Wednesday, 5 November 2014

हस्ताक्षर आणि स्वभाव(Your handwriting and your nature)

हस्ताक्षर आणि स्वभाव
१.मनुष्य हा मुळातच जिज्ञासू प्राणी आहे. निसर्गातील अनेक अनाकलनीय घटनांचा अर्थ लावणारा माणूस स्वत:चे भविष्य जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असतो. त्यामुळे त्याला प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यात रस आहे. त्याला अनेक प्रश्न पडतात. त्याची उत्तरे शोधण्यासाठी तो जंग जंग पछाडतो. अनेक गोष्टींचा शोध घेतो. सापडलेल्या गोष्टींचे अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो. माणसाच्या जिज्ञासूपणातून अनेक शास्त्रे विकसित होत गेली.  ग्राफोलॉजी (हस्ताक्षरावरून स्वभाव ओळखण्याचे एक शास्त्र ) हे याचं उत्तम उदाहरण आहे. हस्ताक्षराचा विश्लेषणात्मक, शास्त्रोक्त अभ्यास म्हणजेच ग्राफोलॉजी होय. हस्ताक्षर अभ्यासण्याचे काही खास नियम आणि पद्धती आहेत. या नियम आणि पद्धतींचा अभ्यास करून मानवी स्वभावांचा अभ्यास केला जातो.
२.माणसाचा स्वभाव हे एक अजब रसायन आहे. त्याचा संपूर्ण थांग आजपर्यंत कुणालाही लागलेला नाही. आरशात जसे तुमच्या शरीराचे प्रतिबिंब दिसते, तसे तुमच्या अक्षरातून तुमच्या व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब पाहता येते. ग्राफोलॉजीव्दारे अक्षराचे आणि आपल्या सहीचे विश्लेषण केले जाते. हस्ताक्षर तपासल्यावर खूप काही नवीन गोष्टी कळू शकतात, कळतात!
३. हस्ताक्षराद्वारे मनोविश्लेषण करणे हे मानसशात्र व हस्ताक्षर यांच्याशी संबंधीत एक शास्त्र आहे. सोप्या शब्दात आपले, आपल्या व्यक्तिमत्त्वाचे, चारित्र्याचे,मनोवृत्तीचे, जीवनाकडे बघण्याच्या आपल्या दृष्टिकोनाचे व अशा विविध गोष्टींचे विश्लेषण आपल्या हस्ताक्षराद्वारे होते. आपले हस्ताक्षर, आपली सही खऱ्या अर्थाने शाईच्या माध्यमातून कागदावर उतरलेले आपण असतो.
४.ग्रॅफोलॉजी आपल्या  हस्ताक्षराचे विश्लेषण करुन आपले चारित्र्य, आपले गुणदोष यांचे आकलन करते. आपल्या हस्ताक्षरात छोटे छोटे बदल करुन कसा फायदा मिळवायचा याचे मार्गदर्शन करते.
५.आपले हस्ताक्षर, आपली सही यामध्ये केलेले अगदी साधे बदल, आपल्या स्नेहसंबंधातील कठीण प्रश्न सोडवू शकतील, मग ते वैवाहीक संबंध असोत एकमेकांशी जुळण्याचा प्रश्न असो किंवा कुटुंबियांबरोबरच्या, मित्र परिवाराबरोबरच्या संबंधातील तणाव असोत. या सर्व समस्यांवर ग्रॅफालॉजीच्या माध्यमातून आपण नक्कीच मार्ग काढू शकतो.
६.हस्तलिखानातून आपला स्वभाव, गुण, दोष व्यक्त होत असतात, असे हस्तलेखनतज्ज्ञ मानतात.बऱ्याच प्रश्नांची उत्तरे केवळ आपले हस्ताक्षर व सही  याचा अभ्यास करुन मिळतात. तुमच्या सहीत तुमच्या आत्मविश्वासाची पातळी,नातेसंबंधामधला ओलावा, तुमच्या कल्पनाशक्तीची झेप, तुमची निर्णय घेण्याची पध्दत,  तुमच्या मनाच्या कोप-यात दडून बसलेले वेगवेगळ्या प्रकारचे न्यूनगंड,  भीती या सर्व गोष्टींचे प्रतिबिंब स्वच्छ आणि स्पष्ट दिसतं.

सही आणि स्वभाव
.
तुमची सही तुमच्या पर्सनॅलिटीचा आरसा असतो. सही ही व्यक्तीची खरी ओळख असते.त्यावरुन व्यक्तीचा स्वभाव ओळखता येतो सहीच्या पाच सहा अक्षरांतून एखाद्याचा स्वभाव संदर्भातले आडाखे नक्की बांधता येतात. त्यासाठी या काही टिप्स..

1.  ज्या व्यक्तींची सही छोटी असते, अशा व्यक्तींमध्ये आत्मविश्वास कमी असतो असे समजावे.
2.  अनेकांना आपल्या सहीचे अप्रूप असते काही जण तर सतत आपल्या सहीचा सराव करीत असतात अश्या व्यक्तींमध्ये अहंपणा अधिक असतो .आपल्याशिवाय इतर कोणीही ज्ञानी नाही अशी त्यांची धारणा असते.
3.  अनेकांना आपल्या सहीमध्ये गोलाकार काढण्याची सवय असते अशा व्यक्ती आपल्या निर्णयावर ठाम असतात.
4.  काही व्यक्ती आपल्या नावाऐवजी आडनाव अधिक गडद करण्याचा प्रयत्न करतात अशा  व्यक्तींना आपल्या कुटुंबाचा गर्व असतो. आपण कुठल्या कुटुंबात जन्माला आलो हे दाखवण्याचा त्यांचा अट्टहास असल्याचे दिसून येते.
5.  काही व्यक्तींना सही करताना तुटक-तुटक सही करण्याची सवय असते, अशा व्यक्ती प्रचंड एकलकोंड्या असतात.
6.   काही व्यक्तींना आपल्या सहीला गोल करण्याची सवय असते, अशा व्यक्ती इतरांचा विचार न करता, केवळ स्वार्थी वृत्तीने जगत असतात.
7.  आपल्या नावात झाड, फुले, हसरा चेहरा काढणार्‍या व्यक्ती या दुसर्‍यांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतात. अशा व्यक्तींचा स्वभाव भयंकर मुडी असतो.
8.  सहीच्या खाली रेष न मारणाऱ्या व्यक्तीना स्वतःला फारसे महत्व घेणे आवडत नाही , त्यांच्यामध्ये तुलनेने आत्मविश्वास कमी जाणवतो. ही माणसं स्वत:च्या पद्धतीने आयुष्य जगणारी असतात. दुसऱ्यांची लुडबूड त्यांना सहन होत नाही. एरवी स्वभावाने बरी पण थोडी स्वाथीर्ही असतात.
9.  सहीखालील वक्र रेष ही त्या व्यक्तीच्या कला रसिकतेचे प्रतिक असते !
10. सहीच्या खाली पण सही संपल्यावर असलेले टिंब व्यक्तीचा जनसंपर्क आणि मिश्कील वृत्ती दर्शविते.
11. सहीखाली दोन डॉट्स - ही माणसं रोमॅण्टिक असतात.त्यांचे खुप मित्र-मैत्रीण असतात.यांची सौंदर्यदृष्टी चांगली असते. स्वत:च्या दिसण्याबद्दल ते अतिशय जागरूक असतात. इतरांना ते सहज आकर्षित करू शकतात.एकदा घेतलेला निर्णय सहसा बदलत नाही.

12. सहीखाली एक डॉट - या लोकांना क्लासिकल आर्ट्समध्ये इण्टरेस्ट असतो. एरवी साधी आणि कूल वाटणारी ही माणसं एकदा बिनसलं, तर आयुष्यभर तुमच्याकडे बघणारही नाहीत याची खात्री.
13. ज्यांची सही वाचता येते तेवढे ते ओळखायला सोपे, जेवढी सही वाचायला कठीण तेवढे ते ओळखायला कठीण !
14. जे लोक स्वत:ची सही खालील आडवी रेष ओढताना सहीतील अक्षरांना कापतात, ते स्वतःच्या मार्गात स्वतः अडचण निर्माण करतात
15. जे लोक लांबलचक सही करतात त्यांना मुळ मुद्यावर यायला जरा वेळच लागतो!]
16. जे लोक महत्वाकांशी असतात त्यांच्या सहीला नेहमी ३० ते-४५ degree चा angle असतो.
17. जे लोक बहुतांशी नोकरी करतात किंवा नोकरीतल्या माणसाची मानसिकता जपतात त्यांच्या सह्या ह्या पसरत्या flat  असतात!
18. जे लोक पारंपारिक पद्धतीचा वडिलोपार्जित व्यवसाय करतात बहुतांशी त्यांची सहीला angle कमी असतो!
19. शिक्षकी पेशा मधील लोक सहीखाली बहुतांशी आडवी रेष न चुकता मारतात, स्वतःचे व्यक्तिमत्व दर्शविण्यासाठी!
20. जे वडिलांच्या छत्रछायेखाली पारंपारिक व्यवसाय करतात आणि वडिलांचा मान ठेवतात , त्यांच्या सही मध्ये स्वतःचे initial हे वडिलांच्या initial मध्ये झाकले जाते!
21. ज्या व्यक्तींचे लेखन पानाच्या उजव्या बाजूला झुकलेले असते. ते लोक मनाचे ऐकणारे असतात. त्यांच्या दृष्टीने भावनेला महत्त्व असते.ते भावुक असतात. त्यांचा स्वभाव कधी कधी खूप नाटकीय वाटतो. त्यांना क्षणात राग येतो आणि लगेच जातोही.
22. ज्या व्यक्तींचे लेखन पानाच्या डाव्या बाजूला झुकलेले असते. असे लोक मेंदूने विचार करतात. कोणताही निर्णय ते विचारपूर्वक घेतात. त्यांच्या लेखी भावनेला महत्त्व नसते. हे लोक फारसे संवेदनशील नसतात.
23. ज्या लोकांचे लेखन वरच्या बाजूला जाणारे असते असे लोक महत्त्वाकांशी असतात. ते नेहमी सकारात्मक दृष्टीने विचार करतात.
24. ज्या लोकांचे लिखाण खालच्या बाजूला झुकलेले असते असे लोक महत्त्वाकांक्षी नसतात. ते नेहमी नकारात्मक विचार करतात.
25. जे लोक आपल्या लिखाणात कॅपिटल अक्षरांचा जास्त वापर करतात ते इतरांवर अधिकार गाजवतात.
26. ज्यांचे अक्षर गोलाकार असते त्यांच्याकडे स्पष्टतेचा अभाव असतो. स्पष्ट बोलणे, स्पष्ट विचार यांचा त्यांच्याकडे अभाव जाणवतो.
27. काही जणांचे अक्षर खूप गुंतागुंतीचे असते. त्यातील अक्षरे एकमेकांत घुसलेली असतात. काही वेळा असे अक्षर वाचणेदेखील कठीण होते. हे लोक नेहमी कोणत्या ना कोणत्या समस्येमध्ये अडकलेले असतात.
28. ज्या लोकांचे अक्षर सरळ आणि एकसंध असते असे लिखाण सहज आणि एका कटाक्षामध्ये वाचता येते. अशा लोकांच्या विचार करण्यामध्ये, व्यवहारामध्ये एक प्रकारची स्पष्टता पाहायला मिळते. हे लोक आयुष्यात यशस्वी होतात.
29. काही लोक शब्द लिहिताना किंवा वाक्याची सुरुवात करताना पहिल्या अक्षरावर कमी दाब देतात आणि त्यांचा हा शब्द थोडा आतल्या बाजूला झुकलेला असतो. असे लोक आरंभशूर असतात.
30. ज्यांच्या लिखाणामध्ये शब्दांवर जोर आढळतो ते दृढ विचारांचे असतात.
31. काही जणांच्या लिखाणात शब्द मध्येच तुटतात. असे लोक विचारशील असतात. ते खूप विचार करणारे असतात.
32. ज्यांच्या लिखाणामध्ये खाडाखोड अधिक असते असे लोक संकटांना मागे टाकून प्रगती करणारे असतात. ते मोठय़ा मनाचे असतात. ते आपली चूक मान्य करून त्यामध्ये सुधारणा करतात. त्यामुळेच ते प्रगती करू शकतात.
33. अति बारीक अक्षर- निर्णयास विलंब ,चिकित्सा
34. मोठे अक्षर. तडजोड वृत्ती , नजीकचा विचार अधिक ,साधेपणा .
35. समयसूचकता नसणे] वेढब अक्षर,सामान्य बुद्धिमत्ता .
36. ] गोलाई अक्षर ; गोडपणा ,लाघवी पणा ,मधुर वाणी .
37. ] अक्षरावरील रेघमनावरील ताबा , पण दुसर्यावर अवलंबून राहणे.
38. अक्षरावर रेषा नसणे ; स्वतंत्र विचारशैली
39. .! खाडाखोड असलेली अक्षरे - मनाची अस्थिरता
पुसट अक्षर निराशावाद
गाठीयुक्त अक्ष निर्णयात ठामपणा!
40. मुळाक्षर गडद असणे  जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन
41. संपूर्ण नाव सही म्हणून लिहिणं हे लोक स्वत:च्या मताशी प्रामाणिक असतात. यांची विल पॉवर खूप स्ट्राँग असते हे कुठेही अँडजस्ट होतात. शिवाय कुणाशीही जुळवून घ्यायची तयारी असते.. चांगल्या मनाचे असतात.
42. क्या आप जानते हैं धन संबंधी मामलों में आपके हस्ताक्षर भी काफी महत्वपूर्ण भूमिका निभाते हैं. यदि हस्ताक्षर सही हैं यानि ज्योतिष के अनुसार शुभ हैं तो आपको पैसों के संबंध में उन्नति प्राप्त होती है। जबकि गलत और दोषपूर्ण हस्ताक्षर करने पर पैसों की तंगी का सामना करना पड़ सकता है। पैसों की तंगी से बचने के लिए ज्योतिष शास्त्र में हस्ताक्षर के संबंध में कुछ ध्यान रखने योग्य बातें बताई गईं हैं। इन बातों को अपनाने से कुछ दिनों में धन संबंधी परेशानियों को कम किया जा सकता है। आप बहुत धन कमाते है और फिर भी बचत नहीं होती है तो अपने हस्ताक्षर(signature) के नीचे की ओर पूरी लाईन खीचें तथा उसके नीचे दो बिंदू बना दें।

No comments:

Post a Comment