Sunday, 17 November 2019

ज्योतिषशास्रातील महत्त्वाचे नियम (भाग -3) (ASTROLOGY TIPS-3)



ज्योतिषशास्रातील महत्त्वाचे नियम (भाग -3)
(ASTROLOGY TIPS-PART-3)

ज्योतिषशास्त्राचा खरोखर शास्त्रीय अभ्यास करावयाचा आहे ,त्याने निरनिराळी ज्योतिषशास्त्राची पुस्तके 
वाचून आपणाला पटणारी अशी काही जातक-शास्त्रीय तत्त्वे वा सूत्रे ( Rules of Predictive Astrology एकत्र करून नंतर ती अभ्यासून पहावीत,  हे करीत असतां ती तत्त्वे वा सूत्रे त्याने निरनिराळ्या 
जन्मपत्रिकांना लावून पहावी आणि पडताळ्याच्या स्वरूपांत तपासून घ्यावी
प्रत्येकाची कुंडली परीक्षणाची पद्धतनियमाचा वापर करण्याची हातोटीअंतीम फलादेशास पोहचण्याची पद्धत वेगळी असू शकते. एकाच घटनेसाठी काही ठिकाणी एकापेक्षा जास्त नियम दिलेले आढळतात, प्रत्येकाला येणारा अनुभव निराळा असल्याने प्रत्येकजण आपली स्वतःची पद्धत व नियम अनुभवांती ठरवित असतो. त्यामुळे एकापेक्षा जास्त नियम आढळले तर, नविन अभ्यासकांनी गोंधळुन जाण्याचे कारण नाही. ज्याने त्याने आपल्या अनुभवानुसार कोणता नियम किंवा पद्धत वापरावी हे ठरवावे. 
माझ्या अभ्यासांत, मी जी अनेक ज्योतिषशास्त्राची पुस्तके वाचली व त्यातील जे मला पटले:-                                                           त्या पुस्तकांमधीलशास्त्रीय तत्त्वे वा सूत्रे :-(Rules of Predictive Astrologyखाली एकत्र देत आहे.:- 
(हे नियम, पत्रिकेतील इतर शुभाशुभ योगांचा तारतम्याने विचार करूनच उपयोगात आणावेत )



१. चतुर्थात कोणत्याही राशीचा मंगळ असता, व्यक्तीच्या मालकीची थोडी का होईना जमीन असतेच    असते.


२. पत्रिकेत रवि, बुध, शुक्र या तीन ग्रहांची युती असता, व्यक्तीजवळ कोणती ना कोणती कला असतेच.       स्त्रियांजवळ भरतकाम, विणकाम इत्यादी तर ,पुरुषांजवळ तबलावादनसारख्या कला पाहावयास     मिळतात.


३. व्ययस्थानी स्वगृहीचा किंवा उच्चीचा ग्रह असल्यास व्यक्ती परोपकारी असतात

४. व्ययस्थानातील पापग्रह व्यक्तीला कीर्ती देतात.


५. सप्तमात बुध असता, पति-पत्नीच्या वयात निदान ६ ते ८ वर्षांचे अंतर सापडते.


६. षष्ठात मंगळ असता किंवा शनि मंगळाची एकमेकांवर दृष्टी असता ,आयुष्यात एखादी तरी शस्त्रक्रिया होतेच

७. पंचमात मंगळ असता विवाह उशिरा होतो.


 ८. जर मंगळ बुधासहित लग्नात असेल तर कमरेत व्यंग निर्माण होते. (कमरेत जोर नसतो.)


९.  नवमातील मंगळ परस्त्रीशी संबंध आणतो.


 १०. शुक्र, गुरु युती असता, पत्नी सुशिक्षित मिळते.


११. चंद्र चतुर्थात असता, व्यक्ती परस्त्रीलोलुप असते.


१२. सप्तमात रवि असता ,व्यक्ती अतिसंतापी व कामलोलुप असतात.


१३. अष्टमांतील  गुरु व्यक्तीला कृपण व रोगी बनवितो.


१४. शुक्र उच्चीचा (मीनेचा) असता, द्विभार्यायोग होण्याचा संभव असतो. वैवाहिक सौख्य कमी.


१५. व्ययात शनि असता, गुप्तपणे पैसा साठविण्याकडे वृत्ती असते. यांना प्रसिद्धी मिळते. या व्यक्ती शरीराने सडपातळच असतात .धर्म व संस्कृतीविषयी अपरंपार प्रेम असते. वृत्ती कर्मठ असते.


१६. पंचमेश चतुर्थात असता पुत्रचिंता असते. काही वेळा पुत्र होतच नाही. फक्त कन्याच होतात


 १७. चतुर्थेशावरून राहूचे अंशात्मक भ्रमण स्थानांतर करावयास लावते. बदलीचा प्रश्न पाहताना हा योग मुद्दाम पाहावा.

१८. चतुर्थातील राहूच्या भ्रमणामुळे, आयुष्यात काही महत्त्वाचे बदल होतात.


 १९.  दशमातील मंगळ व्यक्तीला नोकरीत निश्चितपणे वरच्या जागेवर बढती करतो. बापापेक्षा मुलगा        वरच्या श्रेणीचे जीवन जगतो. उदाहरणार्थ, बाप कारकून असेल तर मुलगा 'गॅझेटेड ऑफिसर' होतो.


२०. चंद्र-राहू युतीमुळे, आयुष्यात एखादे मोठे संकट हमखास येते.


२१. एकट्या शुक्रावर गुरूची दृष्टी असेल तर, शुक्राचे महत्त्व कमी होते; परंतु याच शुक्रावर रविची दृष्टी असेल तर  शुक्र अधिक बलवान होतो.


२२. शुक्र-राहू युतीमुळे व्यक्तीच्या गळ्यात दोष निर्माण होतो.


२३. चतुर्थातील शुक्र व्यक्तीला आयुष्यभर वाहनसुख देतो; परंतु या शुक्रावर   राहू किंवा शनीची दृष्टी नसावी.


२४. तुळेचा शनि पत्रिकेत लग्नी, षष्ठात किंवा दशमात असता व्यक्ती उत्तरायुष्यात महत्पदाला चढतेच चढते.


२५. गुरु १, ५, ७ किंवा ९ या स्थानी असेल तर ,अशा व्यक्ती संकटातून निभावून जातात. असा योग असलेले    सैनिक, विमानचालक, इंजिन ड्रायव्हर संकटकाळात सुरक्षित राहतात


 २६. नवमस्थानात एक किंवा अधिक ग्रह असता व्यक्ती बहुधा भाग्यशाली असते. नवमेश नवमात असता हा  अनुभव निश्वित येतो.


 २७. पंचमातील शुक-चंद्र युती व्यक्तीला स्त्रीलोलुप करते.


२८. वृश्चिकेचा गुरु कन्यासंतती अधिक देतो. प्रथम संतती बहुधा कन्याच असते


२९. नवम स्थानातील राहू व्यक्तीला अतीव बुद्धिमान आणि साहसी बनवितो.


३०. व्ययस्थानातील शुक्र,हा रवीच्या पुढे असेल तर व्यक्तीला परदेशभ्रमणाचा योग येतो. हा शुक्र खूप संपत्ती देतो


३१. व्ययस्थानाचा अधिपती ज्या स्थानात असेल, त्या स्थानाची काही प्रमाणात तरी हानी केल्याशिवाय राहत नाही.


३२. शनी आणि राहू हे ग्रह ज्या स्थानात असतील त्या स्थानाची हानी केल्याशिवाय राहत नाहीत.


३३. वक्री ग्रह विशेष प्रभावी असतात. कुंडलीत ते ज्या भावाचे स्वामी असतात, त्या भावाचे फल (शुभ अथवा  अशुभ) विशेष तीव्रतेने देतात.


३४. लग्नेश ज्या स्थानात पडतो त्या स्थानाची वृद्धी होते.


३५.. एखादा ग्रह लग्नेश आणि अष्टमेश दोन्ही असेल (उदा. मेष लग्न ) तर त्याला तो अष्टमेश असल्याचा दोष लागत नाही, तो लग्नेश असल्याने अष्टमेश असूनही शुभच होतो.


३६. एखादा ग्रह ज्या राशीत असेल त्याच राशीत नवमांशातही पडत असेल तर त्या ग्रहास वर्गोत्तम' असे म्हणतात. असा वर्गोत्तम ग्रह स्वराशीस्थ ग्रहाप्रमाणेच फळ देतो.


३७. एखाद्या भावापासून , त्याचा भावेश अष्टमात पडेल तर ,त्या भावाचे फळात वैगुण्य निर्माण करतो.


३८. एखादा ग्रह दोन भावांचा अधिपती असेल तर आपल्या दशाकालात तो लग्नापासून जो भाव प्रथम पडत असेल त्या भावाचे फळ प्रथम देईल


३९. केंद्राचा स्वामी (१,४,७,१० या  स्थानांचा स्वामी ) त्रिकोणात ( १,५,९ या स्थानात ) पडला तर त्याचे बळ दुप्पट बनते.


 ४०. चतुर्थेश पंचमात व पंचमेश चतुर्थात किंवा दशमेश नवमातआणि नवमेश दशमात असा योग झाला तर तो योग व्यक्तीला फार श्रेष्ठ पदावर पोचवितो. हे दोन्ही योग एखाद्या पत्रिकेत झाले तर व्यक्ती महत्पदाला चढते. 


 ४१. एखाद्या भावात एखादा ग्रह असण्यापेक्षा, त्या भावाकडे दृष्टी टाकणाऱ्या ग्रहाचा, त्या भावावर                      अधिक परिणाम होतो


४२. एखाद्या स्वराशिस्थ ग्रहाबरोबर केतू असेल तर त्या भावाचे फळ द्विगुणित होते.


४३. मंगळ-हर्षल अंशात्मक युतियोगामुळे वैवाहिक जीवनात  संकटे येतात.


