Thursday, 6 November 2014

शनीची साडेसाती (Sadesati)

शनीची साडेसाती

1.  शनीची साडेसाती सर्वांनाच केव्हा ना केव्हा भोगावीच लागते. शनिची साडेसाती हा असाच खडतर कसोटीचा आविष्कार आहे. सारे आलबेल असणे हे समाधानकारक खरेच. परंतु,तेव्हा एकप्रकारची सुखासीनता, निष्क्रियपणा येण्याचा धोका असतो. सोने जसे भट्टीत घातल्यानंतरच लखलखते तद्वतच शनिच्या साडेसातीचा काळ हा उद्याच्या तेजापूर्वीची पहाट असते असे समजून साडेसातीला खुल्या दिलाने सामोरे जावे.

2.  फलज्योतिषात शनीला असाधारण महत्त्व आहे. शनीची साडेसाती ही फलज्योतिषातील प्रसिद्ध कल्पना आहे. प्रत्येक राशीच्या व्यक्तीला तीस वर्षांनंतर एकदा साडेसाती येते ह्याचे कारण शनी संपूर्ण गोलाकार (३६० अंश) प्रदक्षिणा करायला अंदाजे ३० वर्षे (मार्गी-वक्री) घेतो. १२ राशींच्या या प्रवासाला ही ३० वर्षे लागतात. अर्थात प्रत्येक राशीला तो साधारणपणे अडीच वर्ष असतो, शनी ज्या राशीला असेल त्या राशीला तसेच तिच्या मागच्या व तिच्या पुढच्या राशीला अशा एकंदर तीन राशींना त्या त्या वेळी साडेसाती आहे असे मानतात. तीन राशीतील संक्रमणाला शनिला साडेसात वर्षांचा कालखंड लागत असल्याने शनिच्या या कालखंडाला साडेसाती हे पीडा देण्याचे प्रतीक असल्यासारखे नाव मिळाले आहे.

३.  मिनी साडेसाती : याशिवाय ज्याला छोटी/मिनी साडेसाती म्हणतात ती शनी ज्या राशीपासून चवथ्या व आठव्या स्थानी असलेल्या राशींना असते. मिनी साडेसातीला छोटी पनवती/ढैया असेही म्हणतात.

४.  दि. २ नोव्हेंबर २०१४ रात्री ९ वा. १० मिनिटांनी शनी वृश्‍चिक राशीत प्रवेश करतो आहे.त्यामुळे शनिची साडेसाती तूळ, वृश्‍चिक व धनु राशींना असनू मिनी साडेसाती मेष आणि सिंह राशींना आहे. दि. २६ ऑक्टोबर २०१७ पर्यंत शनी वृश्‍चिक राशीत राहणार असून,नंतर तो धनु राशीतून भ्रमण करणार आहे.

 राशीनिहाय साडेसातीची फळे खालीलप्रमाणे:

मेष- आर्थिक अडचणी निर्माण होतील, आरोग्य बिघडेल.
वृषभ- वैवाहिक असमाधान, मनस्ताप.
मिथुन- व्यवसायात वाढ, तीर्थयात्रा.
कर्क- संततीची चिंता, शेअर्समध्ये तोटा.
सिंह- दु:खदायक काळ, घरामध्ये कलह.
कन्या- प्रत्येक कार्यात यश.
तूळ- नेत्रपीडा, पैशाचा नाश.
वृश्‍चिक- मानसिक अस्वस्थता.
धनु- निरर्थक त्रास, मनस्ताप.
मकर- भरभराटीचा काळ.
कुंभ- नवीन कार्यारंभ होतील, आरोग्य सुधारेल.
मीन- आर्थिक लाभ पण मानहानी.


.  प्रत्येक कुंडलीमध्ये १२ स्थांनांपैकी एका स्थानात चंद्र असतो. शनि हा भ्रमण करता करता या स्थानाच्या आदल्या स्थानात आला की त्या जातकाची साडेसाती सुरु होते आणि चंद्राच्या दुसर्‍या स्थानामधून शनि निघून जाईपर्यंत ती चालू रहाते. म्हणजे माझ्या कुंडलीत जर चंद्र १ ल्या घरात पडला असेल, तर १२ वा घरात शनि आला की माझी साडेसाती चालू होणार आणि २ र्‍या घरातून शनि बाहेर पडेपर्यंत ती चालू रहाणार. प्रत्येक राशीत अडीच वर्षे वास्तव्य करत असल्यामुळे शनिस ही एकूण ३ घरे पादाक्रांत करण्यासाठी साडेसात वर्षे लागतात म्हणून नाव साडेसाती.

