Sunday, 29 March 2020

मेषलग्न / मेषरास (Aries ascendent / Moon in Aries)


मेषलग्न / मेषरास

ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करतानाव्यक्तीची जन्मकुंडली महत्त्वाची मानली जातेव्यक्तीची जन्मतारीख - जन्मवेळ आणि जन्मठिकाण या तीन गोष्टी अचूक असतील तर, पंचागांच्या आधारे त्याची जन्म कुंडली मांडली जाते. जन्म क्षणी पूर्वक्षितिजावर जी रास उदित असते तिला'लग्नरासअसे म्हटले जाते. त्या स्थानापासून सुरुवात करून, बारा स्थानांमध्ये बारा राशीची विभागणी केली जाते.नंतर ज्या राशीत जे ग्रह असतील ते मांडले जातात व 'जन्मलग्नकुंडलीतयार होते.कुंडलीत असलेली ग्रहस्थितीस्थाने आणि स्थानगत राशी यांचा एकत्रित अभ्यास म्हणजे कुंडलीचा  अभ्यास  होय.



 जन्मकुंडलीमध्ये लग्नस्थान हे अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. या स्थानावरून स्वरूपशरीराची ठेवणस्वभावप्रकृतीप्रवृत्तीजातत्वचाआरोग्य व रोगप्रतिकार शक्तीव्यक्तिमत्त्वचारित्र्य,जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनआयुष्याचा प्रारंभ व एकंदरीत आयुष्य कशा प्रकारचे असेल याचा विचार करतात. त्यामुळे जन्मलग्नी उदित असलेली राशी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. या राशीचा अधिपती बहुतेक कुंडल्यांत त्या कुंडलीवर वर्चस्व गाजवतो. त्याच्या शुभाशुभ स्थितीनुसार आयुष्यात सुखदुःखे अनुभवास येतात जातकाच्या एकंदर व्यक्तिमत्त्वाचा विचार या स्थानावरून केला जातो. या स्थानातील राशी व ग्रह यांचा जातकाच्याव्यक्तिमत्त्वावर जोरदार परिणाम होत असतो.  कुंडलीतील बारा स्थाने  व त्यावरून पाहावायच्या प्रमूख गोष्टींचा तक्ता खालीलप्रमाणे :--





                           मेषलग्न / मेषरास

जन्मकुंडलीमध्ये प्रथमस्थानात  मेष (१) रास असता अथवा व्यक्तीची जन्मरास   (चंद्र)  मेष राशीत   असता,  जातकाच्या व्यक्तिमत्त्वाविषयी तसेच आयुष्याबाबत   सर्वसामान्यत पुढील गॊष्टी आढळून  येतात.

१) मेष ही राशिचक्रातील पहिली रास असून, या राशीचा स्वामी मंगळ हा ग्रह आहे. ही अग्नितत्त्वाची रास असून क्षत्रिय वर्णाची आहे, रजोगुणी तत्त्वाची / चर तत्त्वाची ही रास आहेशरीराच्या डोक्यावर हिचा अंमल असतो. या सर्व गुणांमुळे बांधा उंचप्रमाणशीरकुरळे केस.गोरेपणा एकूणच व्यक्तिमत्त्व पुरुषीमर्दानी असते. हाडापेराने मजबूत आणि काटक असतात.  रोग प्रतिकारशक्ती चांगली असते.रागीटमानीमहत्त्वाकांक्षीउतावळ्या स्वभावाचे पण निश्चयी.उदारस्पष्टवक्ते आणि न्यायी असतात. शारीरिक श्रम करण्याची तयारी असते, सहनशक्ती चांगली असते. मायाळूपणा कमी असतो.

२) मेष राशीचे जातक बिनधास्त आणि चपळ असतात. गतिमानता हा त्यांचा मुख्य गुण असून त्यांच्याकडे प्रचंड ऊर्जा असते.एक घाव दोन तुकडे हा या राशीचा स्वभाव असतोपरिस्थितीपासून पळणे हार मानणेतडजोड करणे हे यांना पटत नाही. खोटेपणाची यांना विलक्षण चीड असते.

