Tuesday 30 July 2019

चंद्राची स्थानगत फले (MOON IN VARIOUS HOUSES)




कुंडलीतील बारा स्थाने व त्यावरून पाहावयाच्या प्रमुख गोष्टींचा तक्ता बाजूला दिलेला आहे. ज्या प्रकारचे फल पाहावयाचे असेल, तद्दर्शक भाव, त्यात असणारी राशी व तिचा स्वामी, त्याची कुंडलीतील स्थिती, त्या भावामध्ये असणारे ग्रह व त्यावर असलेली इतर ग्रहांची दृष्टी इत्यादी गोष्टींचा विचार करूनच फल निश्चित करावे लागते.
१।४।७।१० ही केंद्रस्थाने व १,५,९ ही त्रिकोण स्थाने आहेत. या स्थानांचे स्वामी महत्त्वाचे आहेत. ६।८।१२ या स्थानांचे मालक अशुभ फलांचे निदर्शक असतात.
ज्या भावामध्ये जी राशी असेल त्या राशीचा स्वामी त्या भावाचा वा स्थानाचा मालक असतो.
उदा० लग्नी म्हणजेच प्रथम स्थानी मेष राशी असता
लग्नेश मंगळ असतो. कोणताही भावेश बलवान व शुभसंबंधीत असणे म्हणजे तो ग्रह राशीबली व शुभग्रहांनी युक्त वा दृश असणे व दूषित असणे म्हणजे पापग्रहाने युक्त वा दृष्ट व निर्बली असणे. याशिवाय ६।८।१२ या स्थानांचे मालक ज्या स्थानी असतील त्या स्थानाच्या फलात अशुभत्व वा न्यूनत्व आढळते. कोणत्याही स्थानाचे मालक ६।८।१२ च्या मालकांनी युक्त वा दृष्ट असता कष्ट, त्रास, विलंब, अडथळे, नाश असा अनुभव येतो. हे जर पापग्रह असतील तर अशुभफल तीव्रतेने मिळते.


चंद्राची स्थानगत फले
 ग्रहमालेत रवि हा राजा आहे, तर चंद्राला राणी मानलेले आहे. ज्याप्रमाणे रवि हा पिता आहे, तद्वतच चंद्राला  माता मानलेले आहे. ग्रहमालेत सर्वात गतिमान, सतत गती बदलणारा चंचल ग्रह

चंद्रच आहे. या चंद्राप्रमाणेच मनाची स्थिती असून, मनुष्य प्राण्याचे सर्व सुखदु:ख मनावरच अवलंबून असल्याने चंद्राला मनाचे कारकत्व दिले आहे. प्रश्नकुंडलीत जातकाचा प्रश्न, म्हणजेच प्रश्नकत्यांच्या मनात काय आहे? याचा विचारदेखील चंद्रावरून  करतात . 

चंद्र हा जलकारक ग्रह आहे. म्हणून पाणी, द्रवपदार्थ तसेच मानवी शरीरातील द्रव, रक्त, गर्भजल इ. चंद्राच्या अमलाखालीच येतात. चंद्रावरून जलाशय, जलप्रवास, नौकाविहार, पिण्याच्या पाण्याचे साठे उदा. तळी, विहिरी, नद्या, ओढे इ.सर्व प्रकारचे द्रवपदार्थ पाहतात.तसेच चंद्रामुळे समुद्राला भरती-ओहोटी येते हे सर्वज्ञातच आहे. 

 चंद्र हा मातृकारक स्त्री ग्रह आहे. स्त्रीच्या ठिकाणी गर्भधारणा करण्याची शक्ती आहे किंवा नाही हे चंद्रावरून कळते. त्याचप्रमाणे स्त्रियांच्या रजोदर्शनाचा व प्रसूतीचा काळदेखील चंद्राच्या भ्रमणावरच अवलंबून असतो.  

चंद्राचा अंमल मनावर असल्याने मनोविकार तसेच कल्पनाशक्ती व काव्यात्मकता यांवरदेखील चंद्राचा अंमल असतो. चंद्र मानवी आयुष्यातील संपूर्ण ऐहिक बाजूवरच अंमल गाजवत असल्याने प्रत्येक संसारी मनुष्याला चंद्रबळाची फार गरज भासते.

फलज्योतिषशास्त्रात विशेषतः मुहर्तशास्त्रात चंद्राचा खोल विचार करावा लागतो. चंद्रावर तिथी अवलंबून असल्याने संपूर्ण मुहर्तशास्त्रच चंद्रावर अवलंबून असते. मानवी आयुष्याचे मोठमोठे कालखंड कसे जाणार आहेत, ते दिग्दर्शित करणारी संपूर्ण महादशापद्धतीसुद्धा जन्माचेवेळी चंद्र ज्या नक्षत्रात असतो त्यावर आधारलेली असते. मनुष्यप्राणी केव्हा, कुठे, कसा वागेल हे सर्वस्वी त्याच्या मनावरच अवलंबून असते, म्हणून मनाचा कारक जो चंद्र, त्याच्या अंश-कलांवरून महादशा काढली जाते.

चंद्र पांढ-या, चंदेरी रंगाच्या तसेच प्रवाही पदार्थाचा कारक आहे. त्यामुळे दूध, दही, तूप व तत्सम धवलवर्णी पदार्थ, तसेच चांदी, पारा, मोती इ. तसेच तो वनस्पतींचा कारक असल्याने पालेभाज्या, फुले-फळे, बागायतदार, चंद्राच्या अमलाखाली येतात. संपूर्ण आयुर्वेद चंद्रावर आधारित आहे.

चंद्र हा जलकारक असल्याने पाणी हीच त्याची देवता ठरवली आहे. चंद्राला वायव्य दिशा दिलेली आहे चंद्र हा स्त्री ग्रह असून जलतत्त्वाचा कारक आहे. चंद्राचा रंग पांढरा आहे. चंद्राचे रत्न मोती आहे
.
स्वभावगुण - शीतलता, कोमलता, वात्सल्य, प्रेम, माया, ममता, प्रसन्नपणा, सात्त्विक, लोकप्रियता, वाचेतील गोडवा, समाधानी, मानसिक शांतता, हळवेपणा, भावनाप्रधानता, संवेदनशीलता, लवकर द्रवणारे, स्वप्नसृष्टीत वावरणे, काव्यात्मकता, सेवाभावी, लोकप्रिय, हौशी, रसिक, जीवनाविषयी खोल आसक्ती, कुटुंबप्रेमी, निसर्गप्रेमी, तामसी वृत्तीचा अभाव, गोडीगुलाबीने काम करून घेणे, उत्कृष्ट शेजारधर्म, एकोप्याने जगण्याची वृत्ती, श्रद्धावान, मातृभक्ती, समंजस, त्यागी.

शरीराचे अवयव - पोट, पचनेंद्रिये, छाती, स्त्रियांचे स्तन, लहान व मोठे आंतडे, शरीरातील द्रव, रक्त, लाळग्रंथी, पाचकरस, डावा डोळा, मूत्राशय, गर्भाशय.

रोग/आजार - नेत्रविकार, विक्षिप्तपणा, पक्षाघात, उन्माद, फिट्स येणे, उद्विग्नता, सर्दी-कफविकार, पोटदुखी, कृमीविकार, ट्यूमर, घशाचे विकार, दमा, ब्राँकायटीस, गर्भाशयाचे आजार, आतड्यांचे रोग, बुद्धिमांद्य, मानसिक आजार व विकृती, दृष्टिदोष, नैराश्य.

