांगले कार्य, व्यवहार सुरू करावयाचा असल्यास या तारखांना सुरू करणे शुभ ठरेल. यशप्राप्ती होईल.

12.मैत्री, प्रेम आणि विवाहासाठी भाग्यशाली अंक: ज्या व्यक्तींचा जन्मदिवस 1,2,7,10,11,16,19,20,25,28 आणि 29 असेल त्या व्यक्ती या मूलांकासाठी भाग्यशाली आहेत. यांच्याशी असलेले संबंध दीर्घकाळ टिकून राहतात. या व्यक्तींशी संबंध ठेवल्यास मूलांक 1च्या व्यक्तींना सुखशांती आणि आनंद मिळतो. मूलांक ४ या व्यक्तींसाठी शुभ आहे. तर जन्मदिवस ३,८,९, १२,१७,१८,२१,२६,२७ असलेल्या व्यक्तीशीं असलेले संबंध कष्ट देणारे असतात. 


13.भाग्यशाली रंग: मूलांक 1 साठी पिवळा, सोनेरी गुलाबी, रंग शुभ आणि यशप्राप्ती देणारे आहेत. तर काळा रंग हानीकारक आहे.. निळा रंग मानसिक कष्ट देणारा आहे. पांढऱ्या रंगाऐवजी दुधी रंग (क्रीम) लाभदायक ठरेल.


14.भाग्यशाली वर्ष : या व्यक्तींच्या आयुष्यातील वय वर्षे 10,11,19, 20, 28,29,37, 38,46,47,55,56 हे वर्ष विशेष लाभदायी ठरू शकतात, शिवाय 7,16,25 शुभ आहेत.. तर 8,9,41,26,27,30,44,45,53 व 54 वे वर्ष समस्या आणि कष्टदायक असू शकते. जीवनकाळ (वर्षे )- २० ते २९ सामान्य, ३० ते ३९ फायाचे, प्रगतीचे, प्रसिद्धीचे, ४० ते ४९ त्रासाचे, असमाधानकारक, ५० ते ५९ सर्वोकृष्ट, संसारी जीवन, प्रगती, सन्मान, स्थावर लाभ. वय वर्षे ९, १२, ३१, ४०, ६०, ८२ आणिबाणी वर्षे.

15.भाग्यदायक करिअर:
राजकारण, व्यवस्थापन आणि सेनादल ही क्षेत्रं या व्यक्तींसाठी उत्तम आहेत. शिवाय संशोधन, इलेक्ट्रॉनिक्स, क्रीडा, ज्वेलरी या क्षेत्रात करिअर केल्यास यश आणि विशेष लाभ होऊ शकतात. संस्थांचे संस्थापक, परराष्ट्र वकील, संशोधन, पुस्तक विक्री, चित्रपट निर्मिती यात यश मिळते. 


16.शुभ रत्न: या मूलांकासाठी माणिक रत्न शुभ आहे. 3 कॅरेटपेक्षा अधिक वजनाच्या सोने किंवा तांब्यातील या रत्नास रिंग फिंगरमध्ये धारण करावे. विशेष लाभासाठी याच्यासोबत पुष्कराज रत्न धारण करू शकता.


17. कल्याणकारी मंत्र: सूर्य मंत्राचा नित्य जप करावा. सूर्यास नियमित जल अर्पण करा. कीर्ती वाढेल.
मंत्र: ॐ हृीं घृणि: सूर्याय आदित्य श्रीं ।


मूलांक दोन 

कोणत्याही महिन्याच्या  २,११,२०,२९ या तारखेला जन्म असलेल्या लोकांचा मूलांक २ येतो. मूलांक २ चा स्वामी चंद्र आहे सहकार्य, अंत:प्रेरणा, सहानुभूती, भावना, संशय, सामाजिकप्रीयता आणि ध्येयवाद या गोष्टींचा बोध होतो.

या लोकांची स्वभाव वैशिष्टे :- 

1.
चंद्र मनाचा कारक, तसेच मातेचा कारक आहे. हळव्या अंतःकरणाची व अती भावनाप्रधान व्यक्ती असते.मुळातच मनाशी या ग्रहाचा संबंध असल्याने संवेदनशील, भावुक असलेल्या या व्यक्ती असतात.


2.एकूणच नाजूक व्यक्तिमत्त्व असलेल्या या व्यक्ती असतात. शारीरिक स्वरूप आकर्षक. त्यांचे आरोग्य मात्र मध्यम स्वरूपाचे असते. सतत शारीरिक विकार होत राहतात.


3. अशी व्यक्ती स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाबद्दल कायमच या व्यक्ती सतर्क असतात. आपली जीवनशैली, खानपान कसं असावं याबाबतीतील समज अत्यंत दृढ असतो. भौतिक गुणांपेक्षा मानसिक गुण अधिक प्रदर्शित होतात. समाजात सहज स्विकार्य असे हे व्यक्तिमत्त्व असते.



4. स्वभाव अत्यंत मूडी आणि हट्टीही असतो. मात्र मित्रपरिवारात अत्यंत प्रिय असं हे व्यक्तीमत्त्व असण्याचं कारण या व्यक्ती तितक्याच प्रेमळ स्वभावाच्या असतात. जसा चंद्र आपला आकार बदलत असतो त्याप्रमाणेच या व्यक्ती आपले विचार बदलत असतात. कला आणि संगीतात यांना विशेष रूची असते. स्वभाव अत्यंत हळवा, भावुक असल्याने या व्यक्ती कोणतीही गोष्ट चटकन मनाला लावून घेतात आणि दु:खी होतात.. कोणत्या गोष्टीसाठी पटकन चिडतील सांगता येत नाही. एखाद्या समस्येने कासाविस होत असल्याने छोटय़ा छोटय़ा गोष्टींसाठीही ऊहापोह करतात. थोडक्यात वर्णन करायचं तर चंद्राच्या कलेप्रमाणेच स्वभाव बदलत राहतो. मात्र इतरांविषयी नेहमीच सहृदयी असे हे व्यक्तिमत्त्व असते, त्यात कोणताही दिखाऊपणा नसतो.

5.मनात सतत कुठेतरी अध्यात्माप्रति कोमल भाव आणि मोक्ष प्राप्तीची इच्छा बाळगून असतात. उदार स्वभावामुळे यांच्या संपर्कात अपरिचित व्यक्तीही सुखावतो. नियमांशी कधीही तडजोड करत नाहीत आणि शिस्तप्रिय असतात. पोहणे, नृत्य करणे, बागकाम आणि इतर कलात्मक गोष्टींमध्ये विशेष रस असतो.

6. व्यक्ती अतिशय संवेदनशील, हळवी असतात. लहानसहान गोष्टीवरून दुसऱ्या व्यक्तीची माफी मागण्याची यांना सवय असते.

7. यांचा स्वभाव अतिशंकेखोर व संशयी असतो. जीवनात कोणत्याही एका कार्यात संतुष्ट नसतात, वेगवेगळ्या पद्धतीने जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. हाती घेतलेल्या कामात जराशी अडचण आली तरी ते काम सोडून दुसऱ्या कार्यात लक्ष घालतात. उदासीनता हा मुख्य अवगुण आहे.

8. स्वभाव स्वप्नालु असतो स्वतच्या स्वप्नाच्या दुनियेत रमन्यात तुम्हाला आनंद वाटतो. स्वताच्या रम्य विचारत नेहमी दंग असून तुमच्यात व्यवहारिक दृष्टीकोणाची कमतरता दिसून येते.

9. कुटुंबात भांडणे होणे, अपयश मिळणे, नातेवाईक दुरावणे, मातृवियोग होणे, मानसिक त्रास होत रहाणे इ. चंद्राची स्थिती बिघडलेली असेल तर अशा व्यक्तिंना अमावस्या, पौर्णिमा व अष्टमी या तिथींना त्रास होतो.


10. अस्थमा, पोटाचे विकार, Gases, अपचन इत्यादीचा अधून मधून त्रास होतो.. झपाटले जाणे, वेडसरपणा करणे, क्षणात भडकणे, चिडणे वगैरे बाधांचा त्रास जास्त दिसून येतो.

11. घर-कुटुंब-माता यांच्या विषयी ओढ, भावनाशील, जुळवून घ्यायचा स्वभाव, मातृप्रेमी, दयाळू, विश्र्वासू, सहनशील, त्यागी. धंदा भागीदारीत अगर नोकरी, उत्तम आयुष्य.

12. दूरचे प्रवास व समुद्रा विषयी खुप आकर्षण दिसून येते.

13) इतर लोक तुमच्या चांगुल पनाचा फायदा घेतात त्या पासून सावध रहावे.

14) तुमच्यात नम्रता असून आपल्या गुणांचे प्रदर्शन करने तुम्हाला आवडत नाही. 

15) तुम्ही तुमच्या भावना सहज सहजी दुसर्या समोर प्रकट करीत नाही.

16) घराबद्दल विलक्षण ओढा असून बारकाईने लक्ष देता. 

17.भाग्यशाली तारखा: 2, 4, 11, 13, 20, 22, 29 व 31 या तारखा या व्यक्तींसाठी भाग्यशाली आहेत. 7, 16 आणि 25 या तारखाही क्वचित शुभफलदायी ठरतील.

18.अशुभ तारखा: 3,9,12,18,21 आणि 27 या तारखा शुभ फळ देणाऱ्या नाहीत.

19.भाग्यशाली वर्ष: 4, 13, 22,31, 40, 49, 58, 67, 76 ही वर्षे भाग्यशाली असतील. 25, 34, 43, 52, 61 व 70 ही वर्षे अधिक उत्तम आहेत. 12, 18, 21,27 व 30व्या वर्षी विशेष सावधानता राखावी.

20.जीवनकाल वर्षे - २९ ते ३० साधारण, धावपळ काळ. ३० ते ३९ बरा, उन्नतीस सुरूवात. ४० ते ४९ सर्वोत्कृष्ट काळ. ५० ते ५९ आरोग्य सांभाळणे.

21.भाग्यशाली करिअर आणि व्यवसाय:
ग्लॅमरची विशेष ओढ असल्याने या व्यक्ती तशाच फिल्डमध्ये म्हणजे अभिनय, फॅशन आणि मॉडेलिंग क्षेत्रात यश संपादन करू शकतात...या व्यतिरिक्त लेखन, संगीत, कला, नृत्य या क्षेत्रात यश मिळू शकते. संशोधनपर कार्य ही करण्‍याकडे तुमचा कल दिसून येईल हॉटेल, किराणामाल दुकान, छापखाना, शेती, इस्टेट एजन्सी या व्यवसायात यश


22.प्रेम आणि मैत्रीसाठी भाग्यशाली अंक: ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्यातील 2, 4, 7,11, 13, 16, 20, 22, 25, 29 आणि 31या तारखांना झाला आहे, त्त्या व्यक्ती मूलांक 2 साठी भाग्यशाली आहेत. मैत्री, प्रेम आणि विवाहासाठी या व्यक्ती 2 मूलांकासाठी योग्य आहेत. मात्र 3, 9, 12, आणि 27 तारखेस जन्मलेल्या व्यक्ती मैत्री, प्रेम, सामंजस्य आणि विवाहासाठी योग्य नाहीत. 


23.भाग्यशाली रंग: क्रिम, पिवळा आणि गुलाबी रंग या मूलांकासाठी शुभ रंग आहे. लाल, पांढरा आणि गडद हिरवा या व्यक्तींसाठी भाग्यशाली रंग आहेत. काळा, वांगी कलर या रंगांपासून दूर राहा. हे रंग समस्या निर्माण करू शकतात.


24.शुभ रत्न: मूलांक 2 च्या व्यक्तींनी मोती रत्न धारण करावे.

कल्याणकारी मंत्र: या व्यक्तिंनी कल्याण आणि प्रगतीसाठी चंद्रमंत्रासोबत गणपती मंत्राचाही जप करावा. 

मंत्र- ॐ सौं सोमाय नम:।
    ऊं वक्रतुण्डाय हुम्।।

मूलांक तीन  

कोणत्याही महिन्याच्या  ३,१२,२१,३० या तारखेला जन्म असलेल्या लोकांचा मूलांक ३ येतो ३ हा अंक गुरु या ग्रहाचा आहे मूलांक चा स्वामी गुरू आहे यश, कीर्ती, भौतिक सुखे, आनंद, प्रेम व आकर्षण मूलांक तीनचे निदर्शक आहेत.
या लोकांची स्वभाव वैशिष्टे :- 

1. तुम्हाला बहुतेक करून जीवनात यश मिलते. साधारणपने मोठ्याने बोलण्याची सवय असते.जीवनात अधिकार व मान उशिरा मिलतो, स्वाभिमानाची तीव्र भावना असे, परन्तु काही प्रमाणात संशयी स्वभाव दिसून येतो. शिक्षणाचं त्यांना विशेष महत्व वाटतं.  शिक्षण, व्स्थापन यात यश मिलते. यौवन व दारिद्र्य मधून लगेच बाहेर पड़ता. अनेक विषया मधे रस घेण्यापेक्षा एकाच विषयात लक्ष दिल्यास जीवनात यश मिळेल.ही माणसं प्रत्येक गोष्टीचा नैतिकदृष्टय़ा विचार करतात. मूल्यांना त्यांच्या जीवनात विशेष महत्व असतं.

2.हे लोक कूटनीतिज्ज्ञ असतात. त्यांना दुसऱ्यांचा हस्तक्षेप सहन होत नाही. सुरुवातीला आर्थिकदृष्टय़ा ते तितकेसे सक्षम नसतात पण पुढे श्रीमंत होतात आणि समाधानी आयुष्य जगतात. त्यांची काम करण्याची पद्धतही थोडी वेगळी असते. जे काम समोर दिसेल ते पूर्ण करण्यासाठी कोणाच्या तरी मदतीची वाट पाहण्यापेक्षा ते काम उरकण्याकडेच त्यांचा कल अधिक असतो.

3.मूलांक ३चे लोक सामान्यत विनोदी आणि प्रेमळ स्वभावाचे असतात. परंतु यांना आपली नाराजी लपवता येत नाही, त्यामुळे त्यांना अनेक गुप्त शत्रू असतात. हसतमुख स्वभाव त्यांना पुढे जाण्यास लाभदायक ठरतो.

4. या व्यक्ती चांगल्याच स्पष्टवक्त्या असतात, पण तितक्याच नम्रही असतात. ज्या गोष्टी त्यांना पटत नाहीत त्या इतरांसाठी करण्यापेक्षा न करणे त्यांना सोयीचे वाटते.

5.समाजसेवेची यांना आवड असते. दान करणे, दुसऱ्यांना मदत करणे हे गुण त्यांच्यात असतात. वृध्दावस्थेतही ते सामाजिक कार्यात सक्रीय राहतात. शक्यतो कोणाच्या वाटेला जाऊ नये आणि आपल्या वाट्याला आलेल्यांना सोडू नये, असा त्यांचा खाक्या असतो. वृत्तीने मोकळ्या असताना यांच्याविषयी बरेच गैरसमजही असतात. पण, त्याचे त्यांना फारसे काही वाटत नाही.

6.अतिमहत्वाकांक्षा ,इतरांवर नियंत्रण ठेवण्याच्या प्रवृत्तीमुळे ,स्पष्टवक्ते असल्यामुळे त्यांच्या गुप्त शत्रूंची संख्या वाढतच जाते. संतापाच्या भरात अपशब्द उद्गारल्यामुळे यांचे नुकसान होण्याची शक्यता असते.

7. शुभ तारखा 3,6,9,12,15,18,21,24 व 27 या तारखा यांच्यासाठी शुभ असतात. आपल्या महत्वाच्या कामांना त्यांनी याच तारखांना सुरुवात करायला हवी. 8, 17 व 26 या तारखा अशुभ ठरू शकतात. जीवनकाल २० ते २६ सामान्य, २७ सुखदायक घटना. ३० ते ३८ उत्कृष्ट. ४० ते ४९ साधारण. ५० ते ५९ प्रगतीचा. १६, ३५, ४४, ७१ आणिबाणी वर्षे.
8.भाग्य रंग-पिवळा, केसरी रंग यांच्यासाठी शुभ असतात. या शिवाय गुलाबी रंगापासून त्यांना विशेष लाभ होऊ शकतो. काळा, निळा व राखाडी रंग यांच्यासाठी शुभ नाहीत.

9.भाग्य दिवस-गुरुवार, सोमवार आणि मंगळवार मूलांक 3च्या लोकांना फलदायी असतात.



10.मधुमेह, वजन वाढणे, मांड्या व पिंढऱ्या दुखणे, पोटदुखी वगैरे त्रास होऊ शकतात.


11.तीन, सहा आणि नऊ मूलांक असलेल्या व्यक्तींशी यांचे उत्तम जमते. त्यांच्याशी झालेली दोस्ती दीर्घकाळ टिकते.


12..करिअर-  कम्युनिकेशन आणि मनोरंजनच्या क्षेत्रात यश मिळवू शकतात. अभिनय, गायन, लेखन आणि पत्रकारिता हे विषय करियरसाठी निवडता येतील. फॅशन डिझायनिंग किंवा मॉडलिंगमध्ये तुम्हाला नशीब आजमावून पाहायला काहीच हरकत नाही.

अध्यापन, राजकारण आणि व्यवस्थापन त्यांच्यासाठी लाभदायक क्षेत्रं आहेत. देवालयाचे ट्रस्टी, धर्मप्रचारक, वकील, जज्ज, प्रोफेसर, खेळाचा कर्णधार वगैरे यांना चांगले जमते. 

13.भाग्य मंत्र-
ॐ ऐं हीं ऐं बृं बृहस्पतये नम
या मंत्राचा त्यांनी दिवसातून किमान 108 वेळा जप करायला हवा.


14.भाग्य रत्न-
3 कॅरेट पुष्कराज रत्न पहिल्या बोटात घालावा.


मूलांक चार   
कोणत्याही महिन्याच्या ४, १३, २२ आणि ३१ या तारखेला जन्म झालेल्या व्यक्तींचा मूलांक चार असतो.
४ या अंकावर हर्शल या ग्रहांचा प्रभाव आहे. लहरीपणा, चंचलता, उत्साह, प्रगती, चळवळ, रूढी आणि बंधनमुक्त विचार, स्वकेंद्रितपणा ही यांची वैशिष्ट्ये.


या लोकांची स्वभाव वैशिष्टे :- 


1.या व्यक्ती खूपच अभ्यासू वृत्तीच्या असतात. संशोधन, मग ते कुठल्याही क्षेत्रात असो ही माणसे त्यात हिरिरीने भाग घेऊन यश मिळवतात यांच्यापाशी उत्तम चिकाटी असते, श्रम आणि बुद्धी यांच्या साहाय्याने या व्यक्ती आपली प्रगती करत असतात  मूलांक चार असलेल्या व्यक्ती मोकळ्या विचरांच्या असतात. वृत्तीनेही त्या न्यायी असतात. शक्यतो कोणावर अन्याय करू नये, असे त्यांचे वागणे असते. कोणाच्याही वाट्याला जाणे यांना फारसे पसंत पडत नाही. 

2. या अंकाचा कारक ग्रह हर्शल असून तुम्हाला बहुतेक करून जीवनात अचानकपने अनापेक्षित गोष्टींचा अनुभव जास्त येतो. जीवनात बरेच चढ़ उतार अचानकपने घडतात.

3. वृत्तीने ही माणसे शोधक असल्यामुळे त्यांना नाविन्याची आवड असते. गुढविद्येबद्दलही त्यांना कमालीचे आकर्षण असते. बुद्धि व मनाची पातली खुप वरच्या दर्जाची असते. संशोधनात्मक वृत्ति दिसून येते.

4. जीवनातील रुढी, परंपरा व बंधने तोड्न्याचे सतत प्रयत्न चालू असतात. सतत विरोध किंवा वाद घालण्याच्या स्वाभाव मुले गुप्त शत्रु निर्माण होउन गैर समाज पसरतात. बाहेरून जरी तुम्ही गरीब स्वभावाचे दिसत असलात तरी आतून हट्टी व विक्षिप्त स्वभावाचे असता.

5. तुम्ही स्वताच्या मता प्रमाने निर्णय घेतास्वभावात अस्थिरता असते. बर्याचदा वागण्यात लहरी पना दिसून येतो. 

6. जीवनातला पहिला भाग कष्टदायी असला तरी उर्वरित भाग यशाचा व सफलतेचा असतो. जीवनात ३१ वर्षा नंतर उत्कर्ष होतो व वयाची ४० ते ६० हा कल यशाचा सर्वोच्च काळ ठरतो.

7. जे करायचे ते नाट विचार करूनच, असा त्यांचा खाक्या असतो. म्हणूनच मूलांक चार असलेल्या व्यक्ती कोणावरही पटकन विश्वास ठेवायला तयार होत नाहीत मित्र परिवार अतिशय मर्यादित असतो व भांडनाची फिकिर नसते बर्याच वेला जीवनात एकटेपना जाणवतो.


8.स्वभाव काहीसा हट्टी आणि विशेष म्हणजे या व्यक्ती मितभाषी असता, घरातही यांचे वागणे जरुरीपुरते असते. पण घरातील महत्त्वाचे निर्णय घेताना आपले महत्त्व ही माणसे राखून असतात.


9. चार ही संख्या संघर्षप्रधान आणि बुद्धिमान आहे व्यवहारात या व्यक्ती नेहमीच मागे असतात, त्यामुळे बऱ्याच वेळेला यांनी उसने दिलेले पैसे यांना परत मिळत नाहीत. पैशाच्याबाबीत या व्यक्ती अधिक सतर्क नसतात. त्यामुळे पैसा टिकून राहत नाही मात्र सतत येत-जात राहतो. ४ मूलांक असणाऱ्यांनी भविष्यासाठी बचत ही करायला हवी. त्याचबरोबर जवळ असलेल्या धनाचा संचय व्यवस्थित करायला हवा. नाहीतर यांना संकटाला सामोरं जावं लागेल. 


10.अपघात आणि अकस्मात पणाच्या बाबतीत हर्षल अत्यंत क्रूर फळे देतो. म्हणून त्या व्यक्तीने वाहन, सायकल, मोटारसायकल, चार चाकी वाहन वगैरे जपून चालवावे. 


11. इंजीनियर, बिल्डर, प्रोग्रॅमर, अकाऊंटन्ट, आर्किटेक्ट, इकोलॉजिस्ट किंवा मॅकेनिक बनू शकतात.सिमेंट, कारखानदारी, कोळसा  व्यापार, शेती, बागायती, फर्निचर निर्मिती व विक्री, चर्मोद्योग वगैरे व्यवसाय फायद्याचे ..


12.शुभ तारीख: 1, 2, 4, 10, 11, 13, 19, 20, 22, 28, 29, 31 या प्रत्येक महिन्याच्या शुभ तारखा आहेत. यादिवशी महत्त्वाची कार्ये करावीत. 

13.अशुभ तारीख: 3, 9, 12, 18, 21, 27 या तारखांना महत्त्वाचे कार्य करू नये. 


14. एक, चार, पाच आणि सात या तुमच्या मित्रराशी आहेत. हे मूलांक असलेल्या व्यक्तींशी त्यांचे चांगले जमू शकेल. सहा आणि आठशी तितकेसे पटणार नाही, मात्र पटवून घेतले तर ते फायद्याचे ठरेल. 


15.संभाव्य आजार- झोपेचा तक्रारी, डोके गरगरणे, कानात आवाज येणे, पाठीत चमका मारणे, असे त्रास यांना होऊ शकतात.


16.भाग्यशाली रंग:  निळा आणि खाकी  हिरवा, सफेद, राखाडी

17.भाग्यशाली दिवस: शनिवार, बुधवार

18.भाग्यशाली वर्षे: 10, 11, 13, 14, 19, 20, 28,29, 31, 37,38, 40, 41,46, 47, 50 

19. महत्त्वाची वर्षे- ४, १३, २२, ३१, ४०, ४९, ५८, ६७, ७६ आणि ८५.

   जीवनकाळ- २० ते २९ मदत मिळेल. २२, २४, २७, ३१, ३७ फायदेशीर, ४० ते ४९ उत्कृष्ठ. ५० ते ५९ साधारण. ६० ते ६९ भाग्याचा   काळ.


मूलांक पाच  
  कोणत्याही महिन्याच्या  ५,१४,२३ या तारखेला जन्म असलेल्य लोकांचा मूलांक ५ येतो. ५ अंकावर बुध या ग्रहाचा प्रभाव आहे बुद्धिवादी, तर्क, नितीमुल्ये, प्रवास, व्यवहार चातुर्य ही यांची गुणवैशिष्ट्ये .
या लोकांची स्वभाव वैशिष्टे :- 
१) या अंकाचा कारक ग्रह बुध असून तुम्ही व्यापारी वृत्तीचे व जलद रितीने काम करणारे आहात. मूलांक पाच असलेल्या व्यक्ती कर्तुत्ववान असतात आणि बुद्धिमानही. मात्र, झालेल्या गोष्टी पुन्हा पुन्हा उगाळण्याची यांना वाईट खोड असते. त्यामुळे ब-याचदा या व्यक्ती पटकन उदास होतात. चिडतात. रागावर ताबा मिळवायला त्यांना विशेष प्रयत्न करावे लागतात.
२) तुम्हाला जीवनात प्रवास व सतत काही तरी नाविन्य याची आवड असते. यांचा स्वभाव हसरा खेळता असून, लोक यांच्या हसण्यावर फिदा होतात. अकस्मात एखाद्याचा राग येणं किंवा एखादी गोष्ट पटकन न आवडणं हेही यांच्याबद्दल लपून राहत नाही. वातावरणात एकूणच हसण्याचा आनंद हे अगदी आरामात देऊ शकतात. नवीन लोकांशी गप्पा मारणे, त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधणे यात त्यांचे कौशल्य वाखाणण्याजोगे असते. त्यामुळेच त्यांचा जनसंपर्क मोठा असतो. हुशार,तल्लख,शास्त्राची आवड असणारे आहात.
३) साहित्य, संगीत, कला, वाचनाची आवड आदी गोष्टींची यांना मनापासून आवड असते बोलणे तरतरीत व हजरजबाबीपणाचे असते.
४) बुद्धी, चातुर्य आणि काळाबरोबर चालण्याची कला यांना उत्तम आत्मसात करता येते. पैशाच्या बाबतीत नशीबवान असता. संपत्ती कमावण्याचे यांच्याकडे उत्तमोत्तम पर्याय असतात. एकूणच त्यांना असलेल्या तीव्र बुद्धीमुळे हे लोक स्वतला काळानुसार बदलत असतात. 
५) खूप प्रवास आणि जगण्यातले नावीन्य जपण्यात यांना खूप आनंद वाटतो. ही माणसे जेव्हा आकर्षली जातात, प्रेमात पडतात, तेव्हा यांनी विवाहाचा निर्णय त्वरित घ्यावा. लहान वयात एखादे प्रेम प्रकरण होण्याचा संभव असतो व त्यातून नुकसान होते.
६) विशेष म्हणजे यांना आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर खूप मोकळेपणा आणि स्वातंत्र्य हवे असते.
७) विरोधी लिंगी व्यक्ति मधे तुम्ही लोकप्रिय असता. स्त्रियाँ मधे सुखी वैवाहिक जीवन दिसून येते,परन्तु मुले होण्या बाबत व प्रसूति बाबत त्रास दिसून येतो.
८) तुमच्या जवळ चांगले शब्द भंडार असते त्यामुले बोलण्यात तुमचा हात कोणी धरु शकत नाही. या व्यक्ती वार्‍यासारख्या चंचल मनोवृत्तीच्या असतात. कुणाशीही महत्र चटकन जमते. कुणाशी वैमनस्य करीत नाहीत. कोणत्याच गोष्टीची संपूर्ण माहिती नसते.
९) तुम्ही ममतालु व स्वातंत्र्य प्रिय आहात.
१०) स्वताच्या व्यवसायात यश मिलते. शिकवणी घेणे किंवा क्लास्सेस घेणे यात यश दिसून येते.
११) नोकरी मधे बैंक किंवा कॉमर्स क्षेत्रात यश दाखवते.
१२) जीवनात ३२  वर्षा नंतर उत्कर्ष होतो.
13) 5,14, 23 या तारखांना महत्त्वाची कामे करावीत. याव्यतिरिक्त 2,6,11,15,20, 24,29 या तारखाही शुभ आहेत. शुभ दिवस बुधवार, शुक्रवार, गुरुवार हे दिवस अतिशुभ आहेत. 14.शुभ वार = बुधवार, शुक्रवार,शनिवार.
15.भाग्यशाली शुभ रंग = हिरवा रंग अतिशय शुभ मानला जातो. याव्यतिरिक्त सफेद, आकाशी रंगही उत्तम मानला जातो. (लाल रंग शक्यतो वापरू नये. ) 

16. प्रेम, विवाह, मैत्री या व्यक्तींचे 5 मूलांक असलेल्या व्यक्तींशी उत्तम संबंध राहतील. तसेच 2, 4 किंवा 6 मूलांक असलेल्या व्यक्तींशी सुद्धा उत्तम संबंध राहतील.

17..रक्ताभिसरणातील गडबड, मज्जातंतूंचे, मेंदूचे विकार, पचनक्रियेत दोष, अर्धांगवायू होण्याची भीती हे शारीरिक त्रास असू शकतात.

18. व्यक्ती संशोधक, गुप्तहेर, प्रकाशक, जाहिरातदार, स्ट्रॉकीस्ट, ट्रॅव्हल्स एजेन्सी मालक, लेखक होण्‍याची शक्यता अधिक असते.राजकारण, शेअर्स, वकिली, रेस्टॉरण्ट व्यवसाय, सेल्समॅनशिप, संपादन, पर्यटन व्यापारी लोक, वकील, ज्योतिषी, विनोदी लेखक, हिशोब तपासणीस, विक्रेते, एजंट, संपादक वगैरे मंडळी असतात. दळणवळण, व्यापार, मासिक, पुस्तकांचे संपादन, काव्यनिर्मिती, शिक्षक, पोस्ट, रेडियो, विमान विभागात नोकरी हे व्यवसाय यांच्या हिताचे


19. 5,14, 23, 32, 41, 50, 59, 68, 77. याव्यतिरिक्त 11,15,20,24,29,33,38,42,51, 56, 60 हे वर्षही शुभ असतील. महत्त्वाची वर्षे ५, १४, २३, ३२, ४१, ५०, ५९, ६८, ७७, ८६. जीवनकाळ- २० ते २९ कष्टदायक, १९, २३, २५, २६, २८ फायाची. ४० ते ४९ साधारण. ५० ते ५९ उत्तम प्रगती. ६० ते ६९ मध्यम, ७० ते ७९ उत्तम.

20.भाग्योदयासाठी उपाय :या व्यक्तींनी बुधवारी गायीला हिरवा चारा घालावा. त्याचबरोबर पारिजातकाच्या झाडाचे मूळ खिशात ठेवावे.

21.भाग्यशाली मंत्र
ऊँ बुं बुधाय नम:।
ऊँ वं वरद मूत्तर्यै नम:।

22. भाग्यशाली देव:
गणपतीची रोज उपासना करा.


मूलांक सहा   

    ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्यात सहा, पंधरा किंवा चोवीस तारखेला झाला असेल, अशा लोकांवर सहा अंकाचा प्रभाव असतो.
 या अंकावर शुक्र  या ग्रहाचा प्रभाव आहे

या लोकांची स्वभाव वैशिष्टे :- 

१) या अंकाचा कारक ग्रह शुक्र असून सौंदर्य, ताल, कलाकौशल्य, सुसंवादित्व, सहकार, प्रेम, प्रसन्नता, उत्साह ही यांची गुणवैशिष्ट्ये होत. तुम्ही जन्मत:च  कला प्रिय आहात. उत्तम आरोग्य, आपुलकी, सामर्थ्य यांचे प्रतिबिंब म्हणजे सहा मूलांक. या व्यक्तींना सौंदर्य, लय, ताल यांचे उत्तम ज्ञान असते.

२) ही संख्या जरी ऐहिक सुखाची निदर्शक असली तरी यांची दुसरी बाजू म्हणजे या लोकांना कलाप्रांतात नावलौकिक मानसन्मान लाभतो. यांच्या कलादी सामाजिक जीवनामुळे या लोकांना स्वत:च्या घरातील संसारसुखाकडे लक्ष देता येत नाही आणि त्यतून काही गंभीर समस्या उद्भवतात.

 ३) जीवनात प्रेम, संसार, मित्रपरिवार याबद्दल यांना एक विशेष ओढ असते. सौंदर्य व कले बद्दल ओढा असतो. प्रेम, सहानभूति, आदर यांचे प्रतिक आहात. विवाह श्रीमंत व्यक्ति बरोबर होतो व विवाह नंतर भाग्योदय होतो.

४) उत्तम कलावंत किंवा उत्तम रसिक म्हणून यांच्याकडे आदराने पाहिले जाते. मोहक हास्य, लाघवी स्वभाव यामुळे समाजात किंवा घरातही ही माणसे सर्वाना प्रिय व हवीहवीशी वाटतात. दुसऱ्याच्या सुखदु:खात स्वत:ला सामावून घेण्याची वृत्ती त्यामुळे याच्या गोड स्वभावार सगळेच आकर्षित होत असतात. यांचे आपल्या मुलांवर जीवापाड प्रेम असते.


५) व्यक्ती आहेत त्या परिस्थितीत निटनेटक्या टापटीप राहणार्‍या असतात. शरीर चांगले असते. प्रकृती निकोप असते, वागण्यात रंगेलपणा असतो. तारूण्यसुलभ अवखळपणा आणि उत्साह असतो. अत्तरे, फुले, सौंदर्याची आवड असते. आवडणार्‍या गोष्टींचा मनमुराद आस्वाद घेणारे असतात.

६) परमार्थाची विशेष आवड नसते. सामाजिक रूढी व बंधनाना तुम्ही बर्याचदा जुमानत नाही.

७) जीवन आरामदायक, ईश्वर्य युक्त व आनंदात जावे याकडे कल असतो व तसे प्रयत्न करता.


८) जीवनात पैसे वाचवन्या पेक्षा खर्च करण्याकडे तुमचा जास्त कल असतो. 


९) या व्यक्तिंची आवड उच्च असते. त्यांना सारे काही उच्च प्रतीचेच आवडते उच्च प्रतीचे कपडे,सुगंधी द्रव्ये,दागदागिने या बद्दल तुम्हाला प्रचंड आकर्षण असते.


१०) अनाठायी कालजी करण्याचा स्वभाव असून कही वेळा मनाने कष्टी होता.


११) उच्च पदस्थ लोकांकडून मदत मिलवन्यात तुम्ही नशीबवान राहता.


१२) खाजगी जीवन आणि सामाजिक जीवन यात अंतर ठेउन असता.


१३) तुम्हाला दुसर्या साठी त्याग करण्याची वेळ वरचेवर येते.


१४) गूढ़ विद्येची आवड असली तरी कनिष्ट दर्जाची विद्या आधिक प्रिय असते.


१५) भावना प्रधान असून ही भावनांवर ताबा ठेउन असता.


१६) वयाच्या २४ वर्षा नंतर उत्कर्ष होतो. विरुद्ध लिंगी व्यक्ति पासून फायदा होतो.


१७) प्रेमप्रकरणात सावधानता राखावी अन्यथा टोकाची भूमिका घेतल्यामुळे या व्यक्ती व्यसनाकडे झुकतात. मद्यपान, धूम्रपान चालू होते. जीवनात मित्र सांगत चांगली ठेवल्यास व व्यसनांच्या आहारी न गेल्यास जीवन सुखी होऊ शकते.


18.
संभाव्य आजार: नाक, कान, घसा, लिव्हर चे आजार होतात. दम्याचा त्रास, लैंगिक विकार, अशा शारीरिक समस्यांचा यांना सामना करावा लागतो.


19. तुम्ही प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ता, मेडिकल प्रोफेशनल, किंवा कुकींगमध्ये चांगली कामगिरी करू शकता.दिग्दर्शन, अभिनय, सौंदर्य प्रसाधने निर्मिती व विक्री, रंगांचे कारखाने, जवाहिरे, विविध खेळ तेही विशेष करून बैठे खेळ, रिसेप्शनिस्ट हे उद्योग व्यवसाय यांना उत्तम जमतात आणि आवडतात सुद्धा….



20. दोन, तीन, सहा आणि नऊ मुलांक असणा-या व्यक्ती, ६ मूलांकास जास्त आकर्षित होत असतात.    तर एक आणि चार मूलांक असलेल्यांच्या तुम्ही फार संपर्कात न राहणेच बरे.
21.महत्त्वाची वर्षे ६, १५, २४, ३३, ४२, ५१, ६०, ६९, ७८ व ८७. जीवनकाळ २० ते २९ उत्कृष्ट, ३० ते ३९ मध्यम प्रगतीचा. ४० ते ४९ उत्कृष्ट, ५० ते ५९ असमाधानकारक. ६० ते ६९ उत्कृष्ट. १०, १९, २३, ३२, ३७, ५५, ७३, ७६ आणबाणीचा काळ.
22.शुभ वार = सोमवार,मंगलवार,गुरवार,शुक्रवार.

23.शुभ रंग  - आकाशी, चॉकलेटी आणि गुलाबी
मूलांक सात  

 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या सात, सोळा व पंचवीस तारखेला झाला आहे. अशा लोकांवर सात अंकाचा प्रभाव असतो. अशा सात अंकावर नेपच्यून ग्रहाचा अंमल असतो.
या लोकांची स्वभाव वैशिष्टे :- 
1. स्वभाव खूपच प्रेमळ, शांत व निसर्गप्रेमी असतो शांतता प्रिय असून शक्यतो कष्टाची कामे करने आवडत नाही.या व्यक्ती बऱ्याच प्रमाणात कल्पनाप्रिय असतात. जन्मत:च अस्वस्थ असता.हे लोक जीवनात पैशाला तितकेसे मह्त्त्व देत नाहीत
२) बोलणे खूप लाघवी आणि संवेदनशील असते.तर्क शुद्ध विचार करून धेय पूर्ति होते.

३) विशेष म्हणजे यांचा ओढा अध्यात्माकडे जास्त असतो. ध्यान, नामस्मरण आदी विषयांची गोडी यांना अगदी लहानपणापासून असते. वागणूक बर्याच वेळा गूढ़ असलेली दिसून येते.
४) अत्यंत आश्चर्यकारक बदल, संतुलन, स्वातंत्र्य, अध्यात्म, प्रवास, अहंभाव, ऐक्य, अलिप्तता, लहरीपणा आणि अंदाज बांधता येणार नाही असे संमिश्र व्यक्तिमत्व हे यांचे अत्यंत आगळे वेगळे गुणवैशिष्ट्य
५) सर्वसाधारण विचार सरनीच्या लोकां मधे मिसलने तुम्हाला आवडत नाही. भावना प्रधान असून मनाने कमकुवत आहात
६) या व्यक्ती अंतर्ज्ञानी तसेच खूप अभ्यासू असते. वैज्ञानिक, मनोचिकित्सक, संशोधक, लेखक म्हणून प्रसिद्धी मिळवू शकता.

७) प्रकृतीची कुरकुर कायम चालू असते. मानसिक स्वास्थ्य बर्याचदा बिघडलेले दिसून येते. आतड्यांचे विकार, बद्धकोष्टता त्वचारोग ,पोटाचे विकार, निराशा असे विकार यांना त्रास देऊ शकतात.
८) विवाहिक जीवनात मात्र काहीतरी उणीव नक्कीच असते. 
९) निर्णय पटकन घेतले जात नाहीत, त्यामुले बर्याचदा निराशेला तोंड द्यावे लगते.
१०) कुणावर रागावणे, चिडणे, दम देणे, कुणाचे मन दुखावणे यांना कधीही जमत नाही. त्याचा ही माणसे स्वत:लाच त्रास करून घेत असतात.
११) प्रमाणिक, निष्ठावान व विश्वासु आहात.
१२) स्वभाव चंचल असल्याने काही वेळेस विसंगत स्वभावाचे दर्शन घडवता. 
१३) संशोधनाची, प्रवासाची आवड असून परदेशाशी सम्बन्ध दिसून येतो.
१४) कोणत्याही विषयात सखोल जाण्याची तयारी . 
१५) भावना प्रधान असून सहजासहजी कोणा पुढे भावना प्रकट करत नाही. 
१६) वयाच्या ४२ वर्षा नंतर उत्कर्ष होतो, परदेश व्यापारा पासून फायदा होतो.

१७) जीवनात भावनेच्या आहारी ना जाता भावनांवर ताबा ठेवल्यास जीवन सुखी होऊ शकते.
18. तत्वज्ञान आणि गूढ विद्यांचा अभ्यास, वीज संबंधी व्यापार, निर्मिती, युनियन लीडर, टायपिस्ट, गणिती, संगीतकार, गीतकार, लेखक, कवी असे यांचे व्यवसाय असू शकतात.

 19. शुभ वार = रविवार, सोमवार,बुधवार,शुक्रवार.

 20.शुभ रंग = पिवला,हिरवा.

 21.मित्र अंक = ज्यांचे मूलांक १, २, ४, ५ किंवा ६ आहेत. अशा व्यक्ती या मूलांकाशी आकर्षित होतात  

 22. महत्त्वाची वर्षे- ७, १६, २५, ३४, ४३, ५२, ६१, ७०, ७९, ८८

मूलांक आठ  

कोणत्याही महिन्याच्या  ८,१७,२६ या तारखेला जन्म असलेल्या लोकांचा मूलांक ८ येतो.

या लोकांची स्वभाव वैशिष्टे :-

1.या अंकाचा कारक ग्रह शनी असून जन्मत:च शांतता व एकांत प्रियतेची आवड असते. खूप मित्रपरिवार वाढवण्यापेक्षा मोजकेच विचार जुळणारे फ्रेंडसर्कल करण्याकडे यांचा अधिक कल असतो.

२) खूप वेळा यांच्या बाबतीत पहिल्या भेटीत ही माणसे खूप शांत स्वभावाची, थंड प्रकृतीची वाटू लागतात. पण सहवासानंतर यांच्या खऱ्या मनाची जाणीव होते. ही माणसे खूप प्रेमळ, कमालीची सोशिक असतात. कड़क शिस्तिचे भोक्ते, निश्चयी,स्थिर, कर्तव्य तत्पर असतात.

३) तुमच्यात काही प्रमाणात निराशावाद असतो.

४) जीवनात सर्व सूखे अतिशय विलंबाने त्यातला सगला रस संपल्यावर प्राप्त होतात.

५) स्वभाव संशयखोर व चिवट असतो.

६) तुम्ही समाजात जरी वावरत असलात तरी मनात एकटे पणाची भावना कायम घर करून असते.

७) सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सतत अडचणी व विलम्ब याचा तुम्हास जीवनात पुरेपुर अनुभव येतो.

८) गरीब व दुबळया लोकां बद्दल तुमच्या मनात कायम आपुलकी असते. 

९) काम तुम्ही करता व श्रेय मात्र दूसरा घेउन जातो असे तुमच्याच बाबतीत घडते, व त्यातून नैराश्य येते.


१०) प्रेम प्रकरणा मधे समस्या निर्माण होतात.

११) गूढ़ विद्यांची आवड असून जादूटोना या विषयी आकर्षण असते.

१२) जन्मत:च उत्तम व्यवस्थापक असून इतरांकडून काम करून घेणे तुम्हास चांगले जमते. 