३) स्पष्टवक्तेपणा हा यांचा मोठाच गुण असतो. समोरच्या माणसाला बरे वाटावे यासाठी हे कधीच खोटे बोलत नाहीत. यांचे मत स्पष्टपणे समोरच्या माणसाच्या तोंडावर सहजतेने सांगून टाकतात.प्रामाणिकपणाला यांच्या दृष्टीने खूप किंमत असते.

४) मेष ही मंगळाची राशी असल्याने ही राशी प्रथमस्थानी असता स्वभाव धाडशीमहत्त्वाकांक्षीआग्रहीआवेशपूर्णशीघ्रकोपीस्वतंत्र,तामसीहेकेखोरउतावळानिग्रहीबेडरचंचलभांडखोरमानीउत्साहीचिडखोरआक्रमकआत्मविश्वासीमोकळ्या मनाचासूड बुद्धीचा,कामीअविचारी असा असतो. थोडक्यातप्रचंड उत्साहआत्मविश्वास इच्छाशक्तीकष्टाळूपणासाहसीचंचलउत्साही असे या व्यक्तींचे व्यक्तिमत्त्व असते.

५) मंगळामुळे हे लोक अधिकार गाजविणारे असतात. कोणतेही कार्य धडाडीने पुरे करणे यांना शक्य असते. मंगळ बिघडल्यास हेच लोक गर्विष्ठअतिउत्साहीभांडखोर व बेमुर्वत बनतात. यांचे बोलणे-चालणे-लिहिणे फार जलद असते

६)व्यक्ती काहीशी तापटशीघ्रकोपी असते. यांचा उत्साह वाखाणण्यासारखा असतो;परंतु काही वेळा अति उत्साहाच्या भरात या व्यक्ती अविचारीपणाही करताना आढळतात! तसेचकाही व्यक्ती उधळ्याउतावळ्या आणि हटवादीही आढळतातपरंतु संकटप्रसंगी या कधीही डगमगत नाहीत.

७) मेषलग्नाचे लोक संरक्षण खातेपोलिसखाते अग्निशामकदलेखेळाडूखाटीक,   न्हावीशल्यवैद्ययंत्रज्ञसर्कसपटूसुतारमुष्टीयोद्धेकुस्तीबाजकारखान्यातील कर्मचारीआचारीशिपाई अशा विवि नोकरी-धंद्याशी त्यांचे प्रत्यक्ष संबंध येतात. शिवाय खिसेकापूचोरदरोडेखोर,खुनी हेही मेष लग्नात आढळतात.  

८) आपल्या दृढनिश्चयाच्या जोरावर असाध्य ते साध्य करण्याची तयारी असते. एखादी संस्था अगर संघटना स्थापन करुन त्या माध्यमातून उत्तम कार्य करण्याची क्षमता असते. स्वतंत्र बुद्धीने विविध शोध लावण्याची आवड असते. हकूमशाही प्रवृत्तीने इतरांवर अंमल गाजवण्याचा यांचा स्वभाव असतो. त्यामुळे नोकरी करण्याकडे यांचा फारसा कल नसतो.

९)आपले जीवन संघर्षमय असले तरी त्या संघर्षातून ते मोठे यश संपादन करतात. त्यांना मिळणारे यशहेस्वयंभू आणि स्वत:च्या ताकदीवर मिळविलेले असते.वेगवेगळया स्पर्धांमध्ये हिरीरीने भाग घेऊन यश मिळविण्याची यांना आकांक्षा असते ही योद्ध्याची रास आहे. वेगवेगळी आव्हाने स्वीकारणे आणि ते यशस्वी करणे यांना आवडते. स्वातंत्र्याची यांना आवड असते.

१०) स्वत:चे स्वातंत्र्य जपताना दुसऱ्याला स्वातंत्र्य देण्याइतका खिलाडूपणा यांच्याकडे असतो. यश मिळाले नाही किंवा काहीप्रतिकूल परीस्थिती आली तरी रडणेकुढणेहातपाय गाळून बसणे हे यांना माहीत नसते. आपल्या कष्टाच्याताकदीच्या जोरावर तेप्रतिकूल पतिस्थितीवर मात करतात.

