रवि सर्व
ग्रहांच्या केंद्रस्थानी असून , सर्व ग्रहांना स्वत:भोवती नियमित फिरत ठेवतो.
सर्व ग्रहांना याच्यापासून तेज मिळते, गती
मिळते. रविवाचून सर्व सृष्टी प्राणहीन होईल म्हणून आणि रवि पिंडोत्पत्ती करतो
म्हणून रवि हा प्राण
व आत्म्याचा कारक आहे. म्हणूनच रवि हा ग्रहमालेचा राजा आहे.त्यावरून जीवनशक्तीचा
विचार करतात. रविपासूनच सर्व ग्रहांची व
सृष्टीची निर्मिती झाली म्हणून रविला पितृकारक व निर्मितीचा कारक ग्रह म्हणतात.
पितृसौख्य, अधिकार, मानमरातब, कार्यप्रवीणता, स्वत्व, आत्मविश्वास, कर्तत्व, तसेच सूर्य राजा असल्याने राजकारण, राजसत्ता, नावलौकिक, कीती, पराक्रम, सामाजिक प्रतिष्ठा इ.चा विचार रविवरून
करतात.
सरकारचे कारकत्व रवी या ग्रहाकडेच
जाते. त्यामुळे सरकार, सरकारी अधिकारी, पंतप्रधान, मुख्यमंत्री, राष्ट्राध्यक्ष, मंत्री इ. तसेच नोकरीच्या प्रश्नात वरिष्ठांचा
विचार रविवरून केला जातो.
सर्यकिरणांनी
रोग बरे होतात म्हणूनच रवि हा आरोग्यकारक आहे. रवि हा जीवनदायी ग्रह असल्याने आरोग्य आणि आयुष्यमर्यादा या
दृष्टीनेही महत्त्वाचा आहे.
वैद्यकीय
व्यवसायासाठीसुद्धा रविचा विचार करणे आवश्यक आहे.
स्त्रियांच्या पत्रिकेत पतिकारक म्हणून रवि विचारात घेतात. (काही लोक गुरुला पतिकारक मानतात).
हा
गहमालेतील सर्वात महत्त्वाचा व मुख्य ग्रह, म्हणूनच
त्याच्या अमलाखाली शरीरातील हृदय, आत्मा (प्राण) तसेच पाठीचा मणका हे मुख्य भाग येतात. तो तेजाचा कारक असल्याने डोळे (विशेषतः उजवा डोळा) रविच्या
अमलाखाली येतात वडिलोपार्जित धंदा रविवरून पाहतात.
स्वभावगुण - स्वाभिमानी, नीतिमान, करारी बाणा, तत्त्वज्ञानी, अधिकारी, अंगी उष्णता असलेला,
तापट, क्रोधी, जीवनशक्ती
व रोगप्रतिकारशक्ती चांगली, सुदृढ
प्रकृती,
उत्तम शरीरयंत्रणा, परखडवृत्ती, अधिकार गाजवण्याची सवय, अहंकारी, गर्विष्ठ, स्पष्टवक्ता, उत्साही, परोपकारी, खिलाडूवृत्ती,
शरीराचे अवयव - हृदय, आत्मा, उजवा
डोळा,
तोंड, घसा, मेंदू,
रोग/आजार - हृदयविकार, दृष्टिदोष, नेत्रविकार, जीवनशक्तीची कमतरता, रक्तदाब, मेंदूतील रक्तस्राव, मेंदूचे विकार, उष्णतेचे विकार, उष्माघात, विषमज्वर, पोटाचे विकार, पित्तविकार, डोक्याचे आजार, तीव्र ताप, साथीचे आजार पाठीच्या मणक्याचे आजार
नोकरी-व्यवसाय - सरकारी
नोकर किंवा अधिकारी, सुरक्षा रक्षक, वैयक्तिक धंदा, वडिलोपार्जित व्यवसाय, तांबे, सोने, गह, औषधे, रसायने इ. संबंधित धंदे, वैद्यकीय सेवा, हॉस्पिटले, हॉटल-कॅटरिंग इ. व्यवसाय ऊर्जा विभाग, प्रशासक, विभागप्रमुख, माणिक-प्रवाळ इ. चे व्यापारी, लोकरीच्या वस्तू, वूलनचे कपडे इ. चे विक्रेते, खाद्यपदार्थाशी संबंधित व्यवसाय.
रवि प्रथमस्थानात
१) हया स्थानातील रवि व्यक्तीला मानी, उदार, बनवितो.
ह्या व्यक्तीत वागण्यात, चालण्यात, बोलण्यात आत्मविश्वास प्रकट होत असतो. हा रवि व्यक्तीला उत्कृष्ट प्रकारचा सामाजिक
दर्जा व कणखर प्रकृति देतो. बोलण्या-चालण्यात एक प्रकारची अदब व ऐट असते. या
व्यक्ती स्वाभिमानी गर्विष्ठ, रागीट व
चंचल असतात.
२)लग्नी रवी
असलेली व्यक्ती स्वातंत्र्यप्रिय, महत्त्वाकांक्षी, आत्मविश्वासी, दृढनिश्चयी, उदार, स्वाभिमानी, मोठ्या दिलाची, करडया स्वभावाची, क्षुद्र कृत्यांचा तिरस्कार करणारी, शीघ्रकोपी, अधिकारयुक्त, गंभीर, मितभाषी, आशावादी, निर्भीड, निस्पृह, पराक्रमी, साहसी, धीरोदात्त, उत्साही, कुलश्रेष्ठ, राजासारखी व राजप्रिय असते.
३)ही माणसे
ज्या क्षेत्रात असतील त्या क्षेत्रात श्रेष्ठ बनतील. परिस्थितीवर मात करण्याची
कुवत असते. हाती घेतलेले कार्य शेवटास नेतील. हे राजकुलात वा तत्सम घराण्यात
जन्मतात,
राजासारखे जीवन जगतात.
४)यांचे
आरोग्य चांगले राहते. प्रतिष्ठा व अधिकार प्राप्ती होते. जन्मकाळीं कुंडलीमध्ये
रवि लग्नांत उदित असणे भाग्यवृद्धिकारक मानण्यास
मुळीच हरकत नाहीं. या रवीच्या स्थितीवर सर्वच क्षेत्रात महान माणसे झाली आहेत.
५)रवि लग्नी असता आप्तेष्ट, नातलग यांच्याशी पटत नाही.
६)स्त्रियांच्या
कुंडलीत येथे रवि असता पतिगृही मानाचे स्थान मिळते.बहुधा यांच्या विवाहानंतर
त्यांच्या पतीचा भाग्योदय होतो.
७)हा ग्रह
बिघडला तरच अहंकारी, दुराग्रही, गर्विष्ठ व जमदग्नी बनवतो. डोळ्यांचे व हृदयाचे विकार, सन-स्ट्रोक, मोठाले ताप, पित्तविकार होतात.
८)अग्निराशीचा-मेष, सिंह व धनु-रवि लग्न असतां जन्मणाराचा स्वभाव
महत्त्वाकांक्षी, राग लवकर येणारा, प्रत्येकावर आपले वर्चस्व असावे व प्रत्येक
मनुष्याने आपल्याला मान द्यावा अशी इच्छा बाळगणारा, गंभीर व मितभाषणी असतो
९)पृथ्वीराशीत-वृषभ, कन्या व मकर-रवि लग्न असतां जन्मणाराचा स्वभाव
गर्विष्ठ,
हट्टी, हेकट, दुराग्रही, आपलेंच मत धरून बसणारा, अभिमानी असतो.