. शनीला एक राशी भोगण्यास अडीच वर्ष लागतात. अर्थात तीन राशी भोगण्यास साडेसात वर्षे लागतात...म्हणजे समजा तुमची राशी सिंह आहे.त्याच्या आधीची राशी आहे कर्क.म्हणजेच जर शनिने सिंह राशीत प्रवेश केला तर कर्क, सिंह आणि कन्या ह्या तिन्ही राशीना साडेसाती सुरु झाली. त्यामुळे या घटनेला साडेसाती हे नाव पडले आहे.

.  जन्मपत्रीकेतील मूळ चंद्रराशीच्या मागे व पुढे शनि असे पर्यंत साडेसाती समजली जाते. उदा. - एखाद्या जातकाची चंद्ररास तूळ असेल तर शनि ने कन्या राशित प्रवेश केल्यापासून ते वृश्चिक राशितून पुढे जाई पर्यंत साडेसाती सुरु होते .

.  जेव्हा चंद्राचे मागील राशितील शनिचे भ्रमण सुरु होते तो साडेसातीचा पूर्वार्ध होय. जन्मस्थ चंद्रावरून शनि भ्रमण करतो त्याला मध्यकाळ, तर चंद्राचे पुढील राशितून शनि जातो त्या वेळेस अंतकाळ वा उत्तरार्ध म्हणतात.

.  शनीच्या साडेसातीची प्रत्येकाला भीती वाटते.प्रत्येकाला वाटते की त्याच्या /तिच्या आयुष्यात कधी साडेसाती येउ नये. पण साडेसाती कोणालाच टळलेली नाही. प्रत्येक राशीला साडेसाती ही असतेच. साडेसाती या शब्दाचे सुद्धा मनुष्य घाबरून जातो. आपल्याला साडेसातीत काय अशुभ गोष्टी घडतील या विचाराने मनुष्य गर्भगळीत होतो. साडेसाती म्हणजे सर्वार्थाने चांगल्या माणसाची सत्वपरीक्षा तर तुमच्या आजपर्यंत केलेल्या प्रत्येक वाईट कृत्यासाठी शासन मिळवण्याचा काळ असतो. सर्वासाठी 'विलंब' हा महत्वाचा अनुभव मात्र येतच असतो.

१०.  शनीची साडेसाती ही इष्टापती - 

पायरी न ओळखता अविचाराने वागून बेभान वागणाऱ्या व्यक्तींना वठणीवर आणण्यासाठी साडेसाती हा रामबाण उपाय होय. आत्मपरीक्षण करण्याची समज नसलेल्यांना सुधारण्याचे, माणुसकीत आणण्याचे कार्य श्री शनिदेव करतो ते फक्त साडेसातीच्या माध्यमातून, म्हणून उच्च विचार केला असता साडेसाती ही एक इष्टापतीच होय. साडेसातीच्या काळात दिसून येणारा अनुभव म्हणजे स्वताच्या बाबतीत सर्वच प्रतिकूल दिसणे किंवा असणे . उदा :- कुठल्याही कामात अपयश , चूक नसताना त्रास भोगावा लागणे, दोस्त मंडळीकडून विश्वासघात, आर्थिक नुकसान, कौंटुबिक कलह वाढणे, मनाविरुद्धच्या घटना भाऊबंदकीचे प्रसंग उत्पन्न होणे, बुडीत जाणे , कोर्ट कचेऱ्यांचे सापडणे, चिवट दुखणी सुरु होणे, मानहानी वा मानसिक अत्याचार सहन करावे लागणे हे प्रकार अनुभवास येतात. साडेसाती हा भोग आहे, तो भोगूनच संपविला पाहिजे.


११. सर्व प्रथम साडेसाती म्हणजे काय ते समजुन घेउया. शनि हा ग्रह एका राशीला साडेसात वर्ष त्रास देतो. म्हणून त्याला साडेसाती असे म्हणतात. शनि हा ग्रह वाईट ग्रह आहे असे अनेकांना वाटते. आणि तो आपल्या राशीत आल्यावर आपले वाईट करतो. असे सर्वांनाच वाटते. इतर ग्रहांप्रमाणे शनी देखील आकाशमंडळात भ्रमण करत असतो. याकाळात तो प्रत्येक राशीत साधारण 2.5 (अडीच) वर्षे असतो. याकाळात ज्या व्यक्तीची ती चंद्र राशी असेल (जन्म पत्रीकेत चंद्र ज्या राशीत आहे ती राशी), त्या व्यक्तीला साडेसाती सुरु आहे असे म्हणतात.

१२. आता एक प्रश्न असा उभा राहतो की शनी लग्न राशीत असल्यावर साडेसाती का        नसते ?तो चंद्र राशीत असल्यावरच का असते ?


या प्रश्नाचे उत्तर समजले की साडेसातीत काय होते ते  समजते या साठी आता आपण प्रथम चंद्राचे कारकत्व समजुन घेउया. चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे. आपण जो विचार करतो, स्वप्न बघतो, कल्पना-रंजन करतो ते सर्व चंद्राच्या अधिपत्याखाली येते.

१३. आता साडेसाती मध्ये काय होते ते समजुन घेउया.साडेसाती मध्ये शनीचा संबंध तुमच्या चंद्र राशीशी म्हणजेच तुमच्या मनाशी येतो. चंन्द्र हा मनाचा कारक असल्यामुळे शनि या पापग्रहामुळे साडेसाती असलेल्या जातकाची मानसिक स्थिती खराब होते.मनावर नियंत्रण राहत नाही. या कालात जातकाला आर्थिक ,मानसिक आणि अपघात होणे अशा स्वरुपाचा खुप त्रास होतो.
माणसाचे गर्वहरण,अहंकार नष्ट करुन त्याला वठणीवर आणायच काम शनि करतो.


१४. सर्वसाधारणपणे मेष,सिह,धनु या अग्निराशींना व कर्क,वॄश्चिक,मीन या जलराशीं मध्ये चंन्द्र असलेल्या जातकांना साडेसाती जास्त त्रास होतो.



१५.शनीची साडेसाती असतांना तुम्ही खालील नियम पाळले तर याचा त्रास होत नाही.

1. साडेसातीत हनुमान या वायु देवतेची उपासना करण्यास सांगितली गेले आहे. साडेसातीत हनुमान चालिसा वाचावी.

2.आपल्या कुलदेवतांची उपासना नित्यनेमाने रोज करण्या इतका चांगला उपाय कोणताही नसेल. ते एक सं‍रक्षक कवच असते.

3.दररोज गणेश स्रोत्राचे वाचन करून गणेश दर्शन घ्यावे व नीतीने वागावे, म्हणजे त्रास कमी होतो.
4. शनिवारी उडीद, तेल, तीळाचे तेल व रूईच्या पानांचा हार शनिमहाराजांना घालावा. शनिवार उपवास करावा व शनि चालीसा वाचणे.
5. कोणालाही खोटी आश्वासने देण्याचे टाळा. वाईट प्रवृतींपासून दुर रहावे.
6. उद्या होणार्‍या कामावर आज कोणालाही शब्द देण्याचे टाळा. जेव्हा प्रत्यक्ष हातात काही येईल तेव्हाच दुसर्‍याला शब्द द्या.
7. तुम्ही जे कार्य योजीले आहे त्या विषयी, त्या संबंधित व्यक्तींशीच चर्चा करा. इतरांशी त्याविषयी काहीही बोलायचे टाळा.

8. खोटे बोलायचे टाळा व इतरांच्या स्वत:संबंधीच्या अपेक्षा उंचावु नका.
9. वरील बर्‍याच गोष्टी रोजच्या जीवनात आचरनात आणणे कठीण असल्यामुळे, शक्यतो जास्त बोलण्याचेच टाळा.
वरील नियमांचे पालन केल्यास त्रास होणार नाही.


राशीनिहाय साडेसाती  खालीलप्रमाणे:

1) मेष : ज्यांची मेष राशी असेल त्यांना मीन राशीत शनी आल्याबरोबर साडेसाती सुरू होते. तेव्हा पहिली अडीच वर्षे व शेवटची अडीच वर्षे चांगली जातात. परंतु मेष राशीत शनी आला म्हणजे मधली अडीच वर्षे अनिष्ट जातात.

2) वृषभ : ज्यांची वृषभ राशी आहे त्यांना मेष राशीत शनी आला की साडेसाती पुन्हा सुरू होते व पहिलीच अडीच वर्षे अनिष्ट जातात. पुढील पाच वर्षे त्रासदायक जात नाहीत.

3) मिथुन : यांची मिथुन राशी आहे त्यांना वृषभ राशीत शनी आला की साडेसाती सुरू होते. पहिली पाच वर्षे चांगली जातात. परंतु शेवटची अडीच वर्षे त्रासदायक जातात.

4) कर्क : ज्यांची कर्क राशी आहे त्यांना शनी मिथुन राशीत आला की साडेसाती सुरू होते. पहिली अडीच वर्षे चांगली जातात. परंतु शेवटची अडीच वर्षे त्रासदायक जातात.

5) सिंह : ज्यांची सिंह राशी आहे त्यांना शनी कर्क राशीत आला की साडेसाती सुरू होते. पहिली अडीच वर्षे चांगली जातात. परंतु शेवटची अडीच वर्षे त्रासदायक जातात.

6) कन्या : ज्यांची कन्या राशी आहे त्यांना शनी सिंह राशीत आला की साडेसाती सुरू होते. पहिली अडीच वर्षे त्रासदायक जातात. परंतु शेवटची अडीच वर्षे चांगली जातात.

7) तूळ : ज्यांची तूळ राशी आहे त्यांना शनी कन्या राशीत आला की साडेसाती सुरू होते. पहिली अडीच वर्षे चांगली जातात. परंतु शेवटची अडीच वर्षे त्रासदायक जातात.

8) वृश्चिक : ज्यांची वृश्चिक राशी आहे त्यांना शनी तूळ राशीत आला की साडेसाती सुरू होते. पहिली अडीच वर्षे चांगली जातात. मधली अडीच वर्षे त्रासदायक जातात.

 9) धनू : ज्यांची धनू राशी आहे त्यांना शनी वृश्चिक राशीत आला की साडेसाती सुरू होते. पहिली अडीच वर्षे त्रासदायक जातात. शेवटची पाच वर्षे चांगली जातात.

10) मकर : ज्यांची मकर राशी आहे त्यांना शनी धनू राशीत आला की साडेसाती सुरू होते. संपूर्ण साडेसात वर्षे चांगली जातात.

11) कुंभ : ज्यांची कुंभ राशी आहे त्यांना शनी मकर राशीत आला की साडेसाती सुरू होते. संपूर्ण साडेसात वर्षे चांगली जातात.

12) मीन : ज्यांची मीन राशी आहे त्यांना शनी कुंभ राशीत आला की साडेसाती सुरू होते. पहिली पाच वर्षे चांगली जातात. शेवटची अडीच वर्षे त्रासदायक जातात.

शनीची चांगली फळे केव्हा मिळतात?

जन्मराशीपासून दुसरा, सहावा, दहावा,अकरावा शनी गोचरीने आला म्हणजे त्याची चांगली फळे अनुभवास येतात.

 विद्यार्थ्यांस परीक्षेत यश मिळते. उद्योगधंद्याची भरभराट होते. नोकरीत बढती मिळते. अधिकार मिळतात. पराक्रम आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते. समाजात मानसन्मान मिळतो. सगळ्या गोष्टी चांगल्या घडतात. घरात मंगलकार्ये घडतात. तिसरा शनी आला म्हणजे द्रव्यलाभ होतो. वादविवादात यश मिळते. अशा शनीत काही गोष्टी अनिष्टही घडतात. उदाहरणार्थ पराक्रमाला चांगला असला तरी संततीविषयी त्रासदायक गोष्टी घडतात. द्रव्याचा खर्च फार होतो. आजारपणात काळ जातो. मनाला त्रासदायक गोष्टी अशाच वेळी घडतात








No comments:

Post a Comment