११) यांचे फारसे कुणाशी पटत नाही. दुसऱ्यावर  हकूमशाही गाजविणे यांना आवडते पण दुसऱ्याचे म्हणणे विचारात घेत नाहीत. त्यामुळे लगेच संतापतात. यांनी "रागाला आवर घातला पाहिजे.. ही माणसं बोलण्यात फारच स्पष्टवादी असल्यानें दुसऱ्यांशी भांडणं ओढावली जातात. कधी-कधी अविचाराने खर्चावर नियंत्रण राहात नाही. स्वभावात कोमलपणाचा भाग कमीच असल्याने रागाच्या भरात खूप कठोर वागणे यांच्याकडून होते तसेच बेपर्वाईने समोरच्या माणसांच्या भावना दुखावल्या जातात.

१२) कुणी जराशी स्तुती केली की ही माणसे लगेच खूश होतात त्यामुळे आपमतलबी लोकांच्या जाळ्यात ओढली जाण्याचा धोका असतो. लोक यांचा फायदा घेतात आणि विसरुन जातात.लोकांचे ऐकून निर्णय घेतले गेल्याने यांचे बरेच नुकसान होण्याचीशक्यता असते.

१३)स्वभावात खूपच अधीरपणा असल्याने शांतपणे विचार करुन निर्णय घेण्याची क्षमता नसते. वाटाघाटीने प्रश्न सुटतात यावर यांचा विश्वास नसतो. काही-काही वेळा समस्यांकडे दुर्लक्ष करावे लागते. काळाच्या ओघात त्या समस्या शिथिल होतात हे त्यांना पटत नाही. त्यामुळे घाई-घाईने निर्णय घेऊन तो प्रश्न अधिकच बिकट करुन ठेवण्याकडे यांचा कल असतो. एखादया माणसावर प्रेम केल तर सर्वस्व उधळून टाकण्याची यांची क्षमता असते. त्यातूनच नंतर प्रस्तावण्याची वेळ येते. जर समोरची व्यक्ती हातचे राखून वागली तर ही माणसे दुखावली जातात, संतापीपणा वाढतो. या व्यक्ती रगेल आणि रंगेल असतात. अतिआत्मविश्वासाने नुकसान करुन घेतात.

१४)थोडक्यात सांगायचे झाले तर या राशीच्याव्यक्तींना स्वत:च्या संतापाला आवर घालणे गरजेचे आहे.कोणताही निर्णय घेताना थोडा विचार करणे गरजेचे आहे. तसेच आपमतलबी लोकांपासून दूर राहणे गरजेचे आहे. कष्ट करणे संघर्षकरुन यश मिळविणे हे चांगलेच आहे परंतु शांत राहून या व्यक्तींनी कमावलेल्या सुखाचा उपभोग घेणे गरजेचे आहे. दुसऱ्याच्या भावनांचा विचार करुन वेळप्रसंगी नमते घेतले पाहिजे. खोटे बोलण्याची गरज नाहीच पण योग्य वेळ पाहून सत्य बोलण्यास शिकले पाहिजे.

१५) प्रकृती स्वास्थ्य:- या राशीच्या माणसांमध्ये संघर्ष करण्याची प्रवृत्ती असल्याने स्वभावात शांतता नसते. त्यामुळे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याची वृत्ती असते. यामुळे यांना प्रामुख्याने दगदगीने होणारे विकार संभवतात. तसेच अग्नितत्त्व राशिस्वामी मंगळ असल्याने प्रामुख्याने पित्तप्रकृती असते. या राशीचा अंमल डोक्यावर असतो त्यामुळे डोक्यावर किंवा चेहऱ्यावर जखमेची खूण असते याशिवाय डोके दुखणेडोळे जळजळणेसनस्ट्रोकभाजणे,कापणेअतिरक्तस्त्राव होणे हे त्रास संभवतात. लहानपणी गोवर कांजिण्या या रोगाची भीती असते. निद्रानाशाचा त्रास होण्याचा संभव असतो तसेच जर झोप पूर्ण झाली नाही तर या व्यक्तींना त्रास होतो कोणत्याही परिस्थितीत शांत झोपेची यांना गरज असते. मेष राशीच्या व्यक्तींनी शक्यतो रात्रपाळीचे काम करु नये.स्वभावात साहस असल्याने, गाडी वाहन वेगात चालवण्याकडे यांचा कल असतो. वाहने सावकाश चालवावीत.

१६) मेषेचा अंमलअसल्याने डोकेदुखीमेंदूविकारमूर्छाअपस्मार,अर्धशिशीअर्धांगवातहिवतापदेवीप्लेगमेंदूचा तापअपघाताने जखमा,भाजणे इत्यादी शारीरिक विकार संभवतात.

१७)मेष राशीच्या व्यक्तींचा पूर्वार्ध कष्टात जातो , पण उत्तरार्धात मात्र त्यांना भरपूर सुख मिळते. यांचे वडिलांशी फारसे पटत नाही. भावंडापासून हे जरासे दूरच राहतात.  मातृसुख उत्तम असते.

१८) विवाहानंतर यांचा भाग्योदय होतो परंतु वैवाहिक मिळत नाही. संततिसौख्य चांगले मिळते.  यांच्या कठीण यांना मित्रांकडून सहकार्य मिळत नाही.

१९) स्त्रियांना मात्र ही रास फारशी अनुकूल नसते. दयाप्रेमनाजूकपणाकोमलपणावात्सल्यसंसारी वृत्ती हे गुण कमी आढळून येतात. या स्त्रिया दिसावयास सुरेख असतात पण नाजूक सौदर्यापेक्षा एकूणच व्यक्तिमत्त्वात मानीपणा अहंकारगर्व दिसून येतो. या थोड्या भांडखोर आणि करारी असतात. पण असे असलेतरी त्या स्त्रिया सत्त्वगुणी असतात. कुटुंबासाठी आवश्यकता असल तर वाट्टेल ती मेहनत घेण्याची तयारी असते. सकाळपासून - रात्रापर्यंत न थकता अंग मेहनतीची कामे या स्त्रिया करु शकतात. पण मुलांना आवश्यक असणारे प्रेममायाआपुलकी देणे त्यांना फार जमणार नाही. शिस्त लावण्याच्या कामी मात्र त्या योग्य असतात.

२०) मेषलग्न असता धनस्थानी वृषभरास येत असल्याने,  डोळे मोठे असतात.यांचे बोलणे व हावभाव नाटकी असतात. आवाजमोठा व खोल असतो. गायनसंगीतादी गोष्टींची आवड असते. वृषभ ही स्थिरराशी असल्याने आर्थिक स्थैर्य लाभते. दागदागिन्यांची हौस असते. खेडेगावातील लोकांकडे दुभती जनावरे विशेषतः गायी-म्हशी असतात. पाळीव प्राणीही असतात. स्त्रियांच्या वस्तूसौंदर्याच्या वस्तू यांच्या क्रयविक्रयापासून लाभ होतात.शेतीच्या मालापासूनही फायदे होतात. कुटुंब मोठे असते व स्त्रिया जास्त असतात. शुक्र चांगला शुभस्थितीत असल्यास आर्थिक उन्नती होते. या लोकांना भरपूर संपत्ती मिळवून ती त्याचप्रकारे खर्च करावी असे वाटते. शुक्र दूषित असताउतावळेपणाने गुंतवणूक होऊन नुकसान होते.


२१) मेषलग्न असता तृतीयस्थानी मिथुन रास येत असल्याने, मैदानी खेळांची आवड असते. खांदे   रुंद   शरीर चपळ असते. हे लोक चंचल असतात. वाचनाची आवड असते. यांना प्रवासाचीही खूप हौस असते. यांच्या पाठीवर बहुधा भाऊ असतो व तो हुशार असतो. स्त्री राशीतील बुध बहीण देतो. यांचे हस्ताक्षर वळणदार असते. लिहिताना हे जलद लिहितात. यांचा मुद्रणकलाइंजिनियरिंग व्यवसाय,गणित यांच्याशी संबंध येतो. यामध्ये यांचा स्वाभाविक कल आढळतो.शेजाऱ्यांशी  यांचे विशेष पटत नाहीउलट शत्तृत्वच येते. फिरतीची नोकरी असते. यांचे लेखन बहुधा टीकात्मक असते. लेखनाने हे शत्रुत्व निर्माण करतात. बुध बिघडल्यास मज्जातंतूचे विकार संभवतात. ऐकायला कमी येते.यांना फुफ्फुसांचे विकारसर्दीकफ यांचा त्रास होतो.

२२) मेषलग्न असता चतुर्थस्थानी कर्क राशी येत असल्याने, यांचे घरावर व कुटुंबावर फार प्रेम असते.यांना कुटुंबातील लोकांमध्ये राहाणे आवडते. चंद्र बलवान् असेल तर मातेचा वरचष्मा असतो. मातृसुख उत्तम मिळते. घर नीटनीटके ठेवण्याकडे लक्ष असते. यांना निरनिराळ्या फुलांची झाडे लावणे आवडते. शोभेच्या वस्तूंत 'मत्स्य-पेटीअसते. यांचे अंतःकरण पवित्र असते. हे संवेदनाशील व भावनाप्रधान असतात. चंद्र दूषित असल्यास मानसिक सुख नष्ट होते.यांचा पाय घरामध्ये स्थिर नसतो. यांना वाहन सुख असावे असे वाटते. चंद्र शुभ असता हे मिळते. यांचे घराणे प्रसिद्धीच्या झोतात असते. या व्यक्तीची आई सार्वजनिक कार्यात भाग घेत असते.या व्यक्तींना जलाशयनदीसमुद्रकिनारा खूप आवडतो. काही आपले निवासस्थान अशा ठिकाणी निवडतात.चतुर्थेश चंद्र असता प्रथम मातेच्या व तिच्या मृत्यूनंतर पत्नीच्या सल्ला-मसलतीने हे लोक वागतात. घरामध्ये स्त्रीचा शब्द महत्त्वाचा ठरतो.

२३) मेषलग्न असता पंचमात सिंह रास येत असल्याने, मनुष्य गायननाटकसंगीत यांचा शौकिन असतो. यांना पुत्रसंतती होते. परंतु रवी दूषित असल्यास ती चांगली निपजत नाही. प्रेमात हे उतावळेसाहसी असतात. यांना खाण्यापिण्याचा शौक असतो.यांना मैदानी खेळाचीरेसकोर्सची आवड असते. हे लोक शिकार करण्यात पटाईत असतात. 'टाईमपाससाठी हे क्लबगॅम्बलिंगची ठिकाणेघोड्यांच्या रेसेस या जागा निवडतात.सिंहेत पापग्रह असल्यास जुगाराच्या व्यसनांत कफल्लक बनतात. कर्तासवरता मुलगा मृत्यू पावतो. मुलगे जगले तरी बापाला त्यांचा उपयोग नसतो.
पंचमात सिंह राशी असलेले लोक ज्या क्षेत्रात वावरतील त्यात महत्पदास चढतात. प्रिन्सिपॉलडायरेक्टर्सऑर्गनायझर्सकस्टोडियन्सगव्हर्नर्समॅनेजर्स,एक्झिक्युटीव्हज्मुख्यसचिव अशा मोठमोठ्या मानाच्या जागा हे भूषवतात.अर्थात् रवी यामध्ये १,,,१० या स्थानांशी संबंधीत असतो.

२४) मेषलग्न असता षष्ठस्थानी कन्यारास येत असल्याने, त्यांची भावंडे ह्यांच्याशी शत्रुत्व करतात त्याचप्रमाणे ह्यांचे शेजारीसुद्धा शत्रुत्व करतात. हे लोक स्वतःच्या वागणुकीने शत्रत्व जोढवून घेत असतात. ह्यांचा स्वभाव टीकाखोर असल्याने लोक यांच्या-वर नाराज असतात. नातेवाईकांनाही ह्यांचा स्वभाव पसंत नसतो. व्यवहारीपणा हा ह्यांचा सर्वांत मोठा शत्रु असतो. पैपैचा हिशेब करणे यांना बिलकूल पसंत नसते. कंजूष वा हिशेबी वृत्तीची माणसे ह्यांना अजिबात आवडत नाहीत.