१०)वायु-मिथुन, तुला व कुंभ-राशींमध्ये रवि लग्न असतां
जन्मणाराचा स्वभाव न्यायी, उदार, शास्त्रीय विषय व कलाकौशल्याची आवड बाळगणारा
असतो.
११)जल-कर्क, वृश्चिक
व मीन राशींमध्ये रवि लग्न उदय पावत असून तो शुक्र, चंद्र किंवा नेपच्यून यांच्याबरोबर अशुभ
दृष्टियोग करीत असेल तर जन्मणारा व्यसनी व त्रैण असतो.साधारणपणे जलराशीमध्ये रवि
निर्बली असतो.
१२)कर्क
राशीमधील रवि कुटुंब, घरदार, बायकापोरें यांवर लुब्ध असणारा, ममताळू, दयार्द्र
अंत:करणाचा असतो.
१३)वृश्चिक
राशीमधील लग्नीं उदय पावत असलेला रवि रसायनशास्त्राची आवड, वैद्य किंवा डॉक्टरकीची आवड असणारा असतो.
रवि व्दितीयस्थानात
१)धनस्थानी
रवी असता व्यक्ती भाग्यशाली असते. संतती व कुटुंबसुखाची हा रवी वृद्धी करतो.
२)या स्थानी रवी शुभस्थितीत असता
वडिलार्जित वा सरकारकडून संपत्तिलाभ होतो. वडिलांच्या कंपनीत नोकरी, धंद्यात भागिदार वा त्यांच्या मृत्यूनंतर
त्या जागी नेमणूक होते. सरकारी खाती व रिझर्व्ह बँकेसारख्या ठिकाणी नोकरी असते.
३)या स्थानाचा रवी राजकीय मानसन्मान, पदव्या, मानधन
यांना चांगला असतो. सरकारी लॉटरीचा पैसा मिळू शकतो. राजकीय क्षेत्रात असणान्यांना
मंत्रीपद मिळते. आपल्या पदाचा ते चांगलाच उपयोग करून घेतात. सरकारदरबारी असलेल्या
ओळखीमुळे संपप्तिलाभ,राहाण्याची जागा वाहनसुख मिळते.
४)या
स्थानाचा रवी स्वभाव फार खर्चिक व उदार दाखवितो.
हे लोक पैसा सढळ हाताने व लवकर खचून टाकतात. स्वत:चा मोठेपणा व डामडौल
दाखविण्यासाठी निष्काळजीपणे खर्च करतात.त्यामुळे
पैसा मिळाला तरी टिकत नाही.
५)स्वराशीचा
किंवा उच्चराशीचा रवि आर्थिक स्थिती चांगली ठेवतो. तरीसद्धा हे लोक फार श्रीमंत
म्हणून नावलौकिक मिळवू शकत नाहीत.
६)खाण्या-पिण्याच्या बाबतीत चोखंदळ असतात. राजसी
अन्न व मिष्टान्न आवडते. यांचा आवाज मोठा असतो. नेहमी अधिकारवाणीने व आदेश
दिल्यासारखे बोलतात. त्यामुळे बरेचदा इतरांची मने दुखावली जातात.
७)येथे रवि चंद्राच्या यतीत असेल अथवा चंद्र
६-८-१२ यांपैकी एखाद्या स्थानात असेल, तर नेत्ररोग किंवा दृष्टिदोष निर्माण होतात. या रवीबरोबर पापग्रह असता नेत्रविकार
होतात. रवि-मंगळ, रवि-हर्षल, असता आर्थिक हानि होते. डोळ्याचे, घशाचे विकार होतात. रवि-राह, रवि-शनि, असता गरिबी तसेच मुखरोग, दंतरोग होतात. रवि- गुरुयोग उत्कृष्ट, संपत्ति देतो.
८)रवी
दृषित असल्यास मुखरोग, नेत्ररोग, वाणीदोष असतो. मोतीबिंदू पडणे, रातांधळे असणे इत्यादी दोष निर्माण होतात.
९)असा दूषित रवी वडिलार्जित संपत्ती देत नाही व मिळाल्यास तंटेबखेडे निर्माण करतो व शेवटी नष्ट करतो. सरकारी जप्ती येते.
१०)हे
कुटुंबस्थान असल्याने स्त्रीची प्रकृती नाजूक करतो. अशुभ रवी माणसाला फटकळ व अर्वाच्यभाषी बनवतो.
११)रवि-बुध
यती येथे असता उत्तम गणिती किंवा ज्योतिषी होतात. धनस्थानात रवि असणा-या
ज्योतिष्यांची अशभ भविष्ये बिनचूक पटतात
१२)या
स्थानात रवि असणान्या स्त्रिया कुटुंबवत्सल व सगळ्यांची काळजी घेणा-या असतात.
त्यामुळे उत्तम माता व गहिणी सिद्ध
होतात. इतरांसाठी त्याग करण्याची वृत्ती असते.
१३)हा रवी
माणसाचा आवाज मोठा करतो. यांचे बोलणे छाप पाडणारे असते. हे निर्भीड व कडकपणे
बोलतात. यांच्या जहाल वक्तृत्वाने शत्रू निर्माण होऊ शकतात, असंतोष भडकू शकतो व क्रांतीची आग पेटू शकते.
उत्कृष्ठ आवाजाचे लोकनेते वा नट निर्माण करण्याचे सामर्थ्य या रवीमध्ये आहे.
१४)धनस्थानामधील
बलवान् रवि राजासारखं ऐश्वर्य, सरकारकहून
पैसा,
सरकारी कामानिमित्त बक्षिसे, देणग्या वगैरे दर्शवितो;किंवा सरकारी नोकरीमुळे चांगली अर्थप्राप्ति
दर्शवितो.
रवि तृतीयस्थानात
१)हया
स्थानात रवि असलेले लोक स्वतंत्र वृत्तीचे, आत्मविश्वासाने, स्वकर्तृत्वावर पुढे येणारे असतात. या व्यक्तींना कोणाची मदत घेणे आवडत नाही. हे
आपल्या बुद्धीने, कर्तृत्वाने घरात श्रेष्ठत्व
मिळवितात. दृढनिश्चयी व्यक्ति असतात.
२)तृतीयांतील
रवि दीर्घोद्योगीपणा, कार्यबाहुल्य व भावंडांत
श्रेष्ठत्व देतो.
३)तृतीयस्थानात
स्थानातील रवी भावंडात वडिलकी देतो असे सर्वसाधारण मत आहे. पण हा अनुभव सर्वत्र
येत नाही. काही पत्रिकांत मात्र ज्येष्ठत्व नजरेस येते.
बहधा
भावंडांत मोठे असतात किंवा जरी लहान असले तरी त्यांच्या कर्तृत्वानुसार त्यांना मोठेपणा मिळतो. भावंडांची जबाबदारी सांभाळावी लागते. हे जर भावंडात लहान असतील, तर मोठ्या भावाशी पटत नाही किंवा जोपर्यंत
मोठा भाऊ जवळ राहतो तोपर्यंत भाग्योदय होत नाही.
४)या
स्थानी रवि असलेली व्यक्ती शूर व पराक्रमी असते. व्यापारधंद्याची आवड असते.
रवि-मंगळ येथे पोलीस, मिलिटरी, सुरक्षा दल अशा पेशात यश देतात.
५)कुंडलीत
या स्थानी रवी असता स्वपराक्रमाने धनप्राप्ती, शत्रूचा नाश व राजापासून सौख्य लाभते.
६)हे
कर्तृत्वस्थान असल्याने येथे रवीसारखा ग्रह व्यक्तीला शूर व पराक्रमी बनवतो.
स्वभाव उद्योगशील व दृढनिश्चयी असतो. हा रवी पराक्रमाला वाव देतो. ज्या क्षेत्रात
हात घालतील त्या क्षेत्राला उजळ करतील. सत्ता राबवणे यांना चांगले जमते. आक्रमकता
स्वभावात असल्याने यांना काही अशक्य वाटत नसते. हातून महान कामगिरी होते.
७)तृतीयस्थान व्यक्तीची उपजत बुद्धी व मनाचा कल
दाखवित असल्याने प्रत्येक गोष्टीमध्ये साहसी वृत्ती असते. राजकीय, बौद्धिक वा क्रीडाक्षेत्रात मानसन्मान
मिळवतात.
८)अशुभ रवी
अपकीर्ती व नातेवाईकांकडून त्रास दर्शवितो.रवी दूषित असल्यास कर्तृत्वाची दिशा
वाकड्या मार्गाची असते. कानाची दुखणी संभवतात. भावंडांच्या सुखात बाधा निर्माण
होते. प्रवासात त्रास होतो.
९)या
स्थानातील रवी सत्ताधारी व्यक्तींशी पत्रव्यवहार दर्शवितो. लेखक असल्यास
सत्ताधा-यांची चरित्रे लिहिणे वा त्यांचे पत्रव्यवहार प्रसिद्ध करणे वा त्यांचे
प्रायव्हेट सेक्रेटरी असणे या गोष्टी संभवतात.
१०)शुभसंबंधीत
रवी शेजाच्यांशी चांगले संबंध, शत्रूवर
विजय,
उत्तम आरोग्य, कीर्ती, मानसन्मान
व यश देणारा असतो. वृत्तपत्रांमध्ये यांच्याबद्दल चांगले लिहिले जाते.
११)या
स्थानामध्यें जलराशीमध्ये रवि असतां धंदा-नोकरीमुळे प्रवास करावे लागतात.
रवि चतुर्थस्थानात
१) चतुर्थामध्ये रवि बलवान् स्थितीमध्ये असतां उत्तर वयामध्ये सुख व भरभराट
दर्शवितो. जमीनजुमला, शेतीवाडीची आवड असणारा, स्वभाव मौन वृत्तीचा, खोल व गूढ विद्यांची आवड बाळगणारा असतो.
चतुर्थामध्ये बलवान् व शुभसंबंधित रवि असला तर चांगलें फल मिळते या स्थानाचा रवी चांगल्या व उच्च कुलात जन्म
दर्शवितो
२)येथे रवि
असता आयुष्याचा उत्तरार्ध चांगला जातो. जोपर्यंत हे वडिलांबरोबर असतात, तोपर्यंत यांचे कर्तृत्व लोकांना दिसून येत
नाही. वडिलांचा दर्जा मोठा असतो. ऐषारामी व आळशी स्वभाव असतो व त्यामुळे काही वेळा
नुकसानदेखील होते.
३)उत्तम गृहसौख्य व वाहनसौख्य लाभते. यांच्या घराजवळ एखादे सरकारी
कार्यालय,
हॉस्पिटल किंवा दवाखाना असतो.
४)शुभ रवी
वडिलांची स्थिती चांगली दर्शवितो. त्यांच्या सुस्थितीमुळे लहानपण मजेत जाते. वारसा हक्काने जमीनजुमला, घर, वाहन
इत्यादींची प्राप्ती होते. या व्यक्ती स्वतः बागायती, शेतीभाती खरेदी करतात. शेतीवाडीपासून फायदा
होतो. व्यक्तीच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण होतात. उच्चवर्गीयांत मित्र असतात. आयुष्याचा अंतकाळ सुखात जातो.
५)चतुर्थस्थान
हे स्थान रविला पोषक नाही. या स्थानातील रवि इतर ग्रह ज्याप्रमाणे ह्या स्थानात
असतील त्याप्रमाणे फलित देतो. पापग्रहाबरोबर मातृसौख्य, गृहसौख्य देत नाही. हृदयविकार होतात. वाहनाचे
अपघात होतात. मंगळ, शनि, राहू, हर्षल
ह्या ग्रहांबरोबर असता अत्यंत अशुभ परिस्थिती निर्माण करतो. गृहसौख्य मन:शांति
नाहीशी करतो.
६)चतुर्थातील
दूषित रवी सुखहीनता, कलह, सरकारकडून
त्रास,
इस्टेटीचा नाश, हृदयव्यथा व चिंतातुर अवस्था दर्शवितो. दूषित असेल तर पितृसुख नष्ट करतो, वा घरापासून व पित्यापासून लहानपणीच दूर
राहावे लागते. स्थावरासंबंधी कलह निर्माण होतो. बालपणी कष्ट होतात.
७)आयुष्यातील
अखेरचे दिवस या स्थानावरून पाहात असल्याने सत्तेवर असताना मृत्यू, झोपेत शांतपणे मृत्यू दर्शवितो. अंतकाळी
सरकारी मदत मिळते. दूषित रवी सत्तेवरून
पदच्युत करतो वा राजीनामा द्यायला लावतो किंवा आयुष्याच्या अखेरीस एकादी फार मोठी
इच्छा अपुरी राहाते. जन्मगावापासून आयुष्यभर वा पुष्कळसा काळ दूर राहावे लागते.
८)दशमस्थानावर या रवीची दृष्टी असल्याने
आयुष्याच्या उत्तरार्धात सत्ता मिळणा-यांच्या कुंडलीत चतुर्थात शुभ रवी असतो.
उत्तरवयात अध्यात्म व तत्त्वज्ञान यांची गोडी असते. काहींना ललितकलांची आवड
निर्माण होते.
९)स्त्रियांच्या
कुंडलीत येथे रवि असता सासर चांगले मिळते. मात्र रवि-हर्षल येथे विवाहपूर्व गुप्त
प्रेमसंबंध दर्शवतात, घराण्याच्या अब्रुसाठी इच्छेविरुद्ध विवाह करावा लागतो. वैवाहिक जीवन सुखी होत नाही.
.
रवि पंचमस्थानात
१)पंचमस्थान -येथील रवि चांगली बुद्धिमत्ता दर्शवतो. रविचा गुरुबरोबरचा शुभयोग विद्याभ्यासात
प्रगती दर्शवतो. येथे राव-बुध युती गणित व ज्योतिषशास्त्रात प्रगती
दर्शविते. हा राव शुभ ग्रहांबरोबर उच्च शिक्षण पूर्ण करतो. संततिसौख्य चांगले देतो
पंचमातील रवि हा उपासनेच्या दष्टीने चांगली प्रगति दाखवतो.
२)पंचमांत
बलवान् व शुभसंबंधित रवि पुत्रसंतति देतो व मुलें नांवलौकिक मिळवितात.
पंचमातील
रवि-हर्षल संततीस अपघात, संततीशी भांडणे दाखवतो. पंचम, नवम वा प्रथम स्थानात गुरू अस बौद्धिक
क्षेत्रात मानमान्यता मिळते. रवि-बुध योगात कुशाग्र बुद्धिमत्ता, संशोधन व असते. शुभ ग्रहांबरोबरच असलेला रवि
व्यक्तिला पोषाखाच्या बाबतीत चोखंदळपण वागण्या-चालण्याच्या
पद्धति (मॅनर्स) बद्दल नसत्या अवाजवी कल्पना देतो
.
३)पंचम
स्थान - येथे रवि असता संतती बुद्धिमान, अभ्यास व
आज्ञाधारक निपजते. हा रवि पत्रसंतती देतो. येथे रवि असलेल्यांना एखादी तरी
पुत्रसंतती निश्चितपणे होते. पहिली कन्या संतती असणान्यांनी दुसरा प्रयत्न केल्यास
पुत्रसंतती होते.
४)या
स्थानामधील रवी फार कमी संतती देतो. या व्यक्ती मंत्रशास्त्र, वैद्यक, ज्योतिष
व राजनीती शास्त्राच्या अभ्यासक व जाणकार असतात. पंचम स्थान संतती, बुद्धी, विद्या, प्रणय, उपासना, करमणूक, खेळ, सदसद्विवेकबुद्धी
या गोष्टी दर्शवीत असल्याने येथील रवी या बाबतीत फार परिणामकारक असतो.
५)हा
अल्पसंतती देतो पण शुभ असल्यास पुत्रसंतती व बिघडला असल्यास केवळ कन्यासंतती देतो.
यांची बुद्धिमत्ता अष्टपैलू असते. कला, साहित्य, तत्त्वज्ञान, भाषा, संगीत, नाटक, गायन
इत्यादी क्षेत्रांत या व्यक्ती नाव कमावतात.
६)करमणुकी पत्ते
कुटणे,
कॅरम खेळणे इत्यादी गोष्टी
यांना पसंत असतात. झटपट पैसा कमावण्यासाठी जे जे मार्ग
असतात ते यांना पसंत असतात. त्यामुळे सट्टा, शेअर, रेसीस, पत्ते वा
अन्य जुगाराचे त्याचप्रमाणे लॉटरीसारखे मार्ग यांना आवडतात. कित्येक वेळा यांना या
प्रकारच्या धडपडीत यश मिळते. करमणुकीसाठी हे लोक पहाडी प्रदेशात फिरायला जातात. या
व्यक्तींना घोडा हे जनावर आवडते. बिलियड्स, वेट
लिफ्टिग,
अश्वशर्यती यात भाग घेणे याना
पसंत असते.
७)दूषित रवी जुगार, प्रणय, विद्या
या गोष्टींमध्ये अपयश देतो. बुद्धी चंचल करतो. मुले वाईट निपजतात. शिक्षण अर्धवट
राहाते.
८)पंचमामध्ये
रवि संततीला सामान्यतः प्रतिकूल असतो. जलराशीमध्ये रवि संततीला इतका प्रतिकूल नसतो, परंतु संतति अशक्त, दुर्बल व अल्पायु असते. पंचमांत रवीबरोबर
चंद्र, गुरु, शुक्र असतां किंवा हे ग्रह पंचमांतील रवीबरोबर शुभसंबंधित असतां वरील
प्रकारचे अनिष्ट फल मिळणार नाहीं.
९)पंचमांतील
शुभसंबंधित रवि शाळा, नाटकगृहे, नाटके, सर्व
प्रकारची करमणुकीची साधनें, रेसिस, सट्टयाचे व्यवहार, सरकारी बॉन्ड किंवा नोटा यांपासून लाभ
दर्शवितो
१०)पंचमामध्ये बलवान् रवि असतां राजाप्रमाणे ऐश्वर्य भोगणारी, सढळ हातानें खर्च करणारी व मोठ्या डामडौलाने
राहणारी मंडळी पाहण्यास मिळतात.
१)हा रवि
दशमस्थानाच्या दृष्टीने नोकरीत भाग्योदय करणारा असतो. हया व्यक्तीत कामाचा उरक
चांगला असतो. कार्यपद्धतीत उत्कृष्ट गुण असतात. त्यामुळे बढती मिळत जाते. सरकारी नोकरीत हा रवि अधिकारयोग देतो.
२)शुभसंबंधीत
रवी व्यक्तीस शूर, स्वाभिमानी, तेजस्वी, उद्योगी बनवून वरचा दर्जा मिळवून देतो. यांना
वैद्यकशास्त्रामध्ये यश मिळते. स्पष्टवक्तेपणामुळे शत्रू होतात. सरकारदरबारी
मानमरातव व हुद्दा मिळतो. शरीरप्रकृती उत्तम राहाते. रोगप्रतिकारक शक्ती असते.
नोकरचाकर विपुल असून स्वभावाने चांगले असतात. शत्रूना वा प्रतिस्पध्र्यांना खडे
चारले जातात. सतत परिश्रम करणे हा या स्थानातील रवीचा गुण आहे. हे लोक अत्यंत प्रामाणिकपणे व इमानेइतबारे नोकरी
करतात. यांना नोकरसद्धा चांगले लाभतात.
३)षष्ठस्थानामध्ये
बलवान् रवि असतां वैद्यकशास्त्र, आरोग्यशास्त्र
यांची आवड असलेली पाहण्यास मिळते व ही मंडळी नामांकित डॉक्टर किंवा वैद्य असतात.
षष्ठस्थान हैं रोगस्थान असल्यामुळे वैद्यकीय कौशल्यामुळे कीर्ति मिळते
४)रवि -मंगळ हा योग या स्थानात आरोग्याच्या
दृष्टीने अतिशय वाईट असतो; हाडाचे विकार, हाडांची मोडतोड, हृदयविकार, छातीचे विकार निर्माण करतो. व्ययस्थानातील पापग्रह अशा
वेळी ह्या दृष्टीने अत्यंत अशुभ असतात.अशा योगात जीवनात मानहानि, मनोभंग सहन करावे लागतात. या व्यक्तींना नमते
घेणे माहीत नसते. त्यामळे जीवनात हया मागे पडतात.
५)येथे रवि
असता आरोग्य चांगले ठेवत नाही, मात्र हे
लोक आपल्या आरोग्याची काळजी चांगल्या प्रकारे घेतात. येथील रवि रक्तदाब, हृदयविकार, पाठीच्या मणक्यांचे विकार, अपचनाचे विकार, नेत्ररोग इ. आजार दर्शवतो. रवि। षष्ठात व
चंद्र २,
६, ८, १२
यांपैकी एखाद्या स्थानात असता नेत्ररोग किंवा दृष्टिदोष निर्माण होतात. रवि-शुक्र
युती मधुमेहाचा विकार देते. येथे रवि दुय्यम दर्जाची नोकरी करावयास लावतो. षष्ठात
रवि असणान्या स्त्रिया पाकशास्त्र प्रवीण असतात.
६)या
स्थानातील रवी शत्रूचा नाश व रोगपरिहारक असतो. राजदरबारी अतिशय सन्मान होतो, परंतु मामाला हा रवी त्रासदायक ठरतो.
७) हा
रवी शनीने दूषित असल्यास उच्च जागेवरून पतन दर्शवितो. अपमानास्पद स्थितीत पदत्याग
करावा लागतो. मंत्रीपदावर पोचलेल्या व्यक्तींना राजीनामा देण्याची परिस्थिती येते
किंवा बडतर्फ केले जाते. अशुभसंबंधीत रवी प्रकृतीला घातक असतो. प्रतिकारशक्ती कमी
असते. आयुष्य कमी असते. दीर्घकाल टिकणारे रोग होतात. हृदयव्यथा, पाठदुखी, कफ, दमा, पित्तविकार, संधिवात आदी रोग होतात. अति कामवासनेमुळे जीवनशक्ती
कमी होत जाते. हा रवी वडिलांचे सुखही लवकर नष्ट करतो.
८)षष्ठस्थानामध्यें
रवि शरीरप्रकृतीच्या दृष्टीने चांगला नाही. या स्थानामध्ये रवि पीडित असतां मोठीं
व दीर्घकाळ टिकणारीं दुखण प्राप्त होतात. या स्थानामध्ये स्थिर राशीमध्ये रवि
पीडित असतां घशांतील गांठींचा तीव्र दाह, घटसर्प, ब्रॉन्कायटिस-लघुश्वासनलिकांचा दाह, दमा, मूतखडा, हार्डडिसीज, पाठीमध्यें व कटिप्रदेशामध्ये दुर्बलता
पाहण्यास मिळते.
९)द्विस्वभाव
राशीमध्यें रवि पीडित असतां कफक्षय, फुफ्फुसाचे
विकार किंवा श्वासनलिकेमध्ये अवरोध झाल्यामुळे उत्पन्न होणारे विकार, आमविकार, आमातिसार इत्यादि विकार होण्याची भीति असते
.
१०)चरराशीमध्यें पीडित असा रवि या स्थानामध्ये असतां यकृत् विकार, लिव्हर कम्प्लेन्ट, पित्ताशयासंबंधाने विकार, मज्जातंतूचे विकार, छातीचे विकार, पोटासंबंधाने विकार, संधिवात इत्यादिकांपासून त्रास होतो व
अपघाताचे भय असते.
रवि सप्तमस्थानात
१)सप्तमस्थान हया स्थानातील रवि असता ,पत्नी स्वभावाने निश्चयी, मानी असते. असा रवि असलेल्या व्यक्तींना
पत्नी अधिभौतिक पिंड असलेली मिळते. उच्च राहणीची जात्याच आवड असते. हा
रविकेंद्रातील रवि या दृष्टीने-भाग्योदय करणारा असतो.
२)सप्तमातील
राव जोडीदार मानी व चांगल्या घराण्यांतील दर्शवतो. रवि-गुरु
नवपंचम योग असता वैवाहिक जीवन अत्यंत सुखी व समाधानाचे जाते. मात्र रवि-राह, रवि-शनि, रवि-मंगळ, रवि-हर्षल या युत्या सप्तमात वैवाहिक सौख्यास
चांगल्या नाहीत.द्विभार्या योग, विधुरावस्था, वैधव्य, विभक्तपणा
इ. गोष्टी घडतात.
३)सप्तमांतील
बलवान् रवि लग्नामुळे भाग्योदय, मानसन्मान
व भागीच्या व्यवहारांमुळे उदय करतो. सर्व प्रकारच्या कोर्टाच्या व्यवहारांमध्ये यश
देतो व उघड शत्रुत्व सुद्धा चांगल्या न्यायी व्यक्तीबरोबर होते.
४)स्त्रियांच्या
कुंडलीत येथे रवि असता पती श्रीमंत घराण्यांतील व दिलदार स्वभावाचा मिळतो.
रवि-हर्षल युती असता गुप्त प्रेमसंबंध असतात. प्रियकराबरोबर पळून जाऊन विवाह केला
जातो,
.५) या
स्थानात शुभ रवी असता स्त्री दिसण्यात रुबाबदार, बांधेसूद, तांबूस काळसर वा तांबूस गौर वर्णाची, मध्यम बांध्याची, स्त्री मिळते. स्वभाव कडक, मितभाषी, शीलवान, धीरोदात्त, संसारदक्ष, अधिकारी वृत्तीचा व मानी असतो.
६)या
रवीच्या स्थितीत स्त्रीच्या पत्रिकेत पतो मानी, अधिकारी, उदार, निश्चयी, नीतिमान् व पवित्र आचरणाचा दर्शवितो. तो
सरकारी अधिकारी, डॉक्टर, बँक ऑफिसर्स, मॅनेजर्स, मंत्री अशा मानाच्या जागावर काम करणा-या
व्यक्तीशी विवाह दर्शवितो. विवाहानंतर सामाजिक व आर्थिक उन्नती, चांगले भागीदार मिळणे, वादविवाद वा संघर्षात विजय मिळणे, विषयवासना शुद्ध असणे अशा प्रकारची फले शुभ
रवी दर्शवितो.
७)या स्थानातील अशुभ रवी रागीट, गर्विष्ठ, व्यक्तीशी विवाह दर्शवितो. विवाह उशीरा होणे, संतती न होणे किंवा संततीसाठी दुसरा विवाह
करणे,
सदोष कामजीवन, संघर्षपूर्ण संबंध, लैंगिक असमाधान, काही स्त्रियांच्या पत्रिकेत घटस्फोट वा
वैधव्य या प्रकारच्या गोष्टी दर्शवितो.
रवि अष्टमस्थानात
१)अष्टमस्थान स्थानातील रवि उशीरा स्थिरस्थावरता देतो.
व्यक्तिच्या इच्छा, आकांक्षा पूर्ण करीत नाही. अपयश
देण्याकडे ह्या रविची प्रवृत्ति असते. रवि पापग्रहाबरोबर असता आयुष्य कमी देतो.
रोगाविरुद्ध झगडण्याची शक्ति कमी असते.
२)आयुष्य व
आरोग्य यांच्या दृष्टीने हा रवि फारसा चांगला नाही. आयुष्य साधारणत: ५५ ते ६०
पर्यंतच असते. ३० ते ३३ दरम्यान अपमृत्यूचा संभव असतो.यांना आनुवंशिक आजाराने मृत्यू येण्याची शक्यता असते. या स्थानामध्ये रवी असणा-या व्यक्ती मध्यायुष्यात जीवावरचे दुखणे येते.
३)अष्टमात रवि-चंद्र युती बालारिष्ट योग दर्शवते.
श्वसुरगृहाकडून लाभ होतो. स्त्रीधन मिळते. या स्थानात रवि असता पुरुषांना
गृह्येद्रियांचे विकार होतात. व्यसनीवृत्ती असते. पचनशक्ती, यकृताचा विकार किंवा हृदयविकारामुळे मृत्यू
होण्याची शक्यता असते.
४) आनुवंशिक रोग,हृदयव्यथा, उष्माघात, मोठाले ताप, सरकारकडून देहान्त शिक्षा, नैसर्गिक वयोमान झाल्यावर मृत्यू येणे, महान कार्य करताना मृत्यू येणे अशा प्रकारचा मृत्यू हा रवी दर्शवतो.
४)स्त्रियांच्या कुंडलीत अष्टमात रवि-शनि, रवि-राह किंवा रवि-शनि युती मध्यम वयात
वैधव्य देते.
५)अष्टमस्थान स्थानातील-अशुभ रवी
असता उच्च जागेवरून पतन, अतृप्त इच्छा, कृश शरीर, अपमानित जीवन, दरिद्री सासर, अनीतिमान् , नेत्रविकार, क्षयाची भावना, पितृछत्र लवकर नष्ट होणे, कर्जबाजारी अवस्था, आनुवंशिक कर्ज, दीर्घ काळची दुखणी, दारिद्रय, बंधनयोग, सरकारी अवकृपा आदी वाईट फले चाखावी लागतात.
अष्टमातील रवी राहूने दूषित असता पितरांची पीडा असते. वेश्यागमनात रवीशी शुक्राचा
संबंध येतो व त्यावर पैसा खर्च होतो. हे गूढस्थान असल्याने गूढ शास्त्राच्या
अभ्यासास चांगले. मृत्यूनंतर काय याचा हे अभ्यास करतात.
६)अष्टमांतील
रवि बलवान् असतां लग्नानंतर लाभ दर्शवितो, मरणसमयीं
मानसन्मान व कीर्ति देतो. या व्यक्तीच्या अक्कलहुशारीनें भागीदारांना लाभ होतो, व भागीदारांच्या पैशापासून मदत किंवा पुढे
येण्यास मार्ग मिळतो. अष्टमांतील पीडित रवि ३० ते ३३ वर्षाचे सुमारास मृत्यु
दर्शवितो,
अष्टमामध्ये रवि असून
मंगळाबरोबर अशुभ दृष्टियोग करीत असतां अपघाताने मरण प्राप्त होण्याचा पुष्कळ संभव
असतो.
रवि नवमस्थानात
१)नवम या
स्थानातील रवि व्यक्तीचे आचरण, वागणूक
आदर्श ठेवतो. स्वभाव मानी असून महत्त्वाकांक्षा जबरदस्त असते. हे लोक स्वत:चे
स्थान,
दर्जा, मान वाढविण्यासाठी व टिकविण्यासाठी सतत
प्रयत्न करीत असतात. ह्या स्थानात रवि व दशमांत गुरू अगर दशमांत रवि व नवमा गुरू
असता उत्कृष्ट प्रकारचा मान, दर्जा
अधिकार लाभतो. राजकारणात असे लोक पुढे येतात.
२)नवमात
रवि असलेली व्यक्ती धर्मनिष्ठ, उदारमतवादी
व ईश्वरभक्त असते. पडद्याआडून राजकारण करण्याची वृत्ती असते. यांना उत्तम घर व
वाहनसौख्य लाभते. रवि-गुरु किंवा रवि-शुक्र युती व्यक्तीला मोठे यश मिळवून देते.
रवि-गुरु युती असता व्यक्ती योगी व तेजस्वी असते. अध्यात्म, ज्योतिषशास्त्र किंवा वकिलीच्या क्षेत्रात यश
व प्रसिद्धी लाभते. पैसा व प्रतिष्ठा मिळते. रवि-शुक्र युती असता कलेच्या
क्षेत्रात, बहुधा संगीताच्या क्षेत्रात
नावलौकिक मिळवतात. वायुराशीचा रवि एअर लाइन्स, वैमानिक किंवा तत्सम प्रवासी संस्थेत नोकरी
मिळवून देतो. येथे रवि असता बहुधा रजिस्टर्ड विवाह केला जातो.
३)नवमांत
रवि असलेल्या स्त्रियांचा विवाह विनासायास व लवकर होतो (अर्थात उशिरा विवाहाचे योग
नसतील तर). विवाहानंतर भाग्योदय होतो.
४)या
स्थानचा रवी व्यक्तीस धर्मकृत्यपरायण, व्यवहारात
चतुर,
मानमान्यता व प्रतिष्ठावान
बनवतो. मात्र बंधुसुखास हे लोक वंचित होतात. या स्थानी रवी असणे भाग्याचे लक्षण असते. हा
रवी शुभसंबंधीत असता व्यक्ती धर्मशील असते. धर्मपीठाची अधिकारी असू शकते. या
व्यक्तीचा शाळा, कॉलेज वा विश्वविद्यालयाशी
संबंध येतो. न्यायखात्यात या व्यक्ती उच्च जागा भूषवतात. परदेशगमनाने फायदे होतात.
उच्चविद्याविभूषित, शास्त्रीय संशोधक राजनीतीज्ञ, परराष्ट्र वकील, परराष्ट्रमंत्री म्हणून हे चमकतात.
वैद्यकशास्त्रात, राजकारणात, साहित्यक्षेत्रात, युद्धक्षेत्रात, खेळात, कलाक्षेत्रात
हे आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकतात. यांची धार्मिक मते पक्की असतात. यांना अलोट
कीर्ती लाभते. हातून पुण्यकर्मे घडतात.
५)या स्थानचा रवी गुरूच्या राशीत असता -धर्म, शिक्षण, न्याय, अर्थ क्षेत्रात, बुधाच्या राशीत प्रकाशन व लेखन क्षेत्रांत, मंगळाच्या राशीत युद्ध, रसायन, इंजिनीयरींग
आदी क्षेत्रांत प्रसिद्धी मिळते.
६)हे
पितृस्थान असल्याने वडिलांचे सुख चांगले मिळते. भाग्योदयास वडिलांची मदत होते.
वडील चांगल्या हुद्यावर असतात. एकंदरीत शुभ रवी उत्तम भाग्यवृद्धिकारक ठरतो.
७)नवमामध्ये
रवि असतां मनुष्य प्रामाणिक, न्यायी, सद्वर्तनी, दृढनिश्चयी, सत्यप्रतिज्ञ, जगांत मोठेपणा मिळविणारा, भविष्य जाणणारा, धार्मिक आचारविचारांचा, महत्त्वाकांक्षी, कारकुनी पेशामध्ये किंवा न्यायखात्यामध्ये
उदयास येणारा, परदेशामध्ये नशीब उदयास आणणारा
असतो. जलराशीमधील या स्थानामधला शुभसंबंधित रवि परदेशगमन, जलप्रवास व दूरचे प्रवास दर्शवितो, व या माणसांचा उदय परमुलुखामध्ये होतो.
८)या
स्थानातील अशुभ रवी पितृसुखात वैगुण्य, वडिलांच्या
मृत्यूनंतर जन्म, भाग्योदयात अडथळे, परमुलुखात त्रास, परधर्माचा स्वीकार, उच्च शिक्षणात खंड, कोर्टकचेन्यांची लचांडे, लहानपणीच प्रापंचिक जबाबदारी, गुरुवर्याचा द्वेष, खोट्या कीर्तीमागे धावणे, कर्मठपणा, संकुचित विचारसरणी, स्वतःविषयी फाजील अहंकार, आत्मप्रौढी इत्यादी गोष्टी दर्शवितो,
रवि दशमस्थानांत
१) लग्नस्थानाप्रमाणेच कुंडलीतील दशम स्थान हे अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. या
स्थानावरून सार्वजनिक जीवन, उद्योगधंदा, अधिकार, हुद्दा, मानमरातब, कीर्ती, यश, आपली कर्मे, नावलौकिक, इज्जत या महत्त्वाच्या गोष्टींचा विचार होतो.
दुपारी ११ ते १ या दरम्यान रवी या स्थानी असतो.
२)या
स्थानातील शुभसंबंधीत रवी यश, मानसन्मान, हुद्दा, अधिकार, सत्ता, भरभराट, राजाश्रय व जनमान्यता मिळण्याचे निश्चित असे
लक्षण आहे. हा योग व्यक्तीस खात्रीने महत्पदास चढवितो, विद्वत्ता, कर्तबगारी, दृढनिश्चय, आत्मविश्वास, स्वाभिमान आदी गुणांमुळे हाती घेतलेल्या
व्यवसायधंद्यात यश लाभते.
३)सरकारी क्षेत्रात ओळखी होऊन मोठमोठी कार्ये
सिद्धीस जातात. वरिष्ठांची मर्जी हे लोक चटकन् संपादतात. यांना विरोध करण्याची
हिंमत कुणातच नसते. जबाबदारीची जागा हे लीलया संभाळतात. आपल्या कुटुंबाचा, जातीचा, राष्ट्राचा
हा आधारस्तंभ असतो.
या
व्यक्ती श्रेष्ठ कुळांत जन्मलेल्या, स्वतंत्र
विचाराच्या, आकर्षक व्यक्तिमत्वाच्या व
लोकप्रिय असल्याने यांना महत्त्वाच्या जागी नेमले वा निवडले जाते. राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, न्याय, तत्त्वज्ञान, संगीत, विज्ञान, वैद्यकी अशा विविध क्षेत्रांत या व्यक्ती
आपला ठसा उमटवतात. या व्यक्तींना वारसाहक्काने मालमत्ता मिळते.
४)आरोग्य सर्वसाधारणपणे उत्तम असते. संतती, संपत्ती, वाहने, नातेवाईक
या गोष्टींची रेलचेल असते. यांचा चाहता वर्ग फार मोठा असतो. आयुष्याच्या मध्यभागात
हे चांगलेच उत्कर्ष पावतात. अलौकिक साध्य करण्याचे सामर्थ्य यांच्याकडे असते. या
व्यक्ती इतिहासाच्या मानकरी असतात. प्रचंड विरोधाला सुद्धा हे निर्भयपणे सामोरे
जात असल्याने यांच्या पराजयातसुद्धा शान असते.
५)मध्ययुगातील अनेक राजामहाराजांच्या
कुंडल्यांत हा ग्रह दशम स्थानी आढळतो. सर्व प्रकारच्या स्थिर स्वरूपाच्या नोक-या, सरकारी नोक-या, सरकारी क्षेत्रे, कलाक्षेत्रे, वैद्यकी यांमध्ये प्रामुख्याने हे लोक
आढळतात. राशीपरत्वे इतर क्षेत्रेही यांना आवडत असतात. परंतु सरकारकडून यांना पदके, पदव्या, मानधन वा
पारितोषिके लाभतात. या व्यक्तींच्या कार्यास राजमान्यता व सरकारतर्फे अनुदान
प्राप्त होत असते.
६)दशमस्थानामधील
रवि मानसन्मान, कीर्ति, हुद्दा, अधिकार, सरकारी नोकरीमध्ये उद्य, मोठ्या किंवा अधिकारी लोकांचा सहवास, बढती, भाग्य व
अबू दर्शवितो. तिशीनंतर भाग्योदय होतो. अधिकाराची व मानाची जागा मिळते. दशमांत
बलवान शुभदृष्ट रवि राजयोगकारक असून भाग्य व लक्ष्मीची वृद्धि करणारा आहे.
दशमांतील रवि हलक्या माणसांना मोठ्याचा आश्रय देतो.
७)ह्या
स्थानातील रवि ब-याच वेळा राजयोगकारक होतो. असा रवि व्यक्तीला आर्थिक, सामाजिक दर्जा उच्च प्रकारचा देतो. या
व्यक्ति सतत आपले अस्तित्व जगाला दाखविण्यात गुंतलेल्या असतात. कीति, हुद्दा, मान
अधिकार ह्यासाठी सतत प्रयत्न करून ते आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करतात.
७)सत्ता आणि
मान हे दशमांतल्या रवीचे आवडते विषय आहेत. सरकारी नोकरी करणा-या व्यक्तींच्या
पत्रिकेत हा रवि उच्च जागा, उच्चाधिकार
देतो.
८)येथे रवि
असता अधिकार योग होतो. हे लोक निसर्गत:च पुढारी व सत्ताधारी असतात सरकारी नोकरी हे
लोक उच्च पदावर दिसून येतात. अधिकार योग, स्वतंत्रता
व सांपत्तिक स्थिती हळूहळू चांगली होत जाते. सरकारदरबारी मानसन्मान मिळतो.
समाजात वजन असते. सचोटीने व सन्मागनि उन्नती होते.
९)येथे रवि
चांगला असन दशमेशही स्थितीत असेल तर नोकरीत पदच्युत होण्याचे किंवा अपमानास्पद
प्रसंग येत नाहीत. रवि-मंगळ येथे उत्तम शल्यचिकिक करतात. तर रवि-गुरु पुती उत्तम
न्यायाधीश, बॅरिस्टर, वकील यांसाठी किंवा विज्ञानाचे प्राध्यापक, प्राचार्य इ. साठी चांगली मानली आहे. येथील
रवि व्यक्तीला आयुष्यात अनेक संधी आणून देतो. आयुष्याच्या मध्यभागी यांना
मानसन्मान व मोठा अधिकार
प्राप्त होतो. रवि-शनि, रवि-राह, रवि-हर्षल या युत्या पितृसौख्यास मारक आहेत.
१०)स्त्रियांच्या
कुंडलीत येथे रवि असता विवाहानंतर पतीचा भाग्योदय होतो. या स्त्रियांची बद्धिमत्ता
चांगल्या दर्जाची असते व त्यांच्या सल्ल्यानुसार वागल्यास त्यांच्या पतीचा फायदा
होतो. रविचंद्र युती येथे असता अशा स्त्रियांना स्वत:च्या किंवा पतीच्या नोकरीच्या
कारणास्तव वारंवार स्थलांतर करावे लागते. मात्र त्यामुळेदेखील त्यांचा फायदाच
होतो. येथे रवि असलेल्या स्त्रियांना वडिलांचे प्रेम तर लाभतेच, मात्र बहुधा वारसाहक्काची संपत्ती किंवा
इस्टेटही मिळते.
११)या
स्थानातील रवी व्यक्तीला राजासमान अधिकारसंपन्न बनवितो. हा रवी मातेला कष्टकारक व
सर्व कार्यात यश देणारा आहे.
रविची एकादशस्थान
१)एकादशस्थान- हया स्थानातील रवि आर्थिक लाभ चांगले करतो. व्यक्ति मानाने पैसे मिळवितात. इच्छा आकांक्षा पूर्ण होतात. सामाजिक गोष्टीत
पुढाकार घेणा-या व्यक्ति असतात.
२)पंचमस्थानात पापग्रह असता हा रवि संतति-सुखात अपायकारक होतो.
३)एकादश
स्थान- एकादश स्थानी रवि असता मित्र चांगले, मोठ्या
कुळातले. श्रीमंत, अधिकारी असे मिळतात. समाजातील
मोठ्या व प्रतिष्ठित व्यक्तींशी तसेच राजकीय क्षेत्रातील व्यक्तींशी ओळखी असतात व
त्यापासून फायदादेखील होतो. सरकारकडून लाभ होतो. मात्र बहधा स्वत:च्या मुलांकडून
त्रास किंवा त्यांच्या चुकीच्या वर्तनामुळे समाजात बेअब्रू होते. आयुष्यात
अडीअडचणींच्या प्रसंगी यांनी वडीलधारी व ज्येष्ठमंडळींकड़न मदत मागितल्यास काम
लवकर होते. जलराशीचा रवि चैनी, विलासी व
खर्चिक वृत्ती देतो.
४)एकादशस्थानी
रवि असलेल्या स्त्रियांचे सासर-माहेर बहधा तोलामोलाचे असते. या स्त्रियांचा बहधा
कुटुंबातील ज्येष्ठ पुत्राशी विवाह होतो, त्यामुळे
मोठी सून म्हणून आपोआपच सासरी वडिलकीचा मान मिळतो. आयुष्यात यांना पैशासाठी कधीही
मानहानी स्वीकारावी लागत नाही.
५)या
स्थानी 'रवी असता वाहनादी सुख प्राप्त होतात, सरकारदरबारकडून धनप्राप्ती होते, यांचे शत्रू यांचा नेहमी मत्सर करतात.
६)या
स्थानात रवी असता महत्त्वाकांक्षी बनवतो. सत्तेवरील व अधिकारसंपन्न व्यक्तींची ओळख
असते व त्यामुळे या व्यक्तींचा फायदा होत असतो. संपत्ती खूप मिळते. पराक्रमी, बुद्धिमान, दृढनिश्चयी स्वभावामुळे यांच्यात आपल्या
आकांक्षा पुप्या करण्याची धमक असते.
७) या स्थानात रवी असता - राहायला घर वा बंगला, फिरायला मोटार, घरात नोकर-चाकर, खाणे-पिणे मुबलक, संगीत-नृत्यादी कलेची आवड, आर्थिक आवक चांगली असे फक्त या रवीने मिळते.
ह्या लोकांना सार्वजनिक कार्याची आवड असते. कायदेपंडित म्हणून हे चमकतात एवढेच
नव्हे तर कायदेकौन्सिलात हे निवडून जातात.
८) साध्या सरपंचापासून राष्ट्रप्रमुखापर्यंत
कोणत्या ना कोणत्या जागी हे लोक निवडून येतात. उद्योगपतींच्या कुंडलीत हा रवी
यशदायी असतो.
९)अशुभ रवी तितकेसे चांगले फल देत नाही.
आशाआकांक्षा पूर्ण व्हायला वेळ लागतो. एकादी महत्त्वाची इच्छा अपुरी राहाते. मित्र
केवळ आश्वासने देणारे भेटतात. राजकारणी व्यक्तींकडून त्रास होतो. हे विरोधी
पक्षातर्फे निवडून येतात. चैनीचा अतिरेक होऊन आर्थिक विपन्नावस्था येते. बडे घर पोकळ वासा अशी स्थिती असते
१०)एकादशस्थानामध्ये
रवि असतां- मित्र फार चांगले व मोठ्या कुलामधील
मिळतात. सर्व आशा व इच्छा सफल होतात, उद्योगधंद्यापासून
प्राप्ति चांगली होते. मित्र विश्वासू व मदत करणारे असतात, व मित्रांमुळे भाग्योदय होतो.
११)रवि
बलहीन व अशुभसंबंधित असतां मित्रांपासून त्रास, संकटें व अनेक अडचणी आलेल्या पाहण्यास
मिळतील.
रवी द्वादशस्थानात
१)द्वादशस्थानी
रवि असता- आरोग्य फारसे चांगले राहत नाही. या व्यक्ती बुद्धिमान असतात. अशा व्यक्ती जरी सामान्य परिस्थितीत जन्मल्या, तरी स्वकर्तृत्वाने व परिस्थितीवर मात करून
पुढे येतात. साधारणत: आयुष्याची पहिली २५ वर्षे अत्यंत कष्टात जातात व त्यानंतर
भागोदयास सुरुवात होते.
२)येथे रवि असून चंद्र २, ६, ८ किंवा
१२ या स्थानांमध्ये असता नेत्ररोग होतात. दृष्टिदोष निर्माण होतो. हॉस्पिटल, धार्मिक संस्था, तुरुंग यांच्याशी कोणत्या ना कोणत्या
कारणांनी संबंध येत राहतो.
३)हे लोक अतिशय मेहनत घेऊन कोणत्या ना कोणत्यातरी
शास्त्रात प्रावीण्य मिळवतात. रवि-राहु युती किंवा रवि-शनि षडाष्टक येाग असता पित्याशी
पटत नाही. रवि-राहु युती बरेच वेळा सरकारी नियम किंवा कायदे यांचे उल्लंघन
केल्यामुळे दंड किंवा बंधनयोग दर्शविते. येथे रवि-शुक्र युती जलराशीत असता
व्यसनीवृत्ती असते. अनेक स्त्रियांशी संबंध
येतो. येथे रवि असता परदेशात भागोदय होतो.
४)स्त्रियांच्या
कुंडलीत व्ययस्थानात रवि असता व्यक्तीमत्त्व व बोलणे चांगले असते. आपल्या शैलीदार
संभाषणाने त्या दुस-यावर चटकन छाप पाडतात. बहुधा अशा स्त्रिया अहंकारी व हेकट
स्वभावाच्या आढळतात.
५)कुंडलीतील बारावे स्थान सर्वच ज्योतिष्यानी वाईट
ठरवले आहे. या स्थानावरून खर्च, तुरुंगवास, गुप्त शत्रुत्व, दंड, राजकीय
संकटे,
मोठ्या व्याधी, व्यसने, कर्ज, हद्दपारी, लांबचे प्रवास, बंधन, मोक्ष, पारलौकिक गती, शयनादी उपभोग यांचा विचार करतात.
या स्थानातील शुभ रवी गूढ शास्त्र, अद्भुतता, गुप्तज्ञान, पारमार्थिक कार्य या गोष्टीत प्रगती करणारा
आहे. याना अतींद्रीय ज्ञान असते. हॉस्पिटल्स, सॅनेटोरियम, धर्मादाय संस्था, तुरुंग यासारख्या गोष्टींशी संबंध येतो.
हातून दानधर्म घडतो. सरकारच्या विरोधात कार्य करणाच्या लोकांच्या कुंडल्यांत हा
रवी असतो. जर सत्ताधारी पक्षात असतील तर विदेशमंत्री किंवा राजदूत म्हणून कार्य
होते. अन्यथा विरोध सहन करावा लागतो.
६)हे नेत्रस्थान असल्याने दृष्टीच्या संबंधी हा
रवी फार परिणामकारक आहे. डोळे खराब होऊन जाड भिंगाचा चष्मा लागणे, एकादा डोळा निकामी होणे या गोष्टी संभवतात.
प्रतिकूल
परिस्थिति देतो व मानभंग करतो. शनिबरोबर असता सामाजिक संकटे आणतो. काही वेळा
बंधनयोग येतो. हा रवि पापग्रहाबरोबर असता नेत्रपीडा देतो. आर्थिक हानि मोठ्या
प्रमाणात होते. शारिरीक पीडा व्यंग येते.
७)दूषित रवी कर्जबाजारी अवस्था, राजद्रोही म्हणून शिक्षा होणे, दारिद्य, परस्त्रीरत वडिलांशी संघर्ष, परदेशात धननाश व पापी वृत्ती दर्शवितो.
रवीच्या जवळपास बुध-शुक्र असल्याने व या स्थानामधील रवी बलवान् असल्याने
साहित्यिकांना चागला. पण दूषित रवी लेखन वा वक्तृत्वामुळे सरकारचा रोष ओढवून
घेणारा असतो.
८)सरकारी
अधिकारी व वरिष्ठांपासून त्रास हा या रवीचा गुण आहे. व्यसनाधीनतेने अपकीर्ती होते.
असे असले तरी या स्थानातील रवी तेजस्वी असल्याने आयुष्यात वर आणतो.
९)व्ययस्थानामधील
पीडित रवि अधिकारी व वरिष्ठ यांच्याबरोबर शत्रुत्व, राजकीय संकट, मोठाल्या अधिकारी माणसांबरोबर वैर उत्पन्न
करतो. कित्येक वेळां या स्थानामधील
पीडित रवि हद्दपारी करवितो किंवा स्वदेशत्याग करण्यास लावतो. ही माणसे स्वतः होऊन
आपल्या हाताने मानसन्मान, कीर्ति यांचे दिवाळे वाजवितात व
त्यामुळे दूर देशांतरीं पळून जावे लागते.
१०)या
स्थानातील रवी नेत्रपीडा वा कमी दिसणे, परदेशात
जाऊन धननाश होणे, भावाना व शत्रूला पीडादायक ठरणे
ही फले दर्शवितो.
११)या स्थानामधील पीडित रवि राजदंड, कैद, राजाज्ञेने
धनक्षय दर्शवितो. परंतु या स्थानामध्ये बलवान् शुभसंबंधित रवि असतां दानसंस्था, तुरुंग, हास्पिटल्स, अध्यात्मविषय यांपासून लाभ दर्शवितो व
जगामध्ये पुढे येण्यास मदत करतो.
No comments:
Post a Comment