कुंडलीनुसार - मंगळाची स्थानागत फले
ग्रहमालेत रवि राजा,
चंद्र राणी तर मंगळाला सेनापती संबोधले आहे. हा निसर्गत:च पुरुष ग्रह असून पापग्रह म्हणूनच तो कुप्रसिद्ध आहे. त्यामुळे खून,
मारामाच्या, जाळपोळ, अपघात, रक्तपात, शस्त्रक्रिया, दरोडा, लढाया इ. घटनांचा कारक ग्रह मंगळच आहे.
मंगळ हा मुख्यत्वाने भूमिकारक व भ्रातृकारक आहे. त्यामुळे जमीन-जुमला, स्थावर इस्टेट व यांचा लाभ, त्याचप्रमाणे व्यक्तीला मिळणा-या भावंडांच्या सुखाचा विचार
मंगळावरून करतात.
मंगळ हा आक्रमक,
उग्र, तापट स्वभावाचा ग्रह आहे. हा पुरुष ग्रह असून अग्नितत्त्वाचा ग्रह आहे.
त्यामुळे वैवाहिक जीवनात कटुता व भांडणे घडवून
आणणारा ग्रह मंगळ आहे. आणिम्हणूनच विवाहाच्या
वेळी पत्रिका जमविताना मंगळ पाहण्याची पद्धत आहे.
मात्र एखाद्या व्यक्तीच्या
अंगी धडाडी, आत्मविश्वास,
कर्तृत्व व साहस निर्माण करून त्याच्याकडून
जबाबदारीचे काम करवून घेण्याचे सामर्थही मंगळातच आहे. तथापि सारासार विचार केला तर या ग्रहात शांतपणा,
सोशिकता, बुद्धिवाद फारच थोड्या प्रमाणात आढळतो. याउलट उतावीळपणा, तडकाफडकी निर्णय घेणे, परिणामांचा विचार न करताच एखादी गोष्ट करणे, अशा प्रकारचाच स्वभाव मंगळामध्ये दिसून येतो.
पोलीस,
मिलिटरी, फौजदारी खटले, अटक, कैद, तुरुंगवास इ. गोष्टीदेखील मंगळाच्याच अमलाखाली येतात.
स्वभावगुण - धाडसी,
साहसी, पराक्रमी, लढवय्या, अधिकार गाजविण्याची वृत्ती, नेतृत्वगुण, तापट, अहंकारी, हट्टी,
दुराग्रही, अतिरेकी, अन्यायाविरुद्ध झगडणारा, नमते न घेणारा, संघर्ष कटता, शत्रुत्व पत्करणारा, स्पष्टवक्तेपणा, एक घाव दोन तुकडे करण्याची वृत्ती,
महत्त्वाकांक्षी,
क्वचित जुलुम-जबरदस्ती करणारा, दाहक व क्रूर, आततायीपणा, अविचारी, उतावळेपणा, दूरदृष्टी कमी, तामसी, भोगी, संरक्षक, सामर्थ्यवान,
कर्तृत्ववान.
शरीराचे अवयव - गुप्तेंद्रियाचा बाहेरचा भाग, गुदद्वार, स्नायु,
चेहरा, डोके, कपाळ, मेंदू,
नाक, प्रोस्टेट ग्रंथी, पित्त, पित्ताशय, मूत्राशय, स्नायू, मांसरज्जू, वीर्य, रक्तातील लाल पेशी.
रोग/आजार - सर्व प्रकारचे ज्वर, भयंकर वेदना, रक्तस्राव, कापणे, भाजणे, चिरफाड होणे, ऑपरेशन्स, गळवे, पुरळ येणे, खाज,
अंगाची आग होणे,
अंगावर चट्टे पडणे,
लातडे उठणे (अंगावर लाल रंगाच्या ग्रंथी),
देवी, गोवर, रक्तदोष, गुप्तरोग,
व्रण, मूच्छ, अपेंडिसायटीस, मूळव्याध, फिस्टुला, फिशरसारखे गुदद्वाराचे विकार,
गंडमाळा, टॉन्सिल्स, मलेरिया, हर्निया, धनुवति, विषबाधा, वीर्यदोष, मूत्रकृच्छ, अंग फुटणे, पित्तज्वर, अग्नीभय, अपस्मार, मेंदूचे विकार, खरूज, अंगहीनत्व, रक्तदाब
वाढणे, उष्णतेचे सर्व
विकार, तिखट खाण्यामुळे
अल्सर, रक्त पडणे, शरीरांतर्गत रक्तस्राव, मेंदूतील रक्तवाहिनी तुटणे (ब्रेन हॅमरेज),
स्त्रियांच्या बाबतीत रक्तप्रदर,
बाळंतपणात शस्त्रक्रिया व त्रास होणे.
नोकरी-व्यवसाय - पोलीस, सैन्यदल, गुप्तहेर,
सुरक्षारक्षक, केमिस्ट, ड्रगिस्ट, सर्जन, ड्रायव्हर, मेकॅनिकल इंजिनिअर, मल्ल, क्रांतिकारक, खाटीक, शिंपी,
न्हावी, लोहार, चांभार, रंगारी, सुतार, स्वयंपाकी, संहारक शस्त्रे व अस्त्रे यांचा शोध लावणारे,
स्फोटकांच्या किंवा शस्त्रास्त्रांच्या
कारखान्यातील लोक, हत्यारे विकणारे, लोखंड व स्टीलचे व्यापारी, लाल रंगाच्या वस्तू तसेच तिखट मसाल्याचे पदार्थ,
लोणची, मिच्र्या इ. चे विक्रेते, उकळते पदार्थ (बॉयलर),
तीव्र औषधे, आम्ल पदार्थ, रसायनशास्त्रज्ञ, टर्नर-फिटर, लेथ वर्क, तांब्याची
भांडी बनविणे, कासार,
दंतवैद्य, चाकू-सुन्या बनवणारे व त्याला धार देणारे,
वॉचमेकर, कांच कारखाना, लोखंड-तांबे-पितळ वितळविण्याच्या भट्ट्या (कास्टिंग), चुना भाजण्याच्या व विटा भाजण्याच्या भट्ट्या, तोफखाना, दारूची कोठारे, शस्त्रागार, कसाईखाना, फौजदारी वकील, ओव्हरसीयर, दारूचे गुत्ते व दारूभट्ट्या ,
अबकारी खाते, एक्साइज इन्स्पेक्टर व शिपाई,
रणगाडे, बॉम्ब, विमाने, पायलट, लढाऊ जहाजे यांवर काम करणारे लोक,
ज्वलनशील वस्तूंशी संबंधित व्यवसाय,
इ.
शक्ति, साहस, शौर्य, पराक्रम ह्याचा
कारक ग्रह मंगळ हा ,त्याला लाभणा-या स्थानाप्रमाणे गुणांचा अविष्कार करतो.
त्याच्याजवळ असलेली विधायक अगर विघातक शक्ति स्थानाच्या चौकटीतून व्यक्त होत असते.
प्रथम स्थानात मंगळ
1) प्रथम स्थानात मंगळ असलेल्या व्यक्ति उंच, दणकट, रुबाबदार, रागीट, उग्र दिसतात. हया मंगळामुळे कित्येक व्यक्तीचे डोळे लालसर, अंगकांति लालसर
असते. बहुधा यांच्या डोक्यावर जखमेचा एखादा व्रण असतो. लग्नी मेषेचा मंगळ
असता हा अनुभव हमखास येतो .
2) व्यक्ति लवकर रागावणा-या, शक्तीने काम करणा-या, दुस-यावर हुकमत गाजविणा-या ,अत्यंत महत्त्वाकांक्षी, आत्मविश्वास, उत्साह, धडाडी, असलेल्या कोणत्याहि संकटाला, अडथळ्यांना न
जुमानणा-या, हट्टी तशाच मेहनती असतात.
3) व्यक्ति स्वत:च्या हिकमतीवर, स्वतःच्या
पायावर आपले उदिष्ठ साध्य करतात. अशा व्यक्ती स्वतंत्र वृत्तीच्या, स्वातंत्र्यप्रिय
असतात. अशा व्यक्ति कार्यात जोम ओततात. कित्येक वेळा अशा व्यक्ति उग्र स्वरूप धारण
करतात. मागचा-पुढचा विचार करीत नाहीत.
4) ध्येय साध्य झालेच पाहिजे हा त्यांचा आग्रह असतो. या
व्यक्तीच्या कार्यात उतावीळपणा, हटवादीपणा, तापटपणा असतो, पण हे ध्येय गाठणारे यशस्वी लोक असतात. एक घाव दोन तुकडे करण्याची वृत्ती असते.
5) लग्नी मंगळ लहानपणी नेत्रपीडा
व
डोकेदुखी
,रक्तपीडा, भाजणे-कापणे, जखमा व खरूज होणे यांचा त्रास होतो.
६) अपघाताच्या दृष्टीने या स्थानातील मंगळ पापग्रहयुक्त असता
तीव्र फले देतो.
शनि-हर्षल वगैरे पापग्रह मंगळाबरोबर असता मोठे अपघात, जबर दुखापत, इलेक्ट्रिक शॉक, भाजणे, शस्त्राघात अशी
फले देतो. असे योग पत्नीला अत्यंत वाईट असतात.
७) अष्टमात, षष्ठात शनि असता, लग्नातील मंगळ शाररिक व्यंग देतो.
पापग्रहयुक्त मंगळ आरोग्य चांगले ठेवीत नाही. या स्थानातील मंगळ व्यक्तीला
उष्णतेचे विकार, कपाळदुखी, डोकेदुखी, चेह-यावर व्रणखुणा दर्शवितो.
८) हा मंगळ अधिकारयोग, उत्तम, शासन करण्याची कला दर्शवितो.
९) मंगळ-शुक्र युती असता
प्रेमविवाह होतो किंवा अनेक स्त्रियांशी संबंध येतो..
१०) येथे मंगळ असता अपघाताचा, विशेषतः डोक्याला मार लागून मृत्यू येण्याची
शक्यता असते. भाजण्याचा किंवा इलेक्ट्रिक
शॉकचाही धोका संभवतो.
1१) लग्नी मंगळ असता वयाच्या ३६ पर्यंत अनेक धंदे करतात त्यामुळे बरेचदा नुकसान
होते. ३६ व्या वर्षांनतर एकाच धंद्यावर
स्थिरस्थावर होतात.
१२)लग्नी मंगळ लोहार,
सोनार, मेकॅनिकल इंजिनीयर, टर्नर-फिटर, मोटारीचे ड्रायव्हर किंवा रेल्वेगाडींचे मोटरमन इ. ना चांगला असतो.
१३)या स्थानाचा मंगळ
लष्कर,
पोलिसखाते,
मुष्टियोद्धे,
शल्यवैद्य,
दंतवैद्य,
उद्योगपती,
लोखंड
व
पोलादाशी
संबंध,
न्हावी,
खाटिक,
सुतार,
रखवालदार,
यंत्रज्ञ,
शिल्पज्ञ,
कुस्तीबाज,
खेळाडू,
इंजिनियर,
सर्कसपटू,
आग
विझवणारे,
शिकारी,
दरोडेखोर,
डॉक्टर,
स्वयंपाकी,
डिटेक्टिव्ह,
क्रांतिकारक,
अग्निजीवी
लोक,
व
पुढारी
दर्शवितो.
1४) लग्नी स्वराशीचा, उच्चराशीचा किंवा शुभग्रहांच्या युतीतील मंगळ स्त्रियांच्या कुंडलीत असता
श्रीमंत किंवा उच्च दर्जाच्या व्यक्तीशी विवाह होतो.
1५) लग्नी मंगळ-राहू युती असता स्त्री अत्यंत भांडखोर स्वभावाची असते. तिचे कोणाशीही पटत नाही. हा योग स्त्रीच्या चारित्र्याच्या व वैवाहिक सौख्याच्या
दृष्टीनेदेखील अशुभ आहे.
1) हया स्थानात मंगळ व्यक्तीला उद्योगी, खटपटी बनवितो.
हा मंगळ जीवनोपयोगी विद्या
देतो . यांत्रिक-तांत्रिक ज्ञान असते.
2) धनस्थानात मंगळ असता व्यक्ती खर्चीक स्वभावाची असते. पैसा हातात टिकत नाही. येथे मंगळ असता उधार-उसनवारी करू नये, अन्यथा अपमानकारक बोलणे ऐकून घ्यावे लागते.
३) शनि-मंगळ युती धनस्थानात असतो
जातक कर्जबाजारी होतो. धनस्थानात मंगळ व व्ययस्थानात शनि असता कितीही पैसा मिळाला
तरी अपुरा पडतो.
४) द्वितीयांत मंगळ असलेल्या
व्यक्तीला पैसा खर्च करतांना मागचा पुढचा विचार रहात नाही. या व्यक्ति कोणत्याही
गोष्टीसाठी उतावीळ होतात. एखादी गोष्ट विकत घ्यावयाची मनात आली की हे चटकन् घेतात. वस्तुची उपयुक्तता, लांबवरचा विचार, आर्थिक कुवत
ह्याचा विचार त्यांना नसतो.
५)मंगळ हर्षल सांपत्तिक बोजवारा उडवतात.जरूर नसताना उदार
वृत्ति दाखविल्याने नुकसान होते.
६) या लोकांनी कमी बोलावे म्हणजे त्यांची प्रगती होते. जेवढे जास्त बोलतील तेवढे मागे राहतील. ब-याच वेळा हे लोक बोल बच्चन अमिताभ बच्चन'
या सदरात मोडणारे असतात.
७)येथे मंगळ असता वकील व डॉक्टरांसाठी चांगला असतो. वकिलांची चांगली छाप पडते,
तसेच डॉक्टरांना अत्यंत जलद व अचूक रोगनिदान
करता येते
८) द्वितीयातील मंगळ वादविवादी दुस-याला टाकून बोलणे, फटकळ बोलणे, चुकून बोलून
जाणे, तिखट बोलणे, दाखवितो. येथील
मंगळ स्पष्टवक्तेपणा देतो. या लोकांनी अशुभ बोलू नये अन्यथा ते खरे होते. बुधाबरोबर असता ही फले
प्रकर्षाने मिळतात. या व्यक्तींची बत्तिशी खरी होते. अशा योगावर जहाल वक्ते, टीकाकार होतात.
९)या व्यक्तींना उष्णतेने
डोळयाचे त्रास होतात. पापग्रहाबरोबर मंगळ असता डोळयाचे ऑपरेशन, दृष्टिदोष
अंधत्व येते.
१०) हया स्थानात मंगळ व अष्टमात शनि-हर्षल असता अपघाती मृत्यूचा
योग होतो. द्वितीयांत मंगळ-राहू घराण्यात अतृप्त व्यक्तींचा अपघाती मृत्यू
दाखवितो.
११) द्वितीयांत मंगळ तिखट पदार्थाची आवड, मांसभक्षण
दाखवितो. यांना तिखट व मसालेदार पदार्थ खाण्याची आवड असते. तसेच धूम्रपान व मद्यपानाचेही व्यसन असते.
१२) हा मंगळ ,सप्तमात -अष्टमात पापग्रह असता द्विभार्यायोग करतो.
१३)पापग्रहयुक्त मंगळ या
स्थानात असता अशा स्त्रियांची लहान बालकांना हमखास दृष्ट लागते.
१४) हे नेत्रस्थान असल्याने यांचे डोळे मोठे, सतेज व लालसर असतात. दृष्टीमध्ये जरब असते.
१५)दूषित
मंगळ भयानक चेहरा, उग्र
दृष्टी, डोळ्यांना
मार व खुपरेपणा दर्शवितो, मोतिबिंदूमुळे शस्त्रक्रिया करावी लागते. चष्मा वापरावा लागतो. अंधत्वाची
भीती असते.
१६) हे वाचास्थान असल्याने यांचे बोलणे तर्कशुद्ध, मुद्देसूद, आत्मविश्वासपूर्ण,
मोठा व स्पष्ट आवाजयुक्त व प्रभावी असते. मंगळ दूषित असल्यास फटकळ, आत्मप्रौढीयुक्त,
शिवराळ, जहाल,
भांडखोर, अर्वाच्यभाषी,
टोमणे मारणारे बोलणे, असत्य
भाषण दर्शवतो.
१७) या मंगळाची मृत्युस्थानावर दृष्टी असल्याने अचानकपणे, अपघाती, खुनी
हल्लयांत व दंडाने मृत्यू देतो. यांना
मिरचीयुक्त तिखट व मसाल्याचे पदार्थ आवडतात. चहा-कॉफी
व तंबाखू-विडी-सिगरेटचे
व्यसन असते. चेह-यावर
व्रणाच्या खुणा असतात. देवीचे
व्रण असतात.
१८) स्त्रियांच्या पत्रिकेत हा गर्भपात व रक्तस्राव दर्शवितो. विषयवासना
बाढविणारा हा मंगळ असतो.
१९) नट लोकांना, वकीलवर्गास, राजकीय
वक्त्यांना येथील मंगळ वक्तृत्वाच्या दृष्टीने चांगला ठरतो.
२०) वैवाहिक साथीदाराचा मृत्यू अचानकपणे दाखवितो.
तृतिय स्थानात मंगळ
1) तृतीयातील मंगळ व्यक्तीला कर्तबगार,
पराक्रमी, धीट, साहसी मात्र दुराग्रही व हट्टी बनवतो
हया स्थानात मंगळ हा साहस, पराक्रम, कर्तृत्व, शूरता, धैर्य ह्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.
2) अशा व्यक्ति मनाच्या चंचल पण परिस्थितीला न डगमगणा-या, बुद्धीने चलात
पण हटवादी असतात. अशा व्यक्तींना त्यांच्या मताविरोधी होणारी टीका सहन होत नाही.
वैचारिक, बौद्धिक, हटवादीपणा, स्वमताग्रह असतो .
3) स्वराशीचा किंवा उच्चराशीचा मंगळ असल्यास भावंडांचे सौख्य चांगले
मिळते. इतर राशीतील किंवा पापग्रह युक्त मंगळ भावंडाचे सुख देत नाही.
४)तृतीयातील मंगळ - लहानपणी काही भावंडे जातात, संघर्षप्रिय असा हा मंगळ भावंडात मताविरोध, न जमणे, विभक्त राहणे
हया स्वरूपात फले देतो.
५) तृतीयांत मंगळ-राह, मंगळ-शनि, मंगळ-हर्षल, मंगळ-नेपच्यून, हे योग एखाद्या
भावंडात शारीरिक व्यंग, अपघाती मत्य, कायमचे मोठे आजार वगैरे परिणामांनी
भ्रातृसौख्य नष्ट करतात.
असे योग कानाची दुखणी, मानसिक कमकुवतता, मेंदूचे आजार, आत्मघातकी
वृत्ति, बौद्धिक व्यग्रता दाखवितात.
६) तृतीयांत रवि, शनिबरोबर मंगळ असता हाताचे हाड मोडते.
७) तृतीय स्थान अष्टमाचे अष्टम असल्याने हे योग आयुर्दाय कमी
करतात.
८) तृतीयातील मंगळ व्यक्तीच्या लिहिण्याच्या प्रकारात जोराने, मोठे ठळठळीत
सुटे अक्षर काढण्याची पद्धत दाखवितो.
९)येथे मंगळ-राहु असता विधवा बहिणीच्या संसाराची जबाबदारी सांभाळावी लागते. बरेच वेळा तृतीयात मंगल असलेले लोक स्वत:ची पत्नी सोडून दुस-या बाईच्या नादाला लागतात व घर सोडून जातात.
१०)तृतीयात मंगळ असलेले लोक
अतिस्पष्टवादी व तुसड्या वृत्तीचे असतात, त्यामुळे अनेक शत्रु निर्माण होतात . येथे मंगळ असलेल्यांनी
लेखी व्यवहारात सावध असणे आवश्यक आहे.
११)येथे मंगळ असलेल्या
स्त्रियांचे वैवाहिक सौख्य हट्टीपणा, तडजोड न करणे इ. स्वभावामुळे बिघडण्याची शक्यता असते. एकत्र कुटूंबात त्यांचे अजिबात पटत नाही. यांनी विवाहानंतर लगेचच विभक्त राहावे हे चांगले. येथे मंगळ असलेल्या स्त्रियांचे वागणे-बोलणे बरेचदा पुरुषीआढळते.
१२)संरक्षणखाते, पोलिसखाते
यामध्ये काम करणाऱ्यांना हा मंगळ चांगला असतो.
यांच्याशी संबंध येतो. शुभ
मंगळ शत्र नाशक योद्धा, विजयी खेळाडू व पराक्रमी भावंड दर्शवितो.
१३)खेळानिमित्त खुप प्रवास होतो. यांचे लेखनही ऐतिहासिक, चरित्रात्मक
व स्फूर्तिदायी असते. जहाल
व आक्रमक लेखक म्हणून प्रसिद्धी लाभते.. हा मंगळ अधिकार देतो.
१४)अशुभ मंगळ पाठीवरच्या भावंडाचा अचानक व अपघाती मृत्यू दर्शवितो. प्रवासात
त्रास, भांडणे
व अपघात, शेजा-यांशी
भांडणे, मनात
आत्महत्येसारखे विचार, व्यभिचारी वृत्ती, लेखनामुळे वितुष्ट व संघर्ष, अविचारी वृत्ती, भावंडांशी वैर, नैतिक अधःपात इत्यादी फले येथील अशुभ मंगळाची आहेत.
१५)या स्थानाचा कानावर अंमल असल्याने उष्णतेमुळे कान ठणकतात. दुसन्या पापग्रहाबरोबर असता बधिरता येऊ शकते.
१६)अतिरेकी क्रांतिकारकांच्या, गावगुंडांच्या किंवा जुलमी सत्ताधीशाच्या तृतीयस्थानी असा दूषित मंगळ असतो.
चतुर्थ स्थानात मंगळ
1) चतुर्थ स्थान - हया
स्थानातील मंगळ केंद्रस्थानातील मंगळ म्हणून महत्त्वाचा असतो. जमीनजुमला, शेतीवाडी या
दृष्टीने चांगला असतो. व्यक्तींच्या
नावावर स्थावर-इस्टेट होते. घर किंवा प्रॉपर्टी घेताना या व्यक्तींच्या नावावर घेतल्यास
अडचणी येत नाहीत. येथे मंगळ असता जन्मगावापासून किंवा जन्मभूमीपासून दूर गेल्यास भाग्योदय होतो.
2) गृहसौख्याच्या दृष्टीने हा मंगळ घरातील वातावरण तप्त
ठेवतो-गृहसौख्य बिघडवितो. लोकांना सतत कार्यरत असल्याने, शांति-विश्रांति
लाभत नाही. हा मंगळ घरात संघर्ष निर्माण करतो. मगळ मातृसौख्य बेताचेच देतो घरात कलहहोतात.
3)स्त्रियांच्या पत्रिकेत हा मंगळ शुभ ग्रहाबरोबर असल्यास
काही अंशी बरा असतो. पापग्रहयुक्त असल्यास, वैवाहिक सौख्य नष्ट करतो. शुक्रयुक्त असता
सांपत्तिक दर्जा चांगला ठेवतो.
4) शनि, हर्षल नेपच्यूनयुक्त मंगळ ग्रहसौख्याची होळी करतात.
वाहनांचे मोठे अपघात, वास्तूला अपघात, घरात अपमृत्यु, उत्तर आयुष्यांत
घसरगुंडी, मातेला तास, मातसौख्याची हानि, मातेस मोठे आजार
दर्शवितात.
5) मंगळ--हर्षल भाजण्याचे अपघात दाखवितात. घराण्यात शांति लाभत
नाही. हा मंगळ हृदयविकाराच्या दृष्टीने अभ्यासतात. छातीचे
दुखणे
संभवते.
अंतकाळ
त्रासदायक
असतो
६)येथील मंगळ पहिल्या संततीला
मारक ठरतो.
७)मंगळाबरोबर अन्य पापग्रह असता
वैवाहिक सौख्य बिघडते. स्त्रियांच्या कुंडलीत चतुर्थात मंगळ असता सासरी सासू-नणंदा यांचा जांच सहन करावा लागतो. यांना सासू-नणंदा नसलेले स्थळ सहसा शोधूनही सापडत नाही, यांनी विवाहानंतर लवकरात लवकर विभक्त व्हावे हे उत्तम,
अन्यथा भांडणे होऊन वेगळे होतात.
८)या स्थानाचा मंगळ बहुतेक ज्योतिष्यांनी अशुभ ठरवला आहे. मातृसुखाची हानी अथवा आजारपण, संपत्तीचा नाश, घरामध्ये कलह, भावाभावांमध्ये
भांडणे, स्थावर मालमत्तेबद्दल काही
ना काही कायदेशीर लचांडे, घराला आग
लागणे, दरोडा पडणे, स्त्रियांना पाशवी वृत्तीने वागविणे, घरात नेहमी अशांतता असणे, घरातल्या वाईट गोष्टी चव्हाट्यावर येणे, दुसन्याच्या घरी राहायची वेळ येणे, लहानपणी मातेचे दूध न मिळणे, स्थावर इस्टेट गहाण असणे, जन्माच्यावेळी मातेस मरणप्राय कष्ट, अशी अनेक प्रकारची अशुभ फळे हा मंगळ दर्शवितो.
1) पंचमांत मंगळ संततीच्या दष्टीने अपायकारक असतो. असा मंगळ
पोटाचे ऑपरेशन, स्त्रियांच्या पत्रिकेत प्रसूतित्रास, गर्भपात
दाखवितो. मंगळ-हर्षल, मंगळ-शनि, मंगळ-नेपच्यून असे योग अत्यंत वाईट असतात. वारंवार गर्भपात, उपजताच मृत्यु, संततीचे अपघाती
मरण दाखवितात. मंगळ-राहू हा योग संततीत, शारीरिक वैगुण्य देतो.
2) मंगळ पंचमांत असता संततीशी पटत नाही. मुले स्वतंत्र • वृत्तीची असतात.
अशा वेळी प्रथम वा नवमांत गुरू असता काही अशी चांगली फले मिळतात.
३)पंचमात मंगळ असता संततीसौख्य
चांगले लाभत नाही. मंगळ-शनि, मंगळ-राहू या युत्या संततीसौख्याच्या दृष्टीने फारच अशुभ आहेत. मूल उपजतच मरणे,
अति लहान वयात मूल जाणे,
गर्भपात होणे अशा घटना घडतात. येथे मंगळ असता संततीशी पटत नाही, मुलांकडून अपमानास्पद वागणूक,
पुत्रशोक किंवा पुत्रचिंता आढळते.
४) पंचमातील हर्षल राहू शनियुक्त मंगळ मेंदूवर बौद्धिक ताण, मेंदूत
रक्तस्राव, वेड, बुद्धिमांद्य दाखवितो.
५) मंगळ-शुक्र व्यक्तीला कामी, व्यभिचारी बनवितो.
६) पंचमात एकटा मंगळ, शिक्षण विलंबाने पूर्ण करतो.
७) मैदानी व मर्दानी खेळात यांना विशेष प्रावीण्य मिळते. जुगार, रेस, लॉटरी इ. ची आवड असते.कोणत्याहि मर्दानी खेळाला हा पोषक असतो. अशा व्यक्ति शक्ति, चपळाई व
कौशल्याचा उत्तम आविष्कार करू शकतात.
८) पंचमांत मंगळ व्यक्तीला वारंवार पैजा, सट्टा, जुगारीची
जात्याच आवड देतो, अविचाराने त्यात पैसा जातो.
९) हा मंगळ गणपति उपासना दाखवितो. येथे मंगळ असलेल्यांनी सहसा दुस-याला उधार पैसे देऊ नयेत.
१०)पंचमात मंगळ असलेल्या
स्त्रियांचा विवाह उशिरा होतो. या स्त्रियांना बाळंतपणात त्रास होतो. सिझेरियन
शस्त्रक्रियेने प्रसूती होते. येथे मंगळ असता एकदा तरी गर्भपात करण्याची वेळ येते किंवा गर्भपात होतो. येथील मंगळ कामवासना प्रबळ करतो, त्यामुळे अशा स्त्रियांचे विवाहपूर्व शरीरसंबंध येण्याची
शक्यता असते. येथे मंगळ असता स्त्रियांना संततीप्रतिबंधक रोग असू शकतात. मासिक पाळीच्या
वेळी ओटीपोटीत दुखणे, कंबर दुखणे असा त्रास होतो.
११) हे विद्यास्थान असल्याने येथील मंगळ तर्कशास्त्र, वैद्यकी, इंजिनियरिंग,
गणित, युद्धशास्त्र,
रसायनशास्त्र आदींचा अभ्यास दर्शवितो. शास्त्रीय विषयांमध्ये रुची असते.
१२)शाळा-कॉलेजमध्ये
खेळांकडे जास्त ओढा असतो. बुद्धी तीव्र असते. युद्धकथा,
डिटेक्टिव्ह कथा यांना आवडतात. गायन-वादन,
संगीतअभिनय आदी कलांना व खेळांना हा मंगळ चांगला. यांना स्टेजवर उभे राहाण्याची अजिबात भीती वाटत नसते.
१३) हे प्रणयाचे स्थान असल्याने स्त्री-पुरुष
एकमेकांकडे खेचले जातात. लैंगिक
सुख उत्तम मिळते. या व्यक्तीची वृत्तीच व्यभिचारी असते. मंगळ फार बिघडल्यास हे लोक बलात्कारी बनतात, जलराशीत
नशापाणी करण्याची संवय दर्शवितो.
१४)जुगार खेळणे, सट्टेबाजी करणे, लॉटरी घेणे या बाबतीत येथील मंगळ असलेला पुरुष, आघाडीवर असतो. शुभ मंगळ विपुल पैसा देतो. परंतु
अशुभसंबंधीत लाखाची राख करून टाकतो.
१५)अशुभ मंगळ गुन्हेगारीकडे
कल
देतो.
खून,
हाणामारी,
रक्तपात,
याचे
यांना
काहीच
वाटत
नाही. १६) स्वस्त्रीव्यतिरिक्त
एकादे
अंगवस्त्र
ठेवावेसे
वाटते.
त्यात
केवळ
लैंगिक
भाव
असतो.
षष्ठ स्थानात मंगळ
1) हया स्थानातील मंगळासारखा दाहक ग्रह अनेक उष्णतेचे रोग
देतो. लहानपणी कांजिण्या- गोवर, फोड, गळवाचा त्रास होतो. अंगात उष्णता जास्त असल्याने तोंड येणे, डोळे तळावणे, फीट येणे हया
नेहमीच्या तक्रारी ठेवतो. मूळव्याध रक्तीआव-रक्तस्राव, भाजणे, दाह होणे, शस्त्राने कापणे, इजा होणे वगैरे
दृष्टीने परिणाम करतो.
2) बुधाबरोबरचा मंगळ इसब, फोड, त्वचा रोग, मेंदूत रक्तस्राव, मेंदूत पाणी, मेंदूचे आजार
देतो.
3) मंगळाबरोबर शनि, हर्षल, वगैरे पापग्रह असता अगर व्ययात असता, माणसाला मोठे
आजार, पंगुत्व, मोठी दुखापत दाखवितात. षष्ठात पापग्रहयुक्त मंगळ एखादे
ऑपरेशन करावयास लावतो.
4) हा मंगळ चहाडखोर, भांडकुदळ व्यक्तींपासून, जनविरोधापासून
डोक्याला त्रास देतो.
5) हा मंगळ व्यक्तीला तिखट, तामसी पदार्थाची आवड व क्रूर गुण देतो.
6) दशमातील ग्रहांना हा मंगळ शक्तीचा पुरवठा करून उचलून धरतो.
7) येथे मंगळ असता मातुल घराण्याची स्थिति चांगली ठेवत नाही. मामांचे संसार विस्कळीत करतो.मामा-मावशीचा संसार चांगला चालत नाही. मामांच्या बायका
मरतात, त्यांची संतती जगत नाही व मावश्या विधवा होतात. अगर या दोघांचे वंश नष्ट होण्याचा संभव असतो.
८) षष्ठ स्थानात मंगळ असलेल्या
व्यक्ती खाण्या-पिण्यांत अविचारीपणाने वागतात. त्यामुळे आरोग्य
बिघडते. यांना पोटाचे विकार, असिडिटी व अल्सर, यकृताचे विकार, मूळव्याध इ. सारखे आजार होतात. वेदनादायी व दाहयुक्त आजार होतात. आयुष्यात
एखादीतरी शस्त्रक्रिया होते.
९)या व्यक्तींना आयुष्यात खूप
मेहनत करावी लागते. यांना बरेच शत्रू असतात, मात्र षष्ठातील मंगळामुळे स्वकर्तृत्वाने शत्रूवर विजय
मिळवतात. यांच्या अंगी उत्साह व कार्यशक्ती अमाप असते. |
मेहनती वृत्तीमुळे वरिष्ठ यांच्यावर खूश
असतात व नोकरीत भरभराट होते. मात्र हाताखालच्या लोकांना हे लोक राबवून घेतात.
१०)येथील मंगळ लाच खाऊन ती
पचविण्यास मदत करतो. हा मंगळ कामेच्छा बळावतो. येथे मंगळ असलेल्या
स्त्रियांचे वागणे पुरुषी असते. पुरुषांना आपल्या कह्यात ठेवणे त्यांना आवडते.
११)बहुधा प्रसूतीच्या वेळी या
स्त्रियांची शस्त्रक्रिया करावी लागते. यांना नोकर किंवा मोलकरणी चांगल्या मिळत नाहीत. घरात चो-या होतात. यांच्या
हाताखाली सहसा नोकरमाणसे टिकत नाहीत.
१३)हा
मंगळ फारच बिघडला असल्यास शल्यक्रियेमध्ये मृत्यूही येतो. कधी
अविचारी स्वभावाने आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतो. व्यभिचाराला व नीच कर्माला प्रवृत्त करणारा हा मंगळ आहे. खाण्यापिण्याच्या बाबतीत अतिरेक असतो. बुधाच्या
राशीतील दूषित मंगळ कुष्ठरोगपीडा दर्शवितो तर शुक्राच्या राशीतील मंगळ अतिविषयसेवनामुळे दुबळेपणा आणतो. गुरूच्या
राशीतला मंगळ शुभफले देतो.
1) सप्तमातील मंगळ
दाम्पत्यसुखाला चांगला नाही. पती-पत्नीत मतभेद होतात. हा मंगळ पापग्रहाच्या युतीत किंवा दृष्टीत असेल तर घटस्फोट
किवा जोडीदाराचा मृत्यू दर्शवतो. येथील हर्षल-मंगळ निश्चितपणे विभक्तपणा किंवा घटस्फोट दर्शवतात.
. कुटुंबात स्वास्थ्य सामंजस्य व एकोपा नसतो. सप्तमात मं गळ असता बायको भांडखोर व पतीला कब्जात ठेवणारी मिळते.
२)येथे मंगळ वक्री असता ठरलेला
विवाह अचानक मोडतो.
४) हा मंगळ नवरा-बायकोत मतभिन्नता,
मतवैचित्र्य, स्वभावविरोध दाखवितो. विवाह जुळता जुळता मोडतात. ठरलेल्या
तारखेला होत नाहीत. ह्या मंगळाने विवाहित जोडीदारांच्या प्रकृतीवर अनिष्ट परिणाम
होतो.
५) मंगळ सप्तमात व चंद्र लग्नात अगर द्वितीयात असता अथवा
मंगळाबरोबर सप्तमात हर्षल, शनि, राहू या
ग्रहांपैकी एखाद्या असता हा मंगळ विवाहित जोडीदारास मोठे अपघात,
शारीरिक व्यंग,
अपघाती मृत्यु अगर घटस्फोट,
थोड्या काळात विधुरावस्था,
वैधव्य दाखवितो.
६) मं. ह. पत्नीस भाजण्याचा अपघात,
मं. ने., मं. बु.-विवाहात फसगत.
७) मं. रा. शारीरिक व्यंग, घृणास्पद वागणूक.
८) शु.मं.-अतिकामुकता, व्यभिचारी वृत्ति,
९) पापग्रहयुक्त मंगळ वैवाहिक सौख्यात वैगुण्य आणतो.
१०) सप्तमातील मंगळ उत्तम प्रकारची शासकीय कार्यप्रवीणता,
अधिकार योग दाखवितो. हा मंगळ व्यक्तीला अति
महत्वाकांक्षी, हुकुमशाहीवत्ति
देतो. सत्तेची आवड असते.
११)येथे मंगळ असता जातक फार
घमेडखोर असतो. येथे मंगळ असता सहसा भागीदारीचा व्यवसाय करु नये. भागीदारांचा
वरचष्मा राहतो. सप्तम स्थानात मंगळ असता स्त्रीला
वैधव्य येते. या स्त्रिया स्वार्थी वृत्तीच्या असतात. सासरच्या
माणसांबद्दल प्रेम व आपुलकी नसते. पतीपेक्षा त्याचा पैसा व प्रतिष्ठा त्यांना अधिक प्रिय असते. सप्तमात मंगळ-राहू युती असता पती मारझोड करणारा असतो.
१२)सप्तमातील मंगळ हुकुमशाही व जुलमी वृत्ती देतो. हे
दुसन्याच्या स्वातंत्र्यवर गदा आणतात. यशस्वी
सेनानी या मंगळावर जन्मतात. युद्धातील विजयाने मानसन्मान व धन मिळते. धंद्यात जबर स्पर्धा असते. भागीदारीत नुकसान होते. कोर्टव्यवहारात अपयश पदरी पडते. या
लोकांचे इतरांशी खटके होतात. धंद्यात स्थैर्य नसते. मोठी
फसवणूकही होते. गुरूची दृष्टी असल्यास मंगळाचे फल खूप सह्य होते.
अष्ठम स्थानात मंगळ
1) हया स्थानातील मंगळ स्त्रियांच्या पत्रिकेत अत्यंत अशुभ
असतो. अशुभ ग्रहाने युक्त असल्यास वैधव्य देतो. मासिक पाळीचे रोग,
स्त्रीरोग, तीव्र प्रकारचे रोग, संततीस अपाय देतो.
2) व्यक्तीच्या पत्रिकेत असा मंगळ असता देवीचा रोग,
अपघात, शस्त्राघात, तडकाफडकी मृत्यु देतो. मृत्यूत अत्यंत तीव्रता असते.
3) द्वितीयात,प्रथम स्थानात पापग्रह असता हा मंगळ आयुष्य
कमी करतो.
4) ह्या मंगळात विवाहानंतर सांपत्तिक स्थिति ढासळते. बायको
खचिक मिळते.
5) पापग्रहयुक्त मंगळ बंधुसौख्य देत नाही.
६)मंगळ अष्टमात असल्यास अपघात
होणे, आकस्मिक मृत्यु
होणे, उष्णतेचे विकार
होणे, मूळव्याध,
फिस्टुलासारखे गुदद्वाराचे किंवा यकृताचे
विकार होणे, अतिविषय
सेवनामुळे शारीरिक व मानसिक दौर्बल्य येणे अशा गोष्टी घडतात. मंगळ-हर्षल युती असता
चर्चा होण्यासारखा मृत्यू होतो. जलराशीतील मंगळ दारूचे व्यसन देतो. शुक्र-मंगळ युती
कामवासना प्रबळ करते. गुप्तरोग होतात. येथे मंगळ असलेल्या लोकांनी कितीही लांच खाल्ली तरी ती पचते.
७)स्त्रियांच्या कुडलीत
अष्टमातील मंगळ वैधव्य योग दर्शवतो. हा मंगळ राहु किंवा
शनिच्या अशुभयोगात असेल तर ऐन तारुण्यातच वैधव्य येते. येथील मंगळ प्रसूतीच्यावेळी सिझेरियन शस्त्रक्रिया,
रक्तपात किंवा गर्भपात दर्शवतो. आर्तवाचा त्रास, कंबर दुखणे, सांधेदुखी इ. त्रासदेखील होतो. या स्त्रिया भांडखोर वृत्तीच्या व असमाधानी असतात. यांच्याशी कितीही सामोपचाराने घेण्याचा प्रयत्न केला तरी भांडण टाळणे अशक्य
असते.
८)अष्टमातील मंगळ अपमृत्यूचा योग आणतो. एखादे मृत्युतुल्य दुखणे मध्यम वयात येते. येथील मकरेचा मंगळ, शनी
बलवान असता निकोप शरीरयष्टी व दीर्घायुष्य देतो. हा
मोरारजीभाईंच्या पत्रिकेतील अनुभव आहे.या स्थानाचा मंगळ लोक दीर्घकाळ चर्चा करतील असा मृत्यू देतो. हा मंगळ दशमेश असता मृत्युमुळे लौकिक वाढतो.
९). हा
भावंडांचे सुख देत नाही. किंवा त्यांच्याशी पटत नाही. त्यांना स्वतंत्र राहाणे जास्त फायदेशीर असते. |
१०)सासरी दारिद्रय किंवा उधळी पत्नी हा मंगळ दर्शवितो. हा शुभ असेल तर जमीनजुमला असलेला सासरा मिळतो. पण याला त्याचा काही उपयोग नसतो.
११)यांना गुह्यरोग होतात. अंडवृद्धी,
विषमज्वर, मूळव्याध
वा रक्त पडणे हे विकार हा मंगळ दर्शवितो. गुप्तजागी मार लागतो. अतिकामवासनेमुळे वीर्यक्षय, अनैसर्गिक
लैंगिक समाधान,लैंगिक विकृती, संभोगात त्रास इत्यादी गोष्टी आढळतात. यांच्या
डोळ्यात तेज नसते. चष्मा
येऊ शकतो.
.
नवम स्थानात मंगळ
1) नवमातील मंगळ पराक्रम, स्वकर्तृत्व, कीति, भाग्य दर्शवितो.
व्यक्ति स्वकष्टाने भाग्य मिळविते.
नवमातील मंगळ व्यक्तीला बुद्धिमान
करतो. मात्र मेहनतीच्या मानाने पदरात फळ पडत नाही हे लोक धर्माच्या बाबतीत कट्टर असतात. सर्पाप्रमाणेडूख धरण्याची वृत्ती असते.
२)येथे मंगळ असलेल्या व्यक्ती नको इतक्या स्पष्टवक्त्या
असतात. स्वतंत्र विचार असतात. यांच्यावर कोणी हकूमत किवा अधिकार गाजवलेला यां ना आवडत नाही.
त्यामुळे नोकरीत यांचे वरिष्ठाशी पटत नाही,
Job Satisfaction लाभत नाही.
३) असा मंगळ पापग्रहयुक्त असता व तृतीयात पापग्रह असता
प्रवासात अपघात होतात.
४) प्रथम पंचम स्थानात गुरु-बुध असता असा मंगळ यांत्रिक,
तांत्रिक ज्ञान उत्कृष्ट दर्शवितो. अशा मंगळात
अत्यंत शक्ति असते. मर्दानी खेळ यांत्रिक उद्योगधंदे,
वैद्यकीय व्यवसायात प्रगति होते.
५) पापग्रहयुक्त असता बायकोच्या माहेरच्या लोकांकडून त्रास
होतो.
६) हा मंगळ शक्ति उपासना, मारुती, शनि-उपासना व गणपतीउपासनेस चांगला असतो.
७)सर्वसाधारणपणे २८व्या वर्षी हा मंगळ भाग्योदय करतो.
८)हा मंगळ स्वैराचाराला उत्तेजन देणारा आहे यामुळे अनेक
संबंध येतात.
दशम स्थानात मंगळ
1) दशमातील मंगळ गुरु, हर्षल, शनि वगैरे मोठे ग्रह हे अत्यंत महत्त्वाचे असतात. व्यक्तीचे
जीवन ठरविण्यात याचा मोठा भाग असतो.
2) मंगळ अति उच्च प्रकारची कार्यशक्ति,
अधिभौतिक महत्त्वाकांक्षा देतो. व्यक्ति सतत
वरचा दर्जा मिळविण्यासाठी धडपडत असते. हा मंगळ जास्त झुंझार आहे,
हुकुमशाहीवृत्तीचा आहे. हया मंगळात असाधारण
तडफ, धैर्य आहे.
कोणतेही कार्य अत्यंत द्रुत गतीने परिस्थितीवर मात करून,
ईष्येने, करण्याची ताकद हयात आहे.
3) ह्या मंगळात संघर्ष आहे. नोकरी व्यवसायात हा
वारंवार बदल करतो. परिस्थितीशी संघर्ष उत्पन्न करतो,
वरिष्ठांशी जमत नाही.
4) दशमातील मंगळ साहसी आहे. हा मंगळ अधिकार योग,
मिलिटरी खाते, पोलीस खाते. इन्स्पेक्टर सर्जन सेल्समन,
केमिस्ट असे व्यवसाय दाखवितो.
5) दशमातील मंगळ जीवनात काही काळ भाग्य चांगले देतो. परिस्थिती
आवाक्यात असते, हा मंगळ पंचमात,
लग्नात, नवमात गुरु असता अत्यंत भाग्यकारक होतो.
6) या मंगळाबरोबर
हर्षल-शनि जीवनात ठणठणीत खाली ओढणारे आहेत. हे योग व्यक्तीला अहमन्य, अविचारी
बनवतात.
7) दशमातील मंगळ असता वडिलांशी पटत नाही. मं. ने. मं. ह.
व्यवसाय, नोकरीत
अनपेक्षित बदल दाखवतात. केन्द्र कोणातील मंगळ हा विविष्ट योग असतो. प्रत्येक
लग्नाला वेगळी फले देतो.
८)दशम स्थानातील मंगळ धंद्यात
प्रगती करतो. हे लोक हरहुन्नरी असता त. स्वपराक्रमाने हे लोक पुढे येतात. घराण्याचे नाव उज्ज्वल करतात. हा मंगळ उच्च प्रतीचा आत्मविश्वास, महत्त्वाकांक्षा व अधिकारी वृत्ती दर्शवितो. शनि मंगळ वरच्या दर्जावरून खाली आणतात. सरकारी नोकरीत असलेल्यांनी सावध राहणे आवश्यक आहे.
९)दशमातील मंगळ पोलीस,
सैन्य दल, प्रशासक, शल्यचिकित्सक इ. क्षेत्रात प्रगती दर्शवतो. लोक आपल्याबद्दल काय बोलतात याचा हे लोक फारसा विचार करीत
नाहीत. नोकरीत अधिकार प्राप्त होतो. बापापेक्षा मुलगा वरच्या श्रेणीचे जीवन जगतो.
१०)या स्थानाचा दूषित मंगळ मात्र फारच वाईट. उतावळेपणा
व अतिरेक यामुळे हंसे व नुकसान होते. अपकीर्ती
व बेअब्रूचे प्रसंग येतात. कुलंगडी चव्हाट्यावर येतात. खुनी,
दरोडेखोर, दादा
लोक यांच्या कुंडल्यात असा मंगळ असतो. व्यसनाधीनता, व्यभिचार,
जुगारी वृत्ती यांच्या हाडीमासी खिळलेली असते.
११)भांडखोरपणा, स्वैर
वृत्ती, लहरीपणा,
अरेरावीपणा, औद्धत्य,
शिवराळपणा, खर्चिकपणा,
विध्वंसक वृत्ती, दुराग्रह यामुळे नुकसान व दिवाळे वाजते.
१२) उच्च
जागेवरून पदच्यूत होतात. अपघात,
खून, विषप्रयोग
यांची भीती असते. यांच्या
वर्तनाची जाहीर चर्चा होते. लोकक्षोभास तोंड द्यावे लागते.
१३)स्त्रियांच्या कुंडलीत दशमात
मंगळ असेल तर त्या अतिशय कर्तृत्ववान असतात. बहुधा यांचा विवाह घरातील ज्येष्ठ पुत्राशी होतो. त्यामुळे किंवा अन्यथाही विवाहानंतर सासरी अधिकार प्राप्त
होतो. कार्यालयात
व कुटंबात सर्वांनाच यांच्याविषयी एक प्रकारची आदरयुक्त भीती वाटत असते. यांच्याकडे उच्चप्रतीचा आत्मविश्वास,
उत्तम निर्णयक्षमता त ओतलेले खंबीरपणे
राबविण्याचे सामर्थ्य असते, त्यामुळे त्यांचा संसार सुखाचा होतो.
एकादश स्थानात मंगळ
1) हया स्थानातील मंगळ हा संततीस अपायकारक असतो. संततीसौख्यात बाधा निर्माण करतो
2) अशा व्यक्तींना पैसा मिळविण्यास फार प्रयत्न करावे लागतात.
पैसा मिळविण्याची प्रबळ इच्छा असते. सतत खटपट करून ते यश मिळवितात. अशा व्यक्तींचे
सहसा कोणाशी पटत नाही.
3) मंश, मने, मह,
वगैरे पापग्रह कानाची दुखणी दाखवितो.
4) मंगु योग सांपत्तिक दर्जा खाली ओढतो. मंशु सांपत्तिक दर्जा
चांगला ठेवतो. स्त्रीसहवासाची ओढ असते.
५)लाभ स्थानात मंगळ असल्यास
मित्र चांगले मिळत नाहीत. वाईट संगतीमुळे व्यसने लागतात. हा मंगळ खर्चीक वृत्ती देतो. पैसा शिलुक टाकता येत नाही. या लोकांनी कोणाला जामीन राहु नये. येथे मंगळ असलेल्या अधिका-याने लाच खाल्ली असता पचत नाही, उघडकीला येते. डॉक्टरांच्या कुंडलीत येथे मंगळ असता उत्तम सर्जन होतात किंवा उत्तम प्रसूतितज्ज्ञ होतात.
६)स्त्रियांच्या कुंडलीत या
स्थानी मंगळ असणे त्यांच्या चारित्र्याच्या दृष्टीने वाईट असते. अशा स्त्रियांची पुरुषांशी मैत्री
जास्त असते. पैसा मिळाल्याशिवाय प्रतिष्ठा मिळणार नाही,
अशी त्यांची ठाम समजूत असते व त्यामळे त्या
असमाधानी आढळतात. अशा स्त्रियांच्या कुंडलीत कर्क-कन्या किंवा
वृश्चिकेचा शुक्र असेल, तर पैसा मिळवण्यासाठी त्या व्यभिचारील करावयास मागे-पुढे पाहत नाहीत.
द्वादश स्थानात मंगळ
1) हा मंगळ सप्तमस्थानाच्या दृष्टीने अशुभ असतो.
पापग्रहाबरोबर असता स्त्रियांवरून मारामारीचे प्रसंग,
गैरसमजुती, बंधनयोग दाखवतो.
2) पापग्रहयुक्त मंगळ, सामदायिक गोष्टीवरून मारामाच्या,
समुदायाकडून दुखापत देतो,
3) मं. श. असता बंधनयोग, टायफाईड, विचित्र
आजार, द्विभार्या योग,
कर्जबाजारीपणा,
दिवाळे वाजवतो.
4) मं. ब.-त्वचा रोग, मेंदूविकार, फीट्स दाखवितो,
5) षष्टस्थानाच्या दृष्टीने हा मंगळ अत्यंत वाईट असतो,
पापग्रहयुक्तमंगळ दृष्टिदोष,
तिरळे पाहणे, डाव्या डोळ्यास अंधत्व, शारीरिक व्यंग दाखवतो.
6) मंगळ- राहू चुलत्याचे अपघाती मरण दाखवितात.
7) तुतीयांत पापग्रह असतो प्रवासात मोठे अपघात होतात. हया
स्थानातील गुरुयुक्त, पापग्रहयुक्त मंगळ फक्त कन्यासंतति राखवतो.
८)व्ययस्थानातील मंगळ
शीघ्रकोपी वृत्ती देतो. विचार न करता तडकाफडकी बोलणे, खर्चीक वृत्ती कोणतीही गोष्ट फायदा- नुकसानीचा विचार न करता आततायीपणाने
करणे, असा स्वभाव आढळतो.
येथील मंगळ विषयवासना जास्त
देतो. त्यामुळे विवाहबाह्य संबंध, गुप्त रोग होतात. या व्यक्ती बेसुमार खर्च करणा-या असतात. किंबहुना
नजीकच्या भविष्यात पैसे मिळणार, अशी खात्री वाटली तर तेवढे पैसे आधीच खर्च
करुन मोकळे होतात.
९)हा मंगळ शनि किंवा राहुच्या युतीत असता बंधन योग
होतो.
१०)येथील मंगळ पती-पत्नींना रात्रीचे भांडावयास लावतो. यांच्या अंगावर नेहमी कर्ज असते. येथे मंगळ असून
सप्तमात शनि, राह, हर्षल यांपैकी
पापग्रह असतील तर वैवाहिक सौख्य बिघडते. उतारवयात अपचनाचा त्रास होतो.
११)स्त्रियांच्या कुंडलीत या
स्थानी मंगळ असता बहुधा दृष्टिदोष असतो. या स्त्रिया मानसिकदृष्ट्या दुर्बल असतात. संतती सौख्यात
हा मंगळ बाधा आणतो.
१३)हे नेत्ररोगी असतात. डोळ्यांवर
शस्त्रक्रिया करण्याची वेळ येते. बारावे स्थान डावा डोळा दर्शविते. हा
डोळा निकामी होऊ शकतो. हा मंगळ शस्त्राचे व अपघाताचे भय दर्शवितो. भाजून
वा खून होऊन वा फाशी होऊन मृत्यू होतो. मोटार, रेल्वे
वा विमान अपघातात मृत्यू येतो. क्रांतिकारकांच्या वा खुनी लोकांच्या पत्रिकेत येथे मंगळ असतो. सत्ताधा-यांना गुंडांचा त्रास होतो. सेनानी
अखेरचे युद्ध हरतात. वेश्यागमनाची संवय असते. लोकापवादास तोंड द्यावे लागते. तुरुंगवास भोगावा लागतो. अविचारीपणामुळे,
शत्रूच्या विश्वासघाताने नुकसान होते. हिंस्र
श्वापदांपासून, चोर-दरोडेखोरांपासून जीवाला भय असते. चोरांमुळे धननाशही होतो. हाताखालचा
नोकरवर्ग चोया करतो. ते
अप्रामाणिक असतात. गुप्तशत्र फार बलवान असतात. यांना उष्णतेच्या विकारांचा त्रास होतो. वैवाहिक
जोडीदारास मारक ठरतो. गुन्हेगारी
प्रवृत्तीमुळे सरकारच्या काळ्या यादीत हे लोक असतात.
१४)भावंडांच्या
दृष्टीने हा ग्रह सौख्य नष्ट करणारा आहे. एखादे
भावंड अपंग असून त्याची जबाबदारी पडते. काही वेळेला भावंड दुष्ट स्वभावाचे निघून याची काहीशी अपकीर्ती होते. एकंदरीत हा मंगळ शुभ फले फार कमी देतो.
No comments:
Post a Comment