२५) मेषलग्न असता षष्ठस्थानी कन्यारास येत असल्याने  कन्याराशीचा पोटावर अंमल असल्याने पोटाचे विकार -आमांशविषमज्वरअपचनआंत्रविकारबद्धकोष्ठ अतिसारसंग्रहणीजंत,विषार यांसारखे रोग होण्याचा दाट संभव असतो. बुध कन्याराशीचा मालक असून त्याचा मज्जासंस्थेवर अंमल चालतो. त्यामुळे पोटाच्या विकारांनी त्रस्त होऊन हे लोक चिडचिडे बनतात व कालांतराने मनोरुग्ण बनतात.इतरांना हे भ्रमिष्ट वाटतातपण त्याचे मुख्य कारण पोटामधील दीर्घकालीनविकार असू शकते. बुध चामडीचे खरूजनायटेगजकर्णकुष्ठ इत्यादी विकारही निर्माण करतो. कन्येत राहू असल्यास हा अनुभव येतो. दूषित बुध बधिरता स्मृतिभ्रंशवेडबुद्धिमांद्य दर्शवितो. नोकरीच्या दृष्टीने कन्या रास इंजिनियरिंगआरोग्यछापखानेप्रकाशन,अकाउंटमहिशेब तपासणेकारकुनीनर्सिंग होममेकॅनिकल रिपेरिंग यागोष्टींशी संबंधीत असते. लेखकांत हे टीकाकार बनतात. हे लोक कॅरम चांगले खेळनात. त्याचप्रमाणे हे चांगले जलदगती गोलंदाज होऊ शकतात. 

कन्याराशीत शुभग्रह असून बुधही शुभ असल्यास मामा कर्तबगार व मोठ्या पदावर असतात. त्यांच्या मार्फत ह्यांना नोकरी मिळते. ह्यांची नोकरीप्रवासाची वा सेक्समनसारखी असू शकते. अनेक मोठमोठ्या व्यापाऱ्यांशी यांची ओळख असते. नोकन्यांत खूप वेळा बदल होतो. धंदाही अनेक वेळा बदलतात.

२६)मेषलग्न असता सप्तमात  तूळरास येत असल्याने, स्त्री बहुधा सुंदर असते. ती अत्यंत प्रेमळ व एकनिष्ठ असते. ही सौंदर्याची रास असल्याने मोहक हास्य हे ह्यांच्या स्त्रीचे आकर्षनाचे प्रमुख अंग असते. पोषाखसुगंधी द्रव्येफॅशन्सनवनवीन वस्तू स्त्रीला आवडतात. ऐषारामाची आवड असते. ह्यांचे लग्न लवकर होते. घरामध्ये शांतता व समाधान असते. ह्या स्त्रियांना समाजजीवनाचीही खूप हौस असते.ह्यांची राहाणी फार उच्च दर्जाची असते. तूळ रास शुद्ध स्वरूपात असल्यास व शुक्रही शुभ असत्यास वैवाहिक जीवन फार सुखात जाते. आपल्या दयाळू व स्नेहाई स्वभावामुळे कुटुंबातील सर्व मंडळींचे प्रेम ह्यांची स्त्री संपादन करते.आपल्या गोड स्वभावाने ही सर्वांना आकर्षित करते. तुळरास शुद्ध असल्यासच हे शक्य आहे. विवाहानंतर आर्थिक उन्नती होते.तूळ राशीमुळे इतरांशी संबंध मित्रत्वाचे असतात. भागीदारीमुळे फायदे होतात. धंद्यामध्ये भरभराट होते. ह्यांचे प्रवास खूप होतात. मौजमजेकरिताअनेक शोभेची ठिकाणे हिंडतात.

२७) मेषलग्न असता सप्तमात  तूळराशीत जर  पापग्रह असेल व शुक्रही दूषित असेल तर मात्र अनिष्ट फले चाखायला मिळतात. स्त्री फारशी सुंदर नसेल. पती-पत्नीत शुद्ध प्रेमाचा अभाव असतो. ऐपत नसताना सुद्धा अनेक शोभेच्या व करमणुकीच्या वस्तूंचा पतीकडे हट्ट धरतात. त्यांच्यामध्ये एकोपा नसतो. दोघांच्या निष्ठा संशयास्पद असतात. मध्यवयात द्विभार्यायोग संभवतो. घटस्फोटाची शक्यता नाकारता येत नाही. येथे रवी दुर्बल असतो त्यामुळे पत्नी वंध्या मिळण्याची शक्यता असते. ह्या कारणाने द्वितीय विवाह संभवतो. शुक्र दुर्बल असल्यास विवाहानंतर आर्थिक परिस्थिती खालावते. ह्या माणसात बाईलवेडेपणा आढळतो.

२८)मेषलग्न असता अष्टमात वृश्चिक रास येत  असल्यामुळे मृत्यू अपघाती होऊ शकतो. यांना मूळव्याध , भगंदरगुदद्वाराचे विकार होतात. विषारी कीटकसापविंच,चावल्याने किंवा पोटामध्ये विषारी ड्रग्स घेतल्याने मृत्यू येतो.  या राशीत मंगळ असता  आत्मघातकी प्रवृत्ती असते. शनी वृश्चिकेत असल्यास उंचावरून पतन होते किंवा मूळव्याधीचा भयंकर रोग होतो.ह्यांना लैंगिक सुखाचे जबरदस्त आकर्षण असते. यांच्या पोटात काही गुह्य राहात नाहीसगळ्यांना सांगत सुटतात. भावंडांशी पटत नाही. हे स्वभावाने फार खर्चिक असतात. व्यसनाधिक्याने हे आपले आयुष्य कमी
करून घेतात.

२९)मेषलग्नअसता भाग्यस्थानी धनु रास येत  असल्यामुळे मनुष्य भाग्यशाली असतो. ह्यांचे वडील धर्माचरणीसत्यप्रियस्पष्टवक्तेनिष्कपटी व आशावादी वृत्तीचे असतात.ह्या लोकांना वडिलांचे सुख चांगले मिळते. घरची स्थिती चांगली असल्याने यांचे शिक्षण निर्वेध होते. हा मनुष्य पंडित असून अनेक विषयांवर अधिकार वाणीने बोलतो. कायदाअध्यात्म व शिक्षण क्षेत्रात ह्यांचे विचार महत्त्वपूर्ण असतात. अर्थशास्त्रांतही ह्यांची प्रगती चांगली होते. ह्यांच्याकडून अनेक वेळा तीर्थक्षेत्रे घडतात. धर्मकार्येमंगल उत्सवब्राह्मणभोजन अशा विविध रूपात ह्यांच्याकडून सत्कार्ये घडत असतात. परदेशात भाग्योदय होतो. ह्यांची तर्कबुद्धी अप्रतिम असते वयाच्या १६२१३३ ह्या वर्षापासून प्रगतीचे टप्पे असतात. ३ हा ह्या लोकांचा शुभ अंक असतो. पुष्कराज हे रत्न वापरल्याने फायदा होतो. हाईशान्य दिशेस भाग्योदय घडवितो.हे दत्त किंवा शिवभक्त असतात.

३०) मेषलग्न  असता दशमात मकर रास येत  असल्यामुळे सावधपणाव्यवहार्यताकाटकसरदीर्घसूत्रीपणा,दूरदर्शीपणाशिस्तबद्धताचिकाटी व हिशेबी वृत्ती या स्वभावगुणांनावाव मिळेल अशा प्रकारचे उद्योगधंदे व नोकऱ्या हे लोक करतात. यांचेसंघटनाकौशल्यनियोजनप्रसंगावधान व विचारपूर्वक जोखीम या गुणांनी हेमहान् उद्योगपती बनू शकतात. या राशीचा मालक शनी असल्याने कोणत्याहीकामाला आवश्यक असलेले कष्ट उचलण्याची तयारी असते. ही रास दशमात असता खालील उद्योगव्यवसाय किंवा नोकऱ्या यांच्याकडून घडतात.
शेतकरीभूगर्भशास्त्रज्ञधातुशास्त्रज्ञजंगली संपत्तीशी संबंधीत लोक,
खाणीतील मजूरम्युनिसिपालिटीलोकल बोर्डकॉर्पोरेशनगव्हर्नमेंट यांमधील
कर्मचारीजमीनजुमला इत्यादी स्थावराचे व्यवहार करणारेबिल्डर्सइस्टेट-
एजंटतेलाचे व्यापारीविहिरीचे खोदकाम करणारेधातूवर खोदकाम करणारे,
गवंडीकुंभारसट्टेयरविटांचे कारखानेवालेबांधकामाचे मटेरियल विकणारे,
चांभारहमालकुटिल राजकारणीकच्चे लोखंड खाणीतून काढून विकणारे,
सर्वसाधारण कष्टकरी मजूरउद्योगपतीकामगार पुढारीदलितांचे पुढारी
इत्यादी.

३१) मेषलग्न दशमात मकर रास ही रास दूषित असता हलक्या दर्जाची अंगमेहनतीची कामे करावी लागतात. ही राजकारणी रास असल्याने दूषित असता राजकारणात अपयश
देते. दीर्घ परिश्रमानंतर थोडेसे यश लाभते. यांच्या कृतीमध्ये निष्ठुरपणा असतो.


३२) मेषलग्न लाभस्थानी कुंभ रास असता मित्रवर्ग निवडक असतो परंतु त्यामध्ये
विद्याव्यासंगी लोक असतात. वैज्ञानिकशास्त्रज्ञसल्लागारलेखकप्रोफेसर,
इंजिनियर्सज्योतिषीमंत्री असे अनेक विद्वद्वर्य यांच्या मित्रमंडळीत असतात.
त्याचप्रमाणे वरिष्ठ राजकारणीही यांच्या ओळखीचे असतात. हे उद्योगधंद्यामध्ये
यशस्वी होतात. त्यासाठी यांना या राजकीय व इतर क्षेत्रांतील मित्रांची मदत
होते. यांचे वैभव स्थिर स्वरूपाचे असते. शेतीवाडीबागाईत यासारखी इस्टेट
असतेच. याशिवाय आधुनिक काळातील सुसज्ज अशी यंत्रणा यांच्या उद्योग-
धंद्यासाठी मिळते. इलेक्ट्रिक वा इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात यांना उत्तम यश लाभते.

३३) मेषलग्न लाभस्थानी कुंभ रास असता व कुंभ रास दूषित असता मकरेप्रमाणेच लबाड मित्र मिळतात. परंतु हे जास्त शक्तिमान्सत्तास्थानी व बुद्धिमान असतात. आयुष्यातील कित्येक इच्छासोडून द्याव्या लागतात. सततच्या अपयश मुळे मन निराश होते. संततीसुख नशिबात नसते. वडीलभावंड आळशी व कुचकामी असते. जुगारात अपयशयेते. वृद्धमित्र यांचा स्वार्थासाठी उपयोग करून घेतात. धंद्यात वारंवार अडथळे
व अपयश येते. सत्ताधाऱ्यांकडून त्रास होतो. परवाना मिळायला अडथळे येतात.

३४) मेषलग्न व्ययात मीन रास असता सत्कार्यासाठी व्यय होतो. धार्मिक उत्सवशिक्षण,तीर्थयात्रा यांत धन खर्च होते. त्याचप्रमाणे संगीत ऐकणे,
मैफली सजविणे यांत व्यय होतो. दानधर्म खूप करतात. अध्यात्मात प्रगती होते.
परदेशगमन होते वा देशांतर्गत दूरचे प्रवास होतात. हा शत्रुत्व कोणाशी ठेवत
नाही. यांच्याकडून गुंतवणूक सहसा होत नाही. मुले उच्चशिक्षणासाठी
परदेशगमन करतात. मठआश्रम येथील लोकांशी संबंध ठेवतात व त्यात ह्यांचे
फायदे होतात. हॉस्पिटलटूस्टदानसंस्थांपासून फायदे होतात.

३५) मेषलग्न व्ययात मीन रास दूषित असेल तर खर्चाला सुमार नसतो. कायदेविषयक अडचणीयेतात. धार्मिक गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. संतसज्जनांची निंदा करतात. यांची
अपकीर्ती होते. वागण्यात अविचारीपणा व दुराचरणी असतात. मुले वाईट
निपजतात. नास्तिकतामात्सर्यवादविवादी वृत्ती असते. पैसा शिल्लक राहात
नाही. कर्जबाजारी अवस्थाही येते. यांची भटकी वृत्ती असते. आचरणात
कसलाही विधिनिषेध वा धर्मबंधन नसते.




No comments:

Post a Comment