४४. शनि-चंद्र अंशात्मक युतियोग व्यक्तीला वैराग्य देतो.


४५. चंद्र-बुध, शनि-शुक्र, चंद्र-शुक्र किंवा बुध-शुक्र यांची अंशात्मक युती असता व्यक्तीला चित्रकला, पेंटिंग, हस्तकला इत्यादीत प्राविण्य देते.


४६. चंद्र-शुक्र युती, प्रतियोग अगर लाभयोग असता व्यक्तीला संगीतकलेची आवड दिसून येते.


४७. पंचमेश दशमात अथवा दशमेश पंचमात किंवा पंचमेश दशमेश युती असता व्यक्तीचा शिक्षणक्षेत्राशी संबंध येतो.


४८. लग्नेश व्ययात मारकेशयुक्त असता अपघात किंवा खून होण्याची शक्यता असते.


४९. कुंडलीतील तृतीय स्थानावरून कानांचा विचार करावा. तृतीयात पापग्रह असून तृतीयेश पापग्रहाने युक्त असता व्यक्तीमध्ये कर्णदोष आढळतात.


 ५०. सप्तमस्थ राहू पापग्रहाबरोबर असता, द्विभार्यायोग संभवतो.


 ५१. स्तंभीग्रह ज्या भावाचा कारक असेल त्या भावाच्या संदर्भात एखादी महत्त्वाची घटना घडताना दिसते.


 ५२. षष्ठेश व्ययस्थानात असता दृष्टीत दोष असतो. (विशषेतः डाव्या डोळ्यात) काही वेळा डोळ्याचे ऑपरेशन करण्याची वेळ येते .


 ५३. षष्ठेश रवीसह ६ किंवा ८ व्या स्थानात असेल तर डोक्याला टक्कल पडते.


५४. षष्ठात मकर राशी असता, जातकाची सांपत्तिक स्थिती पष्कळदा गरिबीची आढळून येते.


५५. लग्नेश  आणि सप्तमेश चतुर्थस्थानी असता उच्च दर्जाचा वाहनयोग होतो.


 ५६ बलवान शुक्र चतुर्थस्थानी असता उच्च दर्जाचा वाहनयोग होतो.


५७. नवमस्थानात गुरु असता जातकाबद्दल लोकांच्या मनात आदरभाव असतो व जातक उच्च स्थितीला पोचून त्याचा उत्तम भाग्योदय होतो


५८. भाग्यस्थानातील या गुरुवर शुक्राची दृष्टी असेल तर, जातकाला विविध प्रकारचे उत्तम वाहनसौख्य मिळते.


 ५९. भाग्येश भाग्यात असता जातक अनेक बाबतीत भाग्यशाली असतो. त्याचे जीवन सुखात जाते. हा एकटाच योग पत्रिकेला सर्व दृष्टीने तारून नेणारा असतो.


 ६० . चतुर्थातील रविमुळे, जातकाला मनःस्वास्थ्य लाभणे कठीण जाते. तो सदैव दुःखी व चिंताग्रस्त असतो.


 ६१. तृतीयस्थानात शनि असता लहान भावंडे नसतात व असलीच तर त्यांच्यापासून सुख मिळत नाही..


 ६२. लग्नेश बलवान असून, भाग्येश भाग्यात असेल तर अशा व्यक्तीजवळ भरपूर संपत्ती असते.


६३.भाग्येश  ज्या राशीत पडला असेल त्या राशीचा स्वामीदेखील भाग्यवर्धक समजला जातो.


६४. अष्टमेश अष्टमाच्या अष्टमात (तृतीयात ) असता मृत्यू एकाएकी  येतो


६५. रोहिणी नक्षत्र असता संगीत विद्येची आवड असते


६६. पंचमेश अष्टमात अथवा अष्टमेश पंचमात असता स्त्रियांना प्रसूतीच्या वेळी त्रास होण्याची शक्यता असते.


६७. शुक्र -नेपच्यून अंशात्मक युतियोग अथवा प्रतियोग असता नेत्रविकार संभवतात.


 ६८. गुरु- चंद्रात अंशात्मक त्रिकोण योग असता व्यक्तीला आपल्या क्षेत्रात कीर्ती व लोकमान्यता मिळते.


६९. शनि मंगळ अंशात्मक केंद्रयोग असता जीवनात अचानक अशुभ घटना घडून संपूर्ण जीवन ढवळून निघते.


७०. कृत्तिका नक्षत्र हे क्रूर नक्षत्र असून या नक्षत्रात पापग्रह असता नेत्रविकार संभवतात.


 ७१. व्ययस्थानात उच्चीचा किंवा स्वगृहीचा शुक्र असता व्यक्ती कलाप्रिय, विख्यात आणि धर्मप्रिय असते. ती    ऐश्वर्याचा उपभोग घेते


७२.भाग्यात चंद्र बुध असता जातक पंडित बनतो.


७३. चंद्र लग्नेश असून चतुर्थेशाबरोबर असेल तर उत्कृष्ट प्रतीचा वाहनयोग होतो.


 ७४. तृतीय स्थानातील शनि भावंडांचा नाश करतो तर राहु वृद्धी करतो.


७५. दुसऱ्या व तिसऱ्या स्थानात जितके ग्रह असतील व या स्थानाकड जितके ग्रह पाहत असतील तितकी भावंडे  मनुष्याला असतात.


७६. तृतीय स्थानात बलहीन मंगळ असेल तर अशा व्यक्तीचा भाऊ ( दीर्घायु असतो.)


७७. नवमस्थ चंद्र कोणत्याही ग्रहाने दृष्ट नसेल तर जातक संन्यासी वृत्तीचा असतो.


७८. षष्ठात मंगळ असता मामा-मावशीचा संसार सुखाचा होत नाही."


७९. नवमस्थानातील चंद्र उत्तम कीर्ती देतो. गुरुबरोबर किंवा गुरूच्या शुभ दृष्टीत असता अधिकच जोरदार फल  मिळते.

८०.दशमात राहू चंद्र युती असल्यास अशा व्यक्तींनी धंदा न करणेच बरे .


 ८१. मंगळ नवमात असता सूडवृत्ती देतो. तसेच, स्पष्टवक्तेपणामुळे यांचे नोकरीत पटत नाही


 ८२. पंचमात गुरुमंगळाची युती असता संततीचा नाश होतो.


 ८३. पंचमातील गुरु उशिरा संतती देतो.


८४. सप्तमात शनि बुध असता व्यक्तीला कामवासना कमी असते. त्यामुळे अविवाहीत राहण्याकडे कल असतो.


 ८५. भाग्यात शुक्र असणारे लोक मनाने मोठे असतात. वृत्ती धार्मिक असून या व्यक्ती विद्याव्यासंगी असतात.


 ८६. सप्तमात बुध (शनिदृष्ट नसल्यास) लवकर विवाह होतो.


 ८७. व्ययातील मंगळ वैवाहिक सौख्य फार अल्प प्रमाणात देतो.


८८ चतुर्थात रवि असता वडील मोठ्या पदावर असतात.


८९. सप्तमातील गुरु विवाह विलंबाने करतो. पतिपत्नींच्या वयात जास्त अंतर असते.


९०. बुध अष्टमात असता आरोग्य चांगले राहत नाही.


९१.  चतुर्थात मंगळ असता गृहसौख्य बेताचेच मिळते.


९२. पंचमात शनि असता प्रेमप्रकरणात अपयश येते.


९३. द्वादशात शनि असलेल्या व्यक्तींच्या गुणांचे व्हावे तसे चीज होत नाही.


९४.  चंद्र अष्टमात असता साडेसाती अतिशय तापदायक आहे.


९५. दशमस्थानात शुक्र असलेल्या व्यक्तींना नोकरीत पात्रतेपेक्षा वरची जागा मिळते


९६. बुध हा मंगळ किंवा राहु ग्रहांनी युक्त असता मनुष्याला त्वाचरोग देतो.


९७.  चतुर्थात शुक्र असता गृहसौख्य व मातृसौख्य उत्तम मिळते.


९८.द्वितीयात चंद्र असलेल्या व्यक्ती अतिशय बोलक्या असतात व त्यांना गोड पदार्थांची आवड असते


९९. नवमातील हर्षल दूरचे प्रवास व परदेशगमन करावयास लावतो.


१००.  कन्या लग्न कन्या राशिच्या व्यक्तिला बसल्या जागी उजवा पाय डाव्या पायावर ठेवून सतत हलवण्याची सवय असते.


१०१) लग्नी कन्येचा शुक्र असणाऱ्या व्यक्ति स्वत:च्या आरोग्या संबंधी अती चिकीत्सक असतात.


102) लग्नी कन्येचा शुक्र असणाऱ्या व्यक्ति चारित्र्याने वाईट नसुनही व्यक्तिमत्त्वाने वादग्रस्त ठरतात.


 103) लग्नी मिथुनेचा हर्षल असलेल्या मुली स्वत:ला मोठ्या समजणाऱ्या, त-हेवाईक व अत्यंत फटकळ असतात. त्यांचे वैवाहीक जीवन असमाधानी जाते.


 103) तूळ राशि व तूळ लग्नाच्या व्यक्ति कमालीच्या लोभस, रसीक व सोशीक असतात. पण पापग्रह नसावेत.


104)  लगी शुभ नेपच्यून असणाऱ्या व्यक्ति उच्च देवतांना भजताना दिसतात.


105) लग्नी धनुराशितील युवा अवस्थेतील एकटा राहु ,त्याच्या महादशेत, व्यंग आणतॊ .  जन्मताच राहु महादशा   असल्यास जन्मताच व्यंग.


106) लग्नी दुषीत राहु असणाऱ्या व्यक्ति अघोरी शक्तीना भजताना दिसतात.


107) लग्नी नेपच्यून असून, शनि मेषेत असेल तर, व्यक्ति कायम सर्दीने पछाडलेली असते


108) लग्न अग्नि राशिवर असून, त्यावर मंगळाची दृष्टि असेल तर, व्यक्ति मत्सरी उतावळी , वयाला न शोभेल असे  वर्तन करणारी असते.


109) वृश्चिक लग्न असून मंगळ सप्तमस्थानात शुक्राबरोबर असल्यास ,व्यक्ति अत्यंत काम पिसाटअसून लैंगीक  जीवन हेच वैवाहीक जीवन समजते

110) लग्नी वृश्चिकेचा कुयोगातील मंगळ वारंवार जखमा, अपघात व रक्तस्त्राव दर्शवीतो.


111) वृश्चिक लग्नी पापग्रह असणारी व्यक्ति, स्वभावाने अत्यंत रफ, अरेरावी प्रवृत्तीची, आक्रस्ताळ्या स्वभावाची   असते.


 112) शुभ लग्नावर जन्म अथवा लग्नी मकर सोडून कुठल्याही राशिचा गुरु असुन, मित्र राशित शुक्र असता,  व्यक्ति कधीही भडक शृंगार करीत नाही.


 113) श्रीरामचंद्रा सारखे मर्यादा पुरुषोत्तम, अनेक संत व सात्त्वीक प्रवृत्तीचे स्त्री पुरुष मुख्यत्त्वे करून कर्क    लग्नावर सापडतात.


 114) कर्क लग्नी शनि असणाऱ्या व्यक्तिच्या मनाचा थांगपत्ता कधीही लागत नाही.


115) कुंभ लग्न व शनि बलीष्ट असल्यास व्यक्ति लवकर विरक्त होते.


 116) लग्नी मकरेचा शनि म्हणजे कालपुरुषाचे दुःख. अनेक रोगाचे मुझीयम म्हणजे शरीर.


 117) मिथुन लग्नाची स्त्री जोडीदाराला या ना त्या स्वरुपात छळते.


118) कर्कलग्न, कर्क राशि व चं + शु असलेली व्यक्ति मनस्वी कलावंत अथवा अभिनय सम्राट असते.


 119) लग्नी तूळेचा शनि असणारी व्यक्ति उत्कृष्ट न्यायाधीश किंवा लबाड असते.


120) लग्नी बरेच ग्रह असणाऱ्या व्यक्तिचे व्यक्तिमत्त्व बहुरंगी बहुढंगी असते.


 121) कर्क लग्न वा कर्क राशिची स्त्री नीत्य सुहास्यवदना असते.


 122) लग्नेश विशेषत: शुक्र असून, तो वृश्चिक राशित असता ,व्यक्ति लंपट असून सुखात अतीरेक करते.


123) धन स्थानी मिथुनेत  र+बु  शुभ युति असल्यास प्रतीष्ठीत व्यापारी घराण्यात जन्म होतो . 


 124) वाचास्थानी मिथुनेचा बुध असलेल्या व्यक्तिचे बोलणे अत्यंत सुंदर पण मुद्देसुद  असते . 


125) वाचास्थानी बुध-शनिची युति व्यक्तिला अत्यंत मितभाषी व मुद्देसुद बोलायला लावते


126) पराक्रमात स्वगृहीचा शुक्र असलेल्या व्यक्तिचे हस्ताक्षर अत्यंत देखणे असते. शुक्र
         बलवान व सुयोगात मात्र हवा.


127)  वरील योगात तृतीयेश सप्तमात असल्यास (शुक्र पराक्रमात) संदर हस्ताक्षरामळे विवाह योग जुळुन येतो.


128) पराक्रमेश विशेषत: मंगळ असून व्ययात असणाऱ्या व्यक्तिच्या कतृत्त्वाचे चीज सहसा होत नाही.


129) कर्क ,धनू  अथवा मीन राशिचा गुरु, केंद्रात आणि चतुर्थस्थानी चंद्र असता गोचर भ्रमणाने नववा येणारा गुरु दैवी साक्षात्कार घडवतो.


130) चतुर्थस्थानी राहु असता स्वप्नात वारंवार सर्प दिसतात व पुढे पुढे कायमचा नीद्रानाश जडतो.


131) गोचरीचा मंगळ चतुर्थातून जाताना व्यक्ति चिडचिडी बनते व गोचरीचा शनि चतुर्थातून जाताना (तसेच लग्नातून) व्यक्ति गंभीर व अन्तर्मुख बनते


.132) पंचमस्थानी ह + शु असलेल्यांनी (विशेषत: स्त्रीयानी) सहसा प्रणय प्रसंगात पडू नये कारण तो धोकादायक जुगार ठरण्याचा संभव असतो. कुमारी माता बनण्याचा योग.


133) पंचमेश विशेषत: मंगळ असून तो व्ययात असता संतती अल्पायु असते

134) पंचमात दुशीत राहु असलेल्या व विशेषत: गुरुशी त्याचा कुयोग होत असलेल्या अनेक सुशिक्षति व्यक्तिनाही जादुटोणा , काळीविद्या यांच्या अभ्यासाची आवड असते.


 135) पंचमेश सप्तमात आणि सप्तमेश पंचमात या सारखा उत्तम योग प्रणय साफल्यात दुसरा नाही.


 136) षष्ठातील दुषीत केतू अथवा षष्ठेशाचे त्रिकस्थानी केतूशी कुयोग कॅन्सरची सुचना देतात.


137) षष्ठेश  मंगळ अथवा शनि असून ,अष्टमात त्यांची युति असल्यास शस्त्रक्रीयेत गुंतागुत होऊन ती अपयशी  होते. जखम लवकर भरून येत नाही. ती चीघळते अथवा दीर्घकाळ कुजत रहाते.


138) षष्ठस्थानी कर्क राशित अशुभ योगात चंद्र केतू युति रक्ताचा कॅन्सर सुचीत करते.


139) षष्ठस्थानात  युवा अवस्थेत कन्येचा मंगळ आतड्यांवर शस्त्रक्रीया सुचीत करतो.


140) षष्ठेश मंगळअसून ,अष्टमस्थानी शनिबरोबर असल्यास वेदनायुक्त दुखण्याचा जन्मभर त्रास असतो.  शस्त्रक्रीयेचाही संभव सुचीत होतो. 


141) गोचरीचा शनि षष्ठातून जात असता,नोकरीत फार त्रास, अचानक बदली ,वरिष्ठानची खप्पा मर्जी, सहकाऱ्यांशी मतभेद असे अनुभवास येते. तसेच  शनि चंद्राला सहावा असतांनाही हे अनुभव येतात.  याचवेळी साडेसाती किंवा पनोती असेल तर नोकरी जाण्याचेही योग येतात.


 142) कन्येचा मंगळ विशेषत: षष्टस्थानी असिडीटीचा कायम त्रास.


143) षष्ठात राहू असलेला नोकरदार युनीयनचा लिडर अथवा तत्सम गोष्टीत रस घेतो.


144) मृत्युस्थानी कन्या राशित चंद्र असलेली व्यक्ति थोड्या आजाराने घाबरून तीला मृत्युभय वाटू लागते.


145) अष्टमस्थानी विशेषत: जल राशित दुषीत नेपच्यून जलभय सुचवतो. मृत्युवर गढतेची छाया असते. देह सापडत नाही अथवा त्याचे शवविच्छेदन करावे लागते.


 146) अष्टमस्थानी शुभ शुक्र अथवा शनि दिर्घायुशी सुचवतो. अशा व्यक्तिचे तनुस्थान बिघडले असल्यास दिर्घायूषी हा शाप ठरतो.


 147) अष्टमात रवि म्हणजे मोटारीच्या पेट्रोलची गळकी टाकी, मृत्यु नैसर्गिक पण लवकर.


 148) अष्टमाधीपती ,शुभस्थानी तूळ अथवा कुंभ राशितील शनिच्या युतीत असल्यास व्यक्ति दिर्घायू होते.


149) जन्मकालीन चंद्राला गोचरीचे बरेचसे ग्रह आठवे आले व त्यावेळी अष्टमेशाची महादशा असेल तर शरिरप्रकृतीला अत्यंत अशुभयोग.


150) अष्टमात वृषभेचा राहु फाशी, गळादाबून मृत्यु अगर घटसर्प सुचवतो.


 151) व्ययस्थानी दुषीत शुक्र असलेल्या स्त्रीयांना दागीने लाभत नाहीत.


 152) व्ययस्थानी मीनेचा केतू, योग मार्गातील साधकांना अत्यंत अनुकुल.


153) व्ययस्थानातील मीनेच्या केतूच्या महादशेत व्यक्ति अनपेक्षीतरित्या आध्यात्माकडे वळते.


 154) व्ययेशाची महादशा प्रापंचीकाला सळो की पळो करून सोडते व आध्यात्मीकाला प्रगतीकारक जाते


 155) व्ययस्थानी दुषीत रवि असणारी व्यक्ती राजदंडास पात्र ठरते.


 156) त्रिकस्थानातील पापग्रहांच्या महादशा व्यक्तिला बहुतांशी खडतर जातात.


 157) षष्ठेश व अष्टमेश यांची लग्नी युति असून, लग्नेश अष्टमात असता एकतर व्यक्ति अभ्यासू असते                    अथवा दुर्धर रोगाने   पीडीत रहाते

.
158) जलराशित त्रिकस्थानी मंगळ असलेले पुरुष भीत्रे व कर्तृत्त्वशुन्य असतात , प्रजोत्पादनासही                  असमर्थ   असतात. 


159)मृत्यूस्थानी मेष अथवा सिंह राशितील रवि मृत्युनंतर किर्ती पसरवतो.


160) सप्तमेश विशेषत: पापग्रह असून तो अष्टमात असता व्यक्ति विवाह करून पस्तावतात.


161) मृत्यू षडाष्टक आणि प्रीती षडाष्टक हे योग वैवाहीक जीवनात अत्यंत असमाधान आणतात.


162) अत्यंत शंगारीक प्रवृत्तीच्या व्यक्तिच्या सप्तमात गुरु असल्यास जोडीदार सात्वीक प्रवृत्तीचा                         असूनही वैवाहीक जीवन असमाधानी असते. 

        
 163) अनेक घटस्पोटीत जोडप्यांमध्ये मृत्युषडाष्टक होतो.


 164) अनेक नि :संतान जोडप्यांची एक नाडी आढळते.


 165) अविवाहीतांच्या पत्रीकेत सप्तमात हर्षल अथवा पंचमात चंद्र असतो व त्यांची विवाहरेषा बुधावर वळते.


 166) दशमेश व्ययात असणाऱ्या व्यक्ति दशमेशाच्या महादशाकालीन धंद्यात जबरदस्त मार खातात.


 167) दशमात कर्केचा चंद्र असणाऱ्या व्यक्तिना पांढऱ्या प्रवाही पदार्थाचे व्यापार फार लाभतात.


168) कर्मेश अष्टमस्थानी असणाऱ्या व्यक्ति आपले खरे उत्पन्न कधी ही दाखवीत नाहीत.


 169) गोचरीचा शनि षष्ठातून जात असता नोकरदारांनी व गोचरीचा शनि दशमातून जात असता व्यवसायीकांनी  फार जपून पावले टाकावीत.


170) लाभेश लाभात असता पुष्कर नामक योग होतो व त्याच्या महादशा कालीन कुंडलीत इतर कुयोग निषप्रभ होऊन व्यक्तिची अनपेक्षीत रित्या भरभराट होते.


171) लाभेश विशेषत: चंद्र असून, सुखस्थानी शुभस्थितित असता, त्याच्या महादशाकालात  वास्तुलाभ होतो. ऐहीक सुखाची परमावधी अनुभवता येते.


172) पुरुषाच्या लाभस्थानी स्त्रीग्रह असता त्यास खुप मैत्रीणी असतात व स्त्रीयांच्या पत्रीकेत लाभस्थानी पुरुषग्रह असता त्यांची अनेक पुरुषांशी मैत्री होते.


173)  जन्मकुंडलीत ज्या भावावर अनेक पापग्रहांच्या दृष्ट्या असतात त्या भावाची फळे वाढतात 


174) मीन राशिच्या व्यक्तिना हसता हसता खांदे उडवण्याची सवय असते व मांडताना त्यांचा आवाज एकाकी वरचढ होऊन त्या घाईघाईने बोलू लागतात

 175) कन्या राशिच्या व्यक्तिना संपूर्ण लैंगीक सौख्य सहसा मीळत नाही.


176) धनु राशिचा बुध विशेषत: मूळ नक्षत्री चतुर्थ चरणात असलेल्या व्यक्ति लवकर नर्व्हस  होतात. त्यांच्यावर मानसिक भितीचा पगडा असून त्या घाबरट असतात. त्रिकस्थानी हा बुधअसल्यास त्याच्या महादशाकालीन हा अनुभव फार प्रभावीपणे येतो.


177) मेषेत हर्षल बुधाची युति असलेल्या स्त्रिया अत्यंत फटकळ, आक्रस्ताळ्या, क्रूर  व अविवेकी असतात.  त्यांना  हिस्टेरीया होण्याचा संभव असतो. त्या कपट कारस्थानात अत्यंत नीपूण असून स्वत:    असमाधानी असल्यामुळे दुसऱ्यांचे सुख त्यांना पहावत नाही. ही युति पापग्रहांच्या दृष्टित अगर युतित    असल्यास अशी स्त्री रुढीबाह्य चालीची असते.

178) मिथुनेत शुक्र स्त्री कमालीची नाटकी वागते व अशा स्त्रीची राशि मिथुन असल्यास ती संसारात न रमणारी,अनेक पुरुषांशी संबंध असणारी, रुपाचा व चारित्र्याचा बाजार मांडणारी असू शकते. अशा स्त्रीचे चारित्र्य  वादग्रस्त व श्रद्धा आणि निष्ठा ठिसुळ असतात.


179) च+बु  अथवा  श+बु  यांचे केंद्रयोग  व्यवहारीक जीवनात अतोनात नुकसान करतात.


180) वधू धवरांच्या गुणमिलनाच्या वेळी शुक्रावर होणारे कुयोग नीट तपासावेत अन्यथा खाजगी जीवन            कमालीचे   केवीलवाणे होते. शुक्राला पापकर्तरीचा योग असल्यास नपुसकत्त्वाची सुचना मिळते.


 181) नीच राशितील राहु केतूनी केलेल्या कालसर्प योगाच्या शापीत कुंडलीत ज्योतिषाची भविष्यवाणी खोटी   ठरते.


 182) ज्या ग्रहावर मंगळाचा सुयोग होतो त्याच्या कारकत्त्वाला प्रचंड गती मिळून उत्तम प्रगती होते.
         मंगल + बुध   तडफदार वकृत्त्व,  म+शु  पल्लेदार सुरांचा गायक.    म+च कणखर मनाची व्यक्ति.


 183) जन्म कुंडलीत शुक्र दुषीत असेल तर व्यक्तिचे चारीत्र्य वादग्रस्त असते ,परंतु शुक्रावर मंगळाचे                      कुयोग   झाल्यावाचून अशी व्यक्ति बिघडू शकत नाही. नुसत्या दुषीत शुक्रामूळे वाईट विचार                     मनात  येतील पण   त्यावर   मंगळाचे कुयोग झाल्यावीना हातून कृती घडणार नाही.


 184) बालपणी मातृवियोग झालेल्या अनेक व्यक्तिच्या पत्रीकेत चंद्र  + शनी युती  व पितृवियोग झालेल्या               व्याक्तिच्या व्यक्तिच्या पत्रीकेत  शनिची, दशम स्थानावर किंवा रविवर ,दृष्टि असते.


185) एकही ग्रह युवा अवस्थेत नसून, बरेच ग्रह मृता अवस्थेत असल्यास, व्यक्ति खडतर जीवन जगते.


 186) महादशा बदलाच्या वेळी व्यक्तिच्या आयुष्यात संक्रमण होते.


 187) साडेसाती ही अत्यंत कडू पण परीणामी हितावह अशी औषधी गोळी असते . 


188) महादशेचे फल वर्णन करताना ,व्यक्तिचे वय, पेशा व स्वभाव या तीन गोष्टींना  मयाना अत्यंत महत्व                आहे.


 189) पृच्छकाच्या कोणत्याही  प्रश्नाचे उत्तर देताना प्रथम कारक ग्रह, भाव व मग भावेश या साकल्याने विचार  केल्याशिवाय फलीत अचूक येत नाही.


190) शुभचंद्राच्या महादशेत लोकप्रीयता व अशुभचंद्राच्या महादशेत अपकिर्ती होते.


191) जन्मकालीन रविवरुन, गोचरीचा शनि जात असता प्रसिद्ध व्यक्तिनी फार सांभाळन व्यवहार करावेत.


192) ज्यांच्या जन्मतारखेत 4 ही संख्या बऱ्याच वेळा असून, शासक ग्रह 4 असेल तर अशा व्यक्ति अत्यंत             चमत्कारीक व लहरी स्वभावाच्या असतात.


 193) दक्षिणाभिमुख अथवा व्याघ्रमुखी वास्तुत केलेली धार्मिक कृत्ये फलदायी होत नाहीत. व्याघ्रमुखी जमिनीवर सुरु केलेले बांधकाम खुप काल रखडते. मालकाला अशुभ अनुभव येतात. अपघात होतात. दक्षिणाभिमुख वास्तुत मालकाला उतरती कळा येते. पैसा टीकत नाही, घरात अशांतता असते.


194) राशि भविश्यात जे लिहिलेले असते त्यापेक्षा अगदी उलट अनुभव वाचकांना येण्याचा संभव असतो.           कारण   राशि भविष्यांत मुळ पत्रिका, महादशा, अन्तर्दशा यांचा विचार केलेला नसतो. टाटा बिर्ला                यांच्या राशि  भविष्यात या आठवड्यात पैशाची चणचण भासेल हे भविष्य हास्यास्पद ठरेल.


 195) पत्रिकेशीवाय उत्तम मुहुर्त काढून देणे हास्यापद आहे. मुळ कुंडली अत्यंत दुर्बल असेल तर शुभ           मुहुर्तावर   केलेले कार्यही निष्फळ ठरते. उदा. एखाद्या व्यक्तिला सिनेमा व्यवसाय लाभण्याचा योग               नसेल तर   फटमारसाठी दिलेला उत्तम मुहुर्तही त्याला आर्थिक फटकाच देणार.


 196) ग्रह रत्नाचे अनेक गुणधर्म असतात. परंतु एखाद्याला त्याचा अनुभव काय येणार आहे ते त्याच्या                   जन्मकालीन  ग्रहावरून समजते. उदा. श्रीखंड मधुरच. गोड आवडणाऱ्याला ते अमृता समान पण                मधुमेह झालेल्याला ते विषसमान.

197) लग्नेश, षष्ठेश व अष्टमेश; अष्टमात असता तडकाफडकी मृत्यु येतो.

198) मृत्युयोग - पत्रिकेत लग्न ,षष्ट वा अष्टम स्थानापैकी जे सर्वात दुषीत आहे तेथील ग्रहांच्या अथवा त्यांच्या अधिपतींच्या महादशेत अष्टमातुन किंवा अष्टमेशावरून शनिचे गोचर  भ्रमण होताना जेव्हां अधिकाअधिक ग्रह चंद्राला आठवे येतात तेव्हां मृत्यु सभवतो ,मृत्युयोगांत शनिचा काहींना काही संबंध असलाच पाहिजे.


1 comment: