Tuesday, 7 April 2020

कर्क लग्न / कर्क रास (Cancer Ascendent / Moon in Cancer)


कर्क लग्न / कर्क रास

ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करतानाव्यक्तीची जन्मकुंडली महत्त्वाची मानली जातेव्यक्तीची जन्मतारीख - जन्मवेळ आणि जन्मठिकाण या तीन गोष्टी अचूक असतील तरपंचागांच्या आधारे त्याची जन्म कुंडली मांडली जाते. जन्म क्षणी पूर्वक्षितिजावर जी रास उदित असते तिला 'लग्नरासअसे म्हटले जाते. त्या स्थानापासून सुरुवात करूनबारा स्थानांमध्ये बारा राशीची विभागणी केली जाते. नंतर ज्या राशीत जे ग्रह असतील ते मांडले जातात व 'जन्मलग्नकुंडलीतयार होते. कुंडलीत असलेली ग्रहस्थितीस्थाने आणि स्थानगत राशी यांचा एकत्रित अभ्यास म्हणजे कुंडलीचा  अभ्यास  होय.  कुंडलीतील बारा स्थाने  व त्यावरून पाहावायच्या प्रमूख गोष्टींचा तक्ता खालीलप्रमाणे :--




 जन्मकुंडलीमध्ये लग्नस्थान हे अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. या स्थानावरून स्वरूपशरीराची ठेवणस्वभावप्रकृतीप्रवृत्तीजातत्वचाआरोग्य व रोगप्रतिकार शक्तीव्यक्तिमत्त्वचारित्र्य,जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनआयुष्याचा प्रारंभ व एकंदरीत आयुष्य कशा प्रकारचे असेल याचा विचार करतात. त्यामुळे जन्मलग्नी उदित असलेली राशी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. या राशीचा अधिपती बहुतेक कुंडल्यांत त्या कुंडलीवर वर्चस्व गाजवतो. त्याच्या शुभाशुभ स्थितीनुसार आयुष्यात सुखदुःखे अनुभवास येतात जातकाच्या एकंदर व्यक्तिमत्त्वाचा विचार या स्थानावरून केला जातो. या स्थानातील राशी व ग्रह यांचा जातकाच्याव्यक्तिमत्त्वावर जोरदार परिणाम होत असतो.
कर्क लग्न / कर्क रास


जन्मकुंडलीमध्ये प्रथमस्थानात  कर्क (४) रास असता अथवा व्यक्तीची जन्मरास (चंद्र)  कर्क राशीत  असता,  जातकाच्या व्यक्तिमत्त्वाविषयी तसेच आयुष्याबाबत  सर्वसामान्यत पुढील गॊष्टी आढळून  येतात :-

१) कर्क ही राशिचक्रातील चौथी रास असून, या राशीचा स्वामी चंद्र हा मातेचा कारक ग्रह आहे. 
जल तत्त्वाची / चर तत्त्वाची / (विप्र) वर्णाची सत्त्वगुणी रास असून शरीरातील हृदयावर हिचा अंमल     असतो. या व्यक्ती आकर्षक व्यक्तिमत्त्वाच्या असतात. 

२) कर्क ही चंद्राची राशी असून, या व्यक्ती अत्यंत परिश्रम घेणाऱ्या आढळतात; परंतु श्रमाच्या मानाने यांना यश मिळतेच असे नाही.,त्यामुळे या निराश होतात. या व्यक्ती न्यायप्रिय, पक्षपात न करणाऱ्या आणि इमानदार असतात. यांना संसारसुख बेताचेच मिळते. कारण पति-पत्नींच्या विचारात मतभिन्नता असते. या दूरदर्शी व काटकसरी असतात; परंतु प्रसंगी या फार कृपणही बनतात.

३) कर्क ही रास निसर्गकंडलीत चतुर्थ स्थानामध्ये येते. चतुर्थ स्थान हे गृहसौख्याचे,आरामाचे आणि वाहनसौख्याचे स्थान असल्याने, या व्यक्तिनां खाणे आणि झोप फार प्रिय असते. विविध प्रकारचे आणि विपुल खाणे,आराम करणे, निवांत झोपणे ह्याची आवड असते. अंगमेहनतीचा त्यांना कंटाळा असतो. निवांत, शांत, चैनीत, छानछोकीत राहणे यांना आवडते. त्यामुळे प्रेमळपणे, भावनिक दबाव टाकून दुसऱ्यावर हकूमत गाजवत काम करायला लावणे यांना आवडते. प्रवासासाठी जाणे किंवा अगदीच थोड्या अंतरावर जायचे असेल तरी गाडीनेच जायला यांना आवडते वाहनसौख्याची खूप आवड असते.

४) आई-वडील, मुले-बाळे, पत्नी किंवा पती यांच्यावर यांचे विशेषप्रेम असते. कुटुंबियांमध्य रमणे यांना मनापासून आवडते.एकलकोंडे राहणे यांना आवडत नाही. कर्क राशीची माणसे समाजप्रिय असतात.

५) कर्क ही रास चरतत्त्व, स्त्रीराशी आणि जलतत्त्वाची असल्यामुळे, यांना पाण्याची ठिकाणे आवडतात. तसेच यांच्यामध्ये प्रवाहीपण असते “पानी तेरा रंग कैसा?" या प्रश्नाचे जसे 'जिस में मिलाओ वैसा' हे उत्तर आहे तद्वत ही माणसं असतात. ते कोणत्याही वर्गातल्या गटातल्या, वयाच्या माणसाबरोबर सहज जमवून घेतात.


६) चंद्रासारखे शीतल आणि मनोहारी कर्क राशीचा स्वामी चंद्र असून, त्याच्या अंमलाखाली ही एकच राशी येते. या सर्व गुणांमुळे हया राशीचे जातक हळवेभावनाप्रधान प्रेमळ असतात या राशीच्या व्यक्ती प्रेमळ व कोमल असल्या तरी या व्यक्ती त्यांच्या काही व्यक्तिगत मतात, तत्वात तडजोड करीत नाहीत.

७) या व्यक्तिचा जीवनाकडे पहाण्याचा दृष्टिकोन बौद्धिक नसून, भावनिक  असतो चंद्राप्रमाणे या व्यक्ती अस्थिर, चंचल असतात. भावनाप्रधानता, कल्पनेच्या उत्तुंग भरारी , सहानुभूती, संवेदनशीलता, गृहजीवनाची व जलाशयाचीआवड, धार्मिक, प्रेमळ, जठराग्नी प्रदीप्त, चिडचिड्या, कामी, भोगलोलुप अशी कर्क राशीची फले आढळतात.

 ८) कर्क या लग्नाचे लोक खूप लोकप्रिय होतात. यांना समाजजीवनाची आवड असते. लोकांना या व्यक्तींचे अद्भूत आकर्षण असते.जलाशयाशी संबंधित सर्व व्यवसाय, हॉटेल्स, खाण्याच्या पदार्थांची दुकाने इत्यादी नोकरी धंद्याशी संबंध येतो.

९) कर्क ही रास,प्रवाहाबरोबर राहणारी असल्याने देवधर्मावर यांची बरीच निष्ठाअसते. या राशीच्या व्यक्तींची मनं वाहत्या पाण्यासारख्शी स्वच्छ आणि निर्मळ असतात. कोणतीही गोष्ट मनात लपवणे किंवा कुढत बसणे यांना जमत नाही. त्यामळे या राशीच्या लोकांच्या जीवनात सुख व आनंद कायम स्वरुपी असतो.

१०) कर्क व्यक्तींनी मन सतत प्रसन्न ठेवून सहसा कोणाशी वैर करू नये. मन प्रसन्न असेल, घरात समाधान असेल तर कर्क व्यक्ती दीर्घायुषी होते.

११) कर्कच्या व्यक्ती विशेषत: स्त्रिया प्रेमळ पण काही बाबतीत निश्चयी, प्रपंचात रमून गेलेल्या, गृहकृत्यदक्ष, धार्मिक वृत्तींच्या, घरगुती कलांमध्ये निपुण असलेल्या, स्वयंपाक घराबर फार प्रेम करणाऱ्या, सतत कसल्या ना कसल्या घरकामात गढून गेलेल्या, स्वच्छतेची (विशेषतःस्वयंपाकघराची) आवड असलेल्या, स्वत:पेक्षा नवऱ्याच्या, मुलांच्या कपड्यालत्त्यांकडे पणाची दक्षता घेणाऱ्या, सणवार किंवा धार्मिक कार्यात उत्साहाने भाग घेणाया, घरचेयोग्य तहेने सांभाळणाऱ्या अशा असतात.

१२) कर्क राशीच्या व्यक्तींना मनाने समजून घ्यावे लागते. हृदयाची भाषा जो जाणतो तोच
या राशीवर प्रेम करू शकतो. अलंकाराने, पैशाने, वस्त्राने ही राशी प्रेम करू शकणार नाही,
तर फक्त प्रेमाने प्रेम करू शकेल. 'Heart has no language, it speaks to the heart.''
हे कर्क राशीच्या व्यक्तींच्या सहवासात पटते.

१३) कर्केच्या  राशीच्या स्त्रियांची आकर्षण-शक्ती चांगली असून या व्यक्ती समाजामध्ये लोकप्रिय असतातया स्त्रिया सुस्त आणि आळशी असतातयांना झोप फार प्रिय असते कष्टाच्या कामाचा कंटाळा असतो. 

१४) कर्केच्या  राशीच्या स्त्रिया उत्तम परिचारिका असतात. त्या  पतिव्रता असतात. त्यांच्या ठिकाणी विलक्षण श्रद्धा, पावित्र्य, अंतरीचा मोठेपणा, भाबडेपणा, त्यागी वृत्ती असते.  ही राशी धन बाजूत सुगृहिणी होते, परिपक्व कलावंत,माँटेसरी-शिक्षिका इत्यादी दर्शविते तर ऋण बाजूत मानसिक रोग, अनियमित मासिक धर्म,मनाचा तोल ढासळणे, मानसिक त्रास दर्शविते, वात्सल्य हा या राशीचा गाभा असल्याने या राशीच्या व्यक्तीस शृंगार जमेलच असे नाही. म्हणून वधुवरांच्या गुणमेलन पद्धतीत या
व्यक्तींचा जोडीदार खूप कामूक वृत्तीचा, प्रणयाची अपेक्षा करणारा, थिल्लर, कठोर अंत:का नसावा. कर्केची व्यक्ती प्रेम करू शकते, प्रणय नव्हे. 

१५) कर्केच्या व्यापारी वर्गास पांढऱ्या प्रवाही पदार्थांचे व्यापार, गृहोपयोगी वस्तूंचा व्यापार,
चांदी, दूध, दही, फळाफळावळ, बागायती भाज्यांचा व्यापार लाभतो. आयुर्वेदिक डॉक्टर या
-राशींवर यशस्वी होतो. कारण चंद्र वनस्पतींचा कारक असतो. कर्केच्या विद्यार्थ्यांना मानसशास्त्र,
मानसरोगतज्ज्ञ, स्त्रियांच्या रोगांचा तज्ज्ञ, माँटेसरी शिक्षणतज्ज्ञ, केटरिंग तज्ज्ञ होता येईल.


१६) कर्क राशी भावनाशील असल्यामुळे यांचे निर्णय ठाम नसून स्वत:चे मत नसते. संगतीचा यांच्यावर परिणाम होतो. दुसऱ्याचे म्हणणे ऐकून वागण्याचे तंत्रल्याने नुकसान होण्याचा संभव असतो. 

१७) थोडक्यात सांगायचे झाले तर या राशीच्या लोकांनी आळशीपणा, सुस्तपणा, आराम झटकून काम केले पाहिजे.  कडकपणा आणि करडेपणा हा यांच्या स्वभावाची भाग नसला तरीवेळ प्रसंगी गरज असेल तेव्हा तसे तसे वागले पाहिजे. भावनेने निर्णय न घेता भावना आणि बुद्धी यांचा समन्वय साधत स्वत:च्या विचाराने योग्य तो निर्णय घेऊन त्याची निश्चयी पणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.

१८) प्रकृती स्वास्थ्य:- सुखवस्तू लोकांना होणारे आजार जसे मधुमेह, रक्तदाब, वात, अपचन आतड्याचे विकार, हृदय विकार छातीशी संबंधित विकार होतात. अपचन, मळमळ,असिडिटी,मानसिक त्रासाने निद्रानाश  हे कर्केचे सर्वसामान्य त्रास असून, कर्क स्त्रियांना डोहाळे कडक लागतात, असा अनुभव आहे.


१९) कर्क  राशीच्या माणसांना आयष्याच्या उत्तरार्धात भाग्योदय होतो आणि वैवाहिक सौख्य चांगले मिळते.मुलाबाळांशी विशेष पटत नाही.


२०) कर्क राशीचे पुरुष उंच भारदस्त शरीराचे व प्रमाणशीरबांध्याचे असतात. चेहरा प्रसन्न आणि शांत असतो. कुटंबावर यांचे विशेष प्रेम असते. अठरा वीस तास ऑफिसमध्ये कष्ट करुन पद,
प्रतिष्ठा मिळविण्याची यांना लालसा नसते तर कुटंबाला वेळ देणं,त्यांच्याबरोबर फिरायला जाणे. खरेदीला जाणे यामध्ये त्यांना रसअसतो. हे पुरुष कुटुंबवत्सल असतात.

२१)  नोकरी -- सर्व प्रकारच्या द्रव पदार्थाचा जसे दूध,शीतपेये व्यवसाय किफायतशीर ठरतो. याशिवाय
 शेतकरी, भाजीपाला यासारख्या क्षेत्रात यश मिळते.चांदी, हिरे, माणिक यांचा व्यापाररास अनुकूल .  

२२) कर्क राशीच्या राजकारणासाठी ही रास उत्तम असते. राजे, युवराज ,न्यायाधीश, वकील, परदेशी वकील, राजकीय मुत्सद्दी, राजकारणी,सरकारी अंमलदार सरकारदरबारी मोठया पदावर काम करणारी
माणसे या कार्यक्षेत्रावर प्रभाव आहे.

२३) कर्क राशीच्या जातकांना निळा, पांढरा आणि हिरवारंग विशेष आवडतो. तरीही भाग्योदयासाठी पिवळा रंग शुभ रंग असतो. जर यांना उदास वाटत असेल तर यांनी लाल रंगाचा वापर करावा. सोमवारी पांढरा समुद्री हिरवा किंवा फिक्कट निळा रंग वापरावा. निदान एक हातरुमाल तरी जवळ ठेवावा. पिण्याच्या पाण्याच्या माठाला पांढरा रंग लावावा.

२४) अशुभ रंग:- कर्क राशीच्या जातकांसाठी काळा रंग अशुभ ठरतो.त्यांनी काळ्या रंगाचे कपडे वापरल्यास नैराश्य येते. दिवसभराची कामे बिघडतात. वाहनखरेदी करताना काळ्या रंगाचे वाहन घेऊ नये.

२५) शुभवार :- सोमवार, मंगळवार, शुक्रवार हा शुभ वार आहे.

२६)  अशुभवार :- बुधवार अशुभ वार आहे.

२७) अशुभ तारखा :- १,१४,१९,२३,२८ या तारखा कर्क राशीसाठी अशुभ ठरतात

२८)  उपास्य देवता:- गणेश,  श्रीशंकर, श्रीकृष्ण या देवतांची उपासना केल्यास अनिष्ट दूर होऊन भाग्यकारक अनुभव येतील.

२९) भाग्यरत्न :- मोती हे रत्न चांदीमध्ये करंगळीमध्ये वापरावे.

३०) कर्क लग्न असता धनस्थानी सिंह रास येत असल्याने,- वडिलार्जित धन व मालमत्ता मिळते. यांची आर्थिक स्थिती चांगली व स्थिर स्वरूपाची असते. कुटुंबात वडिलकीचा मान असतो. चेहरा गोल कपाळ उंच, मोठे तोंड, मोठाले व तेजस्वी डोळे, मोठे दात, आवाजामध्ये हुकुमत असते. यांना त-हेत-हेचे विशेषतः मसालेदार पदार्थ खाणे आवडते. यांची भूक जबरदस्त असते. सरकारमध्ये यांच्या ओळखीची माणसे असतात. त्यांच्यामार्फत हे अनेकांची कामे करतात. यामध्ये आर्थिक लाभही होतात. सरकारी मानधन वा पारितोषिके मिळतात. कित्येक सरकारी नोकरीत काम करीत असतात. रवी बिघडला असल्यास व्यक्ती बढाईखोर असते. नेत्र-विकार व उजवा डोळा कमजोर असतो.

३१) कर्क लग्न असता तृतीय स्थानामध्ये कन्या रास येत असल्याने,- असता भावंडे अल्प असतात. भावंडांचे सौख्य फारसे लाभत नाही. असल्यास यांच्यापासून दूर राहातात. शुभग्रहअसल्यास काही प्रमाणांत शुभ फले मिळतात. साहित्य, टीकात्मक लेखन, हस्तकला, इतिहास,अकाउंटन्सी,वैद्यकी यांसारख्या विषयांची आवड असते. लहान मुले, तरुणी यांच्याशी मैत्री ठेवतात. ही द्विस्वभाव राशी असल्याने मन स्थिर नसते. प्रवासाची आवड असते. दूरचे प्रवासही यांच्याकडून होतात. या लोकांची लेखनशैली चांगलीअसते. थोडक्यात व मुद्देसूद लिहिणे यांना जमते. यांना गूढ विषय, वेदान्त,खगोलशास्त्र यांचेही आकर्षण असते. शिक्षणक्षेत्रात वा बौद्धिक क्षेत्रात यांच्या-कडून विशेष कामगिरी घडते. काही लोक लायब्ररी, लेबोरेटरी, हॉस्पिटल्स,दवाखाने यांसारख्या उपक्रमांस सक्रीय प्रोत्साहन देतात. शेजारधर्म पाळतात.यांच्या लेखनास प्रकाशनाची संधी मिळते.

३२) कर्क लग्न असता चतुर्थस्थानी तूळ रास येत असल्याने,-  व्यक्तीचा जन्म साधारणपणे सुखवस्तू कुटुंबात होतो. या व्यक्ती आपल्या कुटुंबाशी समरस असतात. घरासंबंधी यांना फार आकर्षण असते. यांना फुलझाडांची आवड असते. तरत-हेच्या सुंदर वस्तू जमवण्याचा व घरात ठेवण्याचा छंद असतो. आपले जीवन जास्तीत जास्त सुखी कसे ठेवता येईल या दृष्टीने हे प्रयत्नशील असतात. शुक्र बलवान् वा तूळ रास शुभयुक्त असेल तर गर्भश्रीमंती असते. यांना कशाची कमतरता नसते. घरामध्ये वाहने व नोकरवर्ग असतो. अनेक गोष्टी यांना सहजासहजी मिळतात. यांची माता प्रेमळ व सुंदर असते. घरामध्ये जिव्हाळ्याचे संबंध असतात. शांती, समाधान, सुसंस्कृतता हे घराण्याचे प्रमुख वैशिष्टय असते.तरुण स्त्रियांचा भरणा असतो. संगीत, साहित्य यांची आवड घरातील मंडळींना असते. एखादे वाद्यसुद्धा जवळ बाळगतात. घरामध्ये मित्रमंडळींची येजा सतत असते. उत्तरआयुष्य सुखासमाधानात जाते. परिवार मोठा असतो.

३३) कर्क लग्न असता पंचमात वृश्चिक रास येत असल्याने- विपुल संतती असू शकते. वृश्चिक ही प्रसव रास असल्याने व मंगळही बलवान् पडल्यास संततिनियमन करणे आवश्यक असते. मुले कल्पक, जिगरी, उत्तम मनोबल असलेली व महान् कार्ये करण्यास धडपडणारी असतात.
ही राशी बिघडली असल्यास मात्र फार खतरनाक फले मिळतात.मुले वाईट निपजतात. स्वभावाने ती उपद्रवी, क्षुद्र मनोवृत्तीची, आपमतलबी वर्तनाची असतात. त्यांची लैंगिक वासना प्रबल असून त्यासाठी वाटेल तितक्या खालच्या पातळीवर उतरतात. वृश्चिकेत पापग्रह असून मंगळही दूषित असल्यास गर्भपात, अपुऱ्या दिवसाची संतती, मृतसंतती जन्मास येणे हा अनुभव येतो.
पंचमातील वृश्चिक रास खेळांची आवड देते. यांना व्यायामाचीही आवड असते. यांची बुद्धी तीव्र असते व आकलनशक्ती चांगली असते. गूढशाना-मध्ये हे सहजतेने वावरतात. यांना रसायनशास्त्र, गणित, पुराणवस्तुसंशोधन,वेदादी जुने ग्रंथ यांचा अभ्यास करणे आवडते. यांना पोहण्याची आवड असते.मासे पकडण्याचा छंद असतो.पंचमात वृश्चिक रास लैंगिक वासना प्रबल दर्शविते. या लोकांना गुप्तपणे विवाहबाह्य वासनातृप्ती करण्याची संवय असते. येथे शुक्र असता यांचे चाळे शेजारपाजारी चालतात. यांची प्रेमात फसवणूक होऊ शकते, यांचे प्रेमही फुलपांखरासारखे असते.

३४) कर्क लग्न असता षष्ठस्यानी धनुरास येत असल्याने- असता मनुष्य पराक्रमी व शत्रुहन्ता असतो. हे लोकसत्त्वगुणी असून समाजामधील वाईट व गुन्हेगारी प्रवृत्तींचा नायनाट करतात.यांना स्वातंत्र्याची चाड व अन्यायाची चीड असते. हे लोक वैयक्तिक शत्रुत्व महसा पाळीत नाहीत. धनुरास पापग्रहाने विद्ध असता वा गुरू पापयुक्तअसेल तर हे वैयक्तिक पातळीवर तिरस्कार करतात. हे पंडितांसारखे वादविवाद-काल असन समाजातील विशिष्ट प्रवृत्तींवर टीका करतात. ह्यांना बौद्धिक स्पर्धा आवडत असून आपल्यापेक्षा बुद्धिमान व्यक्तीचा तिरस्कार करतात. त्यामुळे आपल्यापेक्षा उच्च दर्जाची, उच्च वर्णाची व्यक्ती ह्यांची शत्र बनते.. धनुरास अग्नितत्त्वाची असल्याने धाडसाची कामे हे लोक करतात.
ह्या स्थानाची धनुरास प्रकृती चांगली निरोगी ठेवते. जर दूषित असेल तर मांड्या दुर्बल असतात. मंगळ वा शनी या राशीत असल्यास पाय फॅक्चर होतात. गुरू खाण्यापिण्याच्या अनियमितपणामुळे अपचन, अग्निमांद्य, बद्धकोष्ठ हे विकार दर्शवितो. येथे शनी असता ह्यांना क्षयरोग होण्याचा संभव असतो.शुक्र मधुमेह दर्शवितो. गुरू हा वृद्धी करणारा ग्रह आहे. त्यामुळे ज्या रोगांची झटकन् वाढ होते असे रोग होतात. ह्यांचे रक्त दूषित होते. मांड्या धरणे, वात,उसण, पेटके येणे हे प्रकार अनुभवास येतात.नोकरीमध्ये ह्यांना मानाची जागा लाभते. शिक्षक, प्राध्यापक, बँकेतीलकर्मचारी, धार्मिक संस्थेतील नोकऱ्या, राजकारणी, उद्योगपती, वकील, मोठा खेळाडू, मंत्री, डायरेक्टर्स अशा महत्त्वाच्या जागा हे भूषवतात.ह्यांचे मामा मोठ्या जागेवर असतात. त्यांचा ह्यांना फार उपयोग होतो.
नाकरी अगर धंद्यात हे लोकप्रिय होतात. ह्यांची आर्थिक स्थिती चांगली असते.मुले मात्र फारशी मोठी होत नसतात. कधी कधी शत्रुत्व करतात.

३५) कर्क लग्न असता सप्तमात मकर रास येत असल्याने- असून शनी शुभसंबंधीत असता स्त्री कष्टाळू, सोशीक कर्तव्यदक्ष, प्रामाणिक, एकनिष्ठ, सेवाभावी व काटकसरी मिळते. संसार करणारी  ही उत्तम स्त्री असते. दिसायला कृश, रोगी, किंचित् तिरळी असते. वर्ण बहुदा  सावळा  असतो. शुभग्रह गौरवर्ण देतो. दीर्घोद्योगीपणा, मानसिक स्थैर्य, चिकारी आदी शनीचे सद्गुण असतात. तिच्याकडे विचारीपणा, दूरदर्शित्व, व्यवहार्य बुद्धी, सूत्रबद्धता व हिशेबीपणा असतो. फालतू गप्पांत वेळ घालविणे त्यांना आवडत नाही. आपल्या नवऱ्यावरील प्रेमाचे प्रदर्शन करणार नाहीत वा भावना-प्रधानताही आढळणार नाही. आपल्या जन्मजात थंड व सावधचित्ताने नवऱ्या-बरोबर वागतात. लैंगिक बाबतीत स्त्री (वा पुरुष) कधीच पुढाकार घेत नाही.स्त्रीच्या पत्रिकेत नवरा कमी दर्जाचा मिळतो.

३६) मकररास जर दूषित असेल व शनीही अशुभ असेल तर मात्र स्त्रीच्या स्वभावात कंजुषपणा, लोभ, पाताळयंत्रीपणा, कारस्थानी वृत्ती, निर्लज्जपणा,क्रौर्य, आळस, बुद्धिहीनता हे दुर्गुण आढळतात. स्त्री तेजोभंग करणारी असते.चहाडखोरी, लावालावी व अकारणी मुत्सद्दीपणा यामुळे स्त्री घरामध्ये अप्रिय असते. ही मंथरा व कैकेयी या दोन्ही भूमिका पार पाडू शकते. सदोदित काही तरी आजार असतो. संधिवात, सर्दी हे विकार सर्वसाधारणतः आढळतात.
स्त्रीचा अकाली मृत्यू होतो. काही पत्रिकांत संततीसुख आढळत नाही.मकररास स्वतंत्र धंदा करण्यास चांगली असून प्रचंड स्वरूपाचे यश देते.ह्या लोकांचे प्रवास खूप होतात.
२६ किंवा ३१ व्या वर्षी विवाह संभवतो.

३७) कर्क लग्न असता अष्टमात कुंभ रास येत असल्याने-  असता मनुष्य सर्वसाधारणपणे दीर्घायुषी आढळतो.अष्टमात शुभग्रह असेल तर अंत शांत स्थितीत होतो. परंतु पापग्रह असता आयुष्य कमी करतो व अनैसर्गिकरीत्या मरतो. येथे कुंभ रास असता मनुष्य पक्षाघाताने मृत्यू पावतो. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींच्या पत्रिकांत अष्टमात कुंभरास आढळते. त्याचप्रमाणे शत्रूकडून हे लोक मारले जातात. या राशीचा मालक शनी असल्याने उंचावरून पडून वा उडी टाकून किंवा चेंगरून मृत्यू येतो. या राशीचा विजेशी संबंध असल्याने विजेचा शॉक लागून मृत्यू येतो.यांना जलोदर, रक्तदाब, हत्तीरोग, वातव्याधी यांचाही त्रास संभवतो.यांना वडिलांचा वारसा मिळतोच. शिवाय स्त्रीधनही चांगलेच लाभते.स्त्री काटकसरी असल्याने तिचा धनसंग्रह यांच्या चांगलाच कामी येतो. हे लोक गुपिते राखण्यात हुशार असतात. स्त्रीचा मृत्यू अगोदर होतो. 

३८) कर्क लग्न असता नवमात मीन  रास येत असल्याने-  धर्मक्षेत्रात ही माणसे फार महत्त्वाचे कार्य करतात. राशीचा मालक नवमस्थानाचा कारक गुरू असल्याने जन्मजात धार्मिक प्रवृत्ती असते. आध्यात्मिक व धार्मिक विषयावर लेखन घडते. कायद्यामध्येही हे निष्णात असतात.धार्मिक विषयांचे सखोल अध्ययन करून त्यावर टीका लिहितात. यांचे तर्कशास्त्र व तत्त्वज्ञान हे दोन्ही विषय उत्तम असतात. यांच्या अनेक तीर्थयात्रा होतात.त्याचप्रमाणे साधुसत्पुरुषांची सेवाही यांच्याकडून घडते. हे धर्मपीठे स्थापन करून धर्माचा प्रसार करण्यासाठी शिष्य बनवतात. धर्म हेच यांचे जीवन असते.गुरूसारखा ग्रह या राशीचा मालक असल्याने उच्च शिक्षण उत्तम होते.कायदा व तत्त्वज्ञान हे यांचे मुख्य विषय असतात. गुरूचा अंक ३ असून पुष्कराज हे रत्न या व्यक्तींना भाग्यकारक ठरते. हे दत्त किंवा शिवभक्तअसतात. अद्वैताची उपासना यांना प्रिय असते.

३९) कर्क लग्न असता दशमस्थान मेष रास येत असल्याने-  मनुश्य आपल्या बुद्धतेच्या सद्गुणांच व पूर्वपुण्याच्या जोरावर महत्वदास पोहोचतो. ही धाडशी व परिस्थितीशी टक्कर घेणारी राशी असून समाजात पहिले स्थान मिळावे म्हणून धडपडणारीअसते. ही राशी दशमात असता कुंडलीच्या इतर बलाबलाप्रमाणे मनुष्यप्रामुख्याने खालील धंदेव्यवसाय व नोकरी करतो
लष्करी अधिकारी, शिपाई, लष्कर-नौदल-हवाईदल यांमधील महत्त्वाच्याजागा, संरक्षण व पोलिसखात्यातील कामगार, सर्जन, केमिस्ट, मेकॅनिक्स,उद्योगपती, कामगार पुढारी, बबर्जी, सुतार, बेकरीवाले, घड्याळ बनविणारे,अग्निजीवी लोक, अग्निसंरक्षकदल, सीआयडी, कुस्तीबाज, खेळाडू, खेळाचे सामान विकगारे, कारखान्यात काम करणारे, गिरण्यांतील मजूर, विटा-चुन्याच्या
भट्टीत काम करणारे, न्हावी, घडठोक काम करणारे, लोहार, बेलीफ, चोर,शस्त्रास्त्रे बनविणारे व विकणारे, बॉडीगार्ड, मुष्टियोद्धे, लोखंड व पोलादाशीसंबंधीत नोकरीधंदे, धनगर, ड्रायव्हर्स, शिकारी इत्यादी.मंगळ हा शक्ती, पराक्रम, धाडस, उत्साह, जोखीम यांचा कारक असल्याने या गुणांची गरज असलेल्या ठिकाणी हे कार्य करतात. दशमस्थ ग्रहाप्रमाणेयामध्ये फरक पडतो.
मेष राशी दूषित असेल तर हलक्या प्रकारचे, कुशलतेऐवजी शारीरिक बळआवश्यक असलेले धंदे करतात. मेष राशी व मंगळ दोन्ही दूषित असल्यास मनुष्य पातकी, घातकी, चहाडखोर, बेपर्बा, अनाठायी धाडस दाखविणारा, चोर,दरवडेखोर, गँगमन, टिंगलखोर, महान दुष्कर्म करणारा असतो.

४०) कर्क लग्न असता एकादशात वृषभ  रास येत असल्याने-   मित्रमैत्रिणी भरपूर व सुखवस्तू असतात. यांना आपल्या मित्रांचीचांगलीच मदत होते. कला व क्रीडा क्षेत्रात विशेष ओळखी असतात. त्यांच्या-बरोबर या व्यक्तींचा वेळ सुखासमाधानात जातो. ही रास इच्छापूर्ती विनासायास दर्शविते. वडील बहीण सुस्थितीत असते. स्थावर इस्टेटीपासूनलाभ होत असतात. वाहनादींचे सुख भरपूर असते. घराणे संपन्न असते.अद्ययावत् सुखसोयी असतात. घरातील माणसे प्रेमळ असतात. कुठल्या गोष्टींची कमतरता नसते. शेतीवाडी भरपूर असते.
ही रास दूषित असल्यास हलकट, निर्लज्ज व्यक्तींची संगत लाभते. त्यांच्या नादी लागून दुर्व्यसने लागतात व त्यामध्ये धनाचा व्यय होतो. हे लोकघरामध्ये आपल्या मित्रांबरोबर मौजमजा करण्यात वेळ घालवितात. ऐषारामी जीवनाची संवय लागते. सिनेमा-नाटकांचे वेड असते. सट्टा-जुगार-पत्ते-मटका-रेस यांचा नाद असतो. मित्रपरिवारात पैसा खूप घालवितात. शुक्रही दूषित असल्यास अंमली पदार्थांचे व्यसन लागते.

४१) कर्क लग्न असता  व्ययस्थानी मिथुन रास येत असल्याने- लेखनाने वा भाषणाने आपत्ती येते. अब्रुनुकसानीचा लकडा मागे लागू शकतो. वृत्तपत्रामुळे अपकीर्ती होते. ह्यांचे प्रवास खूप  होतात.शिक्षणावर, पुस्तकांवर व लायब्ररीवर खर्च करतात. भावंडांशी विशेष पटत नाही.  भावंडांसाठी खर्च करावा लागतो. स्त्रीला दमा होण्याची शक्यता असते. मज्जातंतू दुबळे झाल्याने डाव्या डोळ्याच्या दृष्टीवर परिणाम होण्याची शक्यता असते. बुद्धिजीवी लोकांशी शत्रुत्व असते. पापग्रहयुक्त ही रास असेल तर फसवाफसवीचे व्यवहार,खोटी सही, कटकारस्थाने, खोट्या शपथा या गोष्टीत हा मनुष्य गुंतलेला असतो. यामुळे तुरुंगवास वा दंड होतो. ही रास गूढशास्त्राचा अभ्यास देते. लेखनामुळे दूरवर प्रसिद्धी देते.


No comments:

Post a Comment