सिंह लग्न / सिंह रास
ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करताना, व्यक्तीची
जन्मकुंडली महत्त्वाची मानली जाते, व्यक्तीची जन्मतारीख - जन्मवेळ आणि जन्मठिकाण या तीन गोष्टी अचूक असतील तर, पंचागांच्या आधारे त्याची जन्म कुंडली मांडली जाते. जन्म क्षणी
पूर्वक्षितिजावर जी रास उदित असते तिला 'लग्नरास' असे
म्हटले जाते. त्या स्थानापासून सुरुवात करून, बारा
स्थानांमध्ये बारा राशीची विभागणी केली जाते. नंतर ज्या राशीत जे ग्रह असतील ते
मांडले जातात व 'जन्मलग्नकुंडली' तयार होते. कुंडलीत असलेली ग्रहस्थिती, स्थाने
आणि स्थानगत राशी यांचा एकत्रित अभ्यास म्हणजे कुंडलीचा अभ्यास होय. कुंडलीतील
बारा स्थाने व त्यावरून पाहावायच्या प्रमूख
गोष्टींचा तक्ता खालीलप्रमाणे :--
जन्मकुंडलीमध्ये लग्नस्थान हे
अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. या स्थानावरून स्वरूप, शरीराची ठेवण, स्वभाव, प्रकृती, प्रवृत्ती, जात, त्वचा, आरोग्य
व रोगप्रतिकार शक्ती, व्यक्तिमत्त्व, चारित्र्य,जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, आयुष्याचा प्रारंभ व एकंदरीत आयुष्य कशा प्रकारचे असेल याचा विचार करतात.
त्यामुळे जन्मलग्नी उदित असलेली राशी अत्यंत महत्त्वपूर्ण
भूमिका बजावते. या राशीचा अधिपती बहुतेक कुंडल्यांत त्या कुंडलीवर वर्चस्व गाजवतो. त्याच्या शुभाशुभ स्थितीनुसार आयुष्यात सुखदुःखे अनुभवास येतात जातकाच्या एकंदर व्यक्तिमत्त्वाचा विचार या स्थानावरून केला जातो. या स्थानातील राशी व ग्रह यांचा
जातकाच्या व्यक्तिमत्त्वावर जोरदार परिणाम होत असतो.
सिंह लग्न / सिंह रास
जन्मकुंडलीमध्ये प्रथमस्थानात सिंह (5) रास असता अथवा व्यक्तीची जन्मरास (चंद्र सिंह राशीत असता) सिंह असता अथवा व्यक्तीची रवीरास सिंह असता जातकाच्या व्यक्तिमत्त्वा विषयी तसेच आयुष्या बाबत सर्वसामान्यत पुढील
गॊष्टी आढळून येतात -
२) ही माणसं गंभीर आणि मितभाषी असतात. ही माणसे निःस्पृह आणि इतरांसाठी झटणारी असतात. त्यामुळे यांना सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान मिळतो . यांनी एखाद्या माणसास आपले मानले तर आयुष्यभर त्याची साथ सोडत नाहीत; पण जर एखादी व्यक्ती यांच्या नजरेतुन उतरली तर त्या व्यक्तीला हे कधीही जवळ करत नाहीत.
३) उदात्त आचारविचार, दुर्बलांना संरक्षण देणे, मदत करताना मागेपुढे न पाहाणे 'हे' महत्त्वाचे गुण असतात स्थिरतत्त्वाची रास असल्याने स्वभाव निश्चयी असतो. एकाच मताला धरुन राहतात आणि आपले निर्णय सहसा बदलत नाहीत.
४) या राशीची माणसे मानी आणि कडक स्वभावाची असतात. पण असे असले तरी हे रागीट किंवा भडक स्वभावाची नसतात. विवेकी असतात. विनाकारण यांचा राग कधीही उसळत नाही, तसेच कारण असेल तर हे लोक रागावतात पण लगेच शांत देखील होतात.
५) या राशीच्या व्यक्ती शूर, धाडसी, करारी, महत्त्वाकांक्षी असतात. अपेक्षित ध्येय गाठवण्यासाठी वाट्टेल ते कष्ट करण्याची याची तयारी असते. वक्तशीरपणा आणि व्यवस्थितपणा हे यांचे महत्त्वाचे गुण असतात.
६) 'रवि' हा ग्रह राजा आहे , त्यामुळे राजकारण आणि शासकीय संस्था या क्षेत्रात सिंह राशीची माणसे आढळून येतात. राजकीय क्षेत्रात अग्रेसर असतात आणि अनेक उच्चपदस्थांशी यांची ओळख असते. सरकार दरबारी यांचे वजन असते. असे असले तरी त्याचा कधीही गैरवापर करत नाहीत प्रामाणिक, न्यायाने वागणाऱ्या असतात. उच्च सांपत्तिक दर्जा आणि उच्चपद या गोष्टी सिंह राशीची माणसे स्वकर्तत्त्वाने मिळवतात.
७) थोडक्यात स्वाभिमानी, धाडसी , स्वातंत्र , स्वावलंबित्त्व, न्यायी, उदार, दीर्घोद्योगी, वक्तशीर असे सिंह राशीचे स्वरुप आहे.
८) सिंह राशीमध्ये हे गुण असले तरी काही अवगुण असतात. या अवगुणामुळे त्यांच्या प्रगतीत अडथळे येण्याचा संभव असतो. यासाठी हे अवगुण दूर करण्याचा कसोशीने प्रयत्न केला पाहिजे. सिंह राशीच्या व्यक्तींमध्ये मानीपणा आणि अधिकाराची तीव्र लालसा दिसून येते. या व्यक्ती स्वत:ला कुणीतरी विशेष समजत असतात. 'प्रत्येक ठिकाणी मलाच मोठे, श्रेष्ठ मानले पाहिजे' असे यांना वाटत असते. ते अधिकारपद मिळविण्यासाठी आणि टिकविण्यासाठी यांची अथक धडपड चाललेली असते. पोकळ, डामडौल, अतिअहंकार, दिखाऊपणा, ढोंगीपणा हे दुर्गुण निर्माण होतात.
९) यांचे कौतुक करणाऱ्या माणसांवर सिंह राशीचे जातक लगेच प्रसन्न होतात. त्यामुळे काही मित्र अथवा आप्तगण तोंडावर गोड-गोड बोलून आपला कार्यभाग साधून घेतात आणि पाठीमाग मात्र बदनामी करतात. सिंह राशीची माणसे कुणी प्रेमाने वागल.बोलले की हे लगेच भाळतात. स्तुतिपाठक आणि आपमतलबी लोकांपासून सावध राहणे गरजेचे आहे.
१०) यांचा स्वभाव जरा संशयी असतो. विशेषत: वैवाहिक जोडीदाराबाबत जास्त संशयी असतात. त्यामुळे सांसारिक जीवनात विनाकारण कटकटी वाद निर्माण होतात
११) सिंह राशीच्या जातकांनी काहीही लिखा-पढी न करता केवळ शब्दांवर, नात्यावर नात्यावर विश्वास ठेवून कुणाला उधारी देऊ नये किंवा प्रॉपर्टी संबंधी व्यवहार करु नये याबाबतीत फसवणारी माणसे भेटतील. तसेच कुणालाही जामीन राहू नये. जामीन प्रकरणामध्ये अडकण्याचे योग असतात.
१२) प्रकृतीस्वास्थ्य :- सिंह राशीचा अंमल कुक्षीवर असतो. तसेच पाठ, पोट यावर देखील असतो त्यामुळे पोटदखी, पाठीचे दुखणे,पाठीच्या कण्याचे रोग यासंबंधी त्रास होण्याची शक्यता असते,त्यासाठी या माणसांनी महिन्यातून एक-दोन उपवास (लंघन) करावेतच.ही अग्नितत्त्वाची, क्षत्रियवर्णाची रास असून राशिस्वामी सूर्यासारखा तप्त (रवि) ग्रह आहे. त्यामुळे यांची प्रकृती उष्ण असते.प्रकृती कणखर असते ही माणसे कधीही आजाराचे फार कौतुक करत नाहीत सहनशक्ती उत्तम असते यांना उष्माघातामुळे होणारे त्रास जसे की, डोळे जळज़ळणे, भयंकर डोके दुखणे, अंगावर लाल पुरळ उठणे, 'पित्ताचा प्रकोप होणे' हे त्रास संभवतात. त्याची काळजी घ्यावी
१३) सिंह रास कालपुरुषाच्या आत्म्याचे दयोतक आहे.या माणसांना सत्ता, पद, प्रतिष्ठा याची स्व-कर्तृत्त्वावर प्राप्ती होते.वैवाहिक सौख्य चांगले असते परंतु जोडिदाराने आपल्या ताब्यात राहावे अशी यांची इच्छा असते. तसेच स्वभाव संशयी असल्याने वैवाहिक जीवनात विनाकारण कटकटी निर्माण होतात, संततीत, मुलींची संख्या अधिक असते. यांनी परस्त्री संबंध टाळावेत अन्यथा त्रास होतो. सार्वजनिक क्षेत्रात मात्र यांना प्रचंड मान मिळतो. यांच्याविषयी आदरयुक्त भीती असते. यांना टीका सहन होत नाही.
१४) मर्दानी खेळ आणि पोषाखाची आवड असते. तिखट पदार्थ खाण्यास आवडतात. यांच्या वागण्यात, बोलण्यात,बसण्यात, खेळण्यात एक प्रकारचे तेज दिसून येते.
१६) स्त्रियांना मात्र ही रास फारशी अनुकूल नसते. दिसावयास या स्त्रिया देखण्या असल्या तरी चेहऱ्यावर रागीटपणा दिसून येतो.या जरा पुरुषी बांध्याच्या आणि पुरुषी वृत्तीच्या असतात. फक्त शिक्षण घेण्याची हौस नसते तर त्याचा प्रत्यक्ष जीवनात उपयोग करण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा असते.
शासकीय खाती, पोलिस खाते, मिलटरी, वैमानिक असे पुरुषी समजल्या जाणाऱ्या क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवतात .
शासकीय खाती, पोलिस खाते, मिलटरी, वैमानिक असे पुरुषी समजल्या जाणाऱ्या क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवतात .
१७ अ) सिंहेचे खणखणीत नाणे हल्ली बाजारात चालत नाही. तत्वाला मुरड न घालण्याचा त्यांचा स्वभाव बदलत्या काळात व बदलत्या जगात त्यांना पुढे येऊ देत नाही.
स्वभावातील अहंकार व्यापारात यश देत नाही. वृत्तीतील
रामशास्त्रीपणा त्यांना आता कलीयुगात लोकप्रिय करीत नसून, अप्रिय करीत आहे. मनाला न
पटणाऱ्या अनेक गोष्टी या धकाधकीच्या काळात आता त्यांना नाईलाजाने कराव्या लागत
आहेत. त्यांचा तेजोभंग सातत्याने होत असतो.पूर्वीच्या एकराजपद्धतीत सिंह राशी अर्जुनासारखी तळपत होती.
आताच्या प्रजापक्षात ती कर्णासारखी झाकोळून येत आहे. अपमानीत होत आहे सूर्यपुत्र
असून सुद्धा.
१८) रविसारख्या तेजाचा सिंह राशी ही खरोखरच जुन्या काळची सुवर्णमुद्रा आहे. परंतु
हल्लीच्या करन्सीमध्ये ती चालत नाही. सिंह राशीच्या व्यक्ती फार लोकप्रिय होत नाहीत.
कारण दुसऱ्याला गोड बोलून,खोटे सांत्वन करण्यापेक्षा हिताच्या चार गोष्टी परखडपणे
सांगून, त्यांचे डोळे उघडण्याकडे कल असतो. हेतू शुद्ध पण
पद्धत रुक्ष, सिंहेच्या तेजस्वी व्यक्तीला बोटचेपेपणा,
लांगूलचालन,खुशामत करणे, वशिलेबाजी,
खोटे बोलणे, आपली पत विसरून खालच्या पातळीवर
येऊन बसणे मुळीच जमत नाही. मोडेन पण वाकणार नाही हा त्यांचा बाणा असतो.
१९) अंधश्रद्धा असत नाही ही मात्र व्यक्ती आस्तिक असते ; पुराणांपेक्षा
देवावर, तत्वज्ञानावर श्रद्धा असते. रविच्या तेजात काही लपत नाही.
सिंह व्यक्तीला लपवाछपवीपेक्षा परखड सत्याला सामोरे जाणे आवडते.सिंह हे कडू औषध आहे. बाप
दाखव नाही तर श्राद्ध कर ही परखड वृत्ती असते. स्वभावाने स्पष्ट असलेली ही व्यक्ती
कर्तृत्ववान, निश्चयी, विश्वासू,
शीलवान असूनही हल्ली मागे पडलेली दिसते. हा त्यांचा दोष नसून काळानं
उगवलेला सूड आहे. म्हणूनच जगात हल्लीच्या राजकारणात
सिंहेचा विचार होत नाही. मात्र रविबळ असल्याने एखाद्या
अधिकाराच्या जागेवर सिंह व्यक्ती,लवकर चढू शकते. शोभू शकते.
जबाबदारीची उत्तम जाणीव, नीतीमत्ता व तेजस्वी तत्वप्रणाली या
गुणांमुळे जबाबदारीच्या जागेलाही व्यक्ती न्याय देऊ शकते !
२०) ऋण बाजूत सिंह राशी त्रासदायक ठरते. पोकळ डौल, मानसन्मानाच्या
फालतू कल्पना,अहंभाव, स्वत:च्या तोऱ्यात रहाणे, स्तुतिप्रियता, हृदयविकार होणे,
पाठीच्या कण्याला इजा होणे, अस्थिभंग होणे,
पित्त विकाराने हैराण होणे, दुसयाची निंदानालस्ती
करणे, शिष्टपणा इत्यादी दोष संभवतात.
२१) सिंहेचे व्यापारी सचोटीचे परंतु अयशस्वी असतात. तत्वज्ञान विषय
सिंह विद्यार्थ्यांना फारच आवडेल.
२२) थोडक्यात प्रकृतीने सुदृढ, उच्च विचारांची, सहसा कधी आजारी न पडणारी, स्वाभिमानी,परखड स्वभावाची
ही राशी असूनही सांप्रतच्या काळात अप्रिय आहे. मात्र म्हणून तिचे मूल्य कमी आहे
असे मुळीच नाही.
२३) शुभ रंग :- सिंह राशीच्या जातकांना नारंगी रंग विशेष लाभदायक असतो. जर त्यांनी हा
रंग वापरला तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वात चुंबकीय आकर्षण निर्माण
होते. या व्यतिरिक्त वांगी रंग, लाल
रंग आणि मोनेरी रंग यांचा
शुभ रंग आहे. विशेष करुन रविवारी नारंगी आणि सोनेरी रंगाचे कपडे वापरावेत निदान या रंगाचा हातरुमाल जवळ बाळगावा अंगावर सोने
हा धातू धारण करावाच पिण्याच्या पाण्याचा माठ लालरंगाचा असावा
विद्यार्थ्याच्या टेबलवर लाल रंगाचे पाणी ग्लासात भरुन ठेवावे.
२४) अशुभ रंग :- राखी व आकाशी हे रंग सिंह राशीच्या जातकांसाठीअशुभ ठरतो. तो त्यांनी अजिबात वापरु नये व्यक्तिमत्त्वातून नकारात्मक किरणे उत्सर्जित होतात. वाहन खरेदी करताना राखी व आकाशी रंगाची वाहने घेऊ नयेत.
२५) शुभ वार :- रविवार, बुधवार आणि गुरुवार हे शुभवार आहेत.
अशुभवार :- शनिवार हा अशुभ वार आहे.
२४) अशुभ रंग :- राखी व आकाशी हे रंग सिंह राशीच्या जातकांसाठीअशुभ ठरतो. तो त्यांनी अजिबात वापरु नये व्यक्तिमत्त्वातून नकारात्मक किरणे उत्सर्जित होतात. वाहन खरेदी करताना राखी व आकाशी रंगाची वाहने घेऊ नयेत.
२५) शुभ वार :- रविवार, बुधवार आणि गुरुवार हे शुभवार आहेत.
अशुभवार :- शनिवार हा अशुभ वार आहे.
२६) अशुभ तारखा:-६,८,१५, १७, २४ या तारखा सिंह राशी अशुभ ठरतात.
२७) उपास्य देवता :- श्री गणेश, श्रीराम, श्रीरवि या उपास्यदेव आहेत. यांची उपासना केल्यास अनिष्ट दूर होऊन जवळ येईल
२८) भाग्य रत्न:- माणिक किंवा पुष्कराज हो सिंह राशीची भाग्यरलेआहेत. माणिक हे रत्न सोन्यामध्ये करंगळीशेजारील बोटात वापरावे.किंवा पुष्कराज हे रत्न सोन्यामध्ये पहिल्या बोटात (तर्जनीत)वापरावे. माणिक हे रत्न रविवारी सूर्योदयाच्या वेळेस वापरण्याससुरुवात केली तर उत्तम. तसेच पुष्कराज हे रत्न गुरुवारी किंवा गुरुपुष्यामृत योगावर वापरण्यास सुरुवात केले तर उत्तम. ही रत्ने सिद्ध करुन मगच वापरावीत.
२७) उपास्य देवता :- श्री गणेश, श्रीराम, श्रीरवि या उपास्यदेव आहेत. यांची उपासना केल्यास अनिष्ट दूर होऊन जवळ येईल
२८) भाग्य रत्न:- माणिक किंवा पुष्कराज हो सिंह राशीची भाग्यरलेआहेत. माणिक हे रत्न सोन्यामध्ये करंगळीशेजारील बोटात वापरावे.किंवा पुष्कराज हे रत्न सोन्यामध्ये पहिल्या बोटात (तर्जनीत)वापरावे. माणिक हे रत्न रविवारी सूर्योदयाच्या वेळेस वापरण्याससुरुवात केली तर उत्तम. तसेच पुष्कराज हे रत्न गुरुवारी किंवा गुरुपुष्यामृत योगावर वापरण्यास सुरुवात केले तर उत्तम. ही रत्ने सिद्ध करुन मगच वापरावीत.
२९) जन्मलग्न सिंह असता धनस्थानी कन्या रास येत असल्याने - चेहरा तरतरीत दिसत असल्यामुळे
वयापेक्षा तरुण भासतात. हे लोक बोलाचालीत फार चतुर असतात. प्रत्येक गोष्टीची
बारीक-सारीक चिकित्सा करतात. दुसऱ्याची कुचेष्टा करणे, टर उडविणे,
विनोद करणे यांना आवडते. काहींच्या चेहऱ्यात व बोलण्यात तीव्रता
असते. पैशाच्या बाबतीत हे अत्यंत व्यवहारी असतात. फालतू खर्च करणार नाहीत. लेखन,प्रकाशन, स्टेशनरी, वैद्यकी,
अध्यापन, अकाउंटस् ठेवणे, हिशेब तपासणे या कामांपासून धन मिळते. डॉक्टर्स, कंपाउंडर्स,
नर्सेस यांच्या धनस्थानी ही रास असते. ही राशी रवीने व्याप्त असेल तर
वरिष्ठांपासून फायदे होतात. चंद्र व शुक्राने व्याप्त असेल तर हिऱ्यामोत्यांची,
वाहनांची प्राप्ती होते. बुध बिघडल्यास वाणी-दोष असतो. बोलण्यात
फसवाफसवी असते. कित्येक वेळा बोलणे उथळ असते. अर्थप्राप्ती विशेष नसते.
३०) जन्मलग्न सिंह असता तृतीयात तूळ रास असल्याने - मनुष्य फार मोठा अधिकार प्राप्त करू शकतो.ही शुक्राची रास असल्याने नाट्य, संगीत,
अभिनय या कलेच्या क्षेत्रात यशस्वी होतो. शनीसारखा ग्रह येथे असल्यास राजकारणात बाजी मारून सत्ता मिळवतो. ही माणसे रेडिओ, टी. व्ही., नियतकालिके ही प्रसारामाध्यमे, रेल्वे-बसेस विमाने ही संचारमाध्यमे, नाटक-तमाशा-सिनेमा
ही करमणुक माध्यमेयासारख्या ठिकाणी कार्यरत असतात. संगीतज्ञ म्हणून हे लौकिक
मिळवतात.धंदाव्यवसाय करण्याच्या निमित्ताने यांचा खूप प्रवास होतो.
यांचे शेजारी कलावंत मंडळी असतात. यांचे हस्ताक्षर सुंदर असते. यांना
बहिणींचे सुख चांगले मिळते. भावांचीही मदत होते. ऑफिसमध्ये काम करणाऱ्या
व्यक्तीशी प्रेमसंबंध व विवाह जमू शकतो.शुक्र दूषित असता सिनेमा-नाटके-तमाशा आदी गोष्टींसाठी व लैंगिक सुखासाठी
पैसा बरबाद करतात. संगत खराब असते. व्यवहारात अपयश येते.अक्षर वाईट असते. धंदा व
चैनबाजी यांचा मिलाफ करतात.
३१) जन्मलग्न सिंह असता चतुर्थात वृश्चिक राशी येत असल्याने - जन्माच्या वेळेच्या आसपास कुणाचा
तरी मृत्यू झालेला असतो किंवा मातेला प्रसूतीच्या मरणतुल्य वेदना होतात. मातेचा स्वभाव
फार कडक व करारी असतो. येथे पापग्रह दूषित असता मातेचा लहानपणीच मृत्यू होतो.
घरातील वातावरण कडक शिस्तीचे असते. यांच्या जन्माच्या वेळी वडिलांनी एखादी नवी
जागा अगर एकादे वाहन खरेदी केलेले असते. निदान एखादी शुभ घटना वडिलांच्या संबंधात
घडते.मंगळ बलवान् असल्यास वंशपरंपरागत जमीनजुमला, घरदार मिळते.घरामध्ये
यांचा कडक अंमल असतो. घरामध्ये सर्वांनी आपले अंकित राहावे असे वाटते. मातेच्या
बाबतीत मात्र हे सौम्य असतात. घरामध्ये राजशाही थाट हवा असतो. यांचे उच्च शिक्षण
चांगले होते. त्याकरिता परदेशगमनही होते.एखादी परदेशी डिग्री असते. चतुर्थात वृश्चिक रास असता- खाचरात जन्माला येऊन महालात राहायला जातात.वृश्चिक राशी पापग्रहयुक्त असता व मंगळ दूषित असता या माणसांना
गुन्हेगारी लोकांची संगत लाभते. घरातील वातावरण संशयप्रस्त, स्वार्थी,
आपमतलबी लोकांनी दूषित झालेले असते. या लोकांचे मन सदैव कलुषित व
तिरस्काराने भरलेले असते. शनी, राहू यांनी बिघडलेली वृश्चिक
रास भूतपिशाच्चांचे (Haunted) घर दर्शवते.कोणी मृतात्मा या घरात वास्तव्य करीत असतो. यांचे पूर्वज अतृप्त
अवस्थेतमृत पावलेले असतात. घरात अशांती व असमाधान असते.
३२) जन्मलग्न सिंह असता पंचमात धनु राशी येत असल्याने - धनु राशी ही अल्पसंतती देणारी राशी आहे.यांना एखादा
पुत्र असतो. गुरू दूषित असल्यास वा पंचमात स्त्रीग्रह असल्यासकेवळ मुलीच होतात.
पंचमात राहू असल्यास गर्भपात होतात. परंतु गुरू बलवान् असल्यास काही दैवी उपायांनी
मुलगा होतो. पंचमेश गुरू व पुत्रकारक गुरू हे एकच असल्याने तो शुद्ध स्वरूपात
असल्यासच पुत्रसंतती होते.अन्यथा वाईट फल मिळते. मात्र हा एकच पुत्र असला तरी
महान् बनतो.एखाद्या क्षेत्रात हा मानसन्मान मिळवतोच.
गुरू धनकारक असल्याने पंचमात धनु राशी असता- हे लोक सट्टा, जुगार,रेसेस या मार्गाने धन मिळविण्याचा प्रयत्न करतात. हे एखाद्या
क्लबचे मालक असतात. हे घोड्यांच्या शर्यतीमध्ये विशेष रस घेतात. रेसकोर्सचे
जॉकी बाक्लबमध्ये पत्ते कुटणारे जुगारी यांच्या पंचमात धनु रास असते.
हे लोकनाटक, सिनेमाशीही संबंधीत असतात.कायदा, तत्त्वज्ञान, शिक्षण, धर्म,
अर्थशास्त्र यापैकी एखाद्या विषयात हे प्रावीण्य संपादन करतात.
त्यासाठी हे वाटेल तेवढी मेहनत घेतात. यामध्ये ते शिखर सर करतात.मात्र गुरू दूषित
असल्यास हे पोकळ बढाया मारतात. प्रत्यक्ष बौद्धिक करामतीपेक्षा बडबड जास्त असते.
लैंगिक जीवनही बरबटलेले असते. नीति-शास्त्र केवळ भाषणात राहाते. गुप्तपणे वा उघड
सर्व निंद्य कर्मे करतात.
३३) जन्मलग्न सिंह असता षष्ठात मकर राशी येत असल्याने- ह्यांना शत्रू खूप असतात. परंतु ते
ह्यांना टरकून असतात. ह्यांचे विरोधक महाकारस्थानी, पाताळयंत्री व
स्वार्थी असतात.ह्यांच्या समोर ते काही बोलत नाहीत पण मागाहून काड्या घालण्याचे
धंदे
करतात. ह्यांची इतरांना कमी लेखण्याची वृत्ती असल्याने शत्रुत्व
ओढवूनघेतात. विवाहामुळे शत्रुत्व निर्माण होते. सासरची माणसे वैरी
बनतात. ह्यांच्या आवडी-निवडी खूप असल्यामुळे हलक्यासलक्या गोष्टींचा हे तिरस्कार
करतात. व्यापारधंद्यात ह्यांचे खूप प्रतिस्पर्धी असतात.
ह्या स्थानची मकरराशी गुडघे दुबळे करते. गुडघ्याची वाटी सरकणे,संधिवात, थंडीचे विकार, उन्माद, हृदयविकार, रक्तदाबाचे
विकार, चामडीचेरोग, पक्षाघात आदी विकार निर्माण होऊ शकतात.मकरराशी खाणी, कोळशाचा धंदा, शिसे, स्थावर मालमत्ता, शेतीवाडी,लाकडे विकणे, पाथरवट, प्लंबर,
गवंडी, कष्टाच्या नोकऱ्या, म्युनिसिपालिटी,
लोकलबोर्ड, बिल्डर्स, सरकारी
व निमसरकारी नोकऱ्या दर्शविते. सर्व्हेअर्स,कातडी कमावणारे, बिल्डिंग मटेरियल विकणारे,
खोदकाम करणारे, धातूवरकोरीव काम करणारे या राशीवर जन्मतात.
मकर राशी दूषित असता आरोग्य चांगले नसते. लायकीपेक्षा कमी
प्रतीची
नोकरी मिळते. प्रकृतीच्या तक्रारीमुळे नोकरीत दांडया खूप पडतात.
पत्नी रोगट प्रकृतीची असते. मामांचे सुख नसते. शनी बिघडल्यास नोकरीत
कष्टाचे काम करावे लागते. परंतु बलवान् असल्यास आपला दरारा सर्वत्र
पसरवतात.
३४) जन्मलग्न सिंह असता सप्तमात कुंभरास येत असल्याने- असता बहुधा विजोड जोडपे असते. नवरा उंच तर पत्नी ठेगू, तर बहुधा नवऱ्यापेक्षा पत्नी
एखादा इंच उंच असते. शिक्षणामध्ये दोन टोके, रंगामध्येही तसेच! नवरा काळा तर
पत्नी पिठासारखी गोरी. कुंभरास खालच्या जमातीत वा कनिष्ठ दर्जाची पत्नी दर्शविते.
स्वभावभिन्नताही
आढळते. कधी भिन्न धर्मीय विशेषतः मुस्लीम धर्मीय पत्नी असते.
शनी शुभ
असल्यास विवाह संपन्न घराण्यात होतो. विवाहानंतर ऊर्जितावस्था
येते. पत्नी
विद्याव्यासंगी, हुशार, बहुश्रुत,
स्मरणशक्ती चांगली असलेली व एकनिष्ठ
असते. ती सुसंस्कृत घराण्यातील असते.
कुंभरास जर दूषित असेल तर विवाह होत नाही वा विवाहापासून सुखलाभत नाही. पत्नी दूर राहाते किंवा तिला सतत काही तरी आजार
असतात.ती वंध्याही असू शकते. दीर्घकाळानंतर घटस्फोट वा वियोग होतो.
शनी जरशुक्रासहित वा त्याच्या राशीत दूषित असेल तर स्त्रीचे चारित्र्य
संशयास्पदअसते. विवाहामुळे अपकीर्ती होते. कुंभरात विधवा वा घटस्फोटिता
स्त्रीशी विवाह दर्शविते. कधी कधी स्त्री वयाने फारच मोठी असते. परदेशात राहाणाऱ्या व्यक्तीशी विवाह होतो. मालमात्र ह्यांचे विवाह बहुधा
यशस्वी झालेले आढळतात. सप्तमस्थानाबरोबर इतर गोष्टी बिघडल्या तरच घटस्फोट होतो
भागीदारीतील धंद्यात हे यशस्वी ठरतात. शनी ३।९।१२ या स्थानी
असेल
तर प्रवास होतात.तिशीनंतर किंवा त्यापेक्षाही उशीरा ३६।३७व्या
वर्षी विवाहयोग संभवतो.
३५) जन्मलग्न सिंह असता अष्टमात मीन रास येत असल्याने- मीन रास ही बलराशी असून तिचा पायावर अंमल
आहे. ह्या राशीचा मालक गुरू आहे.. पायाला मार लागणे ही गोष्ट संभवते किंवा गुरू
मंगळाने युक्त वा दृष्ट असेल तर अपघात वा शस्त्राने मृत्यू संभवतो. ही अत्यंत
दुबळी रास असल्याने आत्महत्येने मृत्यू येऊ शकतो किंवा साधुसंतांप्रमाणे शांतपणे
मृत्यू येतो.अपघाताने मृत्यू पाण्यात येईल.
ह्या लोकांना सट्टा, जुगार, रेस
ह्यासारख्या झटपट पैसे कमवायच्या मार्गाची आवड असते व तसा पैसा खूप मिळतो.
ह्यांच्याकडे बेहिशेबी धन असू शकते.
ह्यांना तत्त्वज्ञानाची आवड असते; अध्यात्माचा
अनुभव घेण्यासाठी प्रयत्नशील असतात.
३६) जन्मलग्न सिंह असता नवमस्थानी मेष राशी येत असल्याने-- वडिलांचा स्वभाव तापट, उतावळा व चंचल असतो.मेष रास प्रवास खूप दर्शविते. वयाच्या २८ व्या वर्षी भाग्योदय
होतो. ह्यांच्या हातून धर्मकर्म थोडे होते. हे सिद्धिविनायकाचे भक्त असतात. लाल
रंग व ९ हा अंक ह्यांना शुभ असतो. यांचा भाग्योदय जन्मभूमीतच होतो. यांना
उच्चशिक्षण लाभते. वडिलांशी यांचे फारसे जमत नाही. नित्योपासनेत दृढनिश्चयाचा अभाव
असतो. मंगळ दूषित असता पितृसुख लवकर नष्ट होते. उच्च शिक्षणात अडथळे व धर्मावर
विश्वास नसणे या गोष्टी अनुभवास येतात. जर हे धार्मिक असतील तर धर्मान्धता वा
धर्मविषयक एकतर्फी मते असतात.
३७) जन्मलग्न सिंह असता दशमस्थानी वृषभ रास येत असल्याने-- चिकाटी, दृढनिश्चय व
व्यवहारी दृष्टिकोण,सौंदर्यदृष्टी, नादलुब्धता, स्थैर्य, चैन, सुखलोलुपता हया
गुणवैशिष्टयांना पोषक असे धंदे-व्यवसाय-नोकऱ्या ही माणसे करतात. ही नैसर्गिक
धनस्थानाची राशी असल्याने ज्या ठिकाणी चांगला पगार मिळतो त्या ठिकाणी हे लोक
कार्यरत असतात. दशमात वृषभ राशी असता प्रामुख्याने पुढील धंदे आढळतात.
सावकार, भांडवलदार, बँकर्स,
चैनीच्या-शोभेच्या-स्त्रियांच्या वस्तूंशीसंबंधीत, सौंदर्यप्रसाधने-सुवासिक तेले व
अत्तरे-रत्ने व जडजवाहीर विकणारे,स्टॉक-ब्रोकर्स, कॅशियर्स, खजिनदार,
सट्टाबाज, जुगारी, शेतकरी,
माळी,नर्सरी-मालक, फूलवाले, संगीतकार,
नट, गायक, नर्तक,
वाद्यवादक, सिनेमा-नाटक यांशी संबंधीत, शिंपी, चित्रकार,
पेंटर, नक्षीकाम करणारे, फोटोग्राफर्स,शिल्पकार, शिल्पशास्त्रज्ञ, बाहनांचे मालक, साहित्यिक, नाटककार,
कवी, रबर-अभ्रक-प्लॅस्टिक-तांदूळ-दूध-डेअरी प्रॉडक्टस
कापूस-सिल्क-साखर-काच-फर्निचरविकणारे इत्यादी.
ही राशी बिघडली असता हलक्या व बीभत्स प्रकारे मनोरंजन करणारेलोक असतात. शुक्र दूषित असता अंमली पदार्थ, दारू विकणारे,
जुगार अड्डा चालविणारे, जारण-मारण करणारे मांत्रिक
असतात.शुभग्रह युक्त असता मनुष्य सत्कर्मयुक्त असतो.
३८) जन्मलग्न सिंह असता लाभस्थानात मिथुन रास येत असल्याने-- असता बुद्धिजीवी वर्गात मित्र असतात.
यांचे मित्र स्वभावतः चंचल व व्यवहारी वृत्तीचे असतात. यांना त्याच वृत्तीने मदत करीत
असतात. यांची आर्थिक स्थिती उत्तम असते. व्यापारामध्ये, दलालीच्या
व्यवहारात, सट्टा-लॉटरीत यश मिळते. शेअर्समध्येही ह्यांचे नशीब चांगले असते. अनेक मार्गांनी ह्यांना सतत लाभ होत राहातात. पैशाचा वापरही
चातुर्याने करतात. वक्तृत्वापासून ह्यांना धनलाभ होतो. नोकरीपेक्षा अन्य मार्गात
हे अधिक यशस्वी होतात.
मिथुन राप्त दूषित असता मित्र लबाड, स्वार्थी,
फसव्या वृत्तीचे, लोमी असतात. त्यांच्यामुळे
आर्थिक अडचणी येतात. वडील भावंडांसाठी पैसा खर्चावा लागतो. ह्यांच्या आर्थिक
अपेक्षा फार मोठ्या असतात व त्या अपुऱ्या राहातात, वाहनांना
अपघाताचे भय संभवते. ह्या ठिकाणी मिथुन रास वा बुध मंगळाने दूषित असता मित्रांवर
कधीच विसंबू नये वा जामीन राहू नये.
३९) जन्मलग्न सिंह असता व्ययस्थानी कर्क येत असल्याने-- असता भटकी वृत्ती असते. ह्यांना प्रवास आवडतात. सार्वजनिक स्वरूपाच्या गोष्टींमध्ये पैसा खर्च करतो. विवाहित
स्त्रियांचा भोक्ता असतो. पिण्याचे व्यसन असू शकते. अपकीर्ती होते. दूषित चंद्र
चांगली झोप देत नाही. सारखी स्वप्ने पडत असतात. खर्चाचे प्रमाण अनियमित असते. पाण्यापासून अपघात संभवतो. आईचे सुख लवकर नष्ट होत
असते.
कर्क रास शुभयुक्त असता आध्यात्मिक अनुभूती येते. दिगंत कीर्ती
लाभते.आचरण चांगले असते. मंगलउत्सवासाठी धन खर्च होते. मातृसुख चांगलेमिळते व ती
यांच्या उर्जितावस्थेसाठी सर्वतोपरी प्रयत्नशील असते. द्रवपदार्थांशी संबंधीत
असलेल्या कंपन्यांत आर्थिक गुंतवणूक होते. सार्वजनिक जीवनात प्रसिद्धी लाभते.