Sunday 5 April 2020

वृषभलग्न / वृषभरास (Taurus Ascendent / Moon in Taurus)


                        वृषभलग्न / वृषभरास

ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करतानाव्यक्तीची जन्मकुंडली महत्त्वाची मानली जातेव्यक्तीची जन्मतारीख - जन्मवेळ आणि जन्मठिकाण या तीन गोष्टी अचूक असतील तर, पंचागांच्या आधारे त्याची जन्म कुंडली मांडली जाते. जन्म क्षणी पूर्वक्षितिजावर जी रास उदित असते तिला'लग्नरासअसे म्हटले जाते. त्या स्थानापासून सुरुवात करून, बारा स्थानांमध्ये बारा राशीची विभागणी केली जाते.नंतर ज्या राशीत जे ग्रह असतील ते मांडले जातात व 'जन्मलग्नकुंडलीतयार होते.कुंडलीत असलेली ग्रहस्थितीस्थाने आणि स्थानगत राशी यांचा एकत्रित अभ्यास म्हणजे कुंडलीचा  अभ्यास  होय.कुंडलीतील बारा स्थाने  व त्यावरून पाहावायच्या प्रमूख गोष्टींचा तक्ता खालीलप्रमाणे :--



जन्मकुंडलीमध्ये लग्नस्थान हे अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. या स्थानावरून स्वरूपशरीराची ठेवणस्वभावप्रकृतीप्रवृत्तीजातत्वचाआरोग्य व रोगप्रतिकार शक्तीव्यक्तिमत्त्वचारित्र्य,जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनआयुष्याचा प्रारंभ व एकंदरीत आयुष्य कशा प्रकारचे असेल याचा विचार करतात. त्यामुळे जन्मलग्नी उदित असलेली राशी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. या राशीचा अधिपती बहुतेक कुंडल्यांत त्या कुंडलीवर वर्चस्व गाजवतो. त्याच्या शुभाशुभ स्थितीनुसार आयुष्यात सुखदुःखे अनुभवास येतात जातकाच्या एकंदर व्यक्तिमत्त्वाचा विचार या स्थानावरून केला जातो. या स्थानातील राशी व ग्रह यांचा जातकाच्याव्यक्तिमत्त्वावर जोरदार परिणाम होत असतो.


                          वृषभलग्न




जन्मकुंडलीमध्ये प्रथमस्थानात  वृषभ  (2) रास असता अथवा व्यक्तीची जन्मरास   (चंद्र वृषभ राशीत असता) वृषभ असताअथवा रवी वृषभ राशीत असता जातकाच्या व्यक्तिमत्त्वाविषयी तसेच आयुष्याबाबत सर्वसामान्यत पुढील गॊष्टी आढळून  येतात:--



१) वृषभ ही राशिचक्रातील दुसरी रास असून, या राशीचा स्वामी शुक्रासारखा कलेचा कारक ग्रह आहे.  पृथ्वीतत्त्वाची  ही रास असून, वैश्य वर्णाची आहे, स्थिर स्वभावाची असून, स्वीतत्त्वाची ही रास आहे.  या राशीचा अंमल मुख्यतः मुखावर असतो.  

२) या मुळे वृषभ राशीचे जातक देखणे आणि रेखीव असतात.  सौंदर्याची लालसा        असते  सुखोपभोग , आराम  मिळविण्याची यांची इच्छा असते.  दगदग , परिश्रम याची फारशी आवड नसते . मोहकहास्य , आकर्षक  व्यक्तिमत्त्व यामुळे लोक यांच्याकडे पटकन आकर्षित होतात 

 ३) हौशी असून मित्रमैत्रिणींना जमवणे , पाट्या करणे , आनंदात खाणे-पिणे , गाणे बजावणे करुन, हास्यविनोदात वेळ व्यतीत करणे यांना मनापासून आवडते . त्यासाठी ते आपल्या जवळचे पैसे खर्च करण्यास मागे पुढे पाहात नाहीत . यांना पैशाची कमी देखील नसते .

४) वृषभ राशीचा स्वामी शुक्र असल्याने कलेची जोपासना केली जाते.सिनेमा - नाटकात काम करणे , चित्रकला , संगीत शिकणे याची यांना आवड असते . पण यासाठी आवश्यक असलेली मेहनत करण्याची यांची फारशी तयारी नसते . कमी श्रमात जास्त मोबदला कसा मिळवता येईल याकडे यांचा कटाक्ष असतो.  अर्थात त्यासाठी आवश्यक असलेले नियोजन करण्याची यांची क्षमता असते . 

 ५) वृषभ राशीच्या लोकांच्या मागे टुमणे  लावले की , ते भरभरुन काम देखील करतात . पण तेवढ्या पुरतेच ! इतर वेळेस मात्र निवांत बसणे , गप्पा मारणे , मेलवर चॅटिंग करणे , वॉट्सअपवर मेसेज टाकणे , टी . व्ही पाहणे यांसारख्या गोष्टी करण्यात यांना आनंद असतो . 

६) विषयवासनेकडे यांचा बराच ओढा असतो .भिन्न लिंगी व्यक्ती यांच्याकडे बऱ्याच आकर्षित होतात. त्यामुळे यांचा भिन्नलिंगी मित्र परिवार बराच असतो. यांना माणसे चटकन वश होतात. टीका करण्यापेक्षा माणसांचा अभ्यास करुन त्यांना सल्ला देणे यांना चांगले जमते. यांना लवकर राग येत नाही. 

७) समजूतदारपणा बराच असतो . स्वत: आनंदी चांगले राहतात आणि दसऱ्यानेही तसेच आनंदी राहावे असे यांना वाटते . मध्यस्थ होऊ तडजोड करणे . दोन माणसांमधील वाद मिटविणे हे यांना चांगले जमते .थोडक्यात कलाकौशल्याची आवड सुखोपभोग घेण्याकडे झुकणारी वृत्ती , हौशी , मध्यममार्गी , समजूतदार असे वृषभ राशींचे स्वरुप असते .

८) वृषभ राशीमध्ये हे गुण असले तरी काही अवगुण असतात. ते त्यांनी दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या लोकांना पार्ट्या व चैनीची आवडअसते.कार , मोबाईल , घरातील फर्निचर या उपभोगाच्या वस्तू सतत नवीन घेण्याची आवड असते त्यात पैसा बराच खर्च होत राहतो. मित्र - मैत्रिणींना जमवून स्वत: चा पैसा खर्च करुन, चैन केल्यामुळे खर्च तर आवाक्याबाहेर जातोच शिवाय फायद्यासाठी मित्रमंडळ गोळा होते . खर्चिक प्रवृत्ती आणि असे आपमतलबी मित्रमंडळ यांच्यापासून सावध राहण्याची गरज असते .

९) विषयवासनेत यांचे मन लवकर भरकटते. तसेच व्यसन लागण्याची शक्यता असते , अनैतिक संबंधांची आस आणि अमली पदार्थाची नशा हे दोन मोठे अवगुण ठरण्याची शक्यता असते. त्यामुळे वृषभ राशीच्या व्यक्तींनी यापासून दूरच राहावे .

१०) या राशीच्या माणसांना फार महत्त्वाकांक्षा नसते. त्यामुळे बुद्धिमत्ता , कलेचा वारसा असूनही प्रसिद्धी अधिकार , प्रतिष्ठा यापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता असते. कुणीतरी मागे टुमणे लावल्याशिवाय ही माणसे कामाला लागण्याची शक्यता नसते. याशिवाय पैसा , सौंदर्य या गोष्टीचा त्यांना गर्व होतो. आपल्यापेक्षा कमी दर्जाच्या लोकांशी हे फार संबंध ठेवत नाहीत. त्यांच्याकडे जरा तुच्छतेने बघतात. या गोष्टी टाळण्याची आवश्यकता आहे.  

 ११) या राशीच्या व्यक्तींनी आळशीपणा , सुस्तपणा याला आवर घालणे गरजेचे आहे . एखादा निर्णय घेतल्यानंतर त्याच्यावर धडाडीने अंमलबजावणी करणे आवश्यकअसते.   सुप्त  कलागुणांना वाव देऊन कष्ट करुन पुढे आले पाहिजे . कठोर परिश्रमाला पर्याय नाही हे लक्षात घेऊन वाटचाल करत राहिली पाहिजे. खर्चिकप्रवृत्ती , विषयवासना आणि व्यसने यापासून दूर राहण्याचा मनापासून प्रयत्न केला पाहिजे .

१२) प्रकृती स्वास्थ्य : - वृषभ राशीचा अंमल गळा , स्वर आणि घशावर असतो . त्यातून या माणसांना फळे , सरबते , शीतपेये व गोड पदार्थ यांची फार आवड असते . त्यामुळे या राशीच्या माणसांना घशाचे विकार , सर्दी , कफ , घसा बसणे , टॉन्सिल्स यासारखे आजार होतात .

१३) आळशी आणि सुस्त असल्याने बैठ्या जीवनशैलीमुळे होणारे आजार जसे वातुळपणा , पोटात गॅसेस धरणे , मधुमेह , मधुमेहामुळे लघवीसंबंधी आजार , मुत्राशयाचे विकार इ रोग होण्याची शक्यता असते . घशामार्गे , श्वसननलिकेमार्गे फुप्फुसामध्ये जंतुसंसर्ग होण्याची भीती असते .या माणसांनी योग्या जीवनशैली नियमित सकस  आहार आणि व्यायाम याचा आपल्या जीवनात समावेश करावा .

१४) वृषभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात सुबत्ता आणि समृद्धी असते . दूरच्या नातेवाईकांकडून वारसा हक्काने संपत्ती मिळते . यांना पदार्थ बनविण्याची आणि ते दुसऱ्याला खाऊ घालण्याची आवड असते . प्रेम कशाला म्हणतात , हे शिकविण्याचे काम यांना चांगले जमते.

१५) विवाहितलोकांना सौख्य,संततिसौख्यउत्तम मिळते.वडिलांकडून,भावंडांकडून फायदा     होतो.   

१६) सर्वसाधारणपणे यांना कौटुंबिक सौख्य उत्तम मिळते . यांचे आपल्या घरी येणे लोकांना हवेहवेसे वाटते  हे लोक जाणूनबुजून कोणाचीही गैरसोय करत नाहीत नेहमी चांगल्या कामात रस घेणाऱ्या वैयक्तिक चातुर्याने सुखमय जीवन जगणाऱ्या , उंची वस्त्रे वापरणाऱ्या सुगंधी  अत्तरे , अलंकार , दागदागिने यांची आवड असणाऱ्या असतात .

१७) वरील सर्व विवेचन पाहिले असता लक्षात येते की, पुरुषापेक्षा स्त्रियांना ही रास अधिक अनुकूल असते . सौंदर्य , धन आणि अलंकार अशा सर्वच दृष्टीने फायद्याचे असते . या राशीच्या स्त्रिया गोऱ्यापान , तरतरीत व आकर्षक असतात . श्रीमंती आणि सुखवस्तूपणाचे तेज चेहऱ्यावर दिसून येते या स्त्रियांना उंची-वस्त्रे , अलंकार , दागदागिने यांची आवड असते . या स्त्रियांना आपल्या रुपाचा गर्व आढळतो . या स्त्रिया वयापेक्षा अधिक तरुण दिसतात .

१८) संसारीक वृत्ती , टापटीप , काटकसर या गोष्टींचा अभाव आढळतो. खर्चिक प्रवृत्ती आढळते . भारी किमतीच्या साड्यादागदागिने खरेदी करण्याची आवड असते . पंचतारांकित हॉटेल्स,शॉपिंग मॉल ही यांची प्रिय ठिकाणे असतात थोड्या आळशी आणि सुस्त असतात . आरामात लोळत टीव्ही पाहणे यांना अधिक भावते . घरात उंची फर्निचर , श्रीमंतीचे प्रदर्शन करणाऱ्या देश विदेशातल्या वस्तू घरात आणणे यांना आवडते. पण त्या संभाळणे , त्यांचे जतन करणे यासाठी घरात मोलकरणी लावण्याकडे कल असतो . एकूणच शांतताप्रिय आनंदी , भोगी , सुखासीन आयुष्य जगण्याकडे यांचा कल असतो .

१९) वृषभ राशीचे पुरुष अंगाने भरलेले , सुखवस्तू , भारदस्त  दिसतात . प्रेमविवाहाची आवड असते शांत सरळ व उंची जीवन आवडते . दगदग , परिश्रम याची फारशी आवड नसते . 

२०) शुभ रंग :- वृषभ राशीच्या माणसांना गुलाबी, क्रीम आणि पांढरा हे रंग शुभ असतात. त्यांनी या रंगाचे कपडे परिधान केल्यास फायदे होतात. जर या रंगाचे कपडे वापरता आले नाहीत तर निदान या रंगाचा हातरुमाल तरी जवळ ठेवावा. आकाशी आणि खाकी रंग यांना आकर्षित करतात. या राशीच्या माणसांनी शुक्रवारी गुलाबी रंगाचा वापर करावा निदान त्या रंगाचा हातरुमाल तरी जवळ ठेवावा.

२१) अशुभ रंग :- काळा आणि लाल हे रंग वृषभ राशीसाठी अशुभ ठरतात या राशीच्या लोकांनी हे कपडे अजिबात वापरू नयेत. मनात अस्वस्थता निर्माण होते व कामे बिघडतात. शक्य नसेल तर चॉकलेटी रंग अपवादात्मक परिस्थितीत वापरावा पण काळा, लालहे रंग वापरु नये. दिवस वाईट जाईल.

२२) 
शुभवार :- सोमवार, बुधवार आणि शुक्रवार हे शुभ वार आहेत
२३) अशुभ वार:- शनिवार अशुभ वार आहे.

२४) अशुभ तारखा:- ५,१५,२० या तारखा वृषभ राशीसाठी अशुभ आहेत.  

२५) उपास्य देवता :- श्रीकृष्ण, गणपती, संतोषीमाता या उपास्य देवता आहेत याची       उपासना करावी.

२६) भाग्यरत्न :- अस्सल हिरा, सोन्यात करंगळी शेजारील बोटात धारण करावा. शुक्रवारी धारण करावा ही रत्ने सिद्ध करुन वापरावीत.


२७) जन्मकुंडलीमध्ये प्रथमस्थानात  वृषभ  (2) रास असताधनस्थानी मिथुन रास येत असल्याने चेहऱ्यावर तारुण्य असते.  दंतपंक्ती सुंदर असतात.मिथुन ही व्यवहारी रास असल्याने हे लोक पैसा कसा जास्त मिळेल ते पाहात असतात. यांचे वक्तृत्व चांगले असते. 
बुद्धिमत्तेचा व्यावहारिक उपयोग करतात. लेखन इ व्यवहारापासूनकमिशनएजंट वा ब्रोकरेजमधून पैसा मिळतो. यांना सट्टाशेअर्समार्गे पैसा मिळतो.मात्र पैशाचा व्यवहार हे जपून करतात. हे लोक व्यापारामध्ये यशस्वी होतात. काहींना पक्षी पाळण्याची हौस असते. विनोद सांगण्याची संवय असते. तेच तेच चुटके सारखे ऐकवतील. कधी कधी डोळ्यांत खुनशी तेज चमकते. जलद बोलण्याची संवय असते. कधी बोलताना कलकलतात. बुध बिघडल्यास वाणीदोष आढळतो.

२८) जन्मकुंडलीमध्ये प्रथमस्थानात  वृषभ  (2) रास असता,तृतीयस्थानी चंद्राची कर्क येत असल्याने , पाठीवर बहीण असते.पाठीवरच्या भावंडास प्रसिद्धी मिळते. या व्यक्ती चंद्रकलेप्रमाणे सतत बदलत असतात.यांचा चंचलपणा पाहाण्यासारखा असतो. यांचा कंठ मधुर असतो. यांना भटकण्याची हौस असते. हे अनेक गोष्टींचा संग्रह करतात. स्त्रियांशी गप्पा मारण्याची संवय असते. यांना कोल्ड्रिंक्सची आवड असते. टेनिसबॅडमिंटनहे खेळ प्रिय असतात. यांना बोटिंगजलप्रवासगार्डनिंगफुलझाडे इत्यादींचीआवड असते. त्याचप्रमाणे निसर्ग सौंदर्यात हे रमतात. शेजाऱ्यांबरोबर यांचे
संबंध सौहार्दपूर्ण असतात. 
चंद्र बिघडला असल्यास हे लोक मानसिक रुग्ण बनतात. कोणत्याही मनाविरुद्ध घटनेने हे लवकर निराश होतात. यांना प्रवासातही प्रकृतीसंबंधी त्रास होतात. यांचा मूड वारंवार बिघडत असतो.व्यापारी लोकांशी मैत्री हे फल काही कुंडल्यांत अनुभवास येते.

२९) जन्मकुंडलीमध्ये प्रथमस्थानात  वृषभ  (2) रास असता,चतुर्थांत सिंह राशी येत असल्याने असता खानदानी घराण्यात जन्म असतो. ही राजराशी
असल्याने यांचा जन्म सरकारी नोकरीत असलेल्या घराण्यात असतो. यांचे
आई-वडील सरकारी मानसन्मान प्राप्त केलेले असू शकतात. यांचे घरही
सरकारी नोकरांच्या बस्तीत असते. यांना डोंगराळ वातावरण आवडते. खंडाळा
लोणावळा यासारख्या जागी हे लोक वारंवार फिरायला जातात. ज्यांची ऐपत
असते त्यांचे बंगलेही येथे असू शकतात.यांच्या आईचा स्वभाव मानीमहत्त्वाकांक्षीक्रोधी व गर्विष्ट असतो. ती फार मेहनती व घराण्याचा लौकिक वाढविणारी असते. रवी बलवान असेल तर वरिष्ठ लोकांच्या घराण्याशी मैत्री राहाते.
सिंह रास वा रवी दूषित असता घराण्याची इज्जत धुळीला मिळते. वंश-परंपरागत इस्टेट नष्ट होते. मातृपितृसुख मिळत नाही. घराण्याबद्दल खोटाअहंकार असतो किंवा ते इतिहासजमा झालेले असते.

३०) जन्मकुंडलीमध्ये प्रथमस्थानात  वृषभ  असता,पंचमात कन्याराशी येत असल्याने.  
यांची संतती अत्यंत हुशार आढळते. त्यांच्याकडे व्यवहारचातुर्य व चिकित्सक-
पणा असतो. संततीचे प्रमाण अल्प असते.यांचे वाचन खूप असते. हे वाणिज्य शास्खेमध्ये डिग्री घेतातत्याचप्रमाणे कायद्यातही हे पदवी संपादन करतात. यांना व्यवहारी शिक्षण घेणे जास्त पसंत असते. कन्या रास वैद्यकीचा अभ्यासही दर्शविते. परंतु जास्त करून कलाकुसरीची कामेचित्रकळापेंटिंग्जशिल्पकला यामध्ये हे लोक
चमकतात.यांना टेनिसबॅडमिंटनटेबलटेनिसकार्डगेम्सकॅरम आदी खेळ आवडतात. क्वचितच क्रिकेटही खेळतात. यांना स्त्रियांचे खूप आकर्षण असते स्त्रियांशी गोड बोलण्याची संवय असते. कित्येक पत्रिकांत यांचा प्रेमविवाह झालेला आढळतो.
 पंचमातील कन्या रास शक्यतो न बिघडणे लैंगिक संबंधाच्या दृष्टीने हिताचे असते.बुध दूषित असल्यास संतती नाही.  बुध हा शनीने बिघडल्यास यांनाशेअर्ससट्टादलाली,   सिनेमानाटकेसंगीतकला इत्यादीमार्गानी धनळाभ होतो. 

३१) जन्मकुंडलीमध्ये प्रथमस्थानात  वृषभ  असता, षष्ठात तुळरास येत असल्याने   असता, हे स्वतःहून इतरांशी शत्रुत्व ओढवून घेतात. त्यांचास्वभाव व वागणूक ही शत्रुत्व निर्माण करीत असतात. शुक्र शुभसंबंधीत असता हे कोणाशी शत्रुत्व करत  नाहीत. परंतु तूळेत पापप्रह असता शत्रुत्व होते. स्त्री ही संघर्ष व शत्रुश्व निर्माण होण्याचे कारण असू शकते. विवाहामुळे कलहनिर्माण होतात. स्त्रीचे नातेवाईक विरोधकरतात. स्त्रीयांच्या कुंडलीत सासरची माणसे दुष्मनासारखी वागतात. षष्ठात तूळ रास असता संसर्गजन्य रोग होऊ शकतात मूत्रपिंडकमर,पाठीच्या कण्याचा कमरेमधील भाग यांमध्ये विकार होतात. ह्यांना मधुमेह,मूतखडामूत्रदाहकमरेत लचकअरतिलंगिक सेवनाने होणारे विकार होतात.ह्यांना स्नियांचे व्यसन जबरदस्त असते. ह्यांना चामडीचे रोगही होतात.
कितयेकांना कमरदुखी सतावते. व्यसनाधीनता असते. षष्ठातील तूळरास नोकरी आरामाची दर्शविते. गायकनटसंगीतज्ञ,ट्रान्सपोर्टमध्ये नोकरीपेंटर्सविवाह जुळवणारे मध्यस्यसौंदर्यप्रसाधनेविकणारे फोटोग्राफर्सफर्निचर्सचाधंदाफुलवालेनर्सरी चालविणारेशिंपी इत्यादी गोष्टींशी नोकरीधंद्यानिमित्त संबंध असतो.
ही रास पापग्रहाने फारच दूषित असल्यास, व्यसनी लोकांची संगत लागून
शरीरप्रकृतीचे वाटोळे करून घेतात. जुगारादी मार्गाने धननाश होतो. चैनीत
व ऐशबाजीत आयुष्य खर्च होते.  ख्रियांना गर्भाशयाचे विकार होतात.


३२) जन्मकुंडलीमध्ये प्रथमस्थानात  वृषभ  असता, सप्तमस्थानी वृश्चिक रास येत असल्याने , असता स्त्रीचा बांधा आकर्षक असतो. स्वभावाने ती अतिशय जिद्दीनिग्रही व भावनाप्रधान असते. तिला राग लवकर येतो व झालेला अपमान दीर्घकाळपर्यंत स्मरणात ठेवते. गृहकृत्ये व जेवणखाण यांमध्येती तरबेज असते. परंतु प्रत्येक गोष्ट तिच्या मनासारखी व्हावी अशी तिचीइच्छा असते. तिची मते आग्रही असतात. ती नवऱ्यावर खूप प्रेम करते परंतु त्याच्याकडूनसुद्धा तशीच अपेक्षा ठेवते. पती-पत्नीस लैंगिक भूक प्रचंड असते.हे लोक ह्या बाबतीत खूप आक्रमक असतात. लैंगिक आकर्षणामधून स्त्रीची प्राप्ती होते. सप्तमात वृश्चिकेत शुभग्रह असता स्त्री (अथवा पती) सुशिक्षित,कर्तबगार व प्रामाणिक असते.
वृश्चिकेत पापग्रह असून मंगळ दूषित असता स्त्री दिसायला कुरूप व कंजूष
असते.  ह्यांचे लैंगिक जीवन प्रामाणिक नसते. ह्यांची विषयवासना
जबरदस्त असते. ह्यांच्या स्त्रीसंबंधीही असेच म्हणता येईल. ह्यांच्या वैवाहिक
जीवनसाथींची गुप्त प्रकरणे असू शकतात. वृश्चिकेत शुक्र दूषित असल्यास
ह्यांचे जीवन कामाग्नित होरपळत असते. नोकराणीशी लैंगिक संबंध ठेवण्याचा
प्रयत्न करतात. येथे शनी-राहू युती असल्यास लैंगिक दुर्बलता वा नपुंसकता
असण्याची शक्यता असते
वृश्चिकरास भागीदारीच्या धंद्यात सावधगिरीचा इशारा देते. भागीदार
'बनेलअसतात. स्वतःच्या स्वार्थासाठी बाटेल ते खटाटोप करतात व ह्यांना
बुडवतात.२७।२८ व्या वर्षी विवाइयोग संभवतो.

३३) जन्मकुंडलीमध्ये प्रथमस्थानात  वृषभ  असता,  अष्टमात धनु रास येत असल्याने , असता मनुष्य दीर्घायू असतो. गुरू अष्टमेश असल्याने मृत्यू शांत अवस्थेत इोतो. परंतु ही अग्निरास असल्याने अपधाती मृत्युहीसंभवतो. ह्यांना अग्नी व शस्र भय असते. विशेषतः ह्या राशीत मंगळ असता शरीराची मोडतोड करतो. 
गुरू ग्रह बलवान् असल्यास ह्यांना अचानक धनलाभाचे प्रसंग येतात.
लॉटरीमार्गे धन मिळते. गुरू हा सरळ मार्गाने धन देणारा असल्याने व लॉटरी
सरकारमान्य असल्याने हा मार्ग हे पसंत करतात. वडिलाजित वारसा लाभतो.

३४) जन्मकुंडलीमध्ये प्रथमस्थानात  वृषभ  असता, नवमात मकर रास येत असल्याने   वडील कर्मठ व परंपरावादी असतात. धर्ममताबद्दल ते आग्रही असतात. आपल्या
कर्तव्यात ते अजिबात चुकारपणा करणार नाहीत. घरात कडक शिस्त पाळणारे
असतात.हे लोक संकुचित् विचार जोपासतात.आपले तेच श्रेष्ठ मानतात व दुसऱ्यांच्या बारीकसारीक दोषांत लक्ष घालतात.हे संन्यस्त वृत्तीचेयोगाभ्यास करणारेवेदान्तादी गहन विषय अभ्यासणारे असतात. वयाच्या तिसाव्या व ३६ व्या वर्षी भाग्योदय होतो. ८ हा भाग्यांक असून निळा रंग फायदेशीर असतो. 

३५) जन्मकुंडलीमध्ये प्रथमस्थानात  वृषभ  असता, दशमात कुंभरास येत असल्याने विद्याव्यासंगात चिकाटीसंशोधनात दीर्घपरिश्रमनाविन्याची ओढज्ञानाचीआवडपारंपरिकतेचा
अमिमानअचाट सुभरणशक्तीउपयुक्त सल्लामसलत या गुणांचा परिपोष होत
असल्याने यांना आवडणाच्या व साध्य होणाऱ्या उद्योगधद्यामध्ये खालील
विषयांचा समावेश असतो.ही बौद्धिक राशी असल्याने सर्व प्रकारची बौद्धिक कामे करण्यास हे लोक लायक असतात. मोठमोठ्या जागा हे लोक भूषवितातगूढ विद्यांवर पुस्तके लिहितात.
बैज्ञानिकसंशोधक. इलेक्ट्रिसिटी-अणुशक्ती-विमानविद्या-कॉम्प्यूटर्स-
टेलिव्डिजन यांमध्ये कार्य करणारेखगोलशा्ज्ञ, ज्योतिषीतांत्रिक कायदेशीर
आर्थिक सल्लागारमोइिनीविद्या-टेलिपथी जाणणारेमेंदूशास्रविशारदतंत्रज्ञ,
तत्तवज्ञलेखकवकीलरेल्वे कामगारबौद्धिक कामे करणारेइंजिनियर्स,
सनाजशाख्वज्ञ इत्यादी
ही रास दूषित असल्यास हलक्या प्रकारचे धंदे वा नोकन्या कराव्या
लागतात. हमालचांभारचामड्याचा व्यापारशिपाई इत्यादी साधी कामे
करावी लागतात. कष्ट जास्त व दाम कमी असते. हे नास्तिकधर्मकर्म न
पाळणारेस्वार्थासाठी धडपडणारे व विश्वासघातकी असतात.


३६) जन्मकुंडलीमध्ये प्रथमस्थानात  वृषभ  असता, एकादशस्थानी मीनरास येत असल्याने  कलावंत,   सिनेमाक्षेत्रातील मंडळी,संगीतकारचित्रकारपेंटरकवी या प्रकारची मित्रमंडळी असतात. मित्रवर्ग भरपूर असतो.  गूढवादीज्योतिषीरहस्यकथाकारजासूस यांच्याही ओळखी असतात. ह्या लोकांकडून आर्थिक फायदे होतात. ह्या व्पक्तींना वारसाहक्काने किंवा मृत्युपत्राने धनमिळते.त्याचप्रमाणे प्रॉब्हिडंटफंडविम्याचेपैसेपत्त्यांचा जुगार यांमधून पैसा मिळतो.फोटोप्राफीच्या व्यवसायापासूनही पैसा मिळतो. यांच्याकडे अत्याधुनिकसुखसोयी असलेले घर असते. यांची इच्छातृप्ती होते.
मीन रास त्रिघडली असता मात्र मित्र आळशी व मद्यपी असतात. ते
बेकायदेशीर धंद्यात गुंतलेले असतात. त्यांच्यामुळे हे कायद्याच्या कचाव्यात
सापडण्याची शक्यता असते.  व्यसनाधीनतेत आयुष्य जाते.


३७)जन्मकुंडलीमध्ये प्रथमस्थानात  वृषभ  असता, बाराव्या स्थानी  मेषरास येत असल्याने व्यक्ती उतावळेपणाने व अविचाराने पैसा खर्च वा गुंतवणूक करते. यांचे पैसे चोरीलाही जाऊ शकतात, यांची प्रॉपर्टी आगीच्या भक्ष्यस्थानी पडू शकते. ह्यांची गुंतवणूक लोखंड,पोलादतंबाखू या वस्तू तयार करणाऱ्या कंपनीत किंवा जमिनीत असते
लैंगिक सुखाच्या बाबतीत हे उतावळे असून, ह्यांचे लैंगिक जीवन स्वैर असू शकते. 
ह्यांचा एखादा भाऊ गुप्तशत्रुत्व करतो. अपधात होऊन हे हॉस्पिटलमध्ये राहातात. डाव्या डोळ्याला अपघात वा खुपऱ्या होतात. भावंडांसाठी पैसा खर्च होतो. यांच्या तळपायाला खिळाटोकदार व धारदार लोखंडाची वस्तू लागते व त्रास होतो. 
ही रास दूषित असल्यास ख्रीच्या आजारासाठी कर्ज काढावे लागते. तिला हॉस्पिटलमध्ये खितपत पडावे लागते. तिचे एखादे ऑपरेशन ही होऊ शकते. ही रास पापग्रहाने दूषित असून मंगळही दूषित असल्यास खूनबलात्कारमारामारीचोरीदरोडेखोरी यासाठी तुरुंगात जावेलागते. भागीदारीच्या धंद्यात तोटा होतो. लाल रंग नुकसानकारक ठरतो.




1 comment: