Monday, 6 April 2020

मिथुन लग्न / मिथुन रास (Gemini Ascendent / Moon in Gemini)


मिथुन लग्न / मिथुन रास

ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करतानाव्यक्तीची जन्मकुंडली महत्त्वाची मानली जातेव्यक्तीची जन्मतारीख - जन्मवेळ आणि जन्मठिकाण या तीन गोष्टी अचूक असतील तर, पंचागांच्या आधारे त्याची जन्म कुंडली मांडली जाते. जन्म क्षणी पूर्वक्षितिजावर जी रास उदित असते तिला 'लग्नरासअसे म्हटले जाते. त्या स्थानापासून सुरुवात करून, बारा स्थानांमध्ये बारा राशीची विभागणी केली जाते. नंतर ज्या राशीत जे ग्रह असतील ते मांडले जातात व 'जन्मलग्नकुंडलीतयार होते. कुंडलीत असलेली ग्रहस्थितीस्थाने आणि स्थानगत राशी यांचा एकत्रित अभ्यास म्हणजे कुंडलीचा  अभ्यास  होय.  कुंडलीतील बारा स्थाने  व त्यावरून पाहावायच्या प्रमूख गोष्टींचा तक्ता खालीलप्रमाणे :--


 जन्मकुंडलीमध्ये लग्नस्थान हे अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. या स्थानावरून स्वरूपशरीराची ठेवणस्वभावप्रकृतीप्रवृत्तीजातत्वचाआरोग्य व रोगप्रतिकार शक्तीव्यक्तिमत्त्वचारित्र्य,जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनआयुष्याचा प्रारंभ व एकंदरीत आयुष्य कशा प्रकारचे असेल याचा विचार करतात. त्यामुळे जन्मलग्नी उदित असलेली राशी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. या राशीचा अधिपती बहुतेक कुंडल्यांत त्या कुंडलीवर वर्चस्व गाजवतो. त्याच्या शुभाशुभ स्थितीनुसार आयुष्यात सुखदुःखे अनुभवास येतात जातकाच्या एकंदर व्यक्तिमत्त्वाचा विचार या स्थानावरून केला जातो. या स्थानातील राशी व ग्रह यांचा जातकाच्याव्यक्तिमत्त्वावर जोरदार परिणाम होत असतो.

मिथुन लग्न 
    जन्मकुंडलीमध्ये प्रथमस्थानात मिथुन (३) रास असता अथवा व्यक्तीची जन्मरास 
 (चंद्र मिथुन राशीत असता)  मिथुन असता,  अथवा  रवी  मिथुन  राशीत असताजातकाच्या व्यक्तिमत्त्वाविषयी तसेच आयुष्याबाबत सर्वसामान्यत पुढील गॊष्टी आढळून  येतात:--


१) मिथुन ही राशिचक्रातील तिसरी रास असून या राशीचा स्वामी 'बुध' हा वाणीचा कारक ग्रह आहे.    ही वायुतत्त्वाची रास असून, द्विस्वभाव राशी आहे. पुरुष तत्त्वाची राशी असून हिचा अंमल          शरीरातील छातीवर असतो.या राशीचे पुरुष दिसावयास देखणे असतात. भरपूर कुरळे केस, पांढऱ्या    शुभ्र दंतपंक्ती आणि हसतमुख चेहरा हे त्यांचे वैशिष्टय असते. दिसावयास नाजूक, असतात.        चंचलचपळ असतात

२) मिथुन राशीचे जातक अतिशय चौकस आणि बुद्धिमान असतात. बौद्धिक क्षेत्रात नाव कमावणारे   आणि बुद्धिजीवी असतात. व्यापारी वृत्तीचे असतात. सगळे व्यवहार व्यवस्थित करतात. या व्यक्ती   उद्योगी, कुशाग्रबुद्धीच्या, योजक व आकर्षक व्यक्तिमत्त्वाच्या असतात. या काहीशा   लहानसरठेंगण्या व पुष्ट शरीराच्या असतात.

३) मिथुन राशीचे जातक शिक्षणप्रेमी असून लेखन, प्रकाशनाच्या व्यवसायात पुढे येतात. व्यापारातही या व्यक्ती चमकतात. जीवनाचा प्रत्येक क्षण या उपयोगात आणतात; परंतु तरीही त्यांचे अपेक्षित ध्येय त्या गाठू शकत नाहीत. लिखाणवाचन,प्रवासहास्यविनोद यांची आवड असते मंजूळ व प्रिय भाषण करणारे असतात. कोणतीही गोष्ट गुप्त ठेवणे यांना जमत नाही.या काही वेळा चंचलचिडखोर आणि उधळ्याही आढळतात!

४) मिथन राशीचे जातक एका जागी बराच वेळ बसलेले आढळत नाहीत. सतत बदल हे यांचे वैशिष्टय आहे. जीवनात बदल नसेल तर यांना जीवन नीरस वाटते. असे असले तरी अंगमेहनतीची कामे करण्यापेक्षा बद्धी आणि वाणी यांचा संबंध असणारी कामे यांना जास्त भावतात. यांच्याकले शब्द प्रभुत्व असते. त्यामुळे हे उत्तम वक्ते असतात . आपले म्हणणे दसऱ्याला पटवून देण्याची यांची हातोटी विलक्षण असते त्यामळे सल्लागार मार्गदर्शक या क्षेत्रात यांना यश मिळते.

५) प्रेमळ, न्यायी असून समोर येणाऱ्या बिकट परिस्थितीला हसतमुखाने सामोरे जातात. हसत   बोलण्याची यांना सवय असते ही माणसे कधीही दुर्मुखलेल्या चेहऱ्याने बसलेली दिसत   नाहीत.उत्साहाचा खळखळता झरा म्हणजे मिथुन रास होय ही माणसे कुठेही गेली तरी तेथील वातावरण क्षणात प्रसन्न करुन टाकतात.

६) यांचा स्वभाव विलक्षण बोलका असतो. गप्पा मारणे,कोट्या करणे, विनोद सांगणे यांना मनापासून आवडते.आळशीपणे, निवांतपणे काम करणे याचा यांना मनापासून तिटकारा असतो . झटपट काम करणे, स्वच्छ, व्यवस्थित, टापटीप राहणे यांना आवडते. इतरांच्या मदतीला तत्परतेने धावून जाणे हा यांचा स्थायीभाव असतो उच्च कुळातील आणि श्रीमंत व्यक्ती यांच्यामध्ये वावरणे यांना आवडते हिशोब करणे, आकडेमोड करणे हे यांचे क्षेत्र असल्याने अशा व्यवसायात मनापासून लक्ष घातले तर यांना नक्की यश मिळते.

७) प्रसंगावधान,उत्कृष्ट स्मरणशक्ती, विविध संदर्भ देत मत व्यक्त करणे, समयसूचकता, बोलकेपणा हे यांचे गुण असतात.तर्कद्रुष्टया विचार करुन निर्णय घेणे यांना आवडते. प्रसिद्धीचीयांना आस असते.

८) स्वभाव बोलका, वाचाळ, विनोदी, चतुर, चंचल, अष्टपैलू असतो. या व्यक्ती विद्वान व विद्याव्यासंगी असतात. आकलनशक्ती व स्मरणशक्ती चांगली. सर्व प्रकारच्या बौद्धिक कार्यात मती चालते. मिथुनेसारख्या वायुराशीच्या अंमलाखाली आल्याने अतिशय यशस्वी व्यापारी होतात.

९) मिथुन रास ही बुधाची रास असल्याने ही माणसे बोलघेवडी असतात ज्या व्यवसायात बोलण्याचा संबंध अधिक येतो. जसे सेल्समन, मार्केटिंग क्षेत्र, पुराणिक, कीर्तनकार या क्षेत्रात यश मिळते.

१०) मिथुन रास ही प्रवासाची कारक आहे त्यामुळे दळणवळण खाते जसे रेल्वे, विमान, प्रवासी   वाहतूक, गुप्तहेर या क्षेत्राला चांगले असते.कारकून,आकर्षक बोलण्याच्या कोणत्याही व्यवसायात मिथुन व्यक्ती लवकर पुढे येते. अशा व्यक्ती उत्तम वकीलप्राध्यापकवक्ताइन्कमटॅक्ससेल्सटॅक्स कन्सल्टंट. व्यापारीज्या व्यवसायात लोकांशी बोलावे लागतेसौदे पटवावे लागतात असे व्यापारी एजंटकमिशन बेसिसवरील व्यापारीइन्स्ट्रक्टर्सरेडिओ कलाकारवृत्तपत्र संपादकबातमीदार इत्यादी मिथुनेवर जन्माला येतात. 


११) मिथुन ही बौद्धिक संवाद करणारी राशी आहे. बुधाच्या बुद्धीच्या प्रसन्न व चिकित्सक अशा ज्या दोन बाजू आहेत, त्यातील प्रसन्नतेची, मनोरंजकतेची बाजू मिथुनेत आढळते.थोडक्यातमिथुन रास ही बुदिधजीवी रास आहे.नोकरदारव्यापारी या राशीच्या अंमलाखाली येत असल्याने मध्यमवर्गीयप्रतिष्ठितपांढरपेशा वर्गाचे प्रतिनिधीत्व करते. बँकेत काम करणारी माणसेछोटे-छोटे व्यापारी या राशीच्या अंमलाखाली येतात.

१२) मिथुनेच्या व्यक्ती वृषभेप्रमाणेच सुंदर किंवा सुदृढ नसल्या तरी बुद्धिमत्तेमुळे फारच आकर्षक दिसतात. त्यांची ग्रहणशीलता, स्मरणशक्ती, तर्कशक्ती, आकलनशक्ती, हजरजबाजीपणा,तरतरीतपणा, अवखळपणा, मनोरंजक संवाद करण्याचे कौशल्य यामुळे अशा व्यक्ती लोकप्रिय होतात. कोणताही विषय या व्यक्तींना लवकर समजतो व मांडता येतो. लोकांवर वजन चांगले पडते. स्वभावातील बालिशपणामुळे आणि बौद्धिक शक्तीमुळे या व्यक्ती आपली कामे दुसऱ्याकडून कौशल्याने करून घेतात.

१३) बुध हा विचारांचे प्रकट स्वरूप दर्शवितो. व हे स्वरूप बोलणे व लिखाण यातूनच व्यक्त होत असते. मिथुनेची व्यक्ती जशी उत्तम ओघवत्या वाणीने दुसऱ्या व्यक्तीला जिंकून घेते.तशीच उत्तम लिहूही शकते. किंबहुना लालित्यपूर्ण किंवा हलके फुलके विषय हाताळणारे वक्ते व लेखक मिथुनेतच जास्त सापडतात.
  
१४) वैचित्र्य व बदल ही याच राशीची फार मोठी भूक असते. प्रत्येक गोष्ट बौद्धिक दृष्टिकोनातून त्यांना पटावी लागते. मात्र अशी पटलेली गोष्ट मिथूनेची व्यक्ती स्वत:च्या आकलन शक्तीमुळे, स्मरणशक्तीमुळे, दुसऱ्याला अधिक पटवू शकते. बुधाच्या या बुद्धिमान राशीत बुद्धिमत्ता असली तरी विवेक असतोच असे मात्र नाही.

१५) मिथुनेच्या व्यक्तीला बुद्धिमान व्यक्तीचा सहवास सर्वत्र लाभावा लागतो. तरच तीरमते.मिथुनेच्या व्यक्तीला निर्बुद्ध जोडीदार मिळाल्यास तिच्या वैवाहिक जीवनाची दारूण शोकांतिका होते. अशा व्यक्तीला बौद्धिक प्रतिसाद देणारी अवखळविनोदी वृत्तीची, फार गंभीर नसलेली, बोलकी जोडीदारीणच मिळाल्यास विवाहसुख मिळू शकते. मात्र अशी बौद्धिक भूक न भागल्यास व्यक्तीच्या वृत्तीवर फार परिणाम होऊन मज्जासंस्थेचे विकार, लहरीपणा, इत्यादी अनुभवास येतात.

१६) मिथुन या राशीच्या स्त्रिया फारच लोभस आकर्षक वाटतात, वृत्तीत उत्साह व उल्हास ओसंडून जात असतो. हसतमुख चेहरा, खोडकरपणा, सतत बोलणे, अवखळपणा, एका जागी स्वस्थ न बसणे,  बौद्धिक संवाद, शिडशिडीत बांधा, वातावरणातील जडपणा कमी करून ते आनंदी बनविणे या सर्वांमुळे मिथुनेची स्त्री चिरतरुण वाटते. बुद्धिमत्तेच्या बाबतीतही बोलण्याचे व्यवसाय, रिसेप्शनिस्ट, टेलिफोन ऑपरेटर, खाजगी चिटणीस या कामास  ती फारच अनुकूल असते.

१७) मिथुन राशीमध्ये हे गुण असले तरी काही अवगुणअसतात ते येथे स्पष्ट करुन सांगतो. ही माणसं फार गपिष्ट असतात त्यामळे गप्पा मारण्यात यांचा फार वेळ दवडला जातो .स्वत:बद्दलच बोलत राहणे, स्वत:चीच जाहिरात करणे आणि त्यातून दुसऱ्याला तुच्छ लेखणे हे घडण्याची शक्यता असते. तसेच प्रसंग, काळ वेळ आणि समोरच्या माणसाची मानसिक स्थिती यांचा विचार न करता ही माणसे बोलतात. बऱ्याच वेळा हास्यविनोद करतात. त्यामुळे माणसे दुखावली जातात आणि यांच्यावर संकट कोसळते.

१८) गांभीर्याचा यांच्याकडे अभाव असतो. बुद्धिमत्ता असली तरी अनेक वर्षे साधना, कष्ट करुन एखादया विषयाचे संशोधन करणे, ज्ञानग्रहण करणे यांना जमत नाही. त्यामुळे अनेक विषयांची थोडी- थोडी माहिती असते पण एकाच विषयाचा सखोल माहितीचा अभाव आढळतो. त्यातून मला प्रत्येक विषयातले कळते, हा भाव येऊन थोड्याश्या माहितीच्या आधारे पोरकटपणे मत प्रर्दशन केले जाते तर कधी-कधी थापा मारण्याकडे कल होतो.

१९) निर्णय घेण्यात गोंधळ होतो एका निर्णयावर ठाम राहात नाहीत. दोन्ही पक्षाकडून बोलतात. तसेच स्वत: एक सांगतात पण वागणे मात्र दुसरेच असते.उक्तीत आणि कृतीमध्ये एकवाक्यता नसते.

२०) कधी पुरुषाप्रमाणे कडक, शिस्तप्रिय वागतात तर कधी स्त्रीप्रमाणे कोमल, भावनाप्रधान वागतात. त्यामळे यांच्यावर विश्वास ठेवणे अशक्य बसते. व्यवसायात देखील यांचे मन स्थिर होत नाही. आयुष्यात बदलाची ओढ असल्याने वेगवेगळे व्यवसाय बदलत राहतात

२१) थोडक्यात कमी बोलणे, निर्णयावर ठाम राहणे, मनाची अस्थिरता कमी करणे आणि कृती-उक्ती समान असणे ह्या गोष्टींकर मिथुन राशीने लक्ष देणे आवश्यक आहे.

 २२) प्रकृती स्वास्थ्य:- सर्दी, ब्राँकायटीस, टी. बी., इन्फ्ल्युएंझा, फुफ्फुस व श्वासाचे रोग, धापलागणे, छातीत जंतुसंसर्ग होणे यासारख्या आजाराचा त्रास होतो उन्माद, चित्तभ्रम, हाडे निखळणे (विशेषतः हातांची) मज्जातंतूचे आजार, हाडातल्या वेदना हे त्रास संभवतात वाणीत (बोलण्यात) दोष, तोतरेपणा, मुकेपणा, एखादा शब्द नीट न उच्चारता येणे, स्पर्शजन्य विकार, त्वचेचे विकार याचा त्रास संभवतो.
या माणसांनी संसर्गापासून आणि संपर्कापासून होणारे विकार टाळावेत.


२३) आयुष्यात बरेच चढ-उतार येतात. सर्वसाधारण जीवन जगणारे असतात. बऱ्याचदा स्त्री-लंपटपणामुळे स्त्रीमुळे बदनाम होण्याचा योग असतो. त्यापासून दूर राहावे मानसिक अस्थिरतेमुळे व्यसन लागण्याचा धोका असतो. व्यसनापासून दूर राहावे. 

२४) प्रेम विवाहात अपयश येते. परंतु वैवाहिकसौख्य चांगले मिळते. विवाहानंतर आयष्याला स्थिरता येते. संततीमध्ये कन्या संतती अधिक असते.संततीशी (विशेषतः पुत्राशी) फारसे पटत नाही 

२५) हिशोबीपणा आणि व्यापारी वृत्ती असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित व्यवसायात चांगले यश मिळते. हास्यविनोद करणे, कोपरखळया मारणे, कोटया करणे यामुळे वातावरणातले गांभीर्य सहजतेने कमी करतात लोकांवर यांची खूप छाप पडते. मित्र परिवार मोठा असतो

२६) स्त्रियांनाही ही रास अनुकूल असते. या राशीच्या स्त्रिया उत्तम गृहिणी असतात कामसूपणा, टापटीप, स्वच्छता या सांसारिक जबाबदाऱ्या त्या उत्तम पार पाडतात. प्रकृती जरा नाजूक असल्याने शारीरिक श्रम फार पेलवत नाहीत पण सतत कामात मग्न राहण्याचा स्वभाव असल्याने संसाराची घडी उत्तम बसवतात.  नोकरी करुन कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यात आघाडीवर असतात महागडया वस्तू, फर्निचर, शॉपिंग, उंची वस्त्रे यांचा हव्यास नसतो  हिशोबीपणा असल्याने घराचे आर्थिक गणित कोलमडू देत नाहीत. आनंदी, उत्साही, बोलके असल्याने कुटुंबातील वातावरण हलके-फुलके आणि प्रसन्न असते. फक्त भावनिक दृष्टया आधार देणे,कोणतीही जबाबदारी अंगावर घेऊन कर्तेपणाने ती एकटयाने पार पाडणे यांना जमणे कठीण असते.              

  
२७) शुभ रंग:- मिथुन राशीच्या जातकांना हिरवा रंग व त्या व्यतिरिक काळा, गुलाबी आणि लाल हे रंग शुभ असतात. या लोकांनी बुधवारी हिरव्या रंगाचे कपडे वापरावेत. निदान हिरवा हातरुमाल तर जवळ बाळगावा.  हिरव्या रंगाचे पाणी ग्लासात भरुन सतत घरात ठेवावे. पिण्याच्या पाण्याचा माठ हिरव्या रंगाचा असावा.

२८) अशुभ रंग:- मिथुन राशीच्या लोकांना पांढरा रंग अशुभ असतो त्यानी पांढऱ्या रंगाचे कपडे वापरु नयेत. चांदीची आभुषणे वापरू नयेत दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा व्यापार करु नये, यश मिळणार नाही.  

२९) शुभ वार:- बुधवार हा शुभ वार आहे.

३०) अशुभ वार:- सोमवार आणि शनिवार हे अशुभ वार आहेत.

३१) अशुभ तारखा:- २,११,२०,२९ या तारखा मिथुन राशीसाठी अशुभ ठरतात.

३२) उपास्य देवता:-  गणपती, शिव आणि सरस्वती या उपास्य देवता आहेत यांची उपासना करावी.

३३)  भाग्यरत्न:- पाचू हे रत्न सोन्यात करंगळी शेजारील बोटात किंवा करंगळीत वापरावे बुधवारी वापरण्यास सुरुवात केली तर उत्तम ही रत्ने सिद्ध करुन वापरावीत.  

 ३४) जन्मकुंडलीमध्ये प्रथमस्थानात  मिथुन रास असताधनस्थानी कर्क रास येत असल्याने, --पैसा चांगला मिळतो. स्त्रीवर्गाकडून विशेषतःविवाहित स्त्रियांकडून अर्थलाभ होतात. यांचे मन इस्टेटीत व पैशात गुंतलेले असते. स्वतःच्या अक्कलहुशारीने हे खूप पैसा जमवतात. वाहनांपासून, प्रवाही पदार्थापासून फायदे होतात. यांना आर्थिक चढउतारही खूप पाहावे लागतात.जलराशी असल्याने यांना पेय पदार्थांची आवड असते. त्याचप्रमाणे फळफळावळ, मासे खाणे यांना आवडते. स्त्रियांबरोबर गप्पा मारणे यांना पसंत असते. ही राशी पापग्रहयुक्त असता तोंड सारखे काही ना काही चघळत असते. पान खाणे,सिगरेट-विडी ओढणे वा शेंगदाणे-चॉकलेट-चुइंगम चघळणे चालू असते.चघळणे थांबले की तोंडपट्टा चालू असतो. तोंडाला स्थैर्य ठाऊक नसते.यांचा आवाज कर्णमधुर असतो.धनेश चंद्र असता एकाद्या  विवाहित स्त्रीबरोबर गुप्त प्रेमसंबंध राहून संततीराहाते व त्यांच्यासाठी आर्थिक बोजा सोसावा लागतो.

३५) जन्मकुंडलीमध्ये प्रथमस्थानात  मिथुन रास असतातृतीयस्थानी सिंह राशी येत असल्याने -- हे लोक पराक्रमी असतात. यांच्या पाठीवर भाऊ असतो. रवी दूषित असल्यास भावंड जगत नाही. वरिष्ठ लोकांमध्ये यांचे मित्र असतात. हे लोक महत्त्वाकांक्षी व मानी असतात. यांच्या हातून महत्त्वाची कार्ये घडतात. लेखकास फार मोठ्या स्वरूपाची प्रसिद्धीमिळते. त्यांचा सरकारी सन्मान होतो. वडिलांच्या कॉपीराइटचा यांना फायदा होतो. यांचा प्रवासही खूप होतो. प्रवासवर्णने, राजकीय महत्त्वाच्या व्यक्तींची चरित्रे लिहिणे, महत्पदावरील सरकारी अधिकाऱ्यांच्या ओळखीअसणे, प्रवासामध्ये अशा ओळखी होणे व त्यामुळे प्रवास सुलभ व राजशाही थाटात होणे या गोष्टी तृतीयात सिंह राशी असता अनुभवास येतात. यांच्या आवडी निवडी खूप असतात. इतरांनी यांना मान द्यावा अशी इच्छा हे बाळगतात. रवी बलवान् असल्यास त्यांना असा मान मिळतोही. यांना शेजार मोठ्या अधिकाऱ्यांचा लाभतो. सिंहेत पापग्रह असता वा रवी दूषित असता वरील कोणतेही फल अनुभवास येणार नाही.   
   
३६) जन्मकुंडलीमध्ये प्रथमस्थानात  मिथुन रास असता चतुर्थस्थानी कन्या येत असल्याने -- व्यापारधंदा करणाऱ्या वा डॉक्टरांच्या घरात जन्म होतो. यांचे घर म्हणजे धंद्याचे ठिकाणच वाटावे अशी धंदेवाईक लोकांची वर्दळ असते. आपले घर नीटनीटके ठेवतात व मनाप्रमाणे सजवतात.यांची एकापेक्षा अधिक घरेही असू शकतात. घरामध्ये खूप व्यक्ती असतात.घराणे सुसंस्कृत, सुशिक्षित व व्यापारी वृत्तीचे असते. आई चतुर व व्यवहारी असते. हे लोक मातृभक्त असतात. यांचे शिक्षण चांगले होते. हे वारंवार राहाते ठिकाण बदलण्याची इच्छा करतात.कन्या रास दूषित असता मातेशी पटत नाही. स्वभावात दोष निर्माण होतात. संगत चांगली नसते. प्रत्येक ठिकाणी कमिशन काढण्याची वृत्ती असते. खोट्या मार्गात बुद्धी चालते. राहायला घर मिळत नाही. घरामध्ये मनाविरुद्ध दिवस काढावे लागतात. मन अतिशय चंचल असते. आताचा विचार क्षणात बदलतात. बुध बिघडल्यास असंबद्ध विचार, स्मृतिभ्रंश, मानसिक दुर्बलता येते.

३७) जन्मकुंडलीमध्ये प्रथमस्थानात  मिथुन रास असता पंचमात तूळ रास येत असल्याने ----संतती देखणी असते. यांना मुली जास्त होतात.परंतु पुरुषग्रह असता पुत्रसंततीही होते. शुक्र शुभसंबंधीत असून तूळेत शुभग्रह असता संतती हुशार, अभ्यासू व आज्ञाधारक असते. यांचे मुलावर फार प्रेम असते. एखादी संतती कलेमध्ये प्रावीण्यही मिळविते.पंचमात तूळ रास पापग्रहयुक असता हे लोक लैंगिक दृष्टया आक्रमक असतात. यांचे गुप्त प्रेमसंबंध व विवाहाखेरीज, एखादे प्रकरणही असते. तूळेमध्ये शुभग्रह असल्यास मात्र यांचे आचरण शुद्ध असते.पंचमात तूळ रास असल्याचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे हे लोक खेळामध्ये फार प्रवीण असतात. निरनिराळ्या क्षेत्रातील खेळाडूंच्या पत्रिका पाहिल्यास पंचमावर तूळ रास असलेल्या कुंडल्या जास्त आढळतात.यांचे शिक्षण फार उत्तम झालेले आढळते. तूळ रास जरी कलेच्या प्रांतात व्यक्तीला यशस्वी करीत असली तरी शुक्राच्या विविध अवस्था अभ्यासल्यास हे लोक शास्त्रीय, वाणिज्य या शाखेमध्येही चांगले चमकताना आढळतात.
यांचा गणित विषय चांगला आढळतो. फिजिक्स-केमिस्ट्री या विषयात हे पारंगत असतात. त्याचप्रमाणे न्यायशास्त्रातही हे तरबेज असतात.हे लोक बुद्धिबळातही तरबेज असतात. शुक्र हा पुष्कळ वेळा बुधाजवळ असल्याने बुध-शुक्र युती व्यक्तीस अनेक क्षेत्रात तरबेज बनवते. नवनवीन क्षेत्रे
हे काबीज करतात.

३८) जन्मकुंडलीमध्ये प्रथमस्थानात  मिथुन रास असता षष्ठात वृश्चिक रास येत असल्याने --
शत्रू खूप असतात व ते खतरनाक असू शकतात कित्येक वेळा आपले मित्रच शत्रुत्व करतात. त्याचप्रमाणे आपली भारआपल्याशी संघर्षाचा पवित्रा घेतात. हे शत्रुत्व स्वार्थातून निर्माण झालेले
ह्यांना हाताखालचे लोक चांगले मिळत नाहीत. ते चहाडखोर असतात. कित्येक वेळा यांचे बोलणे जहरी टीकेसारखे झोंबरे असते वैरभाव जन्मतो. ह्या राशीत पापग्रह असता ह्यांच्या विरोधकांचा नायनाट होतो अतिशय धूर्तपणाने हे त्यांचा काटा काढतात. नोकरवर्गाकडून त्रास व लबाडी होते. त्यांत ह्यांचे आर्थिक नुकसान होते.
वृश्चिकेत पापग्रह असता मामांकडून फायदा व्हायच्या ऐवजी त्रासच होतो.त्यांच्याकडून चुकीचा सल्ला मिळून नुकसान होते. ह्या लोकांना जननेंद्रिये वमूत्रनलिकेचे विकार होतात. अंडवृद्धी, गुह्यरोग, मूतखडा, मूळव्याध, गुल्मरोगया रोगांचा प्रादुर्भाव असतो. ह्यांना विषयवासना प्रचंड असते.
वृश्चिक रास रसायने, औषधे, विमा, मादक पेये, खाणी, लष्करी आयुधे,कत्तलखाने, चहा-कॉफी-तंबाखूचा व्यापार आदी गोष्टींशी संबंध दर्शविते.शस्त्रवैद्य, जासूस, शिपाई, न्हावी, छापखानावाले, इंजिनियर्स, रेल्वे-ड्राइव्हसे,स्मशानात कार्य करणारे, यंत्राशी संबंधीत व्यवसाय करणारे वृश्चिक राशी
षष्ठात असताना आढळतात.

३९) जन्मकुंडलीमध्ये प्रथमस्थानात  मिथुन रास असता सप्तमात धनु रास येत असल्याने - सुंदर , सद्गुणी , प्रामाणिक व पतिव्रता स्त्री दर्शविते ; स्त्रीच्या कुंडलीत पती उदारहृदयी , सत्यप्रिय , मनमोकळा , आनंदी व धर्मशील दर्शविते . गुरूच्या ह्या राशीत अनेक उत्तम गुण असल्याने स्त्री सुस्वभावी मिळते . तिला कोणत्याही स्थितीत ठेवले तरी चेहऱ्यावरचा आनंद लोपणार नाही . त्याचप्रमाणे घरामध्ये शांती व समाधान राखण्यासाठी प्रयत्नशील राहाते . ह्यांच्या स्त्रीच्या अंगी जन्मजात सुसंस्कृतपणा असतो . सामाजिक कार्यात भाग घेणेही तिला आवडते . मैदानी खेळ वा मोकळ्या जागेत फिरणे , व्यायाम - योगासने करून प्रकृती तंदुरुस्त ठेवणे ह्या गोष्टी स्वभावात व कृतीत आढळतात . येथे शुभग्रह असता अधिक उत्तम फल पाहावयास मिळते . गुरू सारखा ग्रह मात्र भौतिक सुखाकडे पाठ फिरवणारे जीवनसाथी दर्शवितो . विवाहानंतर नोकरीत बढतीचे योग वा धंद्यामध्ये प्रगती असते .
धनुरास दूषित असता क्षय अथवा दम्याने आजारी असते . वर सांगि तलेल्या गोष्टींचा अभाव असतो . दयेची जागा निष्ठुरता घेते तर धर्मशीलतेची जागा नास्तिकता घेते . बुद्धिहीनता हा शब्द जर व्यापक अर्थाने घेतला तर असे म्हणता येईल की सदसद्विवेक बुद्धी नसते . सप्तमात ही रास बिघडल्यास पुत्रहीनता दर्शविते . जुळी संतती होण्याचा योग असतो . द्विभार्यायोग घडतो
धंद्यामध्ये ही रास फार उत्तम यश देते . इतरांशी संबंध फार जिव्हाळ्याचे असतात . ह्यांचे प्रवास व तीर्थयात्रा विपुल होतात .२१ व्या किंवा ३० व्या वर्षी विवाह होतो .

४०) जन्मकुंडलीमध्ये प्रथमस्थानात  मिथुन रास असता अष्टमात  मकर रास असता व शनी बलवान असल्यास दीर्घायुष्य लाभते . ह्यांना संधिवाताचा त्रास होऊन वृद्धापकाली मृत्यू येतो . शनी जर दूषित असेल तर मात्र दम्यासारखे दीर्घकालीन विकार होतात किंवा पक्षाघाताचा रोग होतो . नातेवाईक ह्यांच्या मृत्यूची वाट पाहात असतात. मकर ही राशी पाण्याशी संबंधीत असल्याने पाण्यात बुडून मृत्यू ह्या व्यक्तींना परदेशातही मृत्यू येतो किंवा तीर्थक्षेत्री अंत होतो . ह्यांना शनीच्या दुसन्या अगर तिसऱ्या भ्रमणात म्हणजे ५९  व ८९ ह्या वर्षी मृत्यू येण्याची शक्यता असते . या राशीत चंद्र असता बालारिष्ट आणतो

४१) जन्मकुंडलीमध्ये प्रथमस्थानात  मिथुन रास असता मकर रास भाग्यात येत असल्याने-- बौद्धिक यश मिळते . हे लोक उत्तम शिक्षण घेतलेले असतात . कायदा , तत्वज्ञान या क्षेत्रात हे शिक्षण घेतात  नवीन शाखे यांना  आवडतात . त्यामुळे विज्ञान , टेक्नॉलॉजी , कॉम्प्युटर इंजिनियरिंग , इलेक्ट्रॉनिक्स , अंतरिक्ष शास्त्र यांमध्येही हे अवगामन करतात . हे शिक्षणासाठी परदेशगमन करतात 

४२) यांचा भाग्यकारक शनी असल्याने उदय उशीराच होतो . आयुष्याच्या उत्तरार्धात हे अधिक यशस्वी होतात . शनीच्या एका भ्रमणानंतर भाग्य पालटते व ३६ च्या सुमारास स्थैर्य येते . नीलमणी हे यांचे भाग्यकारक रत्न असून निळा रंग उपकारक असतो . ८ हा भाग्यांक महत्त्वाच्या गोष्टींमध्ये उपयोगी ठरतो . वृद्धांकडून फायदे होतात .धार्मिक क्षेत्रात हे ज्ञानाची कास धरतात . भक्तियोग यांना पसंत नसतो . ही बौद्धिक राशी असल्याने बुद्धिप्रामाण्यावर जास्त असतो

४३) जन्मकुंडलीमध्ये प्रथमस्थानात  मिथुन रास असता दशमात मीन रास येत असल्याने -- मनुष्यास बुद्धिमत्ता , अंतःस्फूर्ती , कल्पनाशक्ती , चंचलता या गुणांना अनुसरून व्यवसायधंद्याची वा नोकरीची संधी मिळते . ह्या लोकांना नोकरी सारखी बदलण्याची संवय असते . ह्या राशीचा मालक गुरू असल्याने बौद्धिक कामे करण्यात हे गुंतलेले असतात . गुरूने दर्शित धंदे हे लोक करतात . त्याचप्रमाणे मीन राशीदर्शित धंदेही पुढीलप्रमाणे आहेत :-मंत्री , मॅनेजिंग डायरेक्टर , चेअरमन , शास्त्रज्ञ , फिल्म कंपनीतील लोक , हॉस्पिटल - डॉक्टर्स , नर्सेस , जेलर्स , तुरुंगाधिकारी , सॅनिटोरियम वर्कर्स , अनाथाश्रम चालविणारे , कवी , गूढविद्या जाणणारे , प्रवास एजंट , पेट्रोलादी तेले विकणारे , शिक्षक , प्रोफेसर , अकाउंटंट , बैंकर्स , लेखक , नौदल वर्कर्स , क्लीअरिंग एजंटस् , व्यापारी , कस्टम , पोर्ट ट्रस्ट , फिशरीज् यांच्याशी संबंधीत , तत्त्ववेत्ते , जरनॅलिस्ट , देवळात काम करणारे , पाणबुडे इत्यादी .
मीन राशी दूषित असता मनुष्य फार चंचल असतो . एका नोकरीत स्थिर राहात नाहीत , वारंवार बदल होत असतात . काही काळ हलकी कामे करावी लागतात . गुरू दूषित असल्यास फारशी प्रगती नसते .विवाहानंतर ह्यांना स्थैर्य मिळालेले व भरभराट झालेली आढळते . नोकरीत बढतीही मिळते . स्त्री नोकरी करणारी असू शकते .

४४) जन्मकुंडलीमध्ये प्रथमस्थानात  मिथुन रास असता,  अकराव्या स्थानी मेष रास येत असल्याने  असता यांचे मित्र उतावळे , साहसी , शीघ्रकोपी , धैर्य व धाडसाची कामे करणारे व उत्साही असतात . हे मित्र मनापासून प्रेम करीत असून जिवाला जीव देतात . परंतु ह्यांच्यात भावनाप्रधानता असते . एखादी गोष्ट मागितली की हवी असते . विरोध सहन होत नाही . त्यामुळे अशा मित्रांना सांभाळणे म्हणजे कसरत असते . ते लष्करात , पोलिसांत किंवा वैद्यकीय व्यवसायात असू शकतात
ह्या लोकांना नोकरीखेरीज इतर क्षेत्रांत साहसाच्या , बुद्धिमत्तेच्या जोरावर लाभ मिळतात . आवश्यक तो उत्साह व धाडस यांच्याकडे असते . यांचे लाभही अचानक व भरपूर असतात . यांच्या इच्छा ताबडतोब व लवकरात लवकर पुऱ्या व्हाव्यात अशी इच्छा असते . अन्यथा हे निराश होतात . बाजारात आलेली नवीन वस्तू यांना हवी असते . पोलिसस्टेशनमध्ये यांच्या अनेक ओळखी असतात . त्यांच्यामार्फत यांची अनेक कामे होतात .
ही रास दूषित असल्यास मित्र गुन्हेगारी जगतात वावरणारे असून यांनाही त्याच मागी लाभ होत असतात , स्वतं . धंद्यामध्ये असल्यास कामगारांचा त्रास यांना सहन करावा लागतो . इच्छापूर्ती होत नसल्याने स्वभाव चिडचिडा बनतो . बडीलबंधू शत्रुत्व करतो . प्रकृतीच्या अस्वास्थ्याने अनेक योजना बारगळतात . मित्र धोकेबाज निपजतात .

४५) जन्मकुंडलीमध्ये प्रथमस्थानात  मिथुन रास असताबाराव्या स्थानी वृषभरास  येत असल्याने,---     मनुष्य चैन व ऐषारामासाठी धन खर्च करतो . ह्यांना स्त्रियांचा नाद फार असतो . विवाहित खीखेरीज एखादी रखेली कायमची असते. मनसोक्त मजा करणे , सिनेमा - नाटके पाहाणे , रेसकोर्सवर घोडे खेळाणे , दारूवाजी करणे , जुगार खेळगे , निरनिराळे खेळ खेळणे यावर ह्यांचा खूप पैसा जातो . शिक्षणासाठीही हे खूप खर्च करतात . परदेशात उच्च शिक्षणा करिता हे जातात . खेळाडू म्हणूनही परदेशगमन होते , लैंगिक जीवन अतृप्त असतं . शुक्र चांगला असल्यास व वृषभ रास शुद्ध असल्यास डोळ्यांत तेज असते . यांना सट्टयामध्ये नुकसान होते परंतु शेअर्समधील गुंतवणूक फायदेशीर ठरते . शुक्र शुद्ध असल्यास भक्तियोगामधून परमार्थ साधतात . यांची एखादी संतती परदेशात जाते . दूषित शुक्र वा वृषभ रास संततीचा मृत्यू वा व्यसनी  संतती देतो . मंत्रविद्या व इतर गूढविद्या शिकतो दूषित वृषभ राशी प्रेमप्रकरणात दुःख , निराशा व विभक्तपणा दर्शविते 


No comments:

Post a Comment