नोकरी-व्यवसाय - नौदल, नाविक, नौकानयन, पाणी खाते, मीठ, मासे, मोती, पेट्रोल-रॉकेल, सुगंधी द्रव्ये, दूध-दहीतूप इ. चे व्यापारी, तेल, फळा-फुलांचे व्यापारी व बागायतदार, शेती, आचारी, परिचारिका, नगरपालिका, हॉस्पिटल, पाटबंधारे खाते, मरीन इंजिनिअर्स, नावाडी, खलाशी,

मनाचा कारक ग्रह चंद्र हा परिणाम करणा-या बाबतीत अत्यंत संवेदनशील आहे. चंद्र इतर ग्रहांचे गुणधर्म ग्रहण करण्यात व प्रक्षेपित करण्यात महत्त्वाचा भाग घेतो. त्याचप्रमाणे चंद्र ज्या राशीत असतो. ज्या ग्रहांच्या योगात असतो ते ग्रह चंद्राच्या परिणामात मोठे बदल करीत असतात. चंद्राची शुक्ल पक्षकृष्ण पक्षातील स्थितीही अत्यंत मोठे बदल करते.
चंद्र स्थूलमानाने प्रत्येक स्थानात खालील प्रमाणे परिणाम करतो.
चंद्र प्रथमस्थानात  

१) प्रथम स्थानात चंद्र असणारे लोक मृदुभाषी, प्रेमळ, गोड बोलून आपला कार्यभाग साधून घेणारे   असतात. ब-याच व्यक्तीत मनाची चंचलता व प्रवासाची आवड असते. अशा व्यक्ति  भावनाशीलप्रेमळ व चौकस असतात. अशा व्यक्तीचेव्यक्तिमत्व चांगले असते. वागण्याबोलण्यात सज्जनपणाप्रेमळपणा असल्याने हया दुस-यावर उत्कृष्ट छाप पाडू शकतात.

२) लग्नी चंद्र असल्यास व्यवहार ज्ञान कमी असते. सर्दीकफ इ. शीत प्रकतीचे आजार होतात. लग्नी   वृश्चिकेचा चंद्र शनिच्या युतीत असणे हा दारिद्र्य योग आहे. येथे चंद्र-राहू  किंवा चंद्र-नेपच्यून युती  असल्यास स्वत:शीच बडबड करणे, आपल्याच विचारात दंग राहणे, उगाचच हातवारे करणे, झोपेत चालणे किंवा बरळणे अशा गोष्टी आढळतात. 

 ३) प्रथम स्थानात चंद्राबरोबर शनि असता आरोग्य चांगले राहात नाहीसतत तक्रार असते. हा       शनि मानसिक स्थिती बिघडवितो. नैराश्य वृत्ति लवकर येते. शनीच्या भ्रमणाप्रमाणे   ८१५२३३७४५    ही वर्षे अत्यंत कष्टदायकत्रासाची जातात. पापग्रहावरोवर चंद्र असता   व्यक्ति दिसावयास कुरूप  असतात. चंद्र-मंगळ हया योगात दात पुढे असतात. चंद्र-राहू दृष्टिदोष   व अल्पायु देतो. चंद्र-नेपच्यून योगात व्यक्ति अत्यंत भावनाशील असते.

 ४)  या स्थानात चंद्र असल्यास मनुष्य चंचल स्वभावाचा, सज्जन, निरुपद्रवी, विलासी, भित्रा, स्त्रियांमध्ये विशेषतः विवाहीत स्त्रियांमध्ये जास्त मिसळणारा, निसर्गसौंदर्य पहाण्याची त्याचप्रमाणे इतस्ततः भटकण्याची आवड असलेला, मनोराज्यात गुंग असा, फुलझाडांची आवड असलेला, जनसामान्यांमध्ये व लहान मुलांमध्ये विशेष आस्था दर्शविणारा, संघर्ष टाळणारा, कुटुंबवत्सल असा मनुष्य आढळतो.

  ५) या स्थानाचा चंद्र चांगली कल्पनाशक्ती देतो. यांना अफाट लोकप्रियता मिळते.  यांना जलाशयाची आवड असते. यांना स्वप्ने खूप पडतात. वृषभ, कर्क, तूळ या राशीमध्ये दिगंत कीतींचे लोक निपजतात. सार्वजनिक क्षेत्रामध्ये लग्नी चंद्र असलेले लोक आघाडीवर असतात. 

 ६) साधारणपणे ही  माणसे स्वभावानें ममताळूसुस्वभावाचींशांत सत्त्वशीलभांडणतंटा यांची आवड नसणारीं अशी असतात,

  ७) या चंद्राचा अनेक कुंडल्यात दिसून आलेला परिणाम म्हणजे झोपेत हातवार करणे, बडबडणे, चालणे, बिछान्यात उठून बसणे व इतरांशी गप्पा मारण पाय झाडणे, हसणे, लाळ गळणे हा होय. या व्यक्ती बालभावात राहात बुध-शुक्राच्या राशीत कला व साहित्याकडे, तर शनीच्या राशीत शाला विषयाकडे कल असतो. मातेचा प्रभाव या लोकांबर फार आढळतो.

 ८) लग्नीं चंद्र असणारी माणसे इकडे तिकडे भटकण्याची व फिरण्याची घोकी असतात. विशेषतः जर चंद्र लग्नामध्ये द्विस्वभाव किंवा चर' राशीचा असेल तर ही प्रवृत्ति स्वभावामध्ये विशेष पाहण्यास मिळेल

 ९) प्रथम स्थानात चंद्र अग्निराशीचा असता  स्वभाव धाडसी व अत्यंत महत्त्वाकांक्षी असतो. लग्न     मेष राशीचा चंद्र बराच उतावळेपणा, अस्थिरता दर्शवितो; आणि जर का या चंद्राचा हर्शलबरोबर दृष्टियोग होत असेल तर मग ही मंडळी एके ठिकाणीं कधींच स्थिर राहणार नाहींत

 १०) लग्न मकर किंवा वृश्चिक राशीचा चंद्र चांगला नाहीं. ही मंडळी व्यसनी, हलक्या  लोकांच्या सहवासांत वागणारी, बीभत्सशब्दप्रचुर, बदफैली, दारूबाज पाहण्यास मिळतात. या राशीमध्ये चंद्र लग्न अशुभसंबंधित असतां सर्वच गोष्टींचा अतिरेक पाहण्यास मिळेल;

११) शुभ संबंध व शुभ ग्रहांबरोबर चांगले योग घडत असतां वरील फलांमध्ये बरीच सौम्यता येईल. लग्नीं मिथुन, कन्या, तुला व कुंभ या शास्त्रीय राशींचा चंद्र असतां अभ्यासी, विद्वान, शास्त्रीय विषयांमध्ये आवड असणारा, वाचनप्रिय, फलज्योतिष विषयाची आवड असणारा, भाषाज्ञान उत्तम असणारा, लेखक, वक्ता असतो.

१२)कर्क किंवा मीन राशीचा चंद्र लग्नांत उदय पावत असतां जन्मणारा स्वभावाने मायाळू, सात्विक, धार्मिक, सर्व लोकांना प्रिय, सर्वलोकपूजित; आणि घर, कुटुंब, शेतीवाडी यांची आवड बाळगणारा आढळतो.

१३) लग्न वृषभेचा चंद्र उदय पावत असतां स्थिर, गंभीर, कोणतेही काम चिकाटीने तडीला नेणारा, उद्योगी, धीरोदात्त, भाग्यशाली, वैभवयुक्त असा असतो. 

१४) चंद्र दूषित असल्यास मात्र फार वाईट. यांची प्रकृतीची नेहमी तक्रार असते. नेत्ररोग, कर्णरोग, अग्निमांद्य, निद्रानाश, चंचलता, चिंतातुर, मानसिक तोल ढळणे, पाण्यापासून भीती, व्यसनीपणा, वेड, अपस्मार, जलोदर, हिस्टेरीया, कफबाधा असे अशुभ फल मिलते.

-
 चंद्र व्दितीय स्थानात  

१) द्वितीयात चंद्र असलेल्या व्यक्ति अत्यंत बोलक्या असतात. आवाजात गोडवा असतो. शुभ ग्रहाबरोबर असलेला चंद्र व्यक्तीला आर्थिक  लाभ उत्कृष्ट करून देतो

 २) गुरू वा शुक्र लाभस्थानात आणि द्वितीयात चंद्र असता अधिक लाभ उत्कृष्ट होतात. चंद्राच्या   दशमात गरु हा उत्कृष्ट धनयोग आहे.

 ३) या स्थानात चंद्र असता व्यक्तीला गोड पदार्थ खाण्याची हौस असते. फक्त चंद्र एकटाच असता डोळे मोहक असतात. अशुभ ग्रहाबरोबर चंद्र असता दृष्टिदोष असतो.(शुक्राबरोबर असता अभिनयकला, गायन हयात उत्कृष्ट प्रगति होते 

 ४) द्वितीयात चंद्र असणा-या व्यापारी लोकांस द्रवपदार्थ, गृहोपयोगी वस्तु ह्यांचे व्यापार फायदेशीर असतात.

 ५) धनस्थानात चंद्र असेल तर नाना प्रकारच्या वस्तूंचा संग्रह करण्याची सवय असते. बोलतांना जलद बोलतात. चंद्र-बुध युती येथे असता बोलताना हसत बोलण्याची सवय असते. अडचणीच्या प्रसंगी स्त्रियांकडून विशेषतः विवाहित स्त्रीवर्गाकडून आर्थिक मदत लाभते. 

 ६) यांना गोड पदार्थ, शीतयेथे फलांचे रस, आईस्क्रीम इ. ची आवड असते. जलराशीतील चंद्र किंवा चंद्र-शुक्र युती मद्यपानाचे व्यसन देते. 

 ७) येथे शनि-चन्द्र  युती असणे किंवा धनस्थानात चंद्र आणि शनि लग्नात किंवा व्ययस्थानात असेल तर तो दारिद्र्य योग होतो. 

८) धनस्थानात चंद्र असता द्रव किंवा प्रवाही पदार्थ किंवा पांढ-या रंगाच्या वस्तू, चांदी, पारा इ. च्या वस्तूंच्या व्यापारधंद्यात फ़ायदा होतो 

 ९) चंद्र धनस्थानात व रवि २, , ८ किंवा १२ व्या स्थानी असता दृष्टिदोष आढळतो. 

 १०) स्त्रियांच्या कुंडलीत या स्थानात चन्द्र असता त्यांचे डोळे तेजस्वी व पाणीदार असतात.       त्याच्या  वागण्याने त्या इतरांची मने चटकन जिंकतात.

 ११)  या स्थानामध्ये चंद्र असता सांपत्तिक सुखाला उत्तम असतो. यांची कमाई लोकाश्रयावर अवलंबून असते. समाजोपयोगी व्यवहार करून पैसा मिळतो. हा चंद्र उत्तम वाचाशक्ती, आकर्षक चेहरा देत असल्याने नाटक, सिनेमाक्षेत्रात हे लोक चमकतात. वकीली पेशाला हा चंद्र चांगला असतो. सार्वजनिक क्षेत्रात कार्य करणारे, बँकांमध्ये काम करणारे, हॉटेल्स, शीतपेये विकणारे यांच्या धनस्थानी चंद्र असतो.

  १२) चंद्राच्या स्वभावधर्माप्रमाणे आर्थिक चढउतार सारखे होत असल्याने यांना धनासंबंधी चिंता असते. सट्टा, लॉटरी, जुगार यासारख्या धंद्यांवर उपजीविका करणा-यांच्या धनस्थानी चंद्र असतो. आर्थिक उन्नतीसाठी स्त्रियांकडून मदत होऊ शकते. लेखक, डॉक्टर, कलावंत, लोकप्रतिनिधी, प्रवचनकार आदींच्या कुंडल्यांत धनस्थानी चंद्र असतो. हा चंद्र व्यक्तीला विद्याव्यासंगी, बहुश्रुत व संग्राहक बनवितो. यांचे बोलणे मिठास असते. गोड बोलून कोणालाही वश करतात. मुखामध्ये आर्द्रता असते. लोकप्रियतेच्या दृष्टीने हा चंद्र चांगला. मिष्टान्नभोजन प्रिय असते.

 १३) हा चंद्र जर दूषित असेल तर पूर्वार्जित इस्टेट मिळत नाही. असल्यास तिचा नाश होतो. घरात फार मोठी जबाबदारी पडते. पोष्य वर्ग खूप असतो. नेत्रविकार संभवतात. लोकविरोध सहन करावा लागतो. आर्थिक अडचणी वारंवार निर्माण होतात. संपत्तीची उधळपट्टी होते.

 १४) धनस्थानामध्यें चंद्र बलवान् असतां—सांपत्तिक सुख चांगलें दर्शवितो. ही माणसे चांगला संचय करतात. परमुलुखांमध्ये प्रवास केला असता त्यांत भाग्योदय किंवा प्रवासापासून फायदे घडतात. सार्वजनिक संस्था किंवा सार्वजनिक हितसंबंधाचे कार्यामुळे उद्य, व त्यांत लाभ होतो. सांपत्तिक स्थितीमध्ये भरती-ओहोटीप्रमाणे वारंवार घडामोडी घडतात, म्हणून सार्वजनिक हितसंबंध ज्यामध्ये येतो किंवा ज्या वस्तूची जनसमाजाला वारंवार गरज लागते अशा वस्तूंच्या व्यवहारांमध्ये फायदा होतो. या स्थानामध्ये वृश्चिक व मकर राशींचा चंद्र पीडित नसावा, कारण त्याने अनेक प्रकारें सांपत्तिक नुकसानीचे प्रसंग येतात.

 १५) धनस्थानामधील चंद्र स्त्रीवर्गाकडून-विशेषतः विवाहित स्त्रियांकडून लाभ व हानी तो ज्याप्रमाणें बलवान असेल त्याप्रमाणे दर्शवितो.

 चंद्र तृतीय स्थानात  


१) या  स्थानातील चंद्र भावंडांचे सौख्य चांगले देतो. हा स्त्रीग्रह, पाठीमागची बहीण देतो. भावंडांत प्रेमाचे, सलोख्याचे संबंध असतात.

२) तृतीयात चंद्र असलेल्या व्यक्ति मानसिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असतात. व्यक्तीत प्रेमळपणा असतो. पण हया घाबरट असतात. तृतीयातील पापग्रह फक्त व्यक्तीला साहसी करतात. तृतीयातील चंद्र ब-याच व्यक्तीत मानसिक चांचल्य देतो. बौद्धिकदष्ट्या हा चंद्र चौकसपणा, चलाखपणा देतो. अशा व्यक्तींना नाना विषयांची आवड असते. अनेक विषयांची माहिती असते. काही तरी बौद्धिक छंद असतो. ललित वाङमयाची आवड असते. स्वकर्तृत्वावर पुढे येतात.

 ३) तृतीयात चंद्र असता बंधुवर्गाला साडेसातीत त्रास होतो. चंद्र-राहू योग बहिणींना वाईट असतो. एखाद्या बहिणीस वैधव्य येते. तृतीयात चंद्र असता लहान प्रवास वारंवार होतात. चंद्र-हर्षल, चंद्र-नेपच्यून असता परदेशगमनयोग येतो.

४) या स्थानात चंद्र  असता प्रवासाची व हिंडण्या-फिरण्याची आवड असते. या व्यक्ती अतिशय संवेदनशील व भावनाप्रधान असतात. येथे चंद्र गुरु  किंवा चंद्र-बुध  युती  असता बहश्रुत, वाचनाचा व लिखाणाची आवड  असते 

५) तृतीयात चंद्र असता बहुधा पाठीवर बहीण होते किंवा भावंडात धाकटेपणा येतो. चंद्र-राहु युती मानसिक स्थिती बिघडवते  किंवा विधवा बहिणीचा संसार सांभाळावा लागतो.

६) तृतीयातील चंद्र कला-कौशल्याची आवड दर्शवतो . येथे चंद्र असलेल्या स्त्रिया अत्यंत हळव्या असतात. त्यांच्या अंगी एखादी तरी कला निश्चितच असते  व वेळप्रसंगी त्याना त्यांच्या या कलेमळे पैसादेखील मिळतो.

७) यांचे हस्ताक्षर चांगले असते. कला, साहित्य, संगीत, नाटक, खेळ यादृष्टीने येथील चंद्र उत्कृष्ठ फळे देतो.  हा चंद्र प्रवासाची आवड व संधी निर्माण करतो. परदेशगमनाची संधी मिळते. कंठस्थान असल्याने गायन कलेला हा चंद्र फारच उत्तम. त्याचप्रमाणे वादन कलेलाही हा चंद्र उत्तम असतो.

 ८) प्रामुख्याने बौद्धिक स्थान असल्याने येथील चंद्र उच्च दर्जाचे साहित्यिक निर्माण करतो. कवींना हा योग फारच चांगला. मन मात्र चंचल असते व विशिष्ट आवडी निवडी असतात. यांचे विचार सारखे बदलत असतात. हा चंद्र शास्त्रीय संशोधनास मदत करणारा असतो. पुरुषराशीमधील चंद्र पाठीवर भाऊ व स्त्रीराशीमधील बहीण दर्शवितो. पाठीवरील भावंड नावलौकिक मिळविते.

 ९) हे कर्तृत्वस्थान असल्याने येथील चंद्र स्वकर्तृत्वाने व पराक्रमाने नावारूपास आणतो. मध्यवयापर्यंत हे अनेक धंदे अथवा नोक-या बदलतात. शेजारीपाजारी या व्यक्ती आवडीच्या असतात. २७व्या वर्षी हा चंद्र लांबचा प्रवास देतो. गुरूच्या राशीतील चंद्र असलेल्या व्यक्तींची अध्यात्म मार्गात गती असते. निदान परंपरावादी असतात. 

 १०) या स्थानी चंद्र दूषित असता बहिणीस त्रासदायक, अतिशय चंचल स्वभाव, भितरेपणा, आत्मविश्वासाचा अभाव, मनोदौर्बल्य, प्रवासात आरोग्य बिघडणे, वृत्तपत्रामधून बदनामी होणे, लेखन चोरल्याचा आरोप येणे, शेजा-यांशी वितुष्ट अशा प्रकारे अशुभ फल मिळते.

११) या स्थानामध्ये चंद्र बलवान् असतां मातृसुख व भगिनीसुख चांगलें दर्शवितो. शेजारीपाजारी यांचेमध्ये चांगले वजन असते व त्यांपासून चांगलें सुख दर्शवितो. वयाच्या २७-२८ व्या वर्षाचे सुमारास पुष्कळ प्रवास घडतात. 

 चंद्र चतुर्थस्थानात 

१)चतुर्थस्थानातील  हा चंद्र संपत्ति देणारा व मानसिक शांतता व सुख देणारा आहे. अशा व्यक्तीच्या घरात अत्यंत प्रेमळ वातावरण असते. उत्तर आयुष्य अत्यंत सुखाचे जाते. स्त्रियांच्या पत्रिकेत हा चंद्र उत्तम गृहसौख्य देतो. अशा स्त्रिया उत्तम गृहिणी व प्रेमळ स्वभावाच्या असतात. चंद्राबरोबर असलेले शुभ ग्रह आधुनिक शिक्षणास चांगले असतात. चतुर्थातील शुभ ग्रह शैक्षणिक पदवी देणारे असतात. शुभ ग्रहाबरोबर चंद्र घर देतो, वाहनसौख्य, संपत्ति देतो. 

२)चतुर्थात चंद्र असता व  तृतीयात शनि असेल तर गरिबी व कष्टदायक जीवन असते.

३)चतुर्थतील चंद्र-शनि मातेस अत्यंत कष्ट देतात. मातेस मोठे आजार वा मातृसौख्याचा नाश करतो. चंद्र-राहु युति घराण्याला वास्तुदोष, घराण्यात वारंवार घडणा-या अशुभ घटना दाखवतो. चंद्रहर्षल योग गृहस्थितीत वारंवार मोठे बदल, कलह, दाखवतो. चतुर्थात चंद्र असता साडेसातीतील पहिली पांच-वर्षे मानसिक स्वास्थ्य अजीबात देत नाहीत. घराण्यात मोठ्या व्यक्तीचे मृत्यू होतात.

४) चतुर्थस्थानात चंद्र असलेले लोक मातृभक्त असतात. मातेकडून लाभ होतो. गृहसौख्य चागले  मिळते. चंद्राचा शुक्राबरोबरचा शुभयोग किंवा शुक्राच्या राशीतील चंद्र उत्तम वाहनसौख्य मिळवून देतो. या लोकांना शता-बागायता इ. पासून फायदा होतो. 

५)चतुर्थस्थानात चंद्र असता - यांच्या घराजवळ नदी, विहीर, तलाव अशा प्रकारचा एखादा जलाशय किंवा पाण्याची मोठी टाकी आढळते. यांनी शक्य झाल्यास मुद्दामहून  जलाशयाजवळ घर घ्यावे. त्यामुळे भागोदय होतो. 

६) चतुर्थात चंद्र असता विवाहानंतर मध्यम वयात भरभराट होते. मात्र येथे चंद्र असून, तृतीयात शनि असता विपन्नावस्था येते. चंद्र-राहु युती मानसिक स्थिती बिघडवते. तर चंद्र-शनि युती असता मातृसौख्य कमी लाभते. चंद्र-नेपच्युन युती अंत:स्फूर्ती देते.

७)स्त्रियांच्या कुंडलीत येथे चंद्र असता सासर चांगले लाभते. वैवाहिक सौख्य चांगले लाभते. यांच्या विवाहानंतर पतीचा भागोदय होतो.

८) या स्थानी चंद्र असता राहायला स्वतःचे घर होण्याएवढी ऐपत नक्कीच असते. एवढेच नव्हे । तर शेतीवाडी, बागबागाईत, विहीर याही गोष्टी मिळतात. शेतीमधून उत्पन्न चांगले मिळते. चरराशीचा चंद्र राहाते ठिकाण बदलायला लावतो. या स्थानी शुभ चंद्र असता विवाहापासून फायदा होतो. स्त्रीधन वा जागा मिळणे, विवाहोत्तर उत्कर्ष होणे या गोष्टी दिसतात. मातृसुख उत्तम मिळते. स्त्रीवर्गाकडून विशेषतः आईकडून लाभ होतात. माता दीर्घायू असते. बारसा रूपाने इस्टेट मिळते. वाहनसौख्य मिळते. 

९) या स्थानी चंद्र अशुभ संबंधीत असेल तर मातृछत्र लहानपणीच हरपते. या व्यक्तींना इस्टेटीसंबंधी भानगडींना तोंड द्यावे लागते. यांना मानसिक सुख मिळत नाही. एका जागी बूड स्थिर नसते. आयुष्याचा अंतकाळ चिंतेत जातो. काही वाईट घटनेमुळे वा अपयशामुळे मन खचून जाते. कर्तव्यशून्य अवस्थेमुळे आळशी बनतात. व्यसनांच्या आहारी जातात व मनाला विनाशाच्या गर्तेत
लोटतात.

१०) चतुर्थामध्ये चर राशीमध्ये चंद्र असणारी मंडळी आपलें राहण्याचे ठिकाण वारंवार बदलतात. आयुष्याचे उत्तर भागामध्ये कीर्तिवान् होतात. परंतु चतुर्थामधील पीडित चंद्र उद्योगधंदा, कीर्ति व मानसन्मान यासंबंधानें चिंता दर्शवितो

११) चतुर्थामधील बलवान् व शुभसंबंधित असलेला चंद्र विवाहानंतर उदय, विवाहापासून इस्टेटप्राप्ति व स्त्रीधनप्राप्तीमुळे उत्कर्ष दर्शवितो. 

    चंद्र पंचम स्थानात  

१) पंचमस्थान स्थानातील चंद्र शिक्षण व्यवस्थित पूर्ण करतो. बुद्धिविचारात आकलनशक्ति, तरलता, चलाखपणा, चौकसपणा, अभ्यासूपणा असतो. शुभ ग्रहाबरोबर आलेला चंद्र शिक्षणात प्राविण्य दाखवतो. 

२) हा चंद्र संततिसौख्य चांगले देतो. शुभग्रहाबरोबर असलेला चंद्र जुगाराची आवड, आनंदी व स्वछंदी वृत्ति देतो. चंद्र-राहू, चंद्र-केतू हे योग बुद्धीवर अनिष्ट परिणाम करणारे, मानसिक व्यग्रता देणारे आहेत. ह्या योगात संतति सर्पशापाने होत नाही. सर्प स्वप्नात दिसतात. चंद्र-नेपच्यून हा योग अंत:स्फति, गढ. चमत्कारिक, दैवी, मानसिक अनुभव व अंर्तज्ञानशक्ति देतो. हया योगात मन अत्यंत संवेदनशील असते. चंद्र-हर्षल, चंद्र-नेपच्यून, चंद्र-गुरु, शैक्षणिक कारणासाठी परदेशगमन योग दाखवतात.

३) येथे चंद्र असतां कन्या संतती जास्त होते. चंद्र-राहु युती, चंद्र-शनि युती संतती सौख्यात अडचणी दर्शवतात. येथील चंद्र किंवा चंद्र-केतु युती मंत्रविद्येची व गूढशास्त्राची आवड दर्शवतात. शेअर्स, सट्टा व वायदे यांपासून फायदा होतो. चंद्र-गुरु-शुक्र युती असेल तर घोड्यांच्या शर्यतीत फायदा होतो. चंद्र-शुक्र युती अभिनय, नाट्य, सिनेमा इ. क्षेत्रात यश देते. |. 

४)स्त्रियांच्या कुंडलीत येथे चंद्र असता, अशा स्त्रियांचा स्वभाव प्रेमळ, दयाळू, उदार परंतु स्वच्छंदी असतो. प्रवासाची आवड असते. निरनिराळ्या दागिन्यांची व साड्यांची आवड असते. पाळणाघर चालविण्यासाठी येथील चंद्र स्त्रियांना चांगला असतो.

६) या स्थानी चंद्र असणे अतिशय भाग्याचे असते. या चंद्रामुळे बुद्धी विविध स्वरूपात प्रगट होते. राजकारण, विज्ञान, कला, कायदा, धर्म, तत्त्वज्ञान यापैकी कोणत्याही विषयात त्यांची मती चालते. चैनीची आवड विशेष असल्याने हे लोक वेगवेगळ्या कला व क्रीडाकौशल्यात रमतात. यापैकी काही धंदेवाईक खेळाडूही असतात. नाटक-सिनेमा, संगीत, गायन, नृत्य आदी गोष्टींचा व्यासंग करून त्यात अर्थप्राप्ती व लौकिकही मिळतो. हे स्वभावाने आनंदी, स्वच्छंदी व विलासी असतात. यांना सट्टा, लॉटरी, रेसेस यांमध्ये लाभ होतो. गुरूच्या राशीत धर्म व तत्त्वज्ञानाची त्याचप्रमाणे नित्य उपासनेची आवड असते. यांनी गुरुमंत्र घेतलेला असतो. कायद्यामध्ये यांना रस असतो. काव्य रचणे, सिनेसंगीत-नाट्यसंगीत-गझल ऐकणे, मद्य-मदिराक्षीचा आस्वाद घेणे या गोष्टी कित्येकांना प्रिय असतात. 

७) या स्थानातील चंद्र कन्या संतती जास्त देतो. एखादी संतती नाव कमावते, प्रसिद्धीच्या झोतात येते.

८) या स्थानी चंद्र दूषित असता चंचल, जुगारात वेळ व पैंसा घालवणारा, व्यसनाधीन, परस्त्रीरत असतो, परंतु प्रेमात अपयश मिळते. शिक्षण अर्धवट राहाते. खेळात अपयश येते.

                                      चंद्र षष्ट स्थानात  

१)  ह्या स्थानातील चंद्र मानसिकदृष्ट्या अत्यंत बिघडतो.या स्थानामधील चंद्र बालवयामध्ये प्रकृति फारच वाईट ठेवितो. स्त्रियांच्या कुंडलीमध्ये प्रकृतीसंबंधाने फारच अनिष्ट फलें पाहण्यास मिळतात. अशा व्यक्ति चिरचिऱ्या, कटकटी, क्षुल्लक गोष्टीवरून मनस्ताप करून घेणा-या व मानसिक अस्वास्थ्याला स्वतःचे कारण असलेल्या असतात. 

२) व्यक्तीत मानसिक चंचलता, आत्मविश्वासाच्या अभाव, मनाचा कमकुवतपणा असतो. पापग्रहाबरोबर असलेला चंद्र आरोग्य बिघडवतो. अनेक संकटे येतात. जीवनात ऊर्जितावस्था येत नाही. चंद्र-शनि युति क्षय, कफ, दमा, खोकला दाखविते. चंद्र-मंगळ यति टायफॉईट वारंवार ताप दाखवते. षष्ठात चंद्र–व्ययात शनि हा दारिद्रय दाखवितो, अष्टमात पापग्रह असता हा चंद्र आयुष्य कमी करतो. पापग्रहाबरोबर असलेला चंद्र दृष्टिदोष देतो.

३) षष्ठस्थानात चंद्र असता सर्दी-पडसे, कफ विकार, ब्राँकायटीस इ. श्वसनसंस्थेचे व शीतप्रकृतीचे आजार होतात. वृश्चिकेचा चंद्र येथे किडनीचा त्रास व मूतखडा होण्याचा संभव दर्शवतो. पृथ्वीराशींचा चंद्र रक्त बिघडवतो. येथे चंद्र असता लहानपणी सतत आजार होतात. चंद्र-शनि युती येथे असता दमा, क्षय, हिवताप असे आजार होतात. 

४) येथे चंद्र असणा-या व्यक्ती मनाने दुबळ्या व भित्र्या स्वभावाच्या असतात. नोकरीत यांना फारसा त्रास होत नाही. वरिष्ठांची हांजीहांजी करतात. चंद्र-शनि युती दुष्ट प्रवृत्तीच्या व्यक्ती दर्शवते. 'गरज सरो वैद्य मरो' अशी स्वार्थी प्रवृत्ती असते.

५) येथे चंद्र असलेल्या स्त्रिया चहाडखोर असतात. षष्ठात चंद्र असलेल्या स्त्रिया उत्तम नर्स किंवा सुईणी होतात.

६) दूषित चंद्रामुळे जीवनात काहीना काही बालंट येऊन अपकीर्ती होते. कोर्टाचे निवाडे विरुद्ध जातात. सत्तेचा राजीनामा द्यावा लागतो. प्रकृती नाजूक असते. लहानपणी जीवावरची दुखणी काढावी लागतात. बालारिष्टाला हा चंद्र मदत करतो. ही माणसे अल्पायू असतात. हा चंद्र खाणेपिणे अनियमित, मैथुनासक्तीचा अतिरेक व आळस दर्शवितो. वात व कफाचे विकार वारंवार होतात. 

७)द्विस्वभाव राशीत (३।६।९।१२) फुफ्फुसाचे विकार व कफविकार होतात. वृषभेत मुख-कंठविकार, वृश्चिकेत मूतखडा, मूळव्याध, भगंदर, कर्केत चंद्र जठरविकार किंवा पोटाचे विकार व पचनक्रियेचा बिघाड इत्यादि  विकार दर्शवितो. हा चंद्र व्यसनाधीनता देतो. खर्चाला ताळतंत्र नसतो. शत्रू प्रबळ असतात. शारीरिक, मानसिक, आर्थिक चिंता, बेअब्रू, शत्रुत्व दर्शविणारा हा चंद्र आहे. हीं फलें विशेषतः चंद्र येथे पीडित असतांच घेणे.  

८)  या स्थानामधील चंद्र नोकर-चाकरांपासून फार त्रास दर्शवितो व ते टिकत नाहींत. षष्ठामधील बलवान् चंद्र नोकरीमध्यें उन्नति किंवा प्रगति दर्शवितो.
-
  चंद्र सप्तम स्थानात  

१)सप्तमस्थानात एकटा चंद्र असता पत्नी सुस्वरूप, देखणी, प्रेमळ, स्वभावाची, उत्तम गृहिणी असते. विवाह लवकर होतो. वैवाहिक सौख्य उत्कृष्ट लाभते. वैवाहिक जीवनात सुखशांति देणारा चंद्र आहे.

२) चंद्र-शनि चंद्र-राहू हे योग उशीरा विवाह, परजातीतील, वयाने मोठी, पुनर्विवाहित पत्नी दाखवितात. चंद्र-मंगळ स्त्रियांच्या पत्रिकेत तीव्र प्रकारची मतभिन्नता घटस्फोट, पतीचे आरोग्य बिघडणे वगैरे दृष्टीने वैवाहिक जीवनात वैगुण्य निर्माण करतात. 

३) सप्तमातील चंद्र, प्रवासयोग दाखवतो.

४) सप्तमांत शुभग्रह युक्त किंवा एकटा चंद्र वैवाहिक सौख्य चांगले देतो. जोडीदार प्रेमळ व संदर मिळतो. मात्र चंद्र जर राहू , शनि, हर्षल, नेपच्युन, मंगळ इ. ग्रहांच्या युतीत असेल तर वैवाहिक सौख्य बिघडते. घटस्फोटापर्यंत मजल जाते. चंद्र-राहु युती अमर्याद विषयवासना किंवा अनैतिक संबंध दर्शवते. चंद्र-शनि युती उशिरा विवाह किंवा पुरुषाला आपल्यापेक्षा जास्त वयाच्या स्त्रीशी विवाह किंवा प्रेमसंबंध करविते.

 ५) सप्तमात चंद्र शुभग्रहयुक्त किंवा दृष्ट असता स्त्रियांना अतिशय देखणा पती मिळतो. स्त्रियांच्या कुंडलीत येथे चन्द्र राहू किंवा चंद्र-मंगळ असता घटस्फोट किंवा वैधव्य यांपैकी एखादातरी कटू अनुभव निश्चितपणे येतो. चंद्र-नेपच्यून यती परधर्मीय व्यक्तीशी विवाह करविते अन्यथा विवाहाच्या वेळी फसवणूक संभवते..

 ६) सप्तमात चंद्र असता व्यक्तीस सुंदर, चतुरं, मधुरभाषणी व पतिव्रता अशी पत्नी लाभते. |या स्थानात शुभसंबंधीत चंद्र असता विवाह लवकर होतो. स्त्री स्वभावाने लहरी, मनमिळावू, शांत, प्रेमळ, कर्तव्यदक्ष व धार्मिक मिळते. कित्येक वेळा अलौकिक सौंदर्य असते. सप्तमेश शनी नसता, जर तो येथील चंद्रास बिघडवीत असेल तर विवाह फार उशीरा, वा होत नाही. येथील चंद्र शनीने सर्वांत जास्त बिघडतो.

 ७) स्त्रीच्या पत्रिकेत सप्तमातील चंद्र असता, विवाहोत्तर आर्थिक भरभराट होते. या चंद्राची राशीपरत्वे भिन्न फले मिळत असल्याने स्वभावात फरक पडतो. प्रसिद्ध व्यक्तीशी विवाह हे या स्थानच्या चंद्राचे खास फल काही पत्रिकांत आढळते. स्त्री जीवनात महत्त्वाचे अंग ठरते. हा चंद्र लोकप्रियता देणारा, कामुकता वाढविणारा, प्रवास घडविणारा, व्यापारात यश देणारा आहे. समाजजीवनात यांना यश मिळते. विवाहबाह्य संबध प्रकरणे असतात व गाजतात. हे स्थान पंचम स्थानाप्रमाणे करमणुकीचे निदर्शक असल्याने येथील चंद्र कलेत यशस्वी करतो. एकंदरीत येथील शुभचंद्र फार चांगली फले देतो

 ८) हा चंद्र जर दृषित असेल तर व्यक्तीस व्यभिचारी बनवतो. विवाहवैचित्र्य असते. जात, वय, धर्म यासंबंधी काही वेगळेपणा असतो. जीवनसाथी अशक्त, लहरी, अतिरेकी, समाजशील, मनोरुग्ण असतो. सार्वजनिक दुष्कीर्ती होते. विवाहामुळे अपकीर्ती होते. स्त्रीला मासिक पाळीचे त्रास होतात. बाळंतपण जिकीरीचे असते. शरीरात रक्त कमी असते. व्यापारांत प्रतिस्पर्धी मातब्बर होतात.

   चंद्र अष्टम स्थानात  

१) या स्थानामधील चंद्र आयुष्य कमी देतो. हा चंद्र पाण्यापासून भय दाखवतो. शुभ ग्रहाबरोबर असता स्त्रियांच्या पत्रिकेत सौभाग्यमरण देतो. अष्टमातील चंद्र मातृसौख्याच्या दृष्टीने अशुभ असतो. हया स्थानातील चंद्र लाचलुचपतीमुळे धनप्राप्ती दाखवतो.

२) ह्या चंद्राबरोबर मंगळ वा हर्षल असता -अकस्मात, तडकाफडकी, अपघाती मृत्यु होतो. अष्टमात चंद्र असता साडेसाती अत्यंत तापदायक जाते. स्त्रियांच्या पत्रिकेत चंद्र-मंगळ सप्तमात अगर अष्टमात असता मासिक पाळीचे त्रास दाखवितात. 

 ३) अष्टमस्थानात जर चंद्र पापग्रह युक्त किंवा पापग्रहाने दृष्ट असेल तर बालारिष्ट योग होतो, आयुष्यात काहीतरी अरिष्ट येणार असल्याचे ते द्योतक आहे. येथील चंद्र मंगळाच्या किंवा हर्षलाच्या युतीत किंवा दृष्टीत असेल तर अपघात, बाम्बस्फोट, खून, मारामाच्या इ. मुळे आकस्मिक मृत्यू होतो. 

 ४) हा  चंद्र - वडिलोपार्जित इस्टेट व संपत्ती मिळते. स्त्रीधन तसेच श्वसुरगृहाकडून लाभ होतो. हे लोक लांचखोर असतात. अष्टमात चंद्र असणारी माणसे भिशी किंवा फंड चालविणे तसेच पैसे व्याजाने देणे, असे धंदे करतात. येथे चंद्र असता पाण्यांपासून भय असते. चंद्र-शुक्र युती बाई-बाटलीचे व्यसन देते. |

 ५) स्त्रियांच्या कुंडलीत अष्टमांत चंद्र असता सौभाग्याने मरण येते. येथे चंद्र-मंगळ किंवा चंद्र-राहू   असता मासिक पाळीच्या वेळी त्रास होतो. चंद्र-मंगळ युती येथे असता प्रसुतीच्या वेळी रक्तस्राव जास्त होतो. सिझेरियन शस्त्रक्रिया करावी लागते. 

६) या स्थानी चंद्र असता  गूढ शास्त्र, अध्यात्म, मंत्रतंत्रज्योतिषशास्त्र, पुराणवस्तुसंशोधन, परलोकविद्या आदींचा अभ्यास असतो. भागिदारीपासून लाभ होतात.

 ७) या स्थानाचा अशुभ चंद्र बालारिष्ट दर्शवितो. लहानपणी आरोग्य फारच वाईट असते. हा चंद्र ८, २०, ३२, ४४ या वर्षी मृत्यू देतो. पाण्यापासून भय असते. हा चंद्र फारच दूषित असेल तर मनोरुग्ण दर्शवितो व मनुष्य आत्महत्या करतो. मातेला लवकर मृत्यू येतो. विवाहानंतर आर्थिक स्थिती ढासळते. अपघाताने दृष्टिदोष वा डोळा निकामी होणे या गोष्टी दर्शवितो. 

८) अष्टमामधील शनि व मंगळाने पीडित चंद्र- अपघाताने बुडून  आकस्मिक रीतीनें अपमृत्यु दर्शवितो. जलप्रवाहामध्ये मृत्यु येण्याची भीति असते. लग्नानंतर सांपत्तिक स्थिति चांगली राहत नाही.

९) या स्थानामध्ये शुभसंबंधित चंद्र असतां भागीदारांपासून लाभ किंवा लग्नामुळे सांपत्तिक लाभ दर्शवितो. |

                                                           चंद्र नवम स्थानात  

१) नवमस्थान या स्थानातील चंद्रामध्ये बौद्धिक बाजू चांगली असते, पंचमात शुभ ग्रह असता हा चंद्र शैक्षणिक गोष्टीत चांगली प्रगति दाखवतो. हा चंद्र वेदांतज्ञान, धार्मिक गोष्टींची आवड, सेवावृत्ति दाखवतो. नवमात चंद्र असता नावलौकिक, कीति चांगली लाभते. गुरुबरोबर चंद्र असता महापुरुष-योग होतो. कीर्ति भाग्य देतो. अशा व्यक्ति मोठ्या समाजसेवक, दानशूर व त्यागी असतात. चंद्र-नेपच्यून युति उत्कृष्ट कल्पनाशक्ति, प्रतिभा देते. सूचक स्वने पडतात. दृष्टांत होतात. हा योग अनेक वेळा जलप्रवास, परदेशगमनयोग दाखवतो. चंद्र-शुभ सांपत्तिक दर्जा उत्कृष्ट ठेवतो.

२) नवम स्थानी चंद्र असलेल्या व्यक्ती अतिशय बद्धिमान, दयाळू व धार्मिक वृत्तीच्या असतात. 
  चंद्र-गुरु युती या स्थानात किंवा चंद्राचा गुरुबंरोबर नवपंचम योग असता फार मोठा नावलौकिक होतो. चद्र-हर्षल शुभयोग संशोधनकार्यात यश देतो. चंद्र-बुध युती असता उत्तम वक्ते, साहित्यिक किंवा नाटककार होतात. 

३) नवमात चंद्र असता नोकरीनिमित्त किंवा अन्य कारणास्तव अनेक स्थानबदल किंवा प्रवास करावे लागतात. मात्र त्यापासूनदेखील फायदाच होतो. येथे चंद्र असता देशांतर्गत प्रवास व तीर्थयात्रा भरपूर होतात. ज्योतिषशास्त्राची आवड असते. विवाहानंतर भाग्योदय होतो.

 ४) नवम स्थानात चंद्र असलेल्या स्त्रिया प्रसन्न व्यक्तिमत्त्वाच्या प्रेमळ, मृदुभाषी, आतिथ्यशील व घरातील वृद्धांची व मुलांची काळजी घेणा-या असतात. अंगी टापटीप व नीटनेटकेपणा असतो.

 ५) या स्थानी चंद्र असता व्यक्तीची उत्तरोत्तर भाग्यवृद्धी होत असते. यांचे आरोग्य चांगले असते. भाग्यस्थानी चंद्र शुभस्थितीत असता फारच चांगली फले देतो. या व्यक्तींना दिगंत कीर्ती लाभते. हातून पुण्यकर्मे घडतात.  दूरदेशचे प्रवास व तीर्थयात्रा घडतात.  कीर्ती मिळणे हा या चंद्राचा गुण आहे. विवाहानंतर वा विवाहित स्त्रियांकडून लाभ होतात. या स्थानचा चंद्र अतींद्रिय अनुभव व सूचक स्वप्न देतो.

 ६)या स्थानचा दूषित चंद्र भाग्योदयात अडथळे आणतो. उच्च शिक्षणात खंड पडतो. यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होतो. कुटुंबाची अचानक जबाबदारी पडते. स्त्रीमुळे मानहानीचा व बेअब्रूचा प्रसंग येतो. खोट्या गुरूंच्या नादी लागतात. कोर्टाच्या निवाड्यात अपयश येते.

 ७) नवमस्थानामध्ये चंद्र असतां धार्मिक व अध्यात्मविषयाची गोडी असते. या स्थानामध्ये चंद्र शुभसंबंधित असून बलवान् असतां हीं माणसे बरेच लांबलांबचे प्रवास करतात, परदेशामध्ये यांच्या नशिबाचा उदय होतो. 

                                                                  चंद्र दशम स्थानात  

१) या स्थानी चंद्र असता - नोकरीत, व्यवसायात लवकर स्थिरस्थावरता देत नाही. वारंवार बदल होतो. चंद्र दशमात इतर ग्रहांबरोबर असता त्या ग्रहाला प्राधान्य द्यावे शुभ ग्रहावरोवर असता नांवलौकिक, उत्कृष्ट दर्जा, सामाजिक वजन असते. दशमांत चंद्र व्यापारी लोकांस द्रवपदार्थाचे व्यापार, गृहोपयोगी वस्तूंचे व्यापार दाखवितो. दशमात चंद्र व नवमात शनि असता अत्यंत उशिरा स्थिरस्थावरता देतो. द्वितीयांत गुरु-शनि असता दशमातील चंद्र महत्त्वाचा असतो.

२) दशमातील चंद्र धंदा-व्यवसायात अनेक बदल दर्शवतो. नोकरी करीत असल्यास व्यक्ती नगरपालिका, ग्रामपंचायत, सार्वजनिक संस्था इः शी संबंधित आढळते. नगरसेवक, सरपंच इ. पदांवर हे लोक निवडून येतात व त्यानंतर उत्कर्ष होतो. चंद्र-शनि युती दशमांत असता पित्याशी किंवा मातेशी न पटणे, नोकरीत वरिष्ठांशी मतभेद, व्यापारात नुकसान अशा गोष्टी अनुभवास येतात.

३) दशमात चंद्र असलेल्या स्त्रिया उत्तम परिचारिका होऊ शकतात. त्या पाहुण्यांचे आदरातिथ्य करण्यात कुशल असतात. समाधानी वृत्ती असते, त्यामुळे संसार सुखाचा होतो.

४)  या ठिकाणी चंद्रासारखा शुभ ग्रह फार उत्तम फले देताना आढळतो. अशा स्थितीत व्यक्तीचा सार्वजनिक क्षेत्राशी संबंध येतो. सरकारी निमसरकारी व बँकांशी नोकरीनिमित्ताने संबंध असतो. शिपिंग व प्रवासी कंपन्या, लोकोपयोगी व जीवनोपयोगी वस्तू व स्त्रियासंबंधींचे व्यवहार चालणाच्या संस्था इत्यादी ठिकाणी यांचे कर्मजीवन असते. या स्थानातील चंद्रही कीर्ती मिळवून देणारा आहे. लोकांमध्ये ही माणसे प्रसिद्ध असतात. 

५) या स्थानात चंद्र दूषित असता अपकीर्तीला आमंत्रण असते. याच्या अस्थिरता खूपच असते. व्यवसाय-धंद्यात अडथळे येतात. अशा व्यक्त लोकापवाद कानी येतात. वारंवार प्रकृतीची तक्रार असते. अपमानास्पद स्थितीत काम करावे लागते. व्यसनाधीनता येते. पापग्रह असताना अशा व्यक्तींना प्रचंड लोकक्षोभास तोंड द्यावे लागते. 


                                                        चंद्र एकादश स्थानात  

१) एकादशस्थान - ह्या स्थानातील चंद्र कन्यासंतति जास्त देतो. अशा व्यक्ती स्त्रीसमूहात जास्त  वावरत असतात. सुखासक्तपणा देतो. संपत्ति देणारा चंद्र आहे.

२) एकादश स्थानी म्हणजेच लाभ स्थानी चंद्र असलेल्या व्यक्तींचा आयुष्याचा उत्तरार्ध चांगला जातो. सांपत्तिक स्थिती चांगली राहते. मात्र हे लोक कितीही संपत्तीवान असले तरी वेळप्रसंगी गौतम बुद्धाप्रमाणे हसत हसत  आपल्या ऐश्वर्याचा व संपत्तीचा त्याग करू शकतात. हे लोक उद्याची चिंता करीत नाहीत. चैनी व विलासी वृत्ती असते. मात्र लहरी व एककल्ली स्वभावामुळे ब-याच वेळा आजचे मित्र उद्याचे शत्रु होतात. यांना अनेक मित्र-मैत्रिणी असतात, विशेषतः स्त्रियांशी मैत्री जास्त असते. अडचणींच्या प्रसंगी यांना स्त्रियांकडून आर्थिक मदत मिळते. येथे चंद्र असता ज्योतिषशास्त्रात प्राविण्य मिळते.
 ३) लाभस्थानातील चंद्र हा संतती किंवा भावंडापैकी कुणातरी एकाला निरुपयोगी, त्रासदायक अगर दुराचरणी करतो, अथवा शारीरिक व्यंगाने पछाडतो. हा चंद वारंवार पैशाचे लाभ दर्शवतो. लाभस्थानात चंद्र असता व्यक्तीला घाम जास्त येतो. असाच अनुभव चंद्र अष्टमात असता देखील येतो. 

४) या स्थानात चंद्र असलेल्या स्त्रियांचा अनेक पुरुषांशी संबंध येतो. चंद्र-शुक्र युती गायिका, नर्तिका, अभिनेत्री इ. क्षेत्रातील स्त्रियांना पैसा व प्रसिद्धी मिळवून देतो. अशा स्त्रिया पुरुषांना सहज भुरळ पाडतात व आपले ईप्सित साधन घेतात. 

५) या स्थानी चंद्र असता व्यक्तीला सरकारकडून धनलाभ होतो स्त्रियांकडूनही वारंवार लाभ होतात. घर, बंगला, बागबगीचा, वाहने, नोकरचाकर, उंची वस्त्रे-भूषणे या गोष्टी मिळतात. गोड बोलून हे लोक अनेक मित्र बनवतात. सार्वजनिक संस्थांमध्ये यांना पुढारपण लाभते. राजकारणात हे लोक यशस्वी होतात. अनेक व्यक्तिगत इच्छा पुऱ्या  होतात. सार्वजनिक कार्यात पडून आपला व्यवसायही करतात.

६) चंद्र चतुर्थेश असेल तर जमिनीपासून संपत्तीलाभ, अनेक वाहनांचे सुख, शेतीवाडी असते. एकंदरीत हा चंद्र ऐश्वर्य देणारा आहे. जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या लाभस्थानी चंद्र आहे.

 ७) हा चंद्र दूषित असता लबाड, विश्वासघातकी व व्यसनी लोकांशी मैत्री होते. स्त्रियांमुळे अपकीर्ती व नुकसान होते. इच्छा अपु-या राहातात. सार्वजनिक कार्यात अपयश येते. मुले ऐदी निघतात.

८) एकादशस्थानामध्यें चंद्र असतां—एकादशस्थानांत प्रसव राशी   मध्ये चंद्र असतां पुष्कळ संतति देतो. ओळखी पुष्कळ असतात, पीडित चंद्र फसवे व लबाड मित्र दर्शवितो; व त्यापासून बेअब्रू व नुकसान होते. बलवान् चंद्र या स्थानामध्ये असतां मोठाल्या स्त्रियांच्याकडून आश्रय व मदत मिळते,



                                                    चंद्र द्वादश स्थानात  

१) द्वादशस्थानया स्थानात चंद्र अशुभ असतो. मानसिक व्यग्रता, चांचल्य, काळजी देतो. ह्या चंद्रात गरिबी, कर्जबाजारीपणा येण्याची शक्यता असते. व्ययातील चंद्र जलप्रवासाच्या दृष्टीने महत्त्वाचा होतो. चंद्रराहू, चंद्रशनि अत्यंत वाईट रोग होतात. दारिद्रय लवकर येते दष्टिदोष, अंधत्व येते.

२) व्ययस्थानी चंद्र असता दृष्टिदोष असतो. तिरळेपणासारखे नेत्रदोष असण्याची शक्यता असते. गूढशास्त्राची आवड असते. हिशेबीपणा नसतो. खर्चिक वृत्ती असते. या लोकांनी व्यापार-धंदा करू नये, अन्यथा व्यवहारज्ञानाच्या व हिशेबीवलीच्या अभावी नुकसान होते. शनि-चंद्र युती येथे आर्थिक स्थिती चांगली ठेवीत नाही. यांना बंधन योग घडण्याची शक्यता असते.

३) बाराव्या स्थानात चंद्र असता - दूरच्या प्रवासाचे आकर्षण असते व ते घडतातही. सर्व सुखांचा त्याग करून हे लोक अध्यात्माकडे वळतात. यांना गूढाचे व  धर्म, तत्त्वज्ञान, अध्यात्म आकर्षण असते 

४) व्ययस्थानी  अशुभसंबंधीत चंद्र अपकीर्ती देणारा आहे. अशा लोकांना लोकक्षोभास तोंड द्यावे लागते. गुप्त प्रकरणामुळे नाव बदू होते. आर्थिक नुकसान होते. यांना नेत्रदोष, नेत्रविकार वा अंधत्व येते.  स्त्रियांचे प्रेम यांना मिळत नाही. यांना निद्रानाशाचा विकार जडतो. या लोकांना आयुष्यात काही कमतरतेची खंत वा एखाद्या असाध्य रोगाबद्दल चिंता असते. यांच्या चेह-यावरील स्मित लोप पावलेले असते. हा चंद्र फारच बिघडला असल्यास वेड्याच्या इस्पितळात रवानगी होते. हा अपमृत्यूही घडवतो. आत्महत्या करणे, स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणे, प्रायोपवेशन, समाधी घेणे ही या चंद्राची फले होत.

 ५) व्ययस्थानामध्यें चंद्र असतां-या स्थानामध्ये मकर किंवा वृश्चिकेचा चंद्र असतां वाईट स्त्रियांचेबरोबर शत्रुत्व व कलह उत्पन्न होऊन त्यापासून बेअब्रू होते. गूढ विषयांची आवड, प्रगतीमध्ये भलतेच अडथळे उत्पन्न होतात. या स्थानामधील पीडित चंद्र फारच वाईट फळे दर्शवितो. देशत्याग, हद्दपारी, वगैरेसारखे प्रसंग येतात.. परंतु बलवान् व शुभसंबंधित चंद्र असतां देशपर्यटणे, एकांतामध्यें वास, दानसंस्था किंवा इस्पितळे यांचेपासून लाभ दर्शवितो.