१३) हवी असलेली गोष्ट मीलवन्यासाठी हवे तेवढे कष्ट घेण्याची तयारी असते.

१४) तुम्ही महत्वाकांक्षी असून दिर्घोद्योगी आहात.

१५) समाजात राहण्या पेक्षा समाजा पासून दूर रहाणे तुम्हाला पसंद असते. 

१६) वयाच्या ३०, ३६ वर्षा नंतर उत्कर्ष होतो, नोकरी पासून फायदा होतो.
सेल्स मॅनेजर, बँकर, स्टॉक ब्रोकर, व्यवस्थापन सल्लागार किंवा मार्गदर्शक म्हणून आपले करियर घडवू शकता.

१७) जीवनात नैराश्याच्या आहारी ना जाता मित्रां मधे मिसलने तुमच्या फायद्याचे ठरेल.

18. पित्त आणि रक्तदाबाचा त्रास, पोटात वायू धरणे, सांधेदुखी, हाडांचे विकार आणि हाडे मोडणे,  अशा रोगांचा यांना त्रास होऊ शकतो.

19. महत्त्वाची वर्षे ८, १७, २६, ३५, ४४, ५३, ६२, ७१, ८०, ८९. जीवनकाळ २० ते २९ धांत नोकरीत सामान्य काळ, ३० ते ३९ प्रगतीचे, ४० ते ४९ उत्तम प्रगतीचे, ५० ते ५९ उत्कृष्ट प्रगतीचे, ६० ते ६९ सामान्य, ७० ते ७९ फायाचे. २३, २६, ३२, ४१, ५०, ५३, ५५, ७७ फायाची. २, ११, १५, २०, २७, ३३, ४९, ५१, ५४, ६९ आणीबाणीची.  

20.शुभ वार = बुधवार,गुरुवार,शनिवार.


21.शुभ रंग = गडद करडा, गडद नीला,जांभळा ,काला.


22.मित्र अंक = ज्यांचा मूलांक दोन किंवा चार आहे त्यांच्याशी यांचे अगदी छान जमते.


23. पोलीस खाते, सर्कस, पोलाद, लोखंड, तेल आणि शस्त्रात्रांचे कारखाने, न्यायखाते, डॉक्टर, अनाथालयांचे    संचालन वगैरे कामे हे उत्तमरीत्या करतात. 


मूलांक नऊ


 कोणत्याही महिन्याच्या नऊ, अठरा व सत्तावीस या तारखेला जन्म असलेल्या लोकांचा नऊ मूलांक येतो



या लोकांची स्वभाव वैशिष्टे :-

1.या अंकाचा कारक ग्रह मंगल असून जन्मत:च अशा व्यक्ती अतिशय शिस्तबद्ध असतात. त्यामुळे घरात यांचा प्रचंड दरारा असतो. घरातील मंडळी यांच्याकडे भीतीयुक्त आदराने पाहात असतात. लढाऊ वृत्तीचे आहात.


२) या व्यक्ती अधिकार, हुकूमत गाजविणार्‍या असतात. मैदानी खेळांची आवड असते, उताविळपणा जास्त असतो. वृत्ती धरसोड असते, दूरदृष्टी कमी असते आक्रमकता,तड़फ,प्रतिकार तुमच्यात ठासून भरलेला असतो.

३) उत्साही, धाडसी, निर्भय आणि जोशपूर्ण असतात.नेहमी आक्रामक असून धेय पूर्ति जाल्या शिवाय थाम्बत नाही.

४) पूर्णपणे प्रतिकूल परिस्थिति असली तरी तिच्या बरोबर दोन हात करण्याचे सामर्थ्य तुमच्यात आहे.

५) शक्यतो दुसर्यावर टिका करू नए,शब्द काल्जिपुर्वक वापरावेत.

६) स्वभाव तापट पण धाडसी आहे, रागात बेभान होता व हातून चूका / अपराध  घडतात.

७) खेलाची , व्यायामाची सुरवाती पासूनच आवड असते.

८) लैगिक भावना अतिशय तीव्र असून विरुद्ध लिंगी व्यक्तीकडे लगेच आकर्षित होता. 

९) वासना पूर्ति होण्यासाठी तुम्ही कोणत्याही दिव्व्यातून जाण्यास तयार असता. 

१०) आजारी लोकाना स्वताच्या इच्छा शक्तिने बरे करण्याची क्षमता तुमच्यात असते.

११) लहान मुले व प्राणी या बद्दल विशेष प्रेम असते.

१२) मित्रां बद्दल आदर असून वेळ प्रसंगी त्यांच्या बाजूने लढ़न्यास तुम्ही तयार असता. 

१३) दुसर्यावर हुकूमत गाजवने आवडते, दुसर्याचा सल्ला आवडत नाही.

१४) विरुद्ध लिंगी व्यक्ति बद्दल खुप आकर्षण असून त्यातून चकोरी बाहेरील संभंध निर्माण होतात.

१५) वैवाहिक जीवनात दुःख निर्माण होते, व त्याचा जीवनावर खुप प्रभाव पडतो. 

१६) वयाच्या २८ वर्षा नंतर उत्कर्ष होतो, नोकरी पासून फायदा होतो. या व्यक्ती समाजात आपल्या कतृत्त्वाच्या जोरावर प्रसिध्दी मिळवत असते. तुम्ही प्राध्यापक, फिजिशियन, सा‍माजिक कार्यकर्ता, वकील किंवा चित्रकारच्या रूपात प्रसिद्धी प्राप्त करू शकता.

१७) जीवनात वासनेच्या व रागाच्या आहारी न जाने हे तुमच्या हिताचे राहिल.


18. संभाव्य आजार- उष्णतेचे विकार, गळवे, चट्टे, भाजणे, रक्तदाब वाढणे

19. पोलीस, मिलिटरी किंवा तत्सम खात्यांत नोकरी करावी लागते. शल्यविशारद, इंजिनिअर्स,    युनियन लिडर, गुप्तहेर, शेतकरी आणि स्थावर इस्टेटीचे मालक असतात. 

20.शुभ वार = सोमवार,मंगलवार,गुरुवार व शुक्रवार.

21. शुभ रंग = तांबडा , पिवळा 

22.मित्र अंक = ३, ,६, ९ या भाग्यांकाचे लोक तुमचे चांगले मित्र होऊ